Latest Post

श्रीरामपुर (प्रतिनिधी) - येथील श्रीरामपूर तालुका मेडिकल असोसिएशन अणि शब्दगंध साहित्यिक परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मराठी राज भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने कवी सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ. ईफरा सलीम शेख, बिलाल इकबाल काकर,श्रावणी नवनीत जोशी व वैष्णवी नवनीत जोशी या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा.डॉ. शिरीष लांडगे हे होते.

यावेळी कविवर्य सुभाष सोनवणे यांना समाज भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. कवी रज्जाक शेख यांनी प्रास्ताविक केले व आपल्या रचने ने रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमात मान्यवरांचे स्वागत व सत्कार स्वागताध्यक्ष इकबाल इस्माईल काकर (सर) यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नवनीत जोशी यांनी केले तर आभार श्रीरामपूर तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.सलीम शेख व डॉ.सौ.कौसर शेख यांनी मानले.


 याप्रसंगी प्रा.अजय घोगरे, इसाक शेख, कॅरियर कॉम्प्युटरचे रफिक शेख सर,जमील काकर,शाहीन शेख मॅडम,आरिफ जहागीरदार, ऑलविन नाॅर्टन, कवी आनंदा साळवे, शब्दगंधचे अध्यक्ष मीराबक्षभाई बागबान तथा इतरही मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अध्यक्ष डॉ.सलीम शेख,शब्दगंधचे अध्यक्ष मीराबक्षभाई बागबान,  स्वागताध्यक्ष इकबाल काकर सर, डॉ.नवनीत जोशी,रज्जाक शेख सर,कवी आनंदा साळवे,आदींनी विशेष परिश्रम घेतले.

बेलापूर (प्रतिनिधी )-.सोसायटीचा पेट्रोल पंप दुरुस्तीच्या नावाखाली वेळोवेळी बंद ठेवुन सेवा संस्थेचे नूकसान करणारांना आपण निवडून देणार आहात का ?असा सवाल संस्थेचे हितचिंतक सुधाकर खंडागळे यांनी केला असुन कोणतीही निवडणुक असो जिथे तिथे मीच हि मक्तेदारी नष्ट करण्यासाठी गांवकरी मंडळाच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असे अवाहन खंडागळे यांनी केले आहे                                           

प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात सुधाकर खंडागळे यांनी पुढे म्हटले आहे की नेतेच कार्यकर्ते होत असतील तर कार्यकर्त्यांना न्याय केव्हा मिळेल ? एकीकडे नेता म्हणवायचे अन दुसरीकडे उमेदवारी लाटायची मग सर्व सामान्यांना संधी मिळणार तरी कधी .कार्यकर्त्यांना निवडणुकीपुरते वापरायचे आणि पदे माञ आपणच बळकवायची.  प्रत्येक संस्थेत तुम्हीच सत्तेत राहायचे तर सामान्य कार्यकर्त्यांनी फक्त तुमचे ओझेच वाहायचे कां असा सवाल बेलापूर सोसायटीचे माजी चेअरमन सुधाकर खंडागळे यांनी केला असून गावकरी मंडळाने सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी दिली आहे  सभासदांचे गांवकरी मंडळाला मिळणारे  पाठबळ पहाता सत्ताधाऱ्यांची हवाच गुल झालेली आहे नाराज सभासद मतपेटीतुन आपला हिसका दाखविल्याशिवाय राहणार नाही बेलापुर ग्रामपंचायती नंतर आता सेवा संस्थेचा कारभारही सभासद गांवकरी मंडळाच्या ताब्यात देतील असा दावा खंडागळे यांनी केला आहे..ग्रामपंचायत,सोसायटी ,बाजार समिती,जिल्हा परिषद,पंचायत समिती अशी कोणतीही निवडणूक असो.ह्या ठराविक नेत्यांचीच मक्तेदारी असते..वेळ येईल तशा तडजोडी करायच्या आणि सत्ता व पदे मिळवायचे हेच यांचे ध्येय आहे.यांचा इतिहास बघितला तर सत्तेसाठी यांनी अनेकांशी घरोबा केला आहे.अनेक नेत्यांच्या मांडवाखालून यांची वरात गेली आहे.हेतू एकच ज्याची चलती त्याच्याशी युती.सोसायटी निवडणुकीतही अशीच अभद्र व मतलबी लोकांची युती झाली आहे.हि युती म्हणजे निवडणुकीच्या  गोंडस नावाखाली जमलेली भ्रष्टाचार करणारांची टोळी आहे.यांचे कारनामे आणि घोटाळे सभासदांना माहित असल्याने सभासद यांच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत.सत्ताधा-यांचे पितळ सभासदासमोर उघडे पडले असल्याने गावकरी मंडळाचे सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास श्री.खंडागळे यांनी व्यक्त केला आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी)-किर्तन प्रवचन हे समाज प्रबोधनाचे धर्म प्रसाराचे साधन आहे परंतु काही लोक वायफळ गोष्टी सागुंन त्यास करमणूकीचे साधन बनवू पहात आहे किर्तन प्रवचनाचा तमाशा करु पहात आहेत हे दुर्दैव आहे अशी खंत तुकाराम महाराज संस्थानचे मठाधीपती महंत उध्दव महाराज मंडलीक यांनी व्यक्त केली . 

उक्कलगाव येथील हरिहर भजनी मंडळ व उक्कलगाव ग्रामस्थांच्या वतीने श्री हरिहर

केशव गोविंद भगवान मंदिराच्या 

प्रांगणात आयोजित अखंड हरिनाम 

सप्ताहाच्या सांगतेप्रसंगी काल्याच्या 


किर्तनात भाविकांना उपदेश करताना ते बोलत होते. "चला बळ गाई, बैसो जेऊ 

एके ठायी...बह केली वणवण पायपिटी लाभलेली 

जाला सिण....खांदी भार पोटी भक, ते 

काय खेळायाचे सुख,..तुका म्हणे धावे, उक्कलगावला 

मग अवघे बरखे। या संतश्रेष्ठ तुकाराम

महाराजांच्या अभंगावर निरुपण करत 

त्यांनी काल्याचे महत्व विषद केले.मंडलीक महाराज पुढे

म्हणाले,की माणूस संस्कृती विसरत चालला आहे संस्कृती विसरलो की विकृती निर्माण होते काम क्रोध मोह मत्सर या गोष्टीवर नियंत्रण मिळविण्याचे शिकाल तरच जिवनात यशस्वी व्हाल शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे त्यामुळे आपल्या मायेपोटी मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवु नका आपला मोह माया सोडून मुलांना शिक्षणासाठी बाहेर पाठवा ग्रंथ समजुन घ्या ग्रंथ समजले तरच संत समजतील समाजाला पोषक असणाऱ्या सर्व गोष्टी ग्रंथामध्ये आहेत .परंतु काही लोक ग्रंथ समजुन सांगतांनाही तमाशाचे स्वरुप आणतात   हे चुकीचे आहे धर्माचे रक्षण व प्रसार करणारांना त्याचे भान असले पाहीजे कष्टाने मिळविलेले धन हे लक्ष्मी असते तर अन्य मार्गाने मिळविलेले धन हे माया असते हीच माया सुखाने झोपूही देत नाही व जगुही देत नाही अन व्यवस्थित खाऊही देत नाही  हवा पाणी जमीन प्रदुषित होणार नाही याची खबरदारी घ्या मन अःतकरण शुध्द ठेवा असे सांगुन भगवान श्रीकृष्ण जन्माचा ओघवत्या 

भाषेत आढावा घेताना त्यांनी अधुन  मधून विविध दाखलेही दिले. उक्कलगाव श्री हरिहर केशव गोविंद भगवान मंदिराचे आणि आपले कौटुंबिक नाते असल्याचा 

 महाराजांनी आवर्जून उल्लेख करत हरिहर भजनी मंडळ व ग्रामस्थांना धन्यवाद दिले. 

ते सांदीपानी गुरुकुल आश्रम पावबाकी, संगमनेर येथील भजनी मंडळाची  लाभलेली साथ, समोर उपस्थित पाच हजारांचा जनसमुदाय यामुळे उक्कलगावला पंढरीचे स्वरूप आले होते. 

हरिहर भजनी मंडळ उक्कलगाव व ग्रामस्थांच्या वतीने सात दिवस चाललेला  हा सोहळा उत्तरोत्तर रंगत गेला. दिवसागणीक भाविकांची संख्या वाढत गेली

त्यामुळे तरुणांचाही उत्साह वाढत 

जाऊन अतिशय भक्तिमय वातावरणात  कोणतेही गालबोट न लागता महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली.गावातील विविध मंडळे, पंचक्रोशितील भजनी मंडळे, प्राथमिक व माध्यमिक

शाळा, ग्रामपंचायत, सेवा सोसायटी,

 मंडप सेवा, जार सेवा पत्रकार या सर्वांनीच आपापल्या पातळीवर सहकार्य केल्याने

उक्कलगावचे पहिल्याच वर्षी सप्ताहाने कळस गाठला.

यावेळी पं.स.माजी सभापती

 इंद्रनाथ पा.थोरात, अशोकचे ज्येष्ठ

. संचालक रावसाहेब पा.थोरात, पं.स.माजी सभापती आबासाहेब थोरात यांच्या हस्ते मंडळाची सप्ताहात व्यासपीठ चालक म्हणून काम पहाणारे नामदेवकाका मोरे, उल्हास महाराज तांबे, बाबा महाराज ससाणे,

मृदंगाचार्य, गायनाचार्य, हार्मोनियम

उछालगाव वादक, देवस्थानसाठी स्वमालकीची

चाललेला जागा देणारे श्री.जगदीश कुलकर्णी

. दाम्पत्य, स्वच्छता कर्मचारी इम्तीयाज शेख विनामुल्य मंडप सेवा

वाढत देणारे सुनील व अनिल गवळी, भजनी मंडळ व अन्य मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला.


बेलापुर  (प्रतिनिधी  )-शेतकऱ्याची कामधेनु असलेल्या बेलापुर सेवा संस्थेत सत्ताधाऱ्यांनी गेल्या दहा वर्षाच्या कार्यकाळात ५० लाख रुपयांचा भ्रष्टाचार केला असुन ही कामधेनु वाचविण्यासाठी गांवकरी मंडळाच्या तेरा उमेद़्वारांना विजयी करा असे अवाहन गांवकरी मंडळाचे मार्गदर्शक जि प सदस्य शरद नवले यांनी केले आहे. बेलापुर सेवा सोसायटीची निवडणूक ६ मार्च रोजी होत असुन गांवकरी मंडळाच्या प्रचाराचा शुभारंभ श्री हरिहर केशव गोविंद भगवान मंदिर येथे संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रफीक शेख हे होते या वेळी बोलताना जि प सदस्य शरद नवले म्हणाले की सत्ताधाऱ्यांनी गेल्या दहा वर्षात मन मानेल तसा कारभार केला जे संचालक स्वतःला सूज्ञ समजुन घेत होते ते देखील चुकीच्या कामाला विरोध करु शकले नाही अनेक चुकीची बिले काढली मग या सूज्ञ म्हणविणारांनी विरोध करण्याचे सोडून मूक संमती दिली त्यामागील कारण शोधणे गरजेचे आहे या संस्थेच अनेकांचे मोलाचे योगदान असुन त्याचा सत्ताधाऱ्यांना विसर पडला आहे कोर्ट केसच्या ,वकील फी च्या नावाखाली बोगस बीले काढली पेट्रोल पंपात वर्षाला सहा हजार लिटरची घट दाखवून पाच लाख रुपयाचे पेट्रोल डिझेल संचालकांनी उधार नेले त्याचे व्याज संस्थेला भरावे लागले अन उधारीवर नेलेले पेट्रोल डिझेल उधारीवर दाखविले हे दुर्दैव आहे पेट्रोल पंपाची केबीन बांधली त्याचे बजेट अचानक दुप्पट कसे झाले  तालुक्यात सर्वात मोठी व उत्पन्नाचे साधन असणारी एकमेव सोसायटी असताना तीचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करुन घेतला ज्याचा संबध नाही अशांनी ग्रामपंचायत  अन सोसायटीही  लुटली.अशा लुटारुंना धडा शिकविण्याची वेळ आली आहे संस्थेचा लुटलेला पैसा वसुल करण्याची जबाबदारी आमची आहे त्या करीता गांवकरी मंडळाच्या ताब्यात सत्ता द्या अन संस्थेचे वाटोळे करु पहाणारांना धडा शिकवा असे अवाहनही नवले यांनी केले या वेळी बोलताना उपसरपंच अभिषेक खंडागळे म्हणाले की अशोक कारखान्याच्या स्थापनेपासूनच्या सर्व बैठका याच ईमारतीत झालेल्या असुन अनेक घटनांची साक्षीदार असलेल्या या संस्थेचे अधःपतन करण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले आहे सभासदांना रोख स्वरुपात लाभांश देण्याचे टाळून वस्तू स्वरुपात भेट दिली त्याचे कारण खरेदीत केलेला भ्रष्टाचार होय संस्थेच्या सलग्न असणारे व्यवसाय बंद पाडण्याचे महापाप या सत्ताधाऱ्यांनी केले आहे .यांच्या भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे आमच्या हाती असुन ते सर्व सभासदासमोर मांडणार आहोत आमच्याकडे सर्व नैतिकता असणारे उमेद़्वार आहेत आम्ही ग्रामपंचायतीमध्ये ज्या पध्दतीने कारभार केला तसाच स्वच्छ भ्रष्टाचार विरहीत काम सेवा संस्थेत करणार आहोत त्या करीता गांवकरी मंडळाच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे असे अवाहन खंडागळे यांनी केले या वेळी सरपंच महेंद्र साळवी रणजित श्रीगोड जालींदर कुऱ्हे सुवालाल लुक्कड,विलास कु-हे,शरद देशपांडे प्रफुल्ल डावरे बाळासाहेब वाबळे आदिंनी मनोगत व्यक्त केले.यावेळी नामदेव बोंबले,विलास कु-हे यांनी गावकरी मंडळात प्रवेश केला. यावेळी सुधाकर खंडागळे,मिस्टर शेलार,सुरेश बाबुराव कु-हे,नामदेव बोंबले,द्वारकानाथ नवले,गोविंद खरमाळे,भरतलाल सोमाणी,पुरुषोत्तम भराटे,ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत नवले,मुस्ताक शेख,प्रभात कु-हे,शफीक बागवान,शरद अंबादास नवले,अशोक शिरसाठ,राजेंद्र सोनवणे,चंद्रकांत लबडे,अमोल पांडगळे, सुभाष खंडागळे,रावसाहेब गाढे,राजेंद्र नवले,श्रीहरी बारहाते,संजय शिंदे,अनिल नवले,संजय नवले,बबन मेहेत्रे,तस्वर बागवान,अजीज शेख,रमेश नवले,चांगदेव वाबळे,दादासाहेब कुताळ, सुखदेव जेजुरकर,प्रदीप नवले,रमेश वाबळे,प्रदीप कापसे,सोपान वाबळे,बन्सी तागड,अनिल वाबळे,बापू कु-हे,भगवान तागड,लक्ष्मण वाबळे,प्रभाकर खंडागळे,राम सोनवणे,दिपक खंडागळे, शाम सोनवणे,अरविंद साळवी,महेश कु-हे,जिना शेख,सोमनाथ शिरसाठ,बाळासाहेब खंडागळे, अनिल कु-हे,भाऊराव दाभाडे,अशोक नेहे,सुधाकर रावसाहेब खंडागळे, प्रल्हाद अमोलिक, शशिकांत तेलोरे,दिलिप अमोलिक, ज्ञानेश्वर वाबळे,गोपी दाणी,बाळासाहेब शेलार,मंगेश नजन,बाबुराव पवार,सचिन मेहेत्रे, दिपक पांडागळे आदी उपस्थित होते.



बेलापुर  (प्रतिनिधी )- श्री  हरिहर भजनी मंडळ उक्कलगाव व उक्कलगाव ग्रामस्थांच्या वतीने उक्कलगाव तालुका श्रीरामपुर येथे दिनांक २१ फेब्रुवारी पासुन श्री हरिहर केशव गोविंद भगवान मंदिर येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते त्या सप्ताहाची सांगता सोमवार दिनांक २८ फेब्रुवारी रोजी ह .भ .प. महंत उध्दव महाराज मंडलीक यांच्या काल्याच्या किर्तनाने होणार असुन या कार्यक्रमास पाच हजार भाविक उपस्थित राहणार असल्याचा आयोजकांचा अंदाज आहे   

   .                                    हरिहर भजनी मंडळ श्री हरिहर केशव गोविंद भगवान श्री क्षेत्र उक्कलगाव व उक्कलगाव ग्रामस्थांच्या वतीने सोमवार दिनांक २१ फेब्रुवारी पासुन श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते दररोज पहाटे ५ ते ६.३० काकडा भजन  सकाळी ६.३० ते ७.०० वाजेपर्यंत आरती सकाळी ८ ते १२ ज्ञानेश्वरी पारायण दुपारी १२ ते १.०० वाचकासाठी भोजन सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ सायंकाळी ७ ते ९ हरिकिर्तन अशा प्रकारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते रविवारी सकाळी ११ वाजता श्री ग्रंथराज मिरवणूक संपन्न झाली या मिरवणूकीत महीला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते  सप्ताह कालावधीत ह भ प भागवताचार्य नवनाथ महाराज म्हस्के ,ह भ प संगीत विशारद अमोल महाराज बडाख ह भ प भागवताचार्य मनोहर सिनारे महाराज ह भ प सचिन पवार महाराज ह भ प किशोर जाधव महाराज ह भ प मच्छिंद्र

महाराज निकम व ह भ प बाळासाहेब रंजाळे महाराज यांनी किर्तनरुपी सेवा दिली .सोमवार दिनांक २८ फेब्रुवारी रोजी या सप्ताहची सांगता महंत उध्दव महाराज मंडलीक यांच्या काल्याच्या किर्तनाने सकाळी १० ते २ या वेळेत होणार आहे                        गेल्या सात दिवसापासून उक्कलगावातील वातावरण भक्तीमय होवुन गेले आहे दररोज होणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमात उक्कलगाव व परिसरातील नागरीक विशेष करुन महीलांची उपस्थिती लक्षणीय होती .काल्याच्या किर्तनानंतर होणाऱ्या महाप्रसादाचे सप्ताह कमीटीने उत्कृष्ट असे नियोजन केले आहे  माजी सभापती इंद्रनाथ पा थोरात अशोक कारखान्याचे माजी चेअरमन रावसाहेब पा थोरात व माजी सभापती आबासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे व्यासापीठ चालक म्हणून ह.भ.प.उल्हास महाराज तांबे ,ह.भ.प.बाबासाहेब ससाणे महाराज ह.भ.प,नामदेव काका मोरे व रविंद्र मुठे यांनी सेवा दिली . सोमवारी होणाऱ्या  काल्याच्या किर्तनास पंचक्रोशितील  पाच हजार भाविक उपस्थित राहणार असल्याचा आयोजकांचा अंदाज असुन त्या दृष्टीने पाच पोत्याची बुंदी मसाला भात हरबऱ्याची घुगरी अशा प्रकारे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असुन दररोज तीन ते साडेतीन हजार भावीकांची उपस्थिती कार्यक्रमास राहत होती सन २०१३ ला अशा प्रकारे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या नंतर ९ वर्षांनी सन २०२२ मध्ये अशा प्रकारे भव्य अशा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन हरिहर भजनी मंडळाने केल्यामुळे उक्कलगाव व परिसरातुन भाविकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असल्याचे आयोजकाचा म्हणणे असुन आता यापुढे दर वर्षा अशा प्रकारे कार्यक्रम आयोजित करण्याचा आयोजकांचा मानस आहे विशेष म्हणजे मंदिर परिसरात राहणारे जगदीश कुलकर्णी व त्यांच्या परिवाराने अपली जागा मंदिरास दान दिल्यामुळे श्री  हरिहर केशव गोविंद भगवान मंदिराचा परिसर मोकळा झाला असुन ग्रामस्थांनी कुलकर्णी परिवारास धन्यवाद दिले आहे

बेलापुर  (देविदास देसाई   )-तालुक्यात सर्वात मोठी सहकारी सोसायटी समजल्या जाणाऱ्या बेलापुर विविध कार्यकारी सेवा संस्थेची निवडणूक ६ मार्च रोजी होत असुन १३ जागेकरीता तीन पँनल मधुन ३४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत                   बेलापुर सेवा संस्थेची १३ जागेकरीता  ६ मार्च रोजी निवडणूक होत असुन तीन पँनलमधुन एकुण ३४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत जि प सदस्य शरद नवले व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांचा गांवकरी मंडळ तर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक ,बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले व जनता अघाडीचे रविंद्र खटोड यांचा शेतकरी जनता विकास अघाडी तसेच शिवसेना पुरस्कृत प्रकाश मेहेत्रे यांचा तिसरा पँनल निवडणूक लढवत असुन त्याच्या पँनलमध्ये केवळ आठच उमेदवार आहेत                                  गांवकरी मंडळाचे उमेदवार पुढील प्रमाणे नवले प्रकाश बाबुराव ,कुऱ्हे प्रभाकर गोवींद , कुताळ भाऊसाहेब हनुमंत ,कुऱ्हे गोरक्ष बाबुराव ,वाबळे रामदास किसन , कुऱ्हे मच्छिंद्र बंडेराव ,बोंबले सुरेश यशवंत , मेहेत्रे शाम रामभाऊ ,नवले शशिकांत कारभारी  ,अमोलीक रावसाहेब शंकर , राशिनकर सुभाष खंडेराव ,वाबळे कविता साहेबराव , खंडागळे भाग्यश्री भास्कर ,                   शेतकरी जनता विकास अघाडीचे उमेदवार पुढील प्रमाणे  नाईक अरुण गुलाबराव , मेहेत्रे विलास गंगाधर ,पवार शेषराव भानुदास ,नवले नंदकिशोर शंकरराव ,नवले सुधीर वेणूनाथ ,बोंबले पंडीतराव यशवंतराव कुऱ्हे अशोक भास्कर , सातभाई राजेंद्र कचरु , वाबळे शिवाजी रामनाथ ,अमोलीक अंतोन विठ्ठल ,गवते विश्वनाथ पाराजी ,मेहेत्रे सविता तुकाराम ,शेळके ईंदुमती जयराम                                       शिवसेना पुरस्कृत उमेदवार  मेहेत्रे प्रकाश चांगदेव ,खंडागळे  सारंगधर गंगाधर ,शेळके दादासाहेब रावसाहेब ,बंगाळ गणेश बाबुराव , दुधाळ संजय रामभाऊ ,गायकवाड चंद्रकांत हरीभाऊ , मेहेत्रे राणी प्रकाश ,अमोलीक शांतवन विठ्ठल  अशा प्रकारे उमेदवार निवडणूक रिंगणात असुन शिवसेना पुरस्कृत स्वतंत्र पँनल या निवडणूकीत उभा असून त्यांचे आठच उमेदवार आहेत हे आठ उमेदवार कुणाचा घाट घालतात किंवा कुणाचा घात करतात हे काळ अन वेळच ठरवेल . शेतकरी  जनता विकास अघाडीने विजयाचा दावा केला असुन मागील पाच वर्षात केलेल्या कामाची पावती घेवुन ते सभासदा समोर जाणार आहे आपल्या काळात योग्य कारभार केल्यामुळे आताही सत्ता आमच्या ताब्यात येईल असा दावा शेतकरी जनता विकास अघाडीच्या वतीने करण्यात आला आहे तर गांवकरी मंडळानेही विजयाचा दावा केलेला आहे मागील पाच वर्षात किती व कसे चुकीची कामे झाले याचे पुराव्यासह सभासदासमोर जाणार आहोत यांच्या मनमनी कारभाराला अनेक जण कंटाळले असुन मत पेटीतून सर्व चित्र स्पष्ट होणार आहे .थांबा आणी पहा असे गांवकरी मंडळाचे म्हणणे आहे तर कायम त्याच त्याच चेहऱ्यांना संधी दिल्याच्या रोषतून प्रकाश मेहेत्रे यांचा तिसरा पँनल उदयास आला असुन हा पँनल कुणाला तारक ठरतो अन कुणाला मारक हे ६ मार्चलाच समजणार आहे

श्रीरामपुर (गौरव डेंगळे)२३/२/२२ श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या महिला कर्मचारी श्रीमती मथुराबाई रामचंद्र देशमुख यांनी विद्यालयात ४५ वर्ष केलेल्या अविरत सेवेचा गुणगौरव म्हणून त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा आनंदमय वातावरणात संपन्न झाला.यावेळी संस्थेचे सचिव श्री जन्मजय टेकावडे,श्री हेमंत सोलंकी,सौ अस्मिता परदेशी व श्री दिगंबर पिनाटे यांच्या हस्ते श्रीमती देशमुख यांचा मानचिन्ह,श्रीफळ,शाल व साडी देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री जन्मजय टेकावडे यांनी आपल्या मनोगत श्रीमती देशमुख मावशी यांचे कौतुक केलं व त्यांनी केलेली ४५ वर्षाची सेवा ही शाळेच्या दृष्टीने अतिशय मोलाची सेवा आहे.पुढे बोलताना ते म्हणाले की श्रीमती देशमुख मावशी यांनी आपले जीवन विद्यार्थ्यांसाठी समर्पित केले.माझे आजोबा कै मा आ ज य टेकावडे यांनी स्थापन केलेल्या न्यू इंग्लिश स्कूल या शाळेच्या उभारणीपासून त्या शाळेत कर्मचारी म्हणून आहेत ही अतिशय उल्लेखनीय बाब आहे.त्यांचे पुढील जीवन आरोग्यदायी व आनंदी जावो हीच प्रार्थना मी करतो असे ते म्हणाले. यावेळी श्री हेमंत सोलंकी,सौ अस्मिता परदेशी,श्रीमती एस चव्हाण यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी वृषाली जोंधळे यांनी केले.यावेळी श्री पंकज त्रिपाठी,श्री सतीश आजगे,श्री दौलत पवार,श्री नितीन गायधने,श्री सुभाष वडीतके,श्री प्रकाश नांदे,सौ रत्नप्रभा पाटील,सौ रीता जेठवा, सौ रीना ओबेराय,सौ सारिका भांड, कु प्रतिक्षा भांड,सौ नम्रता वर्मा,सौ पूजा डोमाले,सौ योगिता गवारे,सौ शुभदा पुंड तसेच बहुसंख्येने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget