Latest Post

श्रीरामपूर-लेखक डॉ.सलीम सिकंदर शेख -साठी जकात अनिवार्य (कंपल्सरी) केलेली  आहेत. ज्यांच्याकडे  वर्षभर साडे बावन ५२.५ तोळे चांदी (सिल्व्हर) व साडेसात ७.५ तोळे सोने (गोल्ड) किंवा त्यांच्या किंमती एवढी रक्कम घरामध्ये वर्षभर वर्षातील सर्व गरजा भागून राहिलेली शिल्लक रक्कम वर २.५% (अडीच टक्के रक्कम) म्हणून ' जकात अनिवार्य (कंपल्सरी) केले आहेत.

जकात,घामाच्या, मेहनतीच्या,

कष्टाच्या किंवा चांगल्या कर्माच्या पैशातूनच दिली जाते,घेतली जाते.

 एक विशेष गोष्ट म्हणजे मस्जिद बांधण्यासाठी जकातीचा पैसा चालत नाही. मस्जिद बांधकाम हे लोकांच्या कष्टाच्या मेहनतीच्या, घामाच्या स्वखुशीने दिलेल्या पैशातूनच पवित्र मस्जिद चे काम (करतात) चाललेले असते व मजुरीचा खर्चही त्याच पैशातून भागवला जातो,कारण जकातीचा पैसा समाजातील पीडीत,गरीब, गरजुंसाठी आल्लाहाने वेगळाच ठेवला आहे.परंतु आजकल काही मुस्लिमद्वषी मिडियाने इस्लाम धर्माला काही खोट्या-नाट्या कुभांडांद्वारे इस्लामवर अनेक चुकीचे  दोष लावत या चांगल्या धर्मासही चुकीची वेगळीच ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे,मुस्लिमाबद्दल खोटं दाखवुन द्वेष पसरविण्याचे काम काही प्रसार माध्यमांतून चालू आहेत.

पवित्र कुरआन मध्ये सांगितले की ,"१) लाच घेतलेला व अवैध  मार्गाने केलेल्या कोणत्याही कब्जाचा पैसा ,(सु.नं.२ अल- बकराह अ.नं१८८) 

२) बेईमानीने ,बेकायदेशीररित्या कमावलेला पैसा (अल-ईमरान)

३) मूर्ती बनवणारा व मूर्तीचा धंदा करणारा,मूर्ती विकणारा याचा पैसा.(अल-मायदा.अ.नं.९०)

४) चोरी करणारा,चोरी करून त्याचा माल विकणारा,चोरीला सहकार्य करणारे,चोरीचा पैसा गडप करणाऱ्या (अल-मायदा अ.नं.३८)

५) दुकान व व्यावसायिक मापात मध्ये कमी जास्त प्रमाणात  घोटाळा केलेला पैसा चालत नाही.(अल-ततफीक नं.१३)

६) अनाथांचा मालामधुन पैसा कमावणारे व अनाथांचा माल गडफ करणाऱ्या लोकांचा.(अल-निसा अ.नं१)

७) अचानकपणे कमावलेला पैसा,धन लाभ,उदाहरणार्थ जुगार,सट्टा,मटका,लॉटरी, कमाईतून आलेला पैसा.(अल-मायदा अ.नं.९०)

८) दारूचा पैसा,दारु दुकानदार, दारु बनवणारा,दारु विकणारा, दारुचा धंदा करणारा,दारुच्या धंद्याला मदत करणारा यांचा पैसा .(अल-मायदा.नं.९०)

९) अश्लीलता आणि वेश्या व्यवसाय किंवा वेश्या व्यवसायाला प्रोत्साहन देणारा किंवा नाच-गाणे तमाशा डान्स बार इत्यादींचा पैसा चालत नाही .(अल-नूर.अ.नं.१९, ३३)

१०)ज्योतिष व्यवसाय,भविष्य वर्तवणारे,गैरकारभार करणाऱ्यांचा पैसा चालत नाही (अल-मायदाअ.नं. ९०)

(११) यांच्या व्यतिरिक्त पैशासाठी गडगंज संपत्ती गोळा करून घरातच साठवून ठेवणारे याला कंजूस म्हणतात आशांसाठी सक्त मना (मनाई)  केलेली आहेत,(सुरह अल-फुरकान अ.नं.६७),

(१२) भरपूर गडगंज पैसा कमावून घरी साठवून ठेवण्याला इस्लामने हराम ठरवलेले आहे. (अत-तौबा अ.नं.३४).

(१३) फिल्मवाले,चुकीचे कृत्य करणाऱ्या पासून जकात बिलकुल घेतली जात नाही.अशा लोकांनी स्वतःहून जकात म्हणून देवु नये कारण काही लोकांना याचे ज्ञान, माहीती नसते.#इत्यादींकडुन जकात चालत नाही व घेतलीही जात नाही,विशेष म्हणजे आशा लोकांनी जकात देऊ देखील नयेत.

## जकात कोणकोणासाठी चालते आणि कोणासाठी खर्च करावा :- --

१) आई वडील, नातेवाईक, अनाथ,पीडित शेजाऱ्यावर खर्च करावा.(अन-निसा अ.नं.३६)

२)  निराधार , अपंग लोकांवर खर्च करावा (अल-जारियात अ.नं.१०)

३) कर्ज देणे. बिगर इंटरेस्ट (बिन व्याजी) कर्ज  देणे.(कर्ज.हसना (विना व्याजदर) म्हणून देऊ शकतात),

(इस्लाममध्ये कर्ज देणे व घेणे दोन्ही निषेध आहेत, (अल-बकराहा अ.नं.२८).

 ४) जकात आदा करणे (अल -तौबा १०८)५) सदकात.आदा करणे अल-तौबा अ.नं १०८) 

जे लोक पीडित आहेत,एखाद्या नैसर्गिक आपत्तीने,भूकंपग्रस्त, धरणग्रस्त,त्सुनामी,एखादे जीवघेणे साथीचे आजार, दुष्काळी परिस्थिती,संकट परिस्थिती,इत्यादी संकटाने पीडितांसाठी,अनाथांच्या भल्यासाठी,विधवांच्या उद्धारासाठी व विधवांच्या मुलाबाळांच्या सांभाळ करण्यासाठी,.गरीब लोकांच्या उद्धारासाठी जे गरीब आजारी आहेत व ज्यांच्यामध्ये आजारपणाचा उपचारासाठी पैशाच नाहीत,ज्याच्याकडे हॉस्पिटल बिल भरण्याची ऐपत नाही अशांसाठी,ज्याचे कर्जदारांचे कर्ज आहे,.कर्ज भरण्याची ऐपत नाही अशांसाठी व गरीब घरातील मुलां-मुलींचे लग्न करण्यासाठी व त्यांच्या संभाळ करण्यासाठी , # विशेष ,माणूस कितीही मोठा असला तरी तो एखाद्या वेळी संकटात सापडलेल्या असतो व आशा वेळी कोणाकडूनतरी कर्ज घेतलेले असते,म्हणून ते कर्ज  फेडण्यासाठी जकातीचा चांगला उपयोग होतो.

भारतामधे इस्लामी शिक्षणासह विविध प्रकारच्या शाळा चालवली जातात .

            # त्या शाळांना मदरसा म्हणतात # 

आपल्या काही मुस्लिम विरोधी भारतीय सोशल मिडिया आणि काही ठराविक प्रसार माध्यमांमध्ये मुस्लिम समाजासह त्यांच्या मदरशांबददल गैरसमज पसरवून सामाजाची दिशाभुल केली जाते,मात्र सत्य वास्तविकता ही वेगळीच आहे, मदरशांमध्ये विद्यार्थ्यांना अरबी,उर्दू भाषेत,शिक्षण दिले जातात,त्यांना देशभक्ती व  इस्लामी शिक्षण व ज्या राज्यांंच्या कायद्यानुसार स्थानिक पातळीवरील शिक्षण दिले जातात,.आशा मदरशांची व्यवस्था व बांधकाम करण्यासाठी विनीयोग करण्यात येतो.सोबतच जागोजागी शाळा-कॉलेज चालवली जातात त्यासाठी, त्यांच्या वसतिगृहातील गरीब विद्यार्थ्यांना जेवण वगैरेसाठी.

गरीब मुलींच्या विवाहासाठी. पीडित व अनाथ मुलांच्या सर्व गरजेसाठी जकातीचा वापर करतात.

# जगातल्या बहुतेक  राष्ट्रांमध्ये व भारतामध्ये सुध्दा आरबी मदरशांना कुठलेही सरकारी अनुदान देत नाही.दिलेही जात नाही. सरकारने कोणत्याही मदरशांना अजून अनुदान दिलेले नाहीत.हा खरोखरच संशोधनाचा विषय आहे ,असो.

परंतु काही ठराविक प्रसार माध्यमांमध्ये मुस्लिम विरोधी  गैरसमज पसरवले जातात की सरकारकडून मुस्लिम मदरशांना मुबलक प्रमाणात सरकारी अनुदान दिले जाते. हे चुकीचे आहे.

 आज लाखो अरबी मदरशांमध्ये शिक्षणाबरोबरच गरीब,अनाथ, विधवा,तथा मुलांसाठी वस्तीगृह व जेवणा - खाण्याची सोय करून त्या बरोबरच अनाथ, गरीब, विधवा,मुलां- मुलींच्या विवाहसाठी मदरशांमधे सोय केली जाते,अशामध्ये जकातीचा वापर केला जातो.भारतात देवबंद सारखा एक लाख मुलं (विद्यार्थी)  असलेला मदरसा सहारनपुर मध्ये आहे,व  भारतात असे खुप गरीब मदरसे आहेत ज्यांचा खर्च , होस्टेल , जेवणाची व्यवस्था सह लाखोंनी-कोटींनी असतो,  सर्व जकातीच्या माध्यमातून  चालवला जातो . त्यामध्ये अलिगड मुस्लिम  युनिव्हर्सिटी, दिल्लीतील हमदर्द युनिव्हर्सिटी,मौलाना आझाद युनिव्हर्सिटी असे जगात नावाजलेले  शिक्षण संस्था, युनिव्हर्सिटी व मदरसे‌ भारतात  चालू आहेत ‌.परंतु त्या नावाजलेले मोठमोठाल्या विद्यापीठांचा खर्च स्वतःच्या व्यवस्थापकीय पध्दतीने ,व काही जकातीच्या माध्यमातूनच चालतो,त्यामध्ये गरीब अनाथ विधवांचे मुलं वस्तीगगृहामध्ये  असतात व त्यांच्या पुस्तकांचा, कपड्यांचा खर्च मोफत ,मोफत हे  कॉलेज,विद्यापीठे ,मदरसे करतात त्यासाठी जकातीचा सुयोग्य वापर केलेला असतो.

 ## मदशांमधुन  :- समाजामध्ये कसे वागावे हे वास्तविक पाहता शिकलेली गरीबांची गरीब मुलं भारताच्या  व जगातील विविध ठिकाणी नोकरी करुन आनंदाने आपले जीवन व्यतीत करतात.याच जकातीच्या पैशांद्वारे दुष्काळी परिस्थितीत, नद्याच्या पुरग्रस्त परिस्थितीत, समाजोपयोगी उपक्रमाला हसत हसत मदत होईल म्हणून बरीच लोकं तिथे जाऊन जकात देत असतात..पाणी,अन्नधान्य पुरवणं. आपात्कालीन पुर परस्थितीत नद्या-नाल्यांच्या पुरामधे कोणी वाहून जात असेल तर मदशातील मुलं त्या वाहत्या पाण्याच्या प्रवाहात उडी मारून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता केवळ सबाब,(पुण्यंच) काम म्हणून समोरच्या पीडीत व्यक्तीला वाचवतात हे अनेक ठिकाणच्या पुरग्रस्त ,करोना मधे ,व विविध ठिकाणच्या आपत्ती निवारण करण्याच्या ठिकाणी बघायला मिळालं ..

आशा जकातीच्या पैशांच्या माध्यमातून विविध गरजूंना मदत व  समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात.

औरंगाबाद : मुस्लिमधर्मियांना इतर धर्मियांपासून धोका असल्याने भविष्यात हिंसक कृती करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या घरगुती वस्तूंचा साठा करण्याचे अप्रत्यक्ष आवाहन व्हिडीओच्या माध्यमातून करणाऱ्या ‘ तहफुझ ए दीन इंडिया’ या यु ट्यूब चॅनलचा निवेदक (अँकर) आणि यु ट्यूब मालकाविरोधात शुक्रवारी पोलिसांनी सायंकाळी गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली.अँकर सय्यद फारुक अहमद आणि यु ट्यूब मालक कारी झियाउर रहमान फारुकी, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. दोन समाजात जात, धर्मावरून तेढ, वाद निर्माण होईल, अशा प्रकारची पोस्ट, व्हिडीओ क्लीप समाजमाध्यमावर टाकणे कायद्याने गुन्हा आहे. अशा प्रकारच्या पाेस्ट समाजमाध्यमावर टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी शहर पोलिसांचे पथक सोशल मीडियावर नजर ठेवून आहे. ‘ तहफुझ ए दीन इंडिया’ या यु ट्यूब चॅनलच्या व्हॉटस् ॲपवर आलेल्या व्हिडीओमध्ये निवेदक सय्यद फारूक अहमद याने शस्त्रासारखा वापर करता येऊ शकतो, अशा घरगुती वस्तूंचा साठा करण्याचे अप्रत्यक्ष प्रोत्साहन दिले. दोन समाजात, धर्मात जातीय तेढ निर्माण होईल, यादृष्टीने हा व्हिडीओ तयार करण्याचा इशारा देण्यात आला होता. या व्हिडीओचा उद्देश पोलिसांच्या लक्षात येताच पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, उपायुक्त अपर्णा गिते, सहायक आयुक्त विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गौतम पातारे, सहायक निरीक्षक काशिनाथ महांडुळे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के, उपनिरीक्षक राहुल चव्हाण आणि सोशल मीडिया टीमने या ट्युब चॅनलचे कार्यालय, निवेदक आणि मालकाला शोधून काढून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात उपनिरीक्षक चव्हाण यांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात सरकारतर्फे गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली.

अहमदनगर प्रतिनिधी-प्रार्थना सुरू असताना मोठ्या आवाजात गाणे लावू नका, असे म्हटल्याचा राग आल्याने दोघांनी तलवार दाखवून धमकावत शिवीगाळ केल्याची घटना शहरातील लालटाकी परिसरात घडली. या प्रकरणी दोघांविरूद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन राबवून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.उबेद सलीम सय्यद (रा. मिसगर कॉलनी, लालटाकी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शग्या ऊर्फ विशाल खंडागळे याच्यासह एका अल्पवयीन मुलाविरूध्द आर्म अ‍ॅक्ट कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडागळे याला अटक केली आहे. फिर्यादी सय्यद हे त्यांच्या सहकार्‍यांसोबत धार्मिकस्थळी प्रार्थना करत असताना आरोपी बाजूला असलेल्या मिसगर कब्रस्तानमध्ये मोबाईलद्वारे ब्लू टूथ स्पिकरवर मोठ्या आवाजात गाणे वाजवत होते. यावेळी सय्यद व त्यांच्या सहकार्‍यांनी तुम्ही मोठ्याने गाणे वाजवू नका, प्रार्थना चालू आहे, असे सांगितले. याचा राग आल्याने आरोपींनी तलवार दाखवून शिवीगाळ केली. दमदाटी करत धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तोफखाना पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ आरोपींचा शोध सुरू केला. पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे, उपनिरीक्षक समाधान सोळंके, अंमलदार दत्तात्रय जपे, शकील सय्यद, भास्कर गायकवाड, अविनाश वाकचौरे, वसीम पठाण, शिरीष तरटे, गौतम सातपुते आदींच्या पथकाने लालटाकी, सिद्धार्थनगर परिसरात रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन राबवून आरोपींना ताब्यात घेतले. गुन्ह्यातील हत्यारही जप्त करण्यात आले आहे.



मक्का मधे प्रेषित , पैगंबर , झाल्यानंतर ११ वर्ष असताना , ईस्लाम विरोधी लोकांनी प्रेषित मुहम्मद स्व. व त्यांच्या सहकारी मित्रगण (सहाबा रजि.). ईस्लामच्या अनुयायींना साथ देईल,सहकार्य करील आशा लोकांचा छळ करुन त्रास दिला जात असे,तरीही त्रास सहन करूनही  पैगंबर मुहम्मद स्व. संयमाने,विवेकाने,शांतपणे अल्लाहाच्या एकेश्वरवादाचा ,सत्य धर्माचा प्रचार व प्रसार शांततेने करीत असत,त्यांच्या व जे एकेश्वरवादाचा प्रसार करीत होते ‌त्यासर्वांवर तीन वर्षापर्यंत सामाजिक व आर्थिक  बहिष्कार टाकला गेला. त्यांचं जीणं, खाणं - पिणं मोठं मुश्किल (अवघड) होतं. तीन - तीन दिवस फक्त खजुरांवर त्यांचं जींणं चालू असत, कित्येक लहान मुलं,महीला, किती दिवस अक्षरशः उपाशीच झोपलीत,माणुसकीची परीसीमाच राहीली नव्हती, छळाची परमोच्च बिंदू गाठलं, शेवटी प्रेषीतांची हत्या करण्याचे कट कारस्थान रचुन , प्रत्येक कबील्यांतुन एक तरुणांची निवड करुन घेरावही करण्यात आला. मात्र ते या कटातून सही सलामत बाहेर आलेत,ही अल्लाहा (ईश्वरा) कडून त्यांची परीक्षाच होती.

शेवटी अल्लाहाच्या ईशवानीच्या आज्ञेनुसार प्रेषित स्व.यांनी सर्वांना होणाऱ्या त्रासाला कंटाळून मदीनेला " हिजरत " करण्याचा निर्णय घेतला ,१६ जुलै ६२२ रोजी मध्यरात्री हज. अबु- बकर रजी., हज.उमर रजी.बरोबर घेत हिजरत केली.

"'हिजरी - साल वर्षे " याच घटनेमुळे इस्लामी (हिजरी सन) वर्षाची सुरुवात झाली,हिजरत नंतर मदीना व आसपासच्या परिसरात अनेक ठिकाणी इस्लामच्या सत्यधर्माचा प्रचार - प्रसार झाला व होत होता. लाखोंच्या संख्येने लोकं इस्लामच्या सत्य धर्म  स्विकारीत होते,मदीनामधेही मक्का येथील अरबी लोकांचं प्रेषितांना व त्यांच्या अनुयायांना (सहाबा) त्रास देणं चालूच होतं. मधल्या काळात मक्का येथील अरब लोकं व प्रेषित मुहम्मद स्व. यांच्या अनुयायांमधे  वारंवार रक्तरंजित संघर्ष घडत होतं,बरेच मोठ - मोठी युद्ध झाले होते .

हे वारंवार होऊ नयेत म्हणून  प्रेषितांनी जगप्रसिद्ध तह केला. यास इस्लामी इतिहासात खुप महत्वाचे स्थान आहे,यालाच " सुलह हुदैबीया" असे म्हणतात .

तहाची मर्यादा दहा १० वर्षांची होती, दोन्ही बाजूंनी बऱ्याच अटी ठरलेल्या होत्या,परंतु जास्त अटी या विरोधी मक्कावासींया कडून‌ लादलेल्या होत्या,एवढे असूनही प्रेषित मुहम्मद स्व. विरोधकांच्या प्रत्येक अटीला मान्यता देत होते व देण्यात आल्या देखील. (घटना मोठी आहे,  असो .) थोड्याच दिवसांत  प्रसिद्ध हुदैबिया कराराच्या उल्लंघनाची सुरुवात विरोधी मक्कावासी आरबां कडुन झाली व  वारंवार होत होतं. त्रासाला कंटाळून शेवटी हजरत  प्रेषीतांनी इस्लामी योध्दयांना घेऊन मक्का कुच करण्याचा निर्णय घेऊन दहा हजार योध्दांबरोबर कुच केली.            मक्का पोहचल्यावर तेथील प्रत्येक माणूस घाबरून जाऊन ज्याला जेथे जागा मिळेल , तिथे तो लपून बसतं,तर कोणी पळून जात होता.जिवाच्या भितीने सर्वच सैरभैर झाले होते,   कारणही तसे महत्वाचे होते,त्यांनी प्रेषित मुहम्मद स्व.व त्यांचे मित्रगण (सहाबा रजि),अनुयायांना दिलेल्या त्रास,आतोनात छळ, वेदनाला,खुनी संघर्ष,या छळाचा बदला घेण्यासाठी आलेत असे वाटत होते, कदाचित फाशी देतील,आज बदल्याचा दिवस असणार ई. प्रत्येक लहान - मोठे अक्षरशः ‌धास्तावले होते ,हा विचार विरोधी लोकांना येणं साहाजिकच होते कारणंही तसेच होते,प्रेषित आणि त्यांचे अनुयायी (सहाबा रजि.) कितीही शांत, न्याय करणारे ‌असले तरी विरोधकांच्या मनात असा विचार येणे तसे स्वभाविकच होते,कारण विरोधकांकडून त्यांना तेवढा आतोनात त्रासच ‌दिला गेला होता, कोणत्याही सद्गृहस्थाने त्याना कधीच केव्हाही कोणत्याही परिस्थितीत माफ केलेच नसते व ते माफीचे लायकही नव्हतेच.


असं म्हणतात की "ज्यांच्या जवळ शक्ति,ताकत,सैनिक असूनही जो समोरच्या कट्टर शत्रुंना शरण देतो,माफी देतो,क्षमा करतो तो मनुष्य सर्वाधिक श्रेष्ठ असतो"

                    एका घटनेचा प्रामुख्याने उल्लेख करावासा वाटतो,उहुदच्या प्रसिद्ध लढाईमधे प्रेषित मुहम्मद स्व. यांच्यावर अत्यंत ह्रदयाने प्रेम करणारे त्यांचे चुलते हजरत हमजा रजि.हे लढाईत शहीद (हुतात्म्या) झाले,विरोधी  प्रमुख सरदार अबु सुफीयान याची पत्नी 'हिंदा"ही पैगंबरांबद्दल वैरभाव बाळगत होती,याच वैरभावापोटी "हिंदा" हिने हजरत हमजा रजि. यांचे काळीज फाडून बाहेर काढुन चावुन खाल्ले,  नाका-कानांचा हार करुन गळ्यात घालण्याचे क्रौर्य केले,  पैगंबरांच्या मक्का विजय प्राप्त केल्यावर "हिंदा" हिने आपली ओळख  न पटावी यासाठी आपल्या चेहऱ्यावर पडदा टाकला होता,  तरी ती सार्वजनिक क्षमादानात  जीव वाचवण्यासाठी  सामील झाली. परंतु पैगंबरांनी तिला ओळखळे  , काका हज. हमजा रजि. यांच्या हत्यासंदर्भाचा मुळीच उल्लेख न करता , मोठ्या मनाने क्रुर हिंदा ,ही क्षमा दिली ,. 

" हिंदा, जा ,  आज,  तुला सुध्दा माफी" 


त्यांचे रक्ताचे वैरी आशा सर्व दुश्मनांना  प्रेषित मुहम्मद स्व. यांच्याजवळ आज सर्व लष्करी ताकत,सत्ता असताना,  ते काहीही करू शकले असते,  परंतु त्यांनी एका झटक्यात उदारमनाने,उदराता दाखवून त्या अल्लाहा  (ईश्वरा) च्या शांतीदुताने  कधीच घडले नव्हते असं , न्यायदानाचे,क्षमाशीलतेचे जगात एकमेव उदाहरण  क्षमा,माफी. अमन,(शांती) दिली,

मक्केच्या पवित्र खाना -ए- काबागृहाच्या जवळच घोषणा दिली गेली की , ""  कोणावरही सुड उगविण्यात येणार नाही . ,

 जुलम करण्यात येणार नाहीत . ,

       कोणाचाही कत्ल (हत्या - खुन) करण्यात येणार नाही,

               कोणाचाही बदला घेण्यात येणार नाही .,

          जे आपआपल्या घरात आहेत,    त्या सर्वांना माफी, अमन देण्यात आले आहेत .,

            जे तलवार उचलणार नाही,त्या सर्वांना माफी अमन,सर्व लोकांना, नागरिकांना माफी देण्यात येत आहे. ,

                मात्र विरोधकांना वाटले की असे कसे घडत आहे ???   आपण केलेल्या कृत्याची शिक्षा ही तर फक्त फाशीच होती .,

मग हे ..फक्त माफी ? ..हे शब्द ऐकून कसं वाटलं असेलं त्यांना.

परंतु प्रेषित मुहम्मद स्व . यांनी हे करून दाखवले..


तो दिवस ‌२१ रमजानुल मुबारक.०८  हिजरी. .

आज  २१ रमजान .१४४३ हिजरी आहेत..

  प्रेषित मुहम्मद स्व.म्हणतात की,"'  ज्यांच्या जवळ शक्ति असूनही , जो बदल्याची भावना जोपासत नाही, सर्वांना माफ करतो,क्षमाशील असतो तोच माझ्या जवळ आणि मला प्रिय असतो तथा तोच सर्वात मोठाही असतो,कारण तो मोठ्या मनाचा असतो, अल्लाहाला (ईश्वराला) माफ (क्षमा) करणारे लोकं पसंद ((प्रिय) आहेत."लेखक - डॉ.सलीम सिकंदर शेख बैतुशशिफा हॉस्पिटल,श्रीरामपूर.९२७१६४००१४ 


#@#स @ @ ली@म@

अहमदनगर- दर्शनाला जाणारे भाविकांना आडवून जबरी चोरी करणारे दोन आरोपींना मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे. सचिन गोपिनाथ चव्हाण ( वय २३, रा. चोभा निमगांव, ता. आष्टी, जि. बीड), रघुनाथ बर्डे ( रा. चोभानिमगांव) असे पकडण्यात आलेल्याची नावे आहेत.जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल व नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे सपोनि दिनकर मुंडे, पोसई सोपान गोरे, पोहेकॉ फकिर शेख, देवेंद्र शेलार, पोना विशाल दळवी, विजय ठोंबरे, शंकर चौधरी, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, पोकाॅ आकाश काळे व चापोहेकॉ चंद्रकांत कुसळकर आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.याबाबत समजलेले माहिती अशी की, दि. २८ जानेवारी २०२२ रोजी देवदर्शनासाठी जात असतांना अज्ञात दोघे दुचाकीवर येऊन वाहन आडवून, शिवीगाळ व मारहाण करुन खिशातील विवो कंपनीचा मोबाईल व रोख असा एकूण १७ हजार ४०० रु.किं. चा मुद्देमाल बळजबरीने चोरुन नेला आहे. या आदित्य अविनाश आळेकर (रा. इंद्रप्रस्थ कॉलनी, बु-हानगर, ता. नगर) यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गु.र.नं. १६२/२०२२ भावविक ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दाक गुन्ह्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांना दुचाकी आडवून जबरी चोरी करणारे गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक नेमून तपासबाबत आदेश दिले. या आदेशान्वये पोनि श्री. कटके यांनी विशेष पथकाची नेमणूक करुन रवाना केले. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सपोनि शिशीरकुमार देशमुख व पोलीस स्टाफ यांचेसह पेट्रोलिंग फिरुन दुचाकी आडवून जबरी चोरी करणारे आरोपींची माहिती घेत असतांना पोनि श्री.कटके यांना माहिती मिळाली की, गुन्हा हा आरोपी सचिन चव्हाण ( रा. चोभानिमगांव, ता. आष्टी, जि.बीड ) याने त्याचे साथीदारासह केला असून तो निंबोडी, ता. आष्टी,( जि.बीड) येथे मिळून येईल अशी माहिती मिळाली. पोनि श्री. कटके यांनी मिळालेली माहिती पथकाला दिली. पथकाने निंबोडी (ता. आष्टी, जि. बीड) येथे जाऊन आरोपीचे ठावठिकाणा बाबत माहिती घेऊन आरोपी सचिन चव्हाण यास शिताफीने ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव व पत्ता विचारता त्याने त्याचे नाव सचिन गोपिनाथ चव्हाण, (वय २३ रा. चोभा निमगांव, ता. आष्टी, जि. बीड) असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे गुन्ह्याबाबत चौकशी करता सुरुवातीस तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. त्याला पोलिस खाक्या दाखविताच त्याने गुन्हा हा त्याचा गांवातील साथीदार रघुनाथ बर्डे ( रा. चोभानिमगांव) अशांनी मिळून केला असल्याची माहिती दिली. या माहितीनुसार आरोपी रघुनाथ बर्डे याचा राहते घरी जाऊन शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास भिंगार कॅम्प ठाण्यात स्टेशन गु.र.नं. ९६२/२०२२ भादविक ३९२, ३४ या गुन्ह्यात वापरलेली आरोपींनी वापरलेली दुचाकी, चोरीस गेलेला विवो कंपनीचा मोबाईल व रोख असा एकुण ३७ हजार ५०० रु. किचे मुडेमालासह ताब्यात घेऊनन भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात येथे हजर केले आहे. पुढील कारवाई भिंगार कॅम्प पोलीस करीत आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी )-मागील कोरोनाचा कार्यकाळ आपण सर्व जण लवकरच विसरलो अन धर्म भोंगा मंदिर मस्जिद या विषयावर भांडू लागलो आपला मनुष्य जातीचा मूळ गुणधर्म मानवता आहे हे आपण विसरत चाललो असल्याची खंत उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी शांतता समीतीच्या बैठकीत व्यक्त केली.बेलापुर येथे शांतता समीतीची बैठक बोलविण्यात आली होती त्या वेळी बोलताना उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके म्हणाले की समाजात सोळा सतरा धर्म आहे हे सर्व धर्म मानवतेचीच शिकवण देतात कुठलाही धर्म दुसऱ्या धर्मासाठी मारक नाही हे सत्य असताना काही असामाजिक तत्व अफवा पसरवुन शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतात त्याकरीता आपण जागृक राहीले पाहीजे असे काही आढळल्यास आमच्या निदर्शनास आणून द्या त्यांचा तात्काळ बंदोबस्त करु बेलापुर गावाची लोकसंख्या मोठी असली तरी सर्व नागरीक जागृक असल्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाण कमीच आहे बेलापुर गावाचे नाव कुठेही संवेदनशील म्हणून नोंदले गेलेले नाही काही स्वार्थी लोक आपली पोळी भाजुन घेण्यासाठी एखादा विषय सतत पेटता ठेवण्याचा प्रयत्न करतात त्यांचा बंदोबस्त केला जाईल व्हाटस्अप वर चुकीची पोस्ट टाकणारावर कठोर कारवाई केली जाईल विना पोलीस बंदोबस्तात मिरवणूक काढण्याची परंपरा गावाने चालू ठेवुन एक नवा पायंडा सुरु करावा असे अवाहनही मिटके यांनी केले पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी गावातील प्रमुखांची कमीटी स्थापन करण्याची सूचना केली  या वेळी सर्व ग्रामस्थांनी गावाचा विषय गाव पातळीवरच मिटविण्याचा निर्णय घेतला,कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिल मुथा यांनी  केले. या वेळी जि. प. सदस्य शरद नवले पंचायत समीती सदस्य अरुण पा नाईक,पञकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे ,सचिव देविदास देसाई, उपसरपंच अभिषेक खंडागळे बाजार समितीचे संचालक सुधीर नवले, भाजपाचे प्रफुल्ल डावरे,माजी सरपंच भरत साळुंके, अकबर टीन मेकरवाले, हाजी ईस्माईल शेख,मोहसीन सय्यद आदिंनी मनोगत व्यक्त केले.पोलिस काँन्स्टेबल रामेश्वर ढोकणे यांनी आभार मानले.                        सदरप्रसंगी तंटामुक्तीचे अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे,अशोक पवार,अशोक गवते,अजयभाऊ डाकले,बाळासाहेब दाणी,आलम शेख,व्यापारी असोसिएशनचे प्रशांत लढ्ढा,पञकार दिलिप दायमा,किशोर कदम,शफीक आतार तसेच हेड काँन्स्टेबल अतुल लोटके,काँन्स्टेबल भिंगारदिवे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.

क्रीडा प्रतिनिधी गौरव डेंगळे-भुवनेश्वर (ओडिशा) : व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडिया (VFI) ने आगामी १४ व्या  यू १८ मुलीच्या आशियाई व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी  २० जणांचा संभाव्य संघ जाहीर केला आहे.या संघामध्ये नेवासा येथील त्रिमूर्ती महाविद्यालयाची कु रक्षा खेनवार व पुण्याच्या डेक्कन जिमखानाची कु वेदिका शिंदे यांची संभाव्य भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.कु वेदिका हि भारतीय महिला व्हॉलीबॉलचे नामांकित प्रशिक्षक श्री देविदास

जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डेक्कन जिमखाना,पुणे येथे प्रशिक्षण घेते तर रक्षा ही ज्ञानेश्वर महाविद्यालय संचालित श्री यशवंत स्पोर्ट्स क्लब,नेवासा येथे राष्ट्रीय व्हॉलीबॉल प्रशिक्षक श्री पापा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.कु रक्षाचे शालेय शिक्षण वर्धा जिल्ह्यातील कारंजा या गावी झाले व पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी नेवासा येथे प्रवेश घेतला.

६ ते १३ जुन या कालावधीत थायलंड मध्ये स्पर्धा होणार आहे. दि २१ व २२ एप्रिल रोजी भुवनेश्वर,ओडिशातील कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी (KIIT) विद्यापीठात निवड चाचणी आयोजित करण्यात आली होती. या निवड चाचणीतून संभाव्य २० सदस्य भारतीय संघाची निवड करण्यात आली. निवड झालेले

खेळाडू दि २३ एप्रिल ते ४ जुन दरम्यान संघाचे सराव शिबिरामध्ये सहभागी होईल. निवड झालेल्या कु रक्षाचे महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष श्री प्रतीक जयंत पाटील, सचिव श्री विरल शहा तसेच संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget