दुरुस्तीच्या नावाखाली वेळोवेळी पेट्रोल पंप बंद ठेवुन संस्थेचे नुकसान करणारांना घरी बसवा -सुधाकर खंडागळे

बेलापूर (प्रतिनिधी )-.सोसायटीचा पेट्रोल पंप दुरुस्तीच्या नावाखाली वेळोवेळी बंद ठेवुन सेवा संस्थेचे नूकसान करणारांना आपण निवडून देणार आहात का ?असा सवाल संस्थेचे हितचिंतक सुधाकर खंडागळे यांनी केला असुन कोणतीही निवडणुक असो जिथे तिथे मीच हि मक्तेदारी नष्ट करण्यासाठी गांवकरी मंडळाच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असे अवाहन खंडागळे यांनी केले आहे                                           

प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात सुधाकर खंडागळे यांनी पुढे म्हटले आहे की नेतेच कार्यकर्ते होत असतील तर कार्यकर्त्यांना न्याय केव्हा मिळेल ? एकीकडे नेता म्हणवायचे अन दुसरीकडे उमेदवारी लाटायची मग सर्व सामान्यांना संधी मिळणार तरी कधी .कार्यकर्त्यांना निवडणुकीपुरते वापरायचे आणि पदे माञ आपणच बळकवायची.  प्रत्येक संस्थेत तुम्हीच सत्तेत राहायचे तर सामान्य कार्यकर्त्यांनी फक्त तुमचे ओझेच वाहायचे कां असा सवाल बेलापूर सोसायटीचे माजी चेअरमन सुधाकर खंडागळे यांनी केला असून गावकरी मंडळाने सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी दिली आहे  सभासदांचे गांवकरी मंडळाला मिळणारे  पाठबळ पहाता सत्ताधाऱ्यांची हवाच गुल झालेली आहे नाराज सभासद मतपेटीतुन आपला हिसका दाखविल्याशिवाय राहणार नाही बेलापुर ग्रामपंचायती नंतर आता सेवा संस्थेचा कारभारही सभासद गांवकरी मंडळाच्या ताब्यात देतील असा दावा खंडागळे यांनी केला आहे..ग्रामपंचायत,सोसायटी ,बाजार समिती,जिल्हा परिषद,पंचायत समिती अशी कोणतीही निवडणूक असो.ह्या ठराविक नेत्यांचीच मक्तेदारी असते..वेळ येईल तशा तडजोडी करायच्या आणि सत्ता व पदे मिळवायचे हेच यांचे ध्येय आहे.यांचा इतिहास बघितला तर सत्तेसाठी यांनी अनेकांशी घरोबा केला आहे.अनेक नेत्यांच्या मांडवाखालून यांची वरात गेली आहे.हेतू एकच ज्याची चलती त्याच्याशी युती.सोसायटी निवडणुकीतही अशीच अभद्र व मतलबी लोकांची युती झाली आहे.हि युती म्हणजे निवडणुकीच्या  गोंडस नावाखाली जमलेली भ्रष्टाचार करणारांची टोळी आहे.यांचे कारनामे आणि घोटाळे सभासदांना माहित असल्याने सभासद यांच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत.सत्ताधा-यांचे पितळ सभासदासमोर उघडे पडले असल्याने गावकरी मंडळाचे सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास श्री.खंडागळे यांनी व्यक्त केला आहे.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget