बेलापुर सेवा संस्थेच्या निवडणूकीत तिरंगी लढत १३ जागेकरीता ३४उमेद्वार रिंगणात
बेलापुर (देविदास देसाई )-तालुक्यात सर्वात मोठी सहकारी सोसायटी समजल्या जाणाऱ्या बेलापुर विविध कार्यकारी सेवा संस्थेची निवडणूक ६ मार्च रोजी होत असुन १३ जागेकरीता तीन पँनल मधुन ३४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत बेलापुर सेवा संस्थेची १३ जागेकरीता ६ मार्च रोजी निवडणूक होत असुन तीन पँनलमधुन एकुण ३४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत जि प सदस्य शरद नवले व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांचा गांवकरी मंडळ तर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक ,बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले व जनता अघाडीचे रविंद्र खटोड यांचा शेतकरी जनता विकास अघाडी तसेच शिवसेना पुरस्कृत प्रकाश मेहेत्रे यांचा तिसरा पँनल निवडणूक लढवत असुन त्याच्या पँनलमध्ये केवळ आठच उमेदवार आहेत गांवकरी मंडळाचे उमेदवार पुढील प्रमाणे नवले प्रकाश बाबुराव ,कुऱ्हे प्रभाकर गोवींद , कुताळ भाऊसाहेब हनुमंत ,कुऱ्हे गोरक्ष बाबुराव ,वाबळे रामदास किसन , कुऱ्हे मच्छिंद्र बंडेराव ,बोंबले सुरेश यशवंत , मेहेत्रे शाम रामभाऊ ,नवले शशिकांत कारभारी ,अमोलीक रावसाहेब शंकर , राशिनकर सुभाष खंडेराव ,वाबळे कविता साहेबराव , खंडागळे भाग्यश्री भास्कर , शेतकरी जनता विकास अघाडीचे उमेदवार पुढील प्रमाणे नाईक अरुण गुलाबराव , मेहेत्रे विलास गंगाधर ,पवार शेषराव भानुदास ,नवले नंदकिशोर शंकरराव ,नवले सुधीर वेणूनाथ ,बोंबले पंडीतराव यशवंतराव कुऱ्हे अशोक भास्कर , सातभाई राजेंद्र कचरु , वाबळे शिवाजी रामनाथ ,अमोलीक अंतोन विठ्ठल ,गवते विश्वनाथ पाराजी ,मेहेत्रे सविता तुकाराम ,शेळके ईंदुमती जयराम शिवसेना पुरस्कृत उमेदवार मेहेत्रे प्रकाश चांगदेव ,खंडागळे सारंगधर गंगाधर ,शेळके दादासाहेब रावसाहेब ,बंगाळ गणेश बाबुराव , दुधाळ संजय रामभाऊ ,गायकवाड चंद्रकांत हरीभाऊ , मेहेत्रे राणी प्रकाश ,अमोलीक शांतवन विठ्ठल अशा प्रकारे उमेदवार निवडणूक रिंगणात असुन शिवसेना पुरस्कृत स्वतंत्र पँनल या निवडणूकीत उभा असून त्यांचे आठच उमेदवार आहेत हे आठ उमेदवार कुणाचा घाट घालतात किंवा कुणाचा घात करतात हे काळ अन वेळच ठरवेल . शेतकरी जनता विकास अघाडीने विजयाचा दावा केला असुन मागील पाच वर्षात केलेल्या कामाची पावती घेवुन ते सभासदा समोर जाणार आहे आपल्या काळात योग्य कारभार केल्यामुळे आताही सत्ता आमच्या ताब्यात येईल असा दावा शेतकरी जनता विकास अघाडीच्या वतीने करण्यात आला आहे तर गांवकरी मंडळानेही विजयाचा दावा केलेला आहे मागील पाच वर्षात किती व कसे चुकीची कामे झाले याचे पुराव्यासह सभासदासमोर जाणार आहोत यांच्या मनमनी कारभाराला अनेक जण कंटाळले असुन मत पेटीतून सर्व चित्र स्पष्ट होणार आहे .थांबा आणी पहा असे गांवकरी मंडळाचे म्हणणे आहे तर कायम त्याच त्याच चेहऱ्यांना संधी दिल्याच्या रोषतून प्रकाश मेहेत्रे यांचा तिसरा पँनल उदयास आला असुन हा पँनल कुणाला तारक ठरतो अन कुणाला मारक हे ६ मार्चलाच समजणार आहे
Post a Comment