लेखक - डॉ. सलीम सिकंदर शेख-पवित्र दिव्य कुरआन नुसार ,"" ज्याने मला जन्म दिला आहे ,तो ही मला सरळ मार्ग दाखवतो # तोच मला अन्न-पाणी देतो #,आणि आजारी पडलो तर तोच मला बरा करतो# तोच मला मृत्यू देईल आणि मग पुन्हा तोच मला कयामतच्या दिवशी जिवंत करील # आणि ज्यांच्यापासून मी आशा बाळगतो की,तोच (कयामतच्या) मोबदल्याच्या दिवशी माझी चुक माफ करील ," (पवित्र कुराण ,पारा नं.१९ ,सुरहा नं.२६ ,अल-अशुराह आ.नं.७८,७९,८०,८१,८२).
#" तोच सृष्टीचा निर्माता ,रब (पालनकर्ता) आहे , तोच एक मात्र कृपावंत ,आणि दयावंत आहे ." ( पारा नं.१ सुरह नं.१ अल -फातिहा आ.नं.१,२)
#" तोच चिरंतरजीवी असून ,तमाम सृष्टीचा भार त्यानेच सांभाळलेला आहे , पृथ्वी व आकाशाचा स्वामी (रब) तोच आहे " ( सु..नं.२ आ.नं.२५९).
# " समस्त सृष्टीचा स्वामी ( रब) तोच आहे , प्रतिष्ठा प्राप्त करणारा ही तोच (रब) आहे व अपमानित करणारा ही तोच आहे " ( सु.नं.३ आ.नं.२६-२७)
# " आकाशातील चंद्र सुर्य तारे सर्व काही त्याचेच आहे ,तोच जी्न व मृत्यू देणारा आहे "( सु. नं.१०, आ.नं.५५-५६).
#" पृथ्वी व आकाशातील गुप्त सत्यांचे ज्ञान फक्त त्यालाच आहे ,तो सर्व ज्ञानी आहे ,तो सर्व काही करु शकतो "( सु. नं. १६,आ.नं. ७७)
#" सृष्टीच्या प्रत्येक वस्तूला तिचे स्वरूप प्रदान करणारा व तिला मार्ग दाखविणारा तोच आहे ". (सु.नं.२०,आ.नं.५०).
#" मागिल व पुढील सर्व समई तोच आहे , चिरंजीवी व चिरस्थानी तोच आहे ." ( सु. नं. २० आ.नं.११०-१११).
-- " तोच सर्वोत्तम उपजिविका देणारा आहै , सर्वत्र आहे ." ( सु. नं. २२ आ.नं.५८ व ६६).
#" तोच असण्याला नष्ट करतो , सत्याला खरे करून दाखवतो , लोकांची निराशा झाल्यानंतर ही पाउस पाडतो " ( सु.नं..४२ आ.नं.२४ व ३१).
#" तोच जबरदस्त व बुद्धीमान आहे , तोच आद्य ही आहेत व अंतिम ही तोच राहाणार आहे , तोच प्रकट ही आहे व तोच अप्रकटही , व. तोच मनातील रहस्ये ही जाणणारा ,"( सु.नं.५७ आ.नं.१ ते ६).
#"तोच वाली व दाता आहे , तोच मृतांना जिवंत करणारा (कयामतच्या दिवशी) आहेत ." (सु. नं.४२ आ.नं.९).
#" कोणीही त्याचा पुत्र नाही व त्याच्या बादशहीत कोणीही त्याचा भागिदार नाही ." ( सु. नं.१७ आ.नं.१११).
# " तोच क्षमा करणारा ही आहे व कठोरातील कठोर शिक्षा देणारा ही तोच आहे ." ( सु. नं.१३ आ.नं.६)
# " तरी ही तो - निरपेक्ष आहे , कोणीही त्याची संतती नाही व तो ही कुणाची संतती नाही ." पारा नं ३० सु.नं ११२ सुरह -ईखलास आ.नं.१ ते ४).
आपण सृष्टी वर तारकीक लक्ष दिले तर , निश्चितच आपण आश्चर्यचकित होत असतो , सृष्टीतील प्रत्येक कण न कण , चंद्र सुर्य ,तारे ,प्रत्येक घटना आपल्याला आश्चर्य चकीत , चमत्कारिक, अदभुत करुन सोडतात . सृष्टीच्या निर्मितीचा व सृष्टी चा सुनियोजित आराखडा ,रचना , पद्धती, त्यांची प्रत्येक वेळेस ची अचुकता , आप-आपल्या वेळी , त्यामधे मिली सेकंदाचा ही फरक नाही ,एवढी अचुकता , चंद्र सुर्य तारे पृथ्वी यांच्या मधे एक मिली सेंकदाचाही फरक न होता आपल्या वेळेनुसार रूतूचक्र फिरत आहेत .येवढं अदभुत चमत्कार आज विज्ञानाच्या युगात सुद्धा आपण आश्चर्यचकीत होऊन पहात असतो. एवढ्या जगात , एवढ्या मोठ्या जनसंख्येला वेळेवर तीन वेळा पोटात अन्न , व समुद्रात जवळपास १८००० आठरा हाजार जिवजंतु आहेत ( कुरआन च्या नुसार) फक्त समुद्रात ..त्यामधे एकटा व्हेल मासा फक्त कितीतरी टन ,टन एका वेळेस खातो .. फक्त एक व्हेल मासा .असे कोटींनी जिवजंतु जिवंत पृथ्वीवर आहेत . त्यामध्ये प्रत्येकाच्या गरजा वेगवेगळे , नखरे वेगवेगळे हे सर्व सिस्टिम बघून माणूस हैरान होत असतो ..पण सृष्टीच्या प्रत्येक जिवजंतु , प्राणी मात्रा , प्रत्येक आणु व रेणू ,ची साचेबद्ध रचना बनवली आहे , प्रत्येक गोष्ट शिस्तबद्ध , साचेबद्ध , काम करीत आहे, प्रत्येकाला आप -अपलं अस्तित्व -ओळख देऊन जन्माला घातलं आहे., सृष्टीत चराचरात चैतन्य भरलेले पाहायला मिळते , प्रत्येक जिवाला एक आपलं वैयक्तिक पातळीवर वैशिष्ट्य बाहल केलेलं आहे .
सृष्टीच्या प्रत्येक जीवजंतू जन्मापासून मृत्यूपर्यंत एक साचेबद्ध नियमितपणे नियमबद्ध जीवन जगत आहे , हे कोणीतरी चाललंय हे लक्षात घेतलं तर .
आईच्या गर्भात वाढणाऱ्या बाळाला तो जन्माला येण्याआधी त्याला उपाशी पोटी राहु नाही म्हणून येण्याआधीच दुधाची सोय पुर्ण करुन ठेवतो .किती अद्भूत आहे हे सर्व विचार केला तर.त्या बाळाला थोडं थोडं मोठं करतो आई बाबा , समाजाच्या प्रत्येक घटकांकडून काही तरी शिकायला देतो.
जमीनीतुन एक दाणा पेरणी केल्यानंतर त्या दाण्याचे रूपांतर असंख्य संख्येने करून ते धान्य , प्रत्येक दाण्यांची विल्हेवाट लाउन , प्रत्येकाला त्याच्या भुकेच्या वेळेनुसार पोटात घालतो .किती अद्भुत आहे ना ? विचार केला तर आश्चर्य करण्याशिवाय पर्याय नाहीच नाही.
ज्याच्या त्याच्या कर्तृत्वानुसार , कर्मानुसार तो मोठा होत जातो , ५०,६०,७०,८०-१०० जगून जग सोडून जातात , सृष्टीच्या प्रत्येक कणा - कणाला मग काही ही आसो त्याला मरण हे निश्चित ,सत्य आहे ( कुल्यु नफसून जायकतुल मौत ), मृत्युनंतर तो कयामतच्या दिवशी जीवंत सुद्धा करणार आहे , तुम्ही या जगात केलेल्या चांगल्या- वाईट कामांचं हिशोब घेण्यासाठी..हे जीवन चक्र आहे.
हे सर्व फक्त अदृश्य अल्लाहा च चालवत असतो. .!!.
अल्लाहा बद्दल काही ही व्याख्या करताच येणार नाहीत , .
पवित्र कुरआन पारा न. १५ मधे ,"हे पैगंबर (स्व.) सांगा की,जर सात ही समुद्र हे माझ्या पालनकर्तयाच्या गोष्टी लिहिण्यासाठी शाई (लिहीण्याची) बनला तर ,तो समुद्राची शाई संपेल , परंतु ,पालणकरत्याच्या गोष्टी संपणार नाही, इतकेच नव्हे तर पुन्हा तितकीच शाई आम्ही आणली तरी देखिल पुरेशी ठरणार नाही ," (सुराहा अल - कहफ आ..नं.१०९) ..!!!.
लेखक - डॉ. सलीम सिकंदर शेख
बैतुशशिफा जनरल हॉस्पिटल
श्रीरामपूर ९२७१६४००१४