यावेळी कविवर्य सुभाष सोनवणे यांना समाज भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. कवी रज्जाक शेख यांनी प्रास्ताविक केले व आपल्या रचने ने रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमात मान्यवरांचे स्वागत व सत्कार स्वागताध्यक्ष इकबाल इस्माईल काकर (सर) यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नवनीत जोशी यांनी केले तर आभार श्रीरामपूर तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.सलीम शेख व डॉ.सौ.कौसर शेख यांनी मानले.
याप्रसंगी प्रा.अजय घोगरे, इसाक शेख, कॅरियर कॉम्प्युटरचे रफिक शेख सर,जमील काकर,शाहीन शेख मॅडम,आरिफ जहागीरदार, ऑलविन नाॅर्टन, कवी आनंदा साळवे, शब्दगंधचे अध्यक्ष मीराबक्षभाई बागबान तथा इतरही मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अध्यक्ष डॉ.सलीम शेख,शब्दगंधचे अध्यक्ष मीराबक्षभाई बागबान, स्वागताध्यक्ष इकबाल काकर सर, डॉ.नवनीत जोशी,रज्जाक शेख सर,कवी आनंदा साळवे,आदींनी विशेष परिश्रम घेतले.
Post a Comment