श्रीरामपूर प्रतिनिधी- उपप्रादेशिक परिवहन कार्यालया अंतर्गत येणाऱ्या, कोपरगाव हद्दीतील रेल्वे मालधक्क्यावर जेव्हा जेव्हा रॅक येतो, त्यावेळी काही हुंडेकरी जाणीवपूर्वक, स्थानिक कोपरगांव तालुका ट्रक मालक चालक व ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या गाड्यांना डावलून. साईराजा रोडवेज व साईचैतन्य रोड लाईन्सच्या .७० ते ८० गाडया क्षमतेपेक्षा जास्त माल घेवून वाहतुक करीत आहे. या ओव्हरलोड वाहतुक करून, स्थानिक युनियनवर अन्याय करीत असल्याने. अशा प्रकारच्या ओव्हरलोड वाहतूकीवर, श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार, संबंधितांवर व त्यांचे गाडयांवर कडक कारवाई करून. शासकीय नियमानुसार दंडासह, जप्तीची कारवाई करावी. अशी मागणी कोपरगांव तालुका ट्रक मालक चालक व ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच संबंधितांवर न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई न झाल्यास ,श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी जे डी डगळे यांना, निवेदनाद्वारे युनियनने दिला आहे. सदरचे निवेदन देण्या वेळी, कोपरगांव तालुका ट्रक मालक चालक व ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष आयुब कच्ची,अनिल हरकल,किरण वैद्य,वसीम सय्यद,प्रशांत पानकडे,संदीप कु-र्हे आदींसह कोपरगांव तालुका ट्रक मालक चालक व ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
Post a Comment