सेक्रेटरी डॉ.तौसिफ शेख व डॉ.विवेक बागले,खजिनदार डॉ.संतोष मोरे यांचा डॉ.मच्छिंद्र त्रिभुवन यांनी शाल,पुष्प देऊन सत्कार केला, या कार्यक्रमात अहमदनगर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे, क्षयरोग अधिकारी डॉ.अविनाश आहेर,डॉ. सौ.सारिका देशपांडे, डॉ. रविंद्र कुटे,या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून मावळत्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक करुन नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या, तसेच कार्यक्रमात आय.एम.ऐ अध्यक्ष डॉ .संकेत मुंदडा, आय. एम.ऐ सेक्रेटरी डॉ.केतन बधे ,डॉ. के.डी.मुंदडा. डॉ.अजित देशपांडे, डॉ.राजाराम जोंधळे,डॉ.सातपुते , डॉ.प्रशांत चव्हाण,डॉ. खपके, डॉ. योगेश बंड , डॉ, कृष्णा बाविस्कर, डॉ.अजित घोगरे, डॉ.आपासाहेब लबडे,जळगांव येथील डॉ.कपील पाटील ,डॉ.स्वपनिल पुरनाळे , डॉ.विजय चुडीवाल डॉ. बैरागी, डॉ. मयुरेश कुटे व मित्र ,बॅंकेचे अधिकारी अकबरभाई शेख, इक्बाल काकर सर, सामाजिक कार्यकर्ते झाकीरभाई शहा . ई.मान्यवर उपस्थित राहुन मावळत्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या,कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन डॉ.मच्छिंद्र त्रिभुवन यांनी केले,नवनिर्वाचित सेक्रेटरी डॉ. तौफिक शेख यांनी आभार मानले..एका उत्कृष्ट कार्यक्रमाचची सांगता आनंदात झाली.
श्रीरामपूर तालुका मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न
श्रीरामपूर ( शौकतभाई शेख) - श्रीरामपूर तालुका मेडिकल असोसिएशनचा सन २०२२-२३ नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळ्याचे आयोजन मावळत्या पदाधिकाऱ्यांनी येथील व्ही.आय .पी गेस्ट हाऊस मध्ये गुरुवार दिनांक २६-५-२२ रोजी संध्याकाळी ७-०० वाजता प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संजय घोगरे, अहमदनगर जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अविनाश आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आले होते .. याकार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आय.एम.ए .इलेक्ट महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ.रविद्र कुटे यांनी भुषविले तर मावळते अध्यक्ष डॉ. सलीम सिकंदर शेख बैतुशशिफा हॉस्पिटल श्रीरामपूर यांनी पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक करुन कार्यक्रमाची सुरुवात केली. नवनिर्वाचित उपाअध्यक्ष डॉ.राजेंद्र लोंढे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिल, मावळते सेक्रेटरी डॉ.विवेक बागले यांनी २०२१-२२ मधे केलेल्या कामाचा अहवाल व आढावा सादर केला. अध्यक्ष डॉ .सलीम शेख यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा नावे व पदे जाहिर केली त्यात १) अध्यक्ष डॉ.दिलीप शेजवळ, २) उपाध्यक्ष डॉ.राजेंद्र लोंढे,३) सेक्रेटरी - डॉ तौसिफ शेख, ४) खजिनदार::- डॉ.संतोष मोरे टाकळीभान यांच्या नावाची घोषणा करण्यात येऊन या सर्वांचा पदाच्या मेडल्स मावळते अध्यक्ष डॉ.सलीम यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. शेजवळ, उपाध्यक्ष डॉ. लोंढे,
Post a Comment