बेलापुर सेवा संस्थेत एकमेकाविरुध्द भ्रष्टाचाराच्या तक्रारी करणारांची निवडणूकीत गळाभेटी, सभासद उधळणार डाव -बंगाळांचा दावा

बेलापूरः(प्रतिनिधी  )- बेलापूर सोसायटीच्या पेट्रोल पंपाच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामाची  किंमत वाढविली म्हणून ज्यांनी तक्रारी केल्या प्रकरण गुन्हा दाखल करण्यापर्यन्त गेले.त्यांनीच निवडणुकीत सत्तेसाठी आपापसात गळाभेट करुन सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला निवडणूकीत सभासद हा डाव हाणून पाडतील असा विश्वास सोसायटीचे माजी संचालक भास्कर बंगाळ यांनी व्यक्त केला आहे. सेवा संस्थेचे जेष्ठ माजी संचालक भास्कर बंगाळ म्हणाले की,अरुण पां.नाईक हे चेअरमन असताना सोसायटीच्या पेट्रोलपंंपाच्या सरंक्षक भिंतीच्या बांधकामाचे  टेंडर काढण्यात आले होते.सदरचे काम पढेगाव येथील मर्जीतल्या ठेकेदाराला दिले होते.काम झाल्यावर टेंडरची रक्कम वाढवून बिल काढण्यात आले होते.सदर प्रकारास तत्कालिन सहा संचालकांना मान्य नसल्याने त्यांंनी यासंदर्भात तक्रार केली होती.अरुण पां .नाईक यांचेविरुध्द केसही चालली.पण नंंतर नेते माजी कै .माजी आ.जयंतराव ससाणे यांच्या मध्यस्थीने प्रकरण मिटवुन समेट घडविण्यात आली होती .तरीही  तक्रारदार संचालकांना तीन हजाराचा दंड करण्यात आला.होता .                यावरुन यांचा कारभार कसा होता? किती सावळा गोंधळ व अनागोंदी कारभार  होता याचे हे उत्तम उदाहरण आहे.ज्यांनी एकमेकांचे वाभाडे काढले,भ्रष्टाचाराच्या तक्रारी केल्या तेच आता निवडणुकीत एकञ आले आहेत.यावरुन पेट्रोलपंपाच्या संरक्षक भिंत प्रकरणात 'अर्थ'पूर्ण तडजोडी होवूनच प्रकरण मिटविले गेले हेच सिध्द होते.अशा लोकांच्या हाती सोसायटीचा कारभार सोपवायचा कां याचा विचार सभासदांनी करावा असे अवाहन बंगाळ यांनी केले आहे. विद्यमान सत्ताधा-यांनी विरोधकांना सतत सूडबुध्दीने वागविले.त्यांना कधीही विश्वासात घेतले नाही.चेअरमन आणि त्यांचा रिमोट हाती असणारा नेता हेच कारभार हाकायचे.संचालक मंडळाला महत्वाच्या व आर्थिक बाबींपासून अंधारात ठेवले जायचे.मी व देवीदास खंडागळे यांना  आकसातून अपाञ ठरविले.कर्जमाफी योजनेचा लाभ मिळावा या हेतूने आम्ही थकबाकी भरली नाही.तर सत्ताधा-यांनी तक्रारी करुन आम्हाला थेट अपाञच ठरविले.आताही काही सभासदांना अक्रियाशिल ठरवून डच्चू देण्याचा डाव होता.पण आमच्या जागृततेमुळे तो डाव उधळला गेला आणि या सभासदांची नावे मतदार यादीत समाविष्ट झाली.सभासदांना अशा सूडबुध्दीने वागणाऱ्या सत्ताधा-यांना सभासद धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही असेही बंगाळ म्हणाले.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget