Latest Post

नाशिक प्रतिनिधी - गावठी कट्टे बाळगून दरोड्याच्या तयारीत असणारे व पूर्वी अहमदनगर जिल्ह्यातही गुन्हे दाखल असणा-या सराईत तीन चोरट्यांना पकडण्यात आले आहे. ही कारवाई पेट्रोलिंग करताना चोपडा (जि.जळगाव) तालुक्यात परिक्षेत्र नाशिक यांच्या आयजीच्या विशेष पथक व चोपडा ग्रामीण पोलिस अशा दोन्ही पथकांनी संयुक्तपणे शनिवारी (दि.२८) ही महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे.गणेश बाबासाहेब केदारे (रा.पाडळी ता.पाथर्डी जि.अहमदनगर ), कालीदास दत्तात्रय टकले (रा.हरताला ता.पाथर्डी,जि.अ.नगर), विकाश आप्पासाहेब गिरी ( रा.पाडळी ता.पाथर्डी,जि.अ.नगर) अशी पकडण्यात असलेल्यांची नावे असून, उर्वरित उमर्टी ( मध्यप्रदेश) येथील दोघे फरार झाली आहेत.नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बीजी शेखर पाटील यांच्या

मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार आयजी पथकातील पीआय बापू रोहम, एपीआय सचिन जाधव,एएसआय बशिर तडवी, हेकाॅ रामचंद्र बोरसे, सचिन धारणकर, शकील शेख, पोना मनोज दुसाने, कुणाल मराठे, प्रमोद मडलीक, नारायण लोहरे आणि चोपडा ग्रामीणचे पीआय कुनगर, पीएसआय अमरसिंग वसावे, हेकाॅ लश्मण शिगाणे, पोना प्रमोद पारधी आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.याबाबत समजलेले माहिती अशी की, या कारवाईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले असता, त्याची पोलिसांनी झडती घेतली, या दरम्यान त्याच्याकडे ३ गावठी कट्टे, १४ राउंड, १ वस्तरा व एक स्कॉर्पिओ कार असा एकूण ६ लाख ३४ हजार १०० रु. किंमतीचा मुद्देमाला ताब्यात घेतला. चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात CCTNS गु.र.न. ६१/२०२२ भादवी. कलम ३९९,४०२ सहा आर्म अँक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आयजी पथकाने पुढील कारवाईसाठी तिन्ही आरोपींना चोपडा ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

श्रीरामपूर ( शौकतभाई शेख) -   श्रीरामपूर तालुका मेडिकल असोसिएशनचा सन २०२२-२३ नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळ्याचे आयोजन मावळत्या पदाधिकाऱ्यांनी येथील व्ही.आय .पी गेस्ट हाऊस मध्ये गुरुवार दिनांक २६-५-२२ रोजी संध्याकाळी ७-०० वाजता प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संजय घोगरे, अहमदनगर जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अविनाश आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आले होते .. याकार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आय.एम.ए .इलेक्ट महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ.रविद्र कुटे यांनी भुषविले तर मावळते अध्यक्ष डॉ. सलीम सिकंदर शेख बैतुशशिफा हॉस्पिटल श्रीरामपूर यांनी पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक करुन कार्यक्रमाची सुरुवात केली. नवनिर्वाचित उपाअध्यक्ष डॉ.राजेंद्र लोंढे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिल, मावळते सेक्रेटरी डॉ.विवेक बागले यांनी २०२१-२२ मधे केलेल्या कामाचा अहवाल व आढावा सादर केला. अध्यक्ष डॉ .सलीम शेख यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा नावे व पदे जाहिर केली त्यात  १) अध्यक्ष  डॉ.दिलीप शेजवळ, २) उपाध्यक्ष डॉ.राजेंद्र लोंढे,३) सेक्रेटरी - डॉ तौसिफ शेख, ४) खजिनदार::- डॉ.संतोष मोरे टाकळीभान यांच्या नावाची घोषणा करण्यात येऊन  या सर्वांचा पदाच्या मेडल्स मावळते अध्यक्ष डॉ.सलीम यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. शेजवळ, उपाध्यक्ष डॉ. लोंढे,

सेक्रेटरी डॉ.तौसिफ शेख व डॉ.विवेक बागले,खजिनदार डॉ.संतोष मोरे यांचा डॉ.मच्छिंद्र त्रिभुवन यांनी शाल,पुष्प देऊन सत्कार केला, या कार्यक्रमात अहमदनगर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे, क्षयरोग अधिकारी डॉ.अविनाश आहेर,डॉ. सौ.सारिका देशपांडे, डॉ. रविंद्र कुटे,या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून मावळत्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक करुन नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या, तसेच कार्यक्रमात आय.एम.ऐ अध्यक्ष डॉ .संकेत मुंदडा, आय. एम.ऐ सेक्रेटरी डॉ.केतन बधे ,डॉ. के.डी.मुंदडा. डॉ.अजित देशपांडे, डॉ.राजाराम जोंधळे,डॉ.सातपुते , डॉ.प्रशांत चव्हाण,डॉ. खपके, डॉ. योगेश बंड , डॉ, कृष्णा बाविस्कर, डॉ.अजित घोगरे, डॉ.आपासाहेब लबडे,जळगांव येथील डॉ.कपील पाटील ,डॉ.स्वपनिल पुरनाळे , डॉ.विजय चुडीवाल डॉ. बैरागी, डॉ. मयुरेश कुटे व मित्र ,बॅंकेचे अधिकारी अकबरभाई शेख, इक्बाल काकर सर, सामाजिक कार्यकर्ते झाकीरभाई शहा . ई.मान्यवर उपस्थित राहुन मावळत्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या,कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन डॉ‌.मच्छिंद्र त्रिभुवन यांनी केले,नवनिर्वाचित सेक्रेटरी डॉ. तौफिक शेख यांनी आभार मानले..एका उत्कृष्ट कार्यक्रमाचची सांगता आनंदात झाली.

श्रीरामपूर प्रतिनिधी - दौंड पुणे देऊळगाव राजे -सिद्धेश्वर हॉल या ठिकाणी घेण्यात आलेल्या उन्हाळी कराटे शिबिरामध्ये पुणतांबा, चितळी, चांगदेव नगर, जळगाव, श्रीरामपूर, देऊळगांव राजे येथील 18 विद्यार्थ्यांनी मिळवली शो दान ब्लॅक बेल्ट डिग्री.या शिबिराचे आयोजन संघर्ष स्पोर्ट्स असोसिएशन च्या वतीने अधिकृत परीक्षक /

मार्गदर्शक शिहान -मीनानाथजी भोकरे सर तसेच सचिन पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते, या शिबिरामध्ये एकूण 5तालुक्यातील 50 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता,32 विद्यार्थी ट्रेनिंग साठी बसले होते,या परीक्षेत योगिता सुनिल ननावरे (प्रथम क्रमांक) अस्मि राहुल शिंदे (द्वितीय क्रमांक )पटकवून बाजी मारली, शो दान पदवी मिळविलेले विद्यार्थी -मैथली अमर गोडसे, श्रेया नारायण दिवटे, साक्षी बाबासाहेब शेटे,सायली जालिंदर वैराळ, सायली बाबासाहेब घाडगे, मयुरी साईनाथ बनकर, अयान रफिक शेख, सत्यम बाबासाहेब शेटे, कृष्णा अनिल फोफसे, शिवम संजय घोगरे, पवन किरण साळुंखे, आशिष रविंद्र कडलग, अधिराज यशवंत फोफसे, रुद्र श्रवण उकांडे, साहिल रावसाहेब शिंदे, अच्युत दत्तात्रय थोरात. या शिबाराचे उदघाटन संदीप (शेठ )नय्यर यांच्य हस्तेझाले, तर शिबिराचा निरोप समारोप नारायण गिरमकर सर तसेच शहाजी काका औताडे यांच्या हस्ते पार पडला. हे शिबीर यशस्वी होण्यासाठी अमोल माळी सर, सचिन जाधव सर, महेश गराडे सर, सचिन शेडगे, आदित्य माळी, रोहन घोडके, दिपीका पोळ, रेश्मा शिंदे, ऐश्वर्या जोगदंड, श्रावणी शेजूळ, साक्षी बावधाने, साक्षी त्रिभुवन, प्रतिभा गायकवाड, आदिनाथ उकांडे, महेश कुऱ्हाडे, यांनी परिश्रम घेतले. 

अहमदनगर प्रतिनिधी:- सदरील घटनेतील तक्रारदार हे शासकीय कंत्राटदार असून त्यांनी केलेल्या ग्रामपंचायत चिंचोली गुरव तालुका संगमनेर येथील मुस्लिम स्मशानभुमी चे वॉल कंपाऊंड सुशोभीकरणाचे कामाची पाहणी करून एमबी करून देण्याच्या मोबदल्यात कामाची रक्कम ३ लाख रूपये असुन त्या रक्कमेच्या ५ टक्के प्रमाणे १५०००(पंधरा हजार रूपये)तसेच क्वालिटी कंट्रोलचे ४०००(चार हजार रूपये)असे एकूण १९०००(एकोणावीस हजार रूपये) लाचेची मागणी आरोपी लोकसेवक श्री.संजय गोविंदराव ढवण(वय-५७ वर्ष रा.श्रीरामपूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर) यांनी करून सदर लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्वतः पंचायत समिती कार्यालय येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कक्षात संगमनेर येथे स्वीकारली म्हणून त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.तसेच फोटोग्राफ घेण्यात आलेले आहे.सदरची कारवाई श्री.सुनील कडासने पोलीस अधीक्षक ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्र नाशिक,श्री.एन.एस.न्याहळदे अप्पर पोलीस अधीक्षक ला.प्र.वि.नाशिक परिक्षेत्र नाशिक,यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी मीरा आदमाने पोलीस निरीक्षक अँन्टी करप्शन ब्युरो नाशिक, पोलीस नाईक प्रवीण महाजन,पोलीस नाईक नितीन कराड,पोलीस नाईक प्रभाकर गवळी,चालक पो.हवालदार संतोष गांगुर्डे यांनी केली.


बेलापूर (वार्ताहर) - श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील शेतकरी कुटूंबातील व पत्रकार देविदास देसाई यांच्या मातोश्री गं.भा.अंजनाबाई अगस्ती देसाई (वय-95) यांचे काल सोमवार दि.23 मे रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास वृद्धपकाळाने निधन झाले त्यंचेवर आज मंगळवार दि. 24 मे रोजी सकाळी आठ वाजता बेलापूर येथे अंत्यसंस्कार होत आहेत.

त्यांचे पश्चात चार विवाहीत मुलगे, तीन विवाहीत मुली, सुना, जावई, नातवंडे, नातसुना व परतवंडे असा मोठा परीवार आहे. अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे मार्गदर्शक, बेलापूर पत्रकार संघाचे सचीव व प्रगतशिल शेतकरी देविदास देसाई, बेलापूर एज्यूकेशन सोसायटीच्या कमालपूर येथील माध्यमिक विद्यालयाचे शिक्षकसेवक भागवत देसाई (सर), एस.टी महामंडळाचे वाहक कैलास उर्फ बाळासाहेब देसाई व गुजरात येथील बी.एस.एफचे सेवा निवृत्त सैनिक मेजर बाबासाहेब देसाई यांच्या त्या मातोश्री होत.

तसेच बीड जिल्हा परीषदेचे लेखा परीक्षक अनिरूद्ध देसाई व नुकतेच मृद व जलसंधारणची एम.पी.एस.सी परीक्षा उत्तीर्ण झालेले बेलापूर येथील अभिषेक देसाई यांच्या त्या आजी होत. त्यांचेवर आज मंगळवार दि.24 मे रोजी सकाळी आठ वाजता बेलापूर शिवारातील सातभाई वस्तीजवळील प्रवरा नदीतीरावर अंत्यसंस्कार होत आहेत. 

श्रीरामपूर प्रतिनिधी-श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात धक्कादायक घटना घडली आहे. ज्यात कोल्हापूर येथील मोहिनी विद्यापीठात ज्यु शास्त्राचा प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेला. विजय मच्छिंद्र बर्डे हा २ दिवसांपूर्वी,  चितळी येथे, माहेरी आलेली पत्नी शैला बर्डे हिस घेण्यासाठी आला होता. त्यावेळी आप आपसात झालेल्या वादातून, विजय  बर्डे याने, दुपारी दीड वाजेच्या सुमारास, शैला हिच्या डोक्यात फरशी टाकून तिला जखमी करून. विजय बर्डे हा फिर्याद देण्यासाठी तालुका पोलीस ठाण्यात आला असता. दुपारी २ ते अडीच वाजे दरम्यान आरोपी विजय बर्डे याने त्याच्या जवळील चाकूने, अचानक पणे अंदाधुंद वार करण्यास सुरुवात केल्याने.तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक संतोष रामकीसन बडे यांच्या हाताला व  तालुका पोलीस ठाण्यात चारित्र पडताळणीसाठी आलेल्या,पाथरवाला जिल्हा परिषद शाळा नेवासा,राहणार टाकळीभान येथील शिक्षक किशोर शीवाजी शिंदे यांच्या डोक्याला व पाठीला चाकू लागल्याने हे गंभीर जखमी झाले आहे . जखमींना साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून. सदरच्या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलीस ठाण्यात घडलेल्या घटने संदर्भात माहिती मिळताच. डीवायएसपी संदीप मिटके यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात घडलेल्या घटने संदर्भात, सीसीटीव्ही फुटेज पाहून पुढील कारवाई केली जानार आसल्याचे व पोलीस फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

पुणे प्रतिनिधी- बेंगळुरू येथे दिनांक २४ एप्रिल ते ३ मे दरम्यान खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत देशभरातील १८८ विद्यापीठांमधील ४ हजार ५२९ खेळाडू सहभाग नोंदवला होता.या गेम्स मध्ये २० खेळांचे आयोजन करण्यात आले होते. वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघाने सांघिक विजेतेपद पटकावले.वेटलिफ्टिंग संघाने या स्पर्धेत २ सुवर्ण,१ रौप्य तर ४ कांस्यपदकाची कमाई केली. वैष्णव ठाकूर व चिराग वाघवले यांनी सुवर्ण,महेश अस्वले रौप्यपदक तर गणेश वायकर धैर्यशील साळुंके,तृप्ती माने व योगिता खेडकर यांनी कांस्यपदकाची कमाई केली.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघाने खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स मध्ये एकूण ३९ पदके या मध्ये ८ सुवर्ण,१४ रोप्य व १७ कांस्यपदक पटकावून देशात आठवा क्रमांक पटकावला.वेटलिफ्टिंग संघाचे संघ व्यवस्थापक म्हणून प्रा श्री सुभाष देशमुख(एस एस जी एम कॉलेज कोपरगाव) व डॉ राहुल भोसले(अगस्ती कॉलेज,अकोले) यांनी काम पाहिले तर संघ मार्गदर्शक म्हणून प्रा श्री विजय देशमुख(बाबूजी आव्हाड महाविद्यालय, पाथर्डी) यांनी काम पाहिले.यशस्वी संघाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन करमळकर,विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ दीपक माने यांनी खेळाडूंचे व संघाचे अभिनंदन केले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget