नाशिक प्रतिनिधी - गावठी कट्टे बाळगून दरोड्याच्या तयारीत असणारे व पूर्वी अहमदनगर जिल्ह्यातही गुन्हे दाखल असणा-या सराईत तीन चोरट्यांना पकडण्यात आले आहे. ही कारवाई पेट्रोलिंग करताना चोपडा (जि.जळगाव) तालुक्यात परिक्षेत्र नाशिक यांच्या आयजीच्या विशेष पथक व चोपडा ग्रामीण पोलिस अशा दोन्ही पथकांनी संयुक्तपणे शनिवारी (दि.२८) ही महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे.गणेश बाबासाहेब केदारे (रा.पाडळी ता.पाथर्डी जि.अहमदनगर ), कालीदास दत्तात्रय टकले (रा.हरताला ता.पाथर्डी,जि.अ.नगर), विकाश आप्पासाहेब गिरी ( रा.पाडळी ता.पाथर्डी,जि.अ.नगर) अशी पकडण्यात असलेल्यांची नावे असून, उर्वरित उमर्टी ( मध्यप्रदेश) येथील दोघे फरार झाली आहेत.नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बीजी शेखर पाटील यांच्या
मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार आयजी पथकातील पीआय बापू रोहम, एपीआय सचिन जाधव,एएसआय बशिर तडवी, हेकाॅ रामचंद्र बोरसे, सचिन धारणकर, शकील शेख, पोना मनोज दुसाने, कुणाल मराठे, प्रमोद मडलीक, नारायण लोहरे आणि चोपडा ग्रामीणचे पीआय कुनगर, पीएसआय अमरसिंग वसावे, हेकाॅ लश्मण शिगाणे, पोना प्रमोद पारधी आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.याबाबत समजलेले माहिती अशी की, या कारवाईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले असता, त्याची पोलिसांनी झडती घेतली, या दरम्यान त्याच्याकडे ३ गावठी कट्टे, १४ राउंड, १ वस्तरा व एक स्कॉर्पिओ कार असा एकूण ६ लाख ३४ हजार १०० रु. किंमतीचा मुद्देमाला ताब्यात घेतला. चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात CCTNS गु.र.न. ६१/२०२२ भादवी. कलम ३९९,४०२ सहा आर्म अँक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आयजी पथकाने पुढील कारवाईसाठी तिन्ही आरोपींना चोपडा ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Post a Comment