पवित्र कुराण ची सुरुवातच आशा आयातीने होउन पहील्या पारा १ व पहील्या सुराहा नं.१ यामध्ये , (१)सर्व स्तुती ही फक्त अल्लाहा साठीच आहेत ,जो संबंध सृष्टीचा रब आहे. " रब " या शब्दाचा अर्थ मालक , पालनपोषण करणारे, समस्त सृष्टीची काळजी घेणारी, देखरेख करणारे,शासक व्यवस्थापक , (२) तोच एकमात्र कृपावंत,दयावंत आहे , (३)प्रलय(कयामतच्या) दिवसाचा स्वामी फक्त तोच आहे,(४) आम्ही, सर्व जण तुझीच बंदगी ( ईबादत , भक्ती ) करतो ,(५) फक्त व फक्त तुमच्या जवळच (पाशी)मदत मांगतो ,(६) आम्हाला सरळ मार्ग दाखवं ,(७)जे कोपग्रस्त झाले नाहीत, व जे मार्ग भ्रष्ट नाहीत ( अर्थात, ज्या मार्गाने तुम्ही खुश आहेत ) असा सरळ मार्ग आम्हाला दाखवां..( अल-,फातिहा १ ते ७).
पहिल्या प्रथमच पवित्र कुराण मधे ईस्लामचा स्वभाव, वैशिष्ट्ये दर्शवली आहे. त्यामधे शांतता, स्नेहभाव, प्रेम, परोपकार आहे, वविशेष महत्त्व प्राप्त झालेत ते प्रेम, करुणा, सहानुभूती ही बांधवाप्रती व संपूर्ण सृष्टीप्रती .
या संबंध सृष्टीला मार्ग , दिशा दाखवण्यासाठी वेळोवेळी सव्वा लाख प्रेषीत पाठवले.त्यात अंतिम प्रेषित मुहम्मद स्व यांना सृष्टीच्या मार्गदर्शनासाठी त्या बरोबरच पवित्र कुराण हे समस्त सृष्टीला "जीवन कसे जगावे " यासाठी पाठवले.
प्रेषित मुहम्मद स्व . सांगताना की, " सर्व निर्मित प्राणीमात्र अल्लाहा (ईश्वरा) ची लेकरे आहोत म्हणून त्यांनी निर्माण केलेल्या मानवी शी जो प्रेम करतो, त्यांच्या शी अल्लाहा (ईश्वर) प्रेम करतात ."
पवित्र कुराण म्हणते ," जो अणु-रेणू ईतके ही सत्कर्म , त्याचे ही फळ त्याला जरूर मिळेल, व जो अणु- रेणू ईतके ही दृष्ट - कर्म (वाईट कृत्ये )करील त्याला त्याचे वाईट फळ ( त्याला चाखायला मिळेल) मिळेल." (सुराह नं.८ अल- जिल -जलाल आ.नं.८).
सृष्टीच्या निर्मितीनंतर चे पहिले प्रेषित हजरत अदम ( अॅडम) अलै. यांच्या पुत्र कैन याने त्याच्याच भाउ ' अबेल ' ची हत्या केली .या जगात घडलेल्या पहिल्या पहिल्या खुना बदल पवित्र कुराण मधे अल्लाहा सांगतात , " कोणाचीही हत्या न घडता पृथ्वीवर उपद्रव मागविण्या करिता ,. जो एखाद्या ही माणसाचा खुन , हत्या करील ..तर ..समजा त्याने संपूर्ण मानवजातीची हत्या केली व करणारा ठरैल ..., व....जो कोणी एका मानवाचे रक्षण करील ...त्या व्यक्तीला अखिल, सर्व , मानवी जातीचे रक्षण केल्या सारखं होईल .ते श्रेय मिळेल..''"( सुराह नं.५ अल- माईदा ,आ.नं.३२ वी).
ईस्लाम धर्माने देशात, समाजात कोणत्याही प्रकारची हिंसक कारवाया करण्यासाठी मुळीच परवानगी दिलेली नाही व देत ही नाहीत. पृथ्वीवर मानवी कल्याणासाठी व सुखरूप राहावं म्हणून या जगात अल्लाहा सुधारणा घडवून आणण्यासाठी पवित्र कुराण मधे स्पष्ट शब्दात आदेश देतात की, " पृथ्वीवर तिच्यामधे सुधारणा घडवून आणा व सुधारणा घडवून आणल्या नंतर पृथ्वीवर उपद्रव ,कलह माजवू नका , आणि भयमुक्त आशेने अल्लाहा (ईश्वर) ची प्रार्थना करीत राहा . अल्लाहा चे वरदान ,कृपा ,कायम सत्कर्मे करणाऱ्यांसाठी उपलब्ध आहेत." ( सुराह अल -आराफ आ.नं.५६ ).
वरील सर्व पवित्र कुराण व प्रेषित मुहम्मद स्व यांच्या सांगण्यावरून हे लक्षात येते की जे जे लोकं आपल्या दृष्ट प्रवृत्ती ने , दृष्ट विचाराने ,वागण्याने , पृथ्वीवर जाणूनबुजून कलह , उपद्रव ,विष पसरविण्याचे काम , प्रयत्न करतात त्यांच्या साठी एक प्रकारची तंबीच आहे.व जे जे खरोखरच पुण्यं च , समाजातील सर्वच थरातील लोकांच्या कल्याणासाठी झटतात त्यांच्यासाठी एक वरदान च आहे.
ईस्लाम ने कोणत्याही जाती धर्माचा कधीच केव्हाही तिरस्कार केला नाही .ईतर कोणत्याही बाबतीत बळजबरी करण्याची कधीच परवानगी दिली नाहीत.याबाबत ..
पवित्र कुराण म्हणते की, " धर्माच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची जोर जबरदस्ती नाही.."(सुराह नं. २ अल- बकराह आ.नं.२५६).
हे सत्य आहे की ईस्लाम अत्याचाराविरोधात, असत्या विरोधी , अन्यायाविरुद्ध , जे जे लोकं नाहक त्रास देतात त्याविरोधात, स्रीयां वर जेथे जेथे अत्याचार किंवा त्यांच्या चारित्र्यावर हनन होत असेल तर , स्त्रियांच्या रक्षणा साठी आवाज उठवतो .. जेथे जेथे काही चुकीचे होत असेल आशा ठिकाणी आवाज उठवण्यासाठी परवानगी देतो .
परंतु , सर्व आक्रमकांना , विरोधकांना , शक्य तो संयमाने ,नेमेस्त पणे ,शांतीने उत्तर द्यायचे आव्हान करतो .
याबाबत पवित्र कुराण म्हणतात की," तुम्हाला जर बदला घेण्याचा असेल तर ,जितक्या प्रमाणात तुमच्या वर करण्यात आला ,आगदी तेवढ्याच प्रमाणात ...पण , परंतु ...जर संयम राखाल तर तुमच्यासाठी ते अधिक चांगले होईल ...जर शांतते कडे त्यांचा कल असेल तर तुम्ही ही शांततेकडेच झुका .." , सुराह नं. २ अल - बकराह आ.नं.८१).
यासर्व पवित्र कुरआन व प्रेषित मुहम्मद स्व यांच्या आदर्शवत शिकवणीनुसार व जीवन चरित्रानुसार हे निर्विवाद सत्य व सिध्द होते की ईस्लाम कधीच केव्हाही जातीयवाद विद्वेष व दहशतवादी कारवाया करण्यासाठी कधीच उत्तेजन देत नाहीत . ईस्लाम चा कायम शांततेकडे कल ,झुकाव राहीलेला आहेत....
Post a Comment