Latest Post

अहमदनगर प्रतिनिधी-प्रार्थना सुरू असताना मोठ्या आवाजात गाणे लावू नका, असे म्हटल्याचा राग आल्याने दोघांनी तलवार दाखवून धमकावत शिवीगाळ केल्याची घटना शहरातील लालटाकी परिसरात घडली. या प्रकरणी दोघांविरूद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन राबवून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.उबेद सलीम सय्यद (रा. मिसगर कॉलनी, लालटाकी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शग्या ऊर्फ विशाल खंडागळे याच्यासह एका अल्पवयीन मुलाविरूध्द आर्म अ‍ॅक्ट कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडागळे याला अटक केली आहे. फिर्यादी सय्यद हे त्यांच्या सहकार्‍यांसोबत धार्मिकस्थळी प्रार्थना करत असताना आरोपी बाजूला असलेल्या मिसगर कब्रस्तानमध्ये मोबाईलद्वारे ब्लू टूथ स्पिकरवर मोठ्या आवाजात गाणे वाजवत होते. यावेळी सय्यद व त्यांच्या सहकार्‍यांनी तुम्ही मोठ्याने गाणे वाजवू नका, प्रार्थना चालू आहे, असे सांगितले. याचा राग आल्याने आरोपींनी तलवार दाखवून शिवीगाळ केली. दमदाटी करत धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तोफखाना पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ आरोपींचा शोध सुरू केला. पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे, उपनिरीक्षक समाधान सोळंके, अंमलदार दत्तात्रय जपे, शकील सय्यद, भास्कर गायकवाड, अविनाश वाकचौरे, वसीम पठाण, शिरीष तरटे, गौतम सातपुते आदींच्या पथकाने लालटाकी, सिद्धार्थनगर परिसरात रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन राबवून आरोपींना ताब्यात घेतले. गुन्ह्यातील हत्यारही जप्त करण्यात आले आहे.



मक्का मधे प्रेषित , पैगंबर , झाल्यानंतर ११ वर्ष असताना , ईस्लाम विरोधी लोकांनी प्रेषित मुहम्मद स्व. व त्यांच्या सहकारी मित्रगण (सहाबा रजि.). ईस्लामच्या अनुयायींना साथ देईल,सहकार्य करील आशा लोकांचा छळ करुन त्रास दिला जात असे,तरीही त्रास सहन करूनही  पैगंबर मुहम्मद स्व. संयमाने,विवेकाने,शांतपणे अल्लाहाच्या एकेश्वरवादाचा ,सत्य धर्माचा प्रचार व प्रसार शांततेने करीत असत,त्यांच्या व जे एकेश्वरवादाचा प्रसार करीत होते ‌त्यासर्वांवर तीन वर्षापर्यंत सामाजिक व आर्थिक  बहिष्कार टाकला गेला. त्यांचं जीणं, खाणं - पिणं मोठं मुश्किल (अवघड) होतं. तीन - तीन दिवस फक्त खजुरांवर त्यांचं जींणं चालू असत, कित्येक लहान मुलं,महीला, किती दिवस अक्षरशः उपाशीच झोपलीत,माणुसकीची परीसीमाच राहीली नव्हती, छळाची परमोच्च बिंदू गाठलं, शेवटी प्रेषीतांची हत्या करण्याचे कट कारस्थान रचुन , प्रत्येक कबील्यांतुन एक तरुणांची निवड करुन घेरावही करण्यात आला. मात्र ते या कटातून सही सलामत बाहेर आलेत,ही अल्लाहा (ईश्वरा) कडून त्यांची परीक्षाच होती.

शेवटी अल्लाहाच्या ईशवानीच्या आज्ञेनुसार प्रेषित स्व.यांनी सर्वांना होणाऱ्या त्रासाला कंटाळून मदीनेला " हिजरत " करण्याचा निर्णय घेतला ,१६ जुलै ६२२ रोजी मध्यरात्री हज. अबु- बकर रजी., हज.उमर रजी.बरोबर घेत हिजरत केली.

"'हिजरी - साल वर्षे " याच घटनेमुळे इस्लामी (हिजरी सन) वर्षाची सुरुवात झाली,हिजरत नंतर मदीना व आसपासच्या परिसरात अनेक ठिकाणी इस्लामच्या सत्यधर्माचा प्रचार - प्रसार झाला व होत होता. लाखोंच्या संख्येने लोकं इस्लामच्या सत्य धर्म  स्विकारीत होते,मदीनामधेही मक्का येथील अरबी लोकांचं प्रेषितांना व त्यांच्या अनुयायांना (सहाबा) त्रास देणं चालूच होतं. मधल्या काळात मक्का येथील अरब लोकं व प्रेषित मुहम्मद स्व. यांच्या अनुयायांमधे  वारंवार रक्तरंजित संघर्ष घडत होतं,बरेच मोठ - मोठी युद्ध झाले होते .

हे वारंवार होऊ नयेत म्हणून  प्रेषितांनी जगप्रसिद्ध तह केला. यास इस्लामी इतिहासात खुप महत्वाचे स्थान आहे,यालाच " सुलह हुदैबीया" असे म्हणतात .

तहाची मर्यादा दहा १० वर्षांची होती, दोन्ही बाजूंनी बऱ्याच अटी ठरलेल्या होत्या,परंतु जास्त अटी या विरोधी मक्कावासींया कडून‌ लादलेल्या होत्या,एवढे असूनही प्रेषित मुहम्मद स्व. विरोधकांच्या प्रत्येक अटीला मान्यता देत होते व देण्यात आल्या देखील. (घटना मोठी आहे,  असो .) थोड्याच दिवसांत  प्रसिद्ध हुदैबिया कराराच्या उल्लंघनाची सुरुवात विरोधी मक्कावासी आरबां कडुन झाली व  वारंवार होत होतं. त्रासाला कंटाळून शेवटी हजरत  प्रेषीतांनी इस्लामी योध्दयांना घेऊन मक्का कुच करण्याचा निर्णय घेऊन दहा हजार योध्दांबरोबर कुच केली.            मक्का पोहचल्यावर तेथील प्रत्येक माणूस घाबरून जाऊन ज्याला जेथे जागा मिळेल , तिथे तो लपून बसतं,तर कोणी पळून जात होता.जिवाच्या भितीने सर्वच सैरभैर झाले होते,   कारणही तसे महत्वाचे होते,त्यांनी प्रेषित मुहम्मद स्व.व त्यांचे मित्रगण (सहाबा रजि),अनुयायांना दिलेल्या त्रास,आतोनात छळ, वेदनाला,खुनी संघर्ष,या छळाचा बदला घेण्यासाठी आलेत असे वाटत होते, कदाचित फाशी देतील,आज बदल्याचा दिवस असणार ई. प्रत्येक लहान - मोठे अक्षरशः ‌धास्तावले होते ,हा विचार विरोधी लोकांना येणं साहाजिकच होते कारणंही तसेच होते,प्रेषित आणि त्यांचे अनुयायी (सहाबा रजि.) कितीही शांत, न्याय करणारे ‌असले तरी विरोधकांच्या मनात असा विचार येणे तसे स्वभाविकच होते,कारण विरोधकांकडून त्यांना तेवढा आतोनात त्रासच ‌दिला गेला होता, कोणत्याही सद्गृहस्थाने त्याना कधीच केव्हाही कोणत्याही परिस्थितीत माफ केलेच नसते व ते माफीचे लायकही नव्हतेच.


असं म्हणतात की "ज्यांच्या जवळ शक्ति,ताकत,सैनिक असूनही जो समोरच्या कट्टर शत्रुंना शरण देतो,माफी देतो,क्षमा करतो तो मनुष्य सर्वाधिक श्रेष्ठ असतो"

                    एका घटनेचा प्रामुख्याने उल्लेख करावासा वाटतो,उहुदच्या प्रसिद्ध लढाईमधे प्रेषित मुहम्मद स्व. यांच्यावर अत्यंत ह्रदयाने प्रेम करणारे त्यांचे चुलते हजरत हमजा रजि.हे लढाईत शहीद (हुतात्म्या) झाले,विरोधी  प्रमुख सरदार अबु सुफीयान याची पत्नी 'हिंदा"ही पैगंबरांबद्दल वैरभाव बाळगत होती,याच वैरभावापोटी "हिंदा" हिने हजरत हमजा रजि. यांचे काळीज फाडून बाहेर काढुन चावुन खाल्ले,  नाका-कानांचा हार करुन गळ्यात घालण्याचे क्रौर्य केले,  पैगंबरांच्या मक्का विजय प्राप्त केल्यावर "हिंदा" हिने आपली ओळख  न पटावी यासाठी आपल्या चेहऱ्यावर पडदा टाकला होता,  तरी ती सार्वजनिक क्षमादानात  जीव वाचवण्यासाठी  सामील झाली. परंतु पैगंबरांनी तिला ओळखळे  , काका हज. हमजा रजि. यांच्या हत्यासंदर्भाचा मुळीच उल्लेख न करता , मोठ्या मनाने क्रुर हिंदा ,ही क्षमा दिली ,. 

" हिंदा, जा ,  आज,  तुला सुध्दा माफी" 


त्यांचे रक्ताचे वैरी आशा सर्व दुश्मनांना  प्रेषित मुहम्मद स्व. यांच्याजवळ आज सर्व लष्करी ताकत,सत्ता असताना,  ते काहीही करू शकले असते,  परंतु त्यांनी एका झटक्यात उदारमनाने,उदराता दाखवून त्या अल्लाहा  (ईश्वरा) च्या शांतीदुताने  कधीच घडले नव्हते असं , न्यायदानाचे,क्षमाशीलतेचे जगात एकमेव उदाहरण  क्षमा,माफी. अमन,(शांती) दिली,

मक्केच्या पवित्र खाना -ए- काबागृहाच्या जवळच घोषणा दिली गेली की , ""  कोणावरही सुड उगविण्यात येणार नाही . ,

 जुलम करण्यात येणार नाहीत . ,

       कोणाचाही कत्ल (हत्या - खुन) करण्यात येणार नाही,

               कोणाचाही बदला घेण्यात येणार नाही .,

          जे आपआपल्या घरात आहेत,    त्या सर्वांना माफी, अमन देण्यात आले आहेत .,

            जे तलवार उचलणार नाही,त्या सर्वांना माफी अमन,सर्व लोकांना, नागरिकांना माफी देण्यात येत आहे. ,

                मात्र विरोधकांना वाटले की असे कसे घडत आहे ???   आपण केलेल्या कृत्याची शिक्षा ही तर फक्त फाशीच होती .,

मग हे ..फक्त माफी ? ..हे शब्द ऐकून कसं वाटलं असेलं त्यांना.

परंतु प्रेषित मुहम्मद स्व . यांनी हे करून दाखवले..


तो दिवस ‌२१ रमजानुल मुबारक.०८  हिजरी. .

आज  २१ रमजान .१४४३ हिजरी आहेत..

  प्रेषित मुहम्मद स्व.म्हणतात की,"'  ज्यांच्या जवळ शक्ति असूनही , जो बदल्याची भावना जोपासत नाही, सर्वांना माफ करतो,क्षमाशील असतो तोच माझ्या जवळ आणि मला प्रिय असतो तथा तोच सर्वात मोठाही असतो,कारण तो मोठ्या मनाचा असतो, अल्लाहाला (ईश्वराला) माफ (क्षमा) करणारे लोकं पसंद ((प्रिय) आहेत."लेखक - डॉ.सलीम सिकंदर शेख बैतुशशिफा हॉस्पिटल,श्रीरामपूर.९२७१६४००१४ 


#@#स @ @ ली@म@

अहमदनगर- दर्शनाला जाणारे भाविकांना आडवून जबरी चोरी करणारे दोन आरोपींना मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे. सचिन गोपिनाथ चव्हाण ( वय २३, रा. चोभा निमगांव, ता. आष्टी, जि. बीड), रघुनाथ बर्डे ( रा. चोभानिमगांव) असे पकडण्यात आलेल्याची नावे आहेत.जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल व नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे सपोनि दिनकर मुंडे, पोसई सोपान गोरे, पोहेकॉ फकिर शेख, देवेंद्र शेलार, पोना विशाल दळवी, विजय ठोंबरे, शंकर चौधरी, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, पोकाॅ आकाश काळे व चापोहेकॉ चंद्रकांत कुसळकर आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.याबाबत समजलेले माहिती अशी की, दि. २८ जानेवारी २०२२ रोजी देवदर्शनासाठी जात असतांना अज्ञात दोघे दुचाकीवर येऊन वाहन आडवून, शिवीगाळ व मारहाण करुन खिशातील विवो कंपनीचा मोबाईल व रोख असा एकूण १७ हजार ४०० रु.किं. चा मुद्देमाल बळजबरीने चोरुन नेला आहे. या आदित्य अविनाश आळेकर (रा. इंद्रप्रस्थ कॉलनी, बु-हानगर, ता. नगर) यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गु.र.नं. १६२/२०२२ भावविक ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दाक गुन्ह्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांना दुचाकी आडवून जबरी चोरी करणारे गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक नेमून तपासबाबत आदेश दिले. या आदेशान्वये पोनि श्री. कटके यांनी विशेष पथकाची नेमणूक करुन रवाना केले. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सपोनि शिशीरकुमार देशमुख व पोलीस स्टाफ यांचेसह पेट्रोलिंग फिरुन दुचाकी आडवून जबरी चोरी करणारे आरोपींची माहिती घेत असतांना पोनि श्री.कटके यांना माहिती मिळाली की, गुन्हा हा आरोपी सचिन चव्हाण ( रा. चोभानिमगांव, ता. आष्टी, जि.बीड ) याने त्याचे साथीदारासह केला असून तो निंबोडी, ता. आष्टी,( जि.बीड) येथे मिळून येईल अशी माहिती मिळाली. पोनि श्री. कटके यांनी मिळालेली माहिती पथकाला दिली. पथकाने निंबोडी (ता. आष्टी, जि. बीड) येथे जाऊन आरोपीचे ठावठिकाणा बाबत माहिती घेऊन आरोपी सचिन चव्हाण यास शिताफीने ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव व पत्ता विचारता त्याने त्याचे नाव सचिन गोपिनाथ चव्हाण, (वय २३ रा. चोभा निमगांव, ता. आष्टी, जि. बीड) असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे गुन्ह्याबाबत चौकशी करता सुरुवातीस तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. त्याला पोलिस खाक्या दाखविताच त्याने गुन्हा हा त्याचा गांवातील साथीदार रघुनाथ बर्डे ( रा. चोभानिमगांव) अशांनी मिळून केला असल्याची माहिती दिली. या माहितीनुसार आरोपी रघुनाथ बर्डे याचा राहते घरी जाऊन शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास भिंगार कॅम्प ठाण्यात स्टेशन गु.र.नं. ९६२/२०२२ भादविक ३९२, ३४ या गुन्ह्यात वापरलेली आरोपींनी वापरलेली दुचाकी, चोरीस गेलेला विवो कंपनीचा मोबाईल व रोख असा एकुण ३७ हजार ५०० रु. किचे मुडेमालासह ताब्यात घेऊनन भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात येथे हजर केले आहे. पुढील कारवाई भिंगार कॅम्प पोलीस करीत आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी )-मागील कोरोनाचा कार्यकाळ आपण सर्व जण लवकरच विसरलो अन धर्म भोंगा मंदिर मस्जिद या विषयावर भांडू लागलो आपला मनुष्य जातीचा मूळ गुणधर्म मानवता आहे हे आपण विसरत चाललो असल्याची खंत उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी शांतता समीतीच्या बैठकीत व्यक्त केली.बेलापुर येथे शांतता समीतीची बैठक बोलविण्यात आली होती त्या वेळी बोलताना उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके म्हणाले की समाजात सोळा सतरा धर्म आहे हे सर्व धर्म मानवतेचीच शिकवण देतात कुठलाही धर्म दुसऱ्या धर्मासाठी मारक नाही हे सत्य असताना काही असामाजिक तत्व अफवा पसरवुन शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतात त्याकरीता आपण जागृक राहीले पाहीजे असे काही आढळल्यास आमच्या निदर्शनास आणून द्या त्यांचा तात्काळ बंदोबस्त करु बेलापुर गावाची लोकसंख्या मोठी असली तरी सर्व नागरीक जागृक असल्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाण कमीच आहे बेलापुर गावाचे नाव कुठेही संवेदनशील म्हणून नोंदले गेलेले नाही काही स्वार्थी लोक आपली पोळी भाजुन घेण्यासाठी एखादा विषय सतत पेटता ठेवण्याचा प्रयत्न करतात त्यांचा बंदोबस्त केला जाईल व्हाटस्अप वर चुकीची पोस्ट टाकणारावर कठोर कारवाई केली जाईल विना पोलीस बंदोबस्तात मिरवणूक काढण्याची परंपरा गावाने चालू ठेवुन एक नवा पायंडा सुरु करावा असे अवाहनही मिटके यांनी केले पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी गावातील प्रमुखांची कमीटी स्थापन करण्याची सूचना केली  या वेळी सर्व ग्रामस्थांनी गावाचा विषय गाव पातळीवरच मिटविण्याचा निर्णय घेतला,कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिल मुथा यांनी  केले. या वेळी जि. प. सदस्य शरद नवले पंचायत समीती सदस्य अरुण पा नाईक,पञकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे ,सचिव देविदास देसाई, उपसरपंच अभिषेक खंडागळे बाजार समितीचे संचालक सुधीर नवले, भाजपाचे प्रफुल्ल डावरे,माजी सरपंच भरत साळुंके, अकबर टीन मेकरवाले, हाजी ईस्माईल शेख,मोहसीन सय्यद आदिंनी मनोगत व्यक्त केले.पोलिस काँन्स्टेबल रामेश्वर ढोकणे यांनी आभार मानले.                        सदरप्रसंगी तंटामुक्तीचे अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे,अशोक पवार,अशोक गवते,अजयभाऊ डाकले,बाळासाहेब दाणी,आलम शेख,व्यापारी असोसिएशनचे प्रशांत लढ्ढा,पञकार दिलिप दायमा,किशोर कदम,शफीक आतार तसेच हेड काँन्स्टेबल अतुल लोटके,काँन्स्टेबल भिंगारदिवे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.

क्रीडा प्रतिनिधी गौरव डेंगळे-भुवनेश्वर (ओडिशा) : व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडिया (VFI) ने आगामी १४ व्या  यू १८ मुलीच्या आशियाई व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी  २० जणांचा संभाव्य संघ जाहीर केला आहे.या संघामध्ये नेवासा येथील त्रिमूर्ती महाविद्यालयाची कु रक्षा खेनवार व पुण्याच्या डेक्कन जिमखानाची कु वेदिका शिंदे यांची संभाव्य भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.कु वेदिका हि भारतीय महिला व्हॉलीबॉलचे नामांकित प्रशिक्षक श्री देविदास

जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डेक्कन जिमखाना,पुणे येथे प्रशिक्षण घेते तर रक्षा ही ज्ञानेश्वर महाविद्यालय संचालित श्री यशवंत स्पोर्ट्स क्लब,नेवासा येथे राष्ट्रीय व्हॉलीबॉल प्रशिक्षक श्री पापा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.कु रक्षाचे शालेय शिक्षण वर्धा जिल्ह्यातील कारंजा या गावी झाले व पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी नेवासा येथे प्रवेश घेतला.

६ ते १३ जुन या कालावधीत थायलंड मध्ये स्पर्धा होणार आहे. दि २१ व २२ एप्रिल रोजी भुवनेश्वर,ओडिशातील कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी (KIIT) विद्यापीठात निवड चाचणी आयोजित करण्यात आली होती. या निवड चाचणीतून संभाव्य २० सदस्य भारतीय संघाची निवड करण्यात आली. निवड झालेले

खेळाडू दि २३ एप्रिल ते ४ जुन दरम्यान संघाचे सराव शिबिरामध्ये सहभागी होईल. निवड झालेल्या कु रक्षाचे महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष श्री प्रतीक जयंत पाटील, सचिव श्री विरल शहा तसेच संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

अहमदनगर प्रतिनिधी - वाढत्या उन्हाची तीव्रता व कोरोना काळानंतर उद्योग जगताकडून वाढलेली वीजमागणी यामुळे महावितरणची सध्याची उच्चतम मागणी नोंदवली गेली आहे. मात्र कोळशाची कमतरता यामुळे वीज निर्मितीत घट झालेली असून आपत्कालीन भारनियमन करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.या पार्श्वभूमीवर अतिभारीत वीज वाहिन्यांवरील रोहित्रांकडे विशेष लक्ष देऊन त्या रोहीत्राची क्षमता व त्याच्यावरील वीजभार तपासण्याची मोहीम राज्यभर राबविण्यात येत आहे. यानुसार आकडे टाकून वीज चोरी करणाऱ्यांविरुद्ध अहमदनगर मंडलात धडक मोहीम हाती घेतली असून, २१ व २२ एप्रिल या दोन दिवसांत २ हजार ४०५ आकडे काढून त्यांच्या केबल जप्त करण्याचे काम केले आहे. तसेच २३९ वीज चोराविरुद्ध कारवाई केली आहे. या प्रयत्नांमुळे दोन दिवसात सदर वीज वाहिन्यांवरील ताण कमी होऊन वीजभार हलका होण्यास मदत झाली आहे. या मोहीमेमध्ये कारवाई करताना ज्या ११ केव्ही वाहिन्यांचा करंट १०० एम्पिअरच्या पुढे असलेल्या विद्युत वाहिन्या अहमदनगर मंडळात आहेत त्यांना लक्ष्य करुन गुरुवारी व शुक्रवारी सकाळपासूनच धडक मोहीम हाती घेतली होती. यामध्ये अनाधिकृतपणे कृषीपंपाला जोडलेले केबल आदी जप्त केले आहेत . घरगुती व इतर ग्राहकांचे आकडे सुद्धा यावेळी काढण्यात आले आहेत. नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर मंडळाचे अधिक्षक अभियंता सुनील काकडे यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकारी अभियंते यांचेसह विविध पथकामध्ये अभियंते, अधिकारी, कर्मचारी व जनमित्र यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.ही कारवाई अशीच सुरु राहणार आहे. यामध्ये अहमदनगर मंडळातील अनधिकृतपणे वीज तारांवर आकडे अथवा हुक टाकणाऱ्या विरुद्ध कार्यवाही करण्यात आली आहे. यामध्ये संगमनेर विभागात हुक टाकणाऱ्या ८९८ कृषी तर १२९ इतर वर्गवारीचे ग्राहक असून वीजचोरी करणारे ५ कृषी व ५१ इतर ग्राहकांचा समावेश आहे. श्रीरामपूर विभागात हुक टाकणाऱ्या ३५३ कृषी तर ३७ इतर ग्राहक असून वीजचोरी करणारे ४ इतर ग्राहकांचा समावेश आहे. अहमदनगर शहर विभागात हुक टाकणाऱ्या ३१४कृषी तर १२२ इतर ग्राहक असून वीजचोरी करणारे ४० कृषी व५२इतर ग्राहकांचा समावेश आहे. अहमदनगर ग्रामीण विभागात हुक टाकणाऱ्या १७१ कृषी तर १०५ इतर ग्राहक असून वीजचोरी करणारे ८२इतर ग्राहकांचा समावेश आहे. कर्जत विभागात हुक टाकणाऱ्या२२२ कृषी तर ५४इतर ग्राहक असून वीजचोरी करणारे ५ इतर ग्राहकांचा समावेश आहे. असे एकूण अहमदनगर मंडळात हुक टाकणाऱ्या कृषी ग्राहकांमध्ये १९५८ तर ४४७ इतर ग्राहक असून वीजचोरी करणारे ५२ कृषी व १८७ इतर असून अशाप्रकारे यामोहिमेत एकूण २ हजार ६४४ अनधिकृत जोडण्या काढण्यात आलेल्या आहेत.तापमानात जशी वाढ होईल तशी राज्याची विजेची मागणी वाढत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मार्च महिन्यापासून मागणीमध्ये वाढच होत आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही महावितरण कसोशीने प्रयत्न करत आहे. खुल्या बाजारात विजेचे दर प्रचंड महागडे आहेत. ही महागडी वीज घ्यायची तर त्याचा बोजा पुन्हा ग्राहकांवर येणार. ती कमीत कमी घेता यावी याकरिता यंत्रणेवरील अनाधिकृत भार कमी करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणला दिले आहेत.मुख्यालय पातळीवरून सर्व वीजवाहिन्याचा आढावा घेण्यात येत आहे. त्याअनुषंगाने अतिभारीत असलेल्या वीज वाहिन्यांची माहिती क्षेत्रीय स्तरावरील संबंधित अधीकाऱ्यांकडे पाठवली आहे. रोहीत्रांवरील अतिरिक्त भार कमी न झाल्यास सबंधितांना जबाबदार धरण्यात येऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. या मोहीमेमुळे वीज यंत्रणेवरील ताण कमी होणार आहे. तसेच या मोहीमेमुळे अनावश्यकपणे वाढणारी विजेची मागणी देखील कमी होण्यास मदत होणार आहे . तरी ग्राहकांनी वीजचोरी, अनधिकृत व गैरवापर टाळून अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

नेवासा (प्रतिनिधी)राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे पी.ए.  राहुल राजळे यांच्यावर काही अज्ञात गुंडांनी लोहगाव येथे जीवघेणा हल्ला केला. यावेळी ३ ते ४ अज्ञातांनी गोळीबार केला.राजळे यांच्यावर ५ गोळ्या झाडण्यात आल्याचे समजते. घटना काल शुक्रवारी रात्री सव्वा नऊ ते साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली.राजळे एका यात्रेतून आपल्या घरी परतत असताना आधीच दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी डाव साधला. त्यांच्यावर ५ फायर झाले, त्यापैकी २ गोळ्या त्यांना लागल्या.घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.राहुल राजळे यांना तातडीने उपचारासाठी अहमदनगर येथे हलवण्यात आले. रात्री १२ च्या सुमारास त्यांच्यावर तातडीने शत्रक्रिया करण्यात आली.हल्ल्याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी रात्री परिसराची नाकाबंदी केली होती. हल्लेखोरांचा कसून शोध सुरू होता. हल्लेखोर सराईत आणि परिसरातील असावेत असा कयास आहे.दरम्यान मंत्र्यांच्या स्वीय सहायकावर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. राहुल राजळे यांचा काही वर्षांपासून गडाख परिवारासोबत आहेत. सध्या ते मंत्री शंकरराव गडाख यांचे पीए म्हणून काम पाहत आहेत.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget