अहमदनगर प्रतिनिधी:- सदरील घटनेतील तक्रारदार हे शासकीय कंत्राटदार असून त्यांनी केलेल्या ग्रामपंचायत चिंचोली गुरव तालुका संगमनेर येथील मुस्लिम स्मशानभुमी चे वॉल कंपाऊंड सुशोभीकरणाचे कामाची पाहणी करून एमबी करून देण्याच्या मोबदल्यात कामाची रक्कम ३ लाख रूपये असुन त्या रक्कमेच्या ५ टक्के प्रमाणे १५०००(पंधरा हजार रूपये)तसेच क्वालिटी कंट्रोलचे ४०००(चार हजार रूपये)असे एकूण १९०००(एकोणावीस हजार रूपये) लाचेची मागणी आरोपी लोकसेवक श्री.संजय गोविंदराव ढवण(वय-५७ वर्ष रा.श्रीरामपूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर) यांनी करून सदर लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्वतः पंचायत समिती कार्यालय येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कक्षात संगमनेर येथे स्वीकारली म्हणून त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.तसेच फोटोग्राफ घेण्यात आलेले आहे.सदरची कारवाई श्री.सुनील कडासने पोलीस अधीक्षक ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्र नाशिक,श्री.एन.एस.न्याहळदे अप्पर पोलीस अधीक्षक ला.प्र.वि.नाशिक परिक्षेत्र नाशिक,यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी मीरा आदमाने पोलीस निरीक्षक अँन्टी करप्शन ब्युरो नाशिक, पोलीस नाईक प्रवीण महाजन,पोलीस नाईक नितीन कराड,पोलीस नाईक प्रभाकर गवळी,चालक पो.हवालदार संतोष गांगुर्डे यांनी केली.
Post a Comment