श्रीरामपुर (गौरव डेंगळे)२३/२/२२ श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या महिला कर्मचारी श्रीमती मथुराबाई रामचंद्र देशमुख यांनी विद्यालयात ४५ वर्ष केलेल्या अविरत सेवेचा गुणगौरव म्हणून त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा आनंदमय वातावरणात संपन्न झाला.यावेळी संस्थेचे सचिव श्री जन्मजय टेकावडे,श्री हेमंत सोलंकी,सौ अस्मिता परदेशी व श्री दिगंबर पिनाटे यांच्या हस्ते श्रीमती देशमुख यांचा मानचिन्ह,श्रीफळ,शाल व साडी देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री जन्मजय टेकावडे यांनी आपल्या मनोगत श्रीमती देशमुख मावशी यांचे कौतुक केलं व त्यांनी केलेली ४५ वर्षाची सेवा ही शाळेच्या दृष्टीने अतिशय मोलाची सेवा आहे.पुढे बोलताना ते म्हणाले की श्रीमती देशमुख मावशी यांनी आपले जीवन विद्यार्थ्यांसाठी समर्पित केले.माझे आजोबा कै मा आ ज य टेकावडे यांनी स्थापन केलेल्या न्यू इंग्लिश स्कूल या शाळेच्या उभारणीपासून त्या शाळेत कर्मचारी म्हणून आहेत ही अतिशय उल्लेखनीय बाब आहे.त्यांचे पुढील जीवन आरोग्यदायी व आनंदी जावो हीच प्रार्थना मी करतो असे ते म्हणाले. यावेळी श्री हेमंत सोलंकी,सौ अस्मिता परदेशी,श्रीमती एस चव्हाण यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी वृषाली जोंधळे यांनी केले.यावेळी श्री पंकज त्रिपाठी,श्री सतीश आजगे,श्री दौलत पवार,श्री नितीन गायधने,श्री सुभाष वडीतके,श्री प्रकाश नांदे,सौ रत्नप्रभा पाटील,सौ रीता जेठवा, सौ रीना ओबेराय,सौ सारिका भांड, कु प्रतिक्षा भांड,सौ नम्रता वर्मा,सौ पूजा डोमाले,सौ योगिता गवारे,सौ शुभदा पुंड तसेच बहुसंख्येने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Post a Comment