बेलापुर (प्रतिनिधी )- श्री हरिहर भजनी मंडळ उक्कलगाव व उक्कलगाव ग्रामस्थांच्या वतीने उक्कलगाव तालुका श्रीरामपुर येथे दिनांक २१ फेब्रुवारी पासुन श्री हरिहर केशव गोविंद भगवान मंदिर येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते त्या सप्ताहाची सांगता सोमवार दिनांक २८ फेब्रुवारी रोजी ह .भ .प. महंत उध्दव महाराज मंडलीक यांच्या काल्याच्या किर्तनाने होणार असुन या कार्यक्रमास पाच हजार भाविक उपस्थित राहणार असल्याचा आयोजकांचा अंदाज आहे
. हरिहर भजनी मंडळ श्री हरिहर केशव गोविंद भगवान श्री क्षेत्र उक्कलगाव व उक्कलगाव ग्रामस्थांच्या वतीने सोमवार दिनांक २१ फेब्रुवारी पासुन श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते दररोज पहाटे ५ ते ६.३० काकडा भजन सकाळी ६.३० ते ७.०० वाजेपर्यंत आरती सकाळी ८ ते १२ ज्ञानेश्वरी पारायण दुपारी १२ ते १.०० वाचकासाठी भोजन सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ सायंकाळी ७ ते ९ हरिकिर्तन अशा प्रकारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते रविवारी सकाळी ११ वाजता श्री ग्रंथराज मिरवणूक संपन्न झाली या मिरवणूकीत महीला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सप्ताह कालावधीत ह भ प भागवताचार्य नवनाथ महाराज म्हस्के ,ह भ प संगीत विशारद अमोल महाराज बडाख ह भ प भागवताचार्य मनोहर सिनारे महाराज ह भ प सचिन पवार महाराज ह भ प किशोर जाधव महाराज ह भ प मच्छिंद्र
महाराज निकम व ह भ प बाळासाहेब रंजाळे महाराज यांनी किर्तनरुपी सेवा दिली .सोमवार दिनांक २८ फेब्रुवारी रोजी या सप्ताहची सांगता महंत उध्दव महाराज मंडलीक यांच्या काल्याच्या किर्तनाने सकाळी १० ते २ या वेळेत होणार आहे गेल्या सात दिवसापासून उक्कलगावातील वातावरण भक्तीमय होवुन गेले आहे दररोज होणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमात उक्कलगाव व परिसरातील नागरीक विशेष करुन महीलांची उपस्थिती लक्षणीय होती .काल्याच्या किर्तनानंतर होणाऱ्या महाप्रसादाचे सप्ताह कमीटीने उत्कृष्ट असे नियोजन केले आहे माजी सभापती इंद्रनाथ पा थोरात अशोक कारखान्याचे माजी चेअरमन रावसाहेब पा थोरात व माजी सभापती आबासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे व्यासापीठ चालक म्हणून ह.भ.प.उल्हास महाराज तांबे ,ह.भ.प.बाबासाहेब ससाणे महाराज ह.भ.प,नामदेव काका मोरे व रविंद्र मुठे यांनी सेवा दिली . सोमवारी होणाऱ्या काल्याच्या किर्तनास पंचक्रोशितील पाच हजार भाविक उपस्थित राहणार असल्याचा आयोजकांचा अंदाज असुन त्या दृष्टीने पाच पोत्याची बुंदी मसाला भात हरबऱ्याची घुगरी अशा प्रकारे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असुन दररोज तीन ते साडेतीन हजार भावीकांची उपस्थिती कार्यक्रमास राहत होती सन २०१३ ला अशा प्रकारे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या नंतर ९ वर्षांनी सन २०२२ मध्ये अशा प्रकारे भव्य अशा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन हरिहर भजनी मंडळाने केल्यामुळे उक्कलगाव व परिसरातुन भाविकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असल्याचे आयोजकाचा म्हणणे असुन आता यापुढे दर वर्षा अशा प्रकारे कार्यक्रम आयोजित करण्याचा आयोजकांचा मानस आहे विशेष म्हणजे मंदिर परिसरात राहणारे जगदीश कुलकर्णी व त्यांच्या परिवाराने अपली जागा मंदिरास दान दिल्यामुळे श्री हरिहर केशव गोविंद भगवान मंदिराचा परिसर मोकळा झाला असुन ग्रामस्थांनी कुलकर्णी परिवारास धन्यवाद दिले आहे
Post a Comment