जिल्हास्तरीय तायकांडो स्पर्धेत संस्कार स्पोर्ट्स क्लब, श्रीरामपूरला यश
श्रीरामपूर(प्रतिनिधी) :अहमदनगर पोखर्डी येथे छत्रपती स्पोर्ट्स क्लब आयोजित जिल्हास्तरीय तायकांडो स्पर्धेमध्ये संस्कार स्पोर्ट्स क्लब,श्रीरामपूरच्या खेळाडूंनी यश संपादन केले.या स्पर्धेमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत राज बारहाते (सुवर्ण),अनन्या शिंदे (रोप्य),अर्णव पगारे (कास्य),सम्राट फंड(कास्य),प्रेमकुमार आठरे (कास्य) यांनी पदक प्राप्त केले . सर्व सहभागी व विजयी खेळाडूंनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी करून श्रीरामपूर शहराचे व परिसराचे नाव खऱ्या अर्थाने उंचावले. या स्पर्धेसाठी जिल्हाभरातून ३०० ते ३५० विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धा आयोजकांनी विशेष करून संस्कार स्पोर्ट्स क्लबचे अभिनंदन केले.यशस्वी खेळाडूंचे ह.भ. प.आचार्य शुभम महाराज कांडेकर,श्री करणदादा ससाणे, दैनिक राष्ट्र सह्याद्री संपादक श्री करण नवले,ॲड.गावडे ,श्री विजय खरात, श्री सचिन बडदे,श्री गणेश शिंदे इत्यादी मान्यवरांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. योग्य मार्गदर्शन व कठोर परिश्रमाच्या जोरावर खेळाडू आपले करिअर घडू शकतो,असे मोलाचे मार्गदर्शन महाराजांनी खेळाडूंना केले.शिवकालीन खेळ व शिवकालीन बालसंस्कार खऱ्या अर्थाने संस्कार स्पोर्ट्स क्लब मध्ये दिले जाते,असे प्रतिपादन श्री करणदादा ससाणे यांनी केले. संस्कार स्पोर्ट्स क्लब गेल्या ७ वर्षापासून शिवकालीन खेळ संस्कृती व बाल संस्कार याची खऱ्या अर्थाने जोपासना करीत आहे.श्रीरामपूरातील व परिसरातील जास्तीत जास्त विद्यार्थी,विद्यार्थिनींनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आव्हान प्रशिक्षक श्री प्रवीण कुदळे यांनी केले.सर्व यशस्वी खेळाडूंना गणेश कुदळे व मुख्य प्रशिक्षक शिवभक्त श्री प्रवीण कुदळे यांचे मार्गदर्शन लाभले.
Post a Comment