Latest Post

श्रीरामपूर (शहर प्रतिनिधी शेख फकीर महंमद) श्रीरामपूर येथील नगर परिषदेच्या वतीने होत असलेली घरपट्टी नळपट्टी व बाजारपेठेतील दुकानांची जोर जबरदस्तीने होत असलेलि पट्टी वसुली शीथील करणे बाबत आज दिनांक 17/ 3/ 2022 रोजी महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले सदरील निवेदन स्वीकारताना पालिकेतील अधिकारी श्री कविटकर यांनी यासंदर्भात वरिष्ठांना कळवितो असे सांगितले सदरील निवेदन देताना पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली महासचिव शेख फकीर महंमद उत्तर जिल्हाध्यक्ष राज मोहम्मद शेख इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद पत्रकार संघाचे पुणे शहराध्यक्ष मोहम्मद हनीफ तांबोळी पत्रकार संघाचे जिल्हा सचिव सलाउद्दीन शेख उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्ष एजाज सय्यद श्रीरामपूर तालुका अध्यक्ष सुभाषराव गायकवाड श्रीरामपूर शहराध्यक्ष रियाज खान पठाण श्रीरामपूर तालुका उपाध्यक्ष गुलाब भाई शेख बेलापुर शाखा प्रमुख मुसा भाई सय्यद बेलापूर शाखा उपाध्यक्ष मोहम्मद अली सय्यद महिला जिल्हाध्यक्ष सौ समिना रफिक शेख पत्रकार संघ सदस्य सलीम जान मोहम्मद शेख अमीर बेग मिर्झा शेख नजीर गफूरभाई शकील इस्माईल कोथमिरे आदी पत्रकार या वेळी उपस्थित होते

पत्रकार संघाच्या वतीने दिलेल्या निवेदनात करण्यात आले की महाराष्ट्रातील नगरपालिका व महानगरपालिकेच्या निवडणूका ओबीसी चा मुद्दा सोडविण्याकरिता राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुका लांबणीवर टाकल्या असून या सर्व नगरपालिकांवर  प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे सबब सर्व प्रशासकीय अधिकार्‍यांकडून जनतेच्या अडीअडचणीं चा विचार न करता कठोरपणे शक्तीची घरपट्टी पाणीपट्टी व दुकानांची पट्टी वसुली करण्यात येत आहे यामुळे सर्व नागरिक हवालदिल झाले आहे विशेष म्हणजे श्रीरामपूर येथील नगर परिषदेच्या वतीने येथील उपविभागीय अधिकारी व नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्या आदेशानुसार जोरदार पट्टी वसुली करण्यात येत आहे पट्टी वसुली करिता नगरपालिकेचे वसुली पथक प्रत्येक वॉर्डातील घरी घरी जाऊन थकलेल्या पट्टीची मागणी करून दमबाजी करीत आहेत पट्टी थकलेल्या लोकांन पट्टीच्या ऐवज मध्ये त्यांच्या घरातील सामान घरावरील पत्रे जप्त करून नळ  कनेक्शन तोडण्याची धमकी देत आहेत सबब नागरिकांनी नगरपालिकेत चौकशी केल्यास उलट कर्मचारी वर्गाचे गाऱ्हाणे ऐकावे लागतात वसुली विभागातील कर्मचाऱ्यांकडून सांगितले जाते की या पट्टी वसुली नंतरच या पैशावर आमचे पगार व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन होणार असल्याने तुम्हीच आमच्यावर उपकार करा व पट्टी भरा असे सांगितले जाते अर्थातच वसुली कर्मचाऱ्यांनी जनतेचे गाऱ्हाणे ऐकण्यास कानावर हात ठेवले आहे यामुळे शहरातील जनता त्रस्त झाली असून पालिका प्रशासनाच्या या जोर जबरदस्ती पणाच्या वागणुकीचा निषेध नोंदवित आहे वास्तविक पाहता सन 2019 -20- 21 व 22 मध्ये कोरोना च्या प्रादुर्भावामुळे लोकांना उद्योग धंद्या पासून मुकावे लागले सद्य स्थितीतही बाजारपेठेतील दुकानदार व सर्वसामान्य नागरिकांची अत्यंत दुरवस्था झाली असून अद्याप शहरातील जनता कोरोना च्या संकटातून सावरली नसताना त्यांच्यावर वसुली चा बडगा थोपणे योग्य नसून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चालविलेल्या या अत्याचाराचा आम्ही निषेध नोंदवित असून जनते कडून सूट देऊन टप्पे वारीने झेपेल अशा स्वरूपात व भरता येईल अशा स्वरूपात पट्टीची वसुली करावी पट्टी वसुली मध्ये शिथीलता वर्तवावी जेणेकरून नागरिकांना पट्टी भरण्यास सवलत मिळेल व ते आपल्या कुवतीप्रमाणे पट्टी भरण्यास समर्थ होतील सदरील या बाबींचा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून सक्तीची पट्टी वसुली शिथील करावी असे नमूद करण्यात आले असून त्वरित पट्टी वसुली शीथील न केल्यास पत्रकार संघ व नागरिकांच्या वतीने पालिकेसमोर तीव्र आंदोलनास सुरुवात करण्यात येईल असा इशाराही पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आला.

अहमदनगर प्रतिनिधी-विषारी पदार्थ घेऊन एका पोलीस अंमलदाराने जीवन संपविले. सोमनाथ बापू कांबळे (रा. विळद ता. नगर) असे मयत पोलीस अंमलदाराचे नाव आहे. ते पोलीस अधीक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षात नेमणुकीस होते. त्यांनी विषारी पदार्थ कोणत्या कारणातून घेतला, याची माहिती अद्याप समोर आली नसून या घटनेमुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.नगर तालुक्यातील इमामपूर शिवारात कांबळे यांनी तीन दिवसांपूर्वी विषारी पदार्थ घेतला होता. त्यांना उपचारासाठी पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरूवारी दुपारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कांबळे हे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षात नेमणुकीस होते. त्यांनी अनेक हरवलेल्या मुले-मुली, महिला-पुरूष यांचा शोध घेण्याचे काम केले आहे. त्यांनी कोणत्या कारणातून विष घेतले याची माहिती मिळू शकली नाही. पोलीस अंमलदाराने विष घेतल्याची माहिती जिल्हा पोलीस दलात पसरल्याने खळबळ उडाली आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी): आज दि. 17/03/2022 रोजी Dysp संदिप मिटके   श्रीरामपूर विभाग,अहमदनगर यांना श्रीरामपूर शहरातील वैभव लॉज मध्ये भगवान विश्वासराव क्षत्रीय वय 68 रा वैभव लॉज वॉर्ड न 5 श्रीरामपूर ( लॉजमालक) हा हायप्रोफाइल  महिलांकडून वेश्याव्यवसाय करुन घेत आहे असे खात्रीशिर बातमी मिळाली.  त्याप्रमाणे Dysp संदिप मिटके  यांनी PI सानप श्रीरामपूर शहर , व अंमलदार यांचे पथक तयार करुन श्रीरामपूर शहरातील वैभव लॉज येथे बनावट ग्राहक पाठवुन शासकीय पंचासमक्ष छापा टाकुन दोन पिडीत महिलांची सुटका केली असून आरोपी भगवान विश्वासराव क्षत्रीय वय 68 रा वैभव लॉज वॉर्ड न 5 श्रीरामपूर ( लॉजमालक)व विश्वास रामप्रसाद खाडे वय 26 रा कांदा मार्केट,शेळके हॉस्पिटल शेजारी श्रीरामपूर्  यांस ताब्यात घेण्यात आलेले आहे. आरोपी विरुध्द श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन जि.अहमदनगर येथे प्रचिलीत कायदयान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम चालु आहे.सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा.  स्वाती भोर,  यांचे मार्गदर्शनाखाली  Dysp संदीप मिटके ,PI सानप, Api  विठ्ठल पाटील,PN करमल पो कॉ नितीन शिरसाठ,  पो कॉ गौतम लगड, राहुल नरोडे, रमिझ् आत्तार  म पो कॉ सरग, गलांडे आदींनी केली.

बेलापुर (प्रतिनिधी  )- प्रदेश तेली महासंघाच्या अध्यक्षपदी बेलापुर येथील सामाजिक कार्यकर्ते एकनाथ उर्फ लहानुभाऊ नागले यांची बिनविरोध निवड करण्यात आली  आहे तेली महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष           भागवतराव लुटे यांच्या अध्यक्षतेखाली   जिल्हाध्यक्ष निवडीबाबत बैठक बोलविण्यात आली होती या वेळी महासंघाचे मार्गदर्शक. विठ्ठलदास लुटे उपस्थित होते बैठकीत  जिल्ह्यातील सामाजिक विषय व संघटनेच्या पुढिल वाटचाली विषयी सकारात्मक चर्चा झाली,तसेच जुनी जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करुन नुतन  कार्यकारिणी बनविण्यासाठी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि जेष्ठ मार्गदर्शक  जयदत्तजी क्षिरसागर व प्रदेशाध्यक्ष श्री. विजयभाऊ चौधरी यांच्या संमतीने सर्वाधिकार नागले यांना देण्यात आले.

      या वेळी नुतन जिल्हाध्यक्ष एकनाथ नागले यांना निवडीचे नियुक्ती पत्र श्री. भागवतराव लुटे यांच्या हस्ते देवुन त्यांचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी संघटनेचे प्रदेश सेक्रेटरी मा. श्री. विजयजी काळे,विभागिय अध्यक्ष मा. श्री. अरविंद शेठ {कारभारी}दारुणकर, युवा जिल्हाध्यक्ष सोमनाथशेठ देवकर,  प्रभाकरराव लुटे. राजेंद्रभाऊ म्हस्के,. कैलासजी बनसोडे,. अनिलशेठ जाधव, देविदास कहाणे  दिपक नागले संतोष मेहेत्रे बाळकृष्ण दारुणकर नितीन फल्ले अँड विजय साळूंके रामेश्वर नागले संदीप सोनवणे योगेश शिंदे सागर ढवळे प्रविण नागले शुभम नागले आदि मान्यवर उपस्थित होते शेवटी प्रभाकर लुटे यांनी आभार मानले

श्रीरामपूर प्रतिनिधी-श्रीरामपूर शहरात काल पोलीस उमहानिरीक्षक पथकाने जुगार खेळणार्‍या क्लबवर छापा टाकून पोलिसांनी 2 लाख 43 हजार 780 रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. यात 20 जणांना ताब्यात घेण्यात आले होते तर एक जण पसार आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.श्रीरामपूर शहरात जुगार, मटका, तसेच अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. शहरात अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय आहे तसेच पोलीस उपविभागाीय कार्यालय असतानाही शहर पोलीस ठाण्याचे दुर्लक्ष असल्याचे यावरून स्पष्ट होते. पोलीस उमहानिरीक्षक पथकाने दोन तीन ठिकाणी छापे टाकले. यात तिरट नावाचा पत्याचा जुगार पैसे लावून खेळत असताना पकडले. यात दिनेश मोहनदास माखिजा, चंद्रकांत गोपीनाथ गुडधे, नसीम मुख्तार शेख, अमरजितसिंग, जावेद खलिद मलिक, रोहिदास अडागळे, सुखदेव गांगुडेर्र्, जाफर करीम शेख, जुनेद असलम मेमन, सलमान हसन कुरेशी, समीर शेळके,जैनुद्दीन याकूब शेख, तुषार नाणेकर, राजेश गोसावी,अजमल नासिर शेख, सर्फराज बाबा शेख, अकील शेख, अमजद पठाण यासह अन्य 21 जण तिरट नावाचा जुगार खेळत असताना पकडले. पोलिसांनी त्यांच्याकडून 45780 रुपये रोख रक्कम, 63 हजारांचे 15 मोबाईल, 1 लाख 55 हजारांच्या पाच मोटारसायकल असा एकूण 2 लाख 43 हजार 780 रुपयांचा ऐवज हस्तगत केला.याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक सुरेश मराठे यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नं. 160/2022 प्रमाणे मुंबई जुगार अ‍ॅक्ट 12 अ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी )- एकीकडे दिवाळीपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी स्टँड ओस पडलेले असताना दुसरीकडे या एसटी स्टँडवर खाजगी वाहतूक करणाऱ्या काळ्या पिवळ्या गाड्या बिनदिक्कतपणे आत मध्ये उभ्या राहत असून तेथेच प्रवासी सुद्धा भरले जात आहेत. विशेष म्हणजे एस टी डेपो सध्या सुरू आहे . सर्व अधिकारी कामावर हजर आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्यासमोर या काळया पिवळ्या गाड्यांचे अतिक्रमण बसस्थानकामध्ये झालेले आहे. त्यामुळे एस टी महामंडळाच्या अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने काळया पिवळ्या गाड्यांनी श्रीरामपूरच्या बसस्थानकावर ताबा मिळविल्याचे चित्र सध्या रोज पाहायला मिळत आहे.

गेले अनेक महिने एस टी कर्मचाऱ्यांचा संपूर्ण राज्यात सुरू आहे.श्रीरामपूर डेपो मध्ये काही कर्मचारी हजर झालेले असल्याने नगर,पुणे, औरंगाबाद, नाशिक इत्यादी ठिकाणच्या बसगाड्या सुरू आहेत. मात्र बहुतांश वेळ बसस्थानकामध्ये शुकशुकाट असतो. याचाच फायदा घेत काळ्या पिवळ्या गाड्या चालवणाऱ्या चालकांनी बसस्थानकाचा ताबा घेतला आहे. नगर, संगमनेर,नेवासा या मार्गावर श्रीरामपूरातून काळया पिवळ्या गाड्या चालू असल्याने जनतेची बऱ्यापैकी प्रवासाची सोय झालेली आहे हे निर्विवाद. पूर्वी या गाड्या रस्त्याच्या कडेला उभ्या करून भरल्या जात होत्या. मात्र त्या बंद असल्यामुळे रिकाम्या बसस्थानकाचा सदुपयोग म्हणून कि काय या सर्व काळात या खाजगी गाड्या बसस्थानकामध्ये एका रांगेत उभ्या केल्या जातात आणि तेथूनच भरल्या देखील जातात. त्यामुळे श्रीरामपूरचे बसस्थानक एस टी महामंडळाने काळ्या पिवळ्या गाड्याची वाहतूक करणाऱ्या लोकांना कराराने दिले आहे कि काय ? असा प्रश्न सध्या श्रीरामपूरकरांना पडला आहे.

नजिकच्या काळामध्ये एस टी बसेस सुरू होण्याची शक्यता नाही . त्यामुळे जनतेची गैरसोय दूर होण्यासाठी या काळया पिवळ्या गाड्यांचा निश्चितपणे मोठा हातभार लागला आहे . प्रवासी वाहतुकीचे सर्व नियम मोडून या गाड्यांमधून प्रवासी भरले जातात . त्याबद्दल ही नागरिकांची तक्रार नाही . कारण गरजू लोकांना प्रवास करणे क्रमप्राप्त असल्याने ते या गाड्यांमधील सर्व प्रकारच्या गैरसोयी सहन करत आपला प्रवास करीत असतात . नगर लाईनवर चालणारे गाड्यांचे चालक हे किमान सौजन्याने तरी वागतात . मात्र संगमनेर लाईन वर चालणाऱ्या गाड्यांच्या बाबतीत नागरिकांच्या मोठ्या तक्रारी आहेत . त्यात ही आता या गाड्यांनी राजरोसपणे श्रीरामपूरच्या बसस्थानकावर ताबा मिळविल्याने व तेथूनच या गाड्यांची वाहतूक होत असल्याने भविष्यामध्ये काळा पिवळ्या गाड्यांसाठी श्रीरामपूरचे बसस्थानक हे माहेर घर बनण्याची शक्यता आहे . एस टी च्या स्थानिक अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने या गाड्या एसटी स्टँड मध्ये लावल्या जातात .ज्या अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने या गाड्या बस स्थानकात लावण्यात येत आहेत त्या अधिकाऱ्यांचा शोध घेऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात यावा अशी मागणी शहरवासीयांनी एस टी महामंडळाच्या जिल्हा नियंत्रक यांच्याकडे केली आहे.


श्रीरामपूर प्रतिनिधी-शासनाने पंधरा वर्षानंतर सर्व प्रकारची वाहने  बंद करण्याचा निर्णय घेतला आहे .मात्र त्यामुळे अनेक वाहने बिनधास्तपणे व परिवहन अधिकाऱ्यांची परवानगी नसतानाही स्क्रॅप केली जात आहेत. त्यामध्ये कागदपत्रे असणारी व कागदपत्रे नसणारी अशी अनेक वाहने स्क्रॅप केली जात असून त्यामध्ये चोरी केलेल्या वाहनांचा समावेश असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या स्क्रप होणाऱ्या वाहनांवर नियंत्रण यावे व त्यासाठी शासनाने स्वतंत्र पथक किंवा पोलीस नियंत्रणासाठी नियुक्त करावेत. व विनापरवाना स्क्राप करणाऱ्या स्क्रॅप धारकांवर कडक कारवाई करावी. अशी मागणी आता होत आहे.केंद्र शासनाने 15 वर्षा

नंतर सर्व प्रकारची वाहने स्क्रॅप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पंधरा वर्षे झाल्यानंतर अनेक वाहने स्क्रप करण्यात येत आहेत. मात्र या स्क्रॅप होणाऱ्या वाहनांवर कोणाचेही नियंत्रण नाही. यासंदर्भात उपविभागीय परिवहन अधिकारी श्रीरामपूर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्क्रॅप होणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना परिवहन विभागातून परवानगी घ्यावी लागते .तरच अशी वाहने स्क्रॅप करता येतात. मात्र श्रीरामपूर शहराप्रमाणेच इतर ठिकाणीही दररोज अनेक वाहने स्क्रॅप केली जात आहेत. मग ती वाहने खरंच पंधरा वर्षे झालेली आहेत की चोरीचे आहेत. याचाही तपास लागत नाही .श्रीरामपूर शहरात तर अनेक तरुणांनी असे व्यवसाय टाकले आहेत व ते गब्बर होत चालले आहेत. मात्र यातून खरंच कायदेशीर हा व्यवसाय होत आहेत का? हा खरा प्रश्न आहे. जर विभागीय परिवहन अधिकाऱ्याची परवानगी नसतानाही वाहने स्क्रॅप केली. तर अशा वाहनधारकांवर, गॅरेज मालकांवर , व स्क्रॅप करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी. जेणेकरून बेकायदेशीरपणे वाहने स्क्रॅप करणाऱ्या टोळीवर नियंत्रण येईल .अनेक तरुण त्यामुळे विविध ठिकाणाहून वाहनांच्या चोरी करतात व ही वाहने स्क्रॅप केली जातात . श्रीरामपूर शहरांमध्ये दोन रुपये किलोने  वाहने स्क्रॅप करून दिली जातात. त्यामुळे वाहने चोरीला ही आणखी पाठबळ मिळत आहेत. शिवाय अशी वाहने विविध ठिकाणी स्क्रप केली जात असल्यामुळे या स्क्रॅप वाहनांच्या रस्त्यावरच अस्ताव्यस्त पडलेल्या सुट्ट्या भागामुळे इतर नागरिकांना येण्या-जाण्यास अडथळा होतो. अनेक जण त्यामुळे जखमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोणतेही वाहन स्क्रप होताना विभागीय परिवहन कार्यालयाची किंवा अधिकाऱ्याची त्यास परवानगी हवी .जर‌ ती नसल्यास किंवा कोणतीही वाहन स्क्रॅप विनापरवाना होत असेल तर अशा वाहन स्क्रॅप करणाऱ्यांवर  त्वरित कारवाई व्हावी. अशी मागणी आता जोर धरू लागली असून यासाठी परिवहन विभाग, पोलीस यंत्रणा व शासनाने याकडे अधिकाधिक लक्ष देऊन या विनापरवाना स्क्रॅप होणार्‍या वाहनांवर नियंत्रण यावे म्हणून स्वतंत्र पथक निर्माण करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे नागरिकांडुन बोलले जात आहे.



MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget