Latest Post

श्रीरामपूर (गौरव डेंगळे) १८/०२: येथील न्यू इंग्लिश स्कूल क्रिकेट मैदानावर अध्यक्ष श्री राम टेकावडे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळविण्यात आलेल्या सुपर सिक्स क्रिकेट स्पर्धेच्या आज झालेल्या अंतिम सामन्यात श्रीरामपूर इन्‍द्राज संघाने श्रीरामपूर फायटर्स संघाचा २० धावांनी पराभव करीत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

आज रंगलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन श्री दौलत पवार, सौ अस्मिता परदेशी, सौ सारिका भांड,श्री नितीन गायधने,श्री नितीन बलराज आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.८ संघाने सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत श्रीरामपूर रायडर्स,श्रीरामपूर फायटर्स,श्रीरामपूर इंद्राज, श्रीरामपूर चॅलेंजर्स संघांनी साखळीतील प्रत्येकी २-२ सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीत श्रीरामपूर रायडर्स संघाने श्रीरामपूर चॅलेंजर्स संघाचा ६ गडी राखून तर दुसरा उपांत्य फेरीच्या लढतीत श्रीरामपूर इंद्राज संघाने श्रीरामपूर फायटर्स संघाचा ८ गडी राखून पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.

स्पर्धेच्या अंतिम सामन्याची नाणेफेक इन्‍द्राज संघाने जिंकली व प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इन्‍द्राज संघाने निर्धारित ६ षटकात ६ गडी बाद ८१ धावा फटकावल्या.यामध्ये ज्वेल पटोले ५८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. रायडर्स संघाकडून मोहित २ गडी बाद केले. विजयासाठी ८२ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेला  रायडर्स संघ ६ षटकात ६१ धावाच करू शकला. व हा सामना इन्‍द्राज संघाने २० धावांनी जिंकून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.स्पर्धेचे पारितोषिक वितरण श्री लकी सेठी, तमन भाटीयानी,मातापुरचे सरपंच श्री गणपत गायके,श्री विनोद जोशी,श्री बन्सीलाल फरवानी,श्री गौरव साहनी,श्री प्रशांत माळवे, क्रीडा प्रशिक्षक श्री गौरव डेंगळे आदी मान्यवरांच्या हस्ते पार पडले.स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अनुज पाटिल , इशन भोसले, साई सोनावणे,साई जवळे, मोहित माळवे आदी खेळाडूंचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या स्पर्धेत उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरी करणारा ज्वेल पटोलेला मालिकावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.स्पर्धा यशस्वी करण्याकरिता श्री नितीन गायधने,श्री नितीन बलराज,श्री निखिल फासाटे,श्री एस हलनोर, श्री अतुल जाधव,श्री दौलत पवार,दीपक रणपिसे आदींनी अथक परिश्रम घेतले.

श्रीरामपूर : अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व इतर आदिवासी भागात राहणाऱ्या आदिवासी समूदावरील होत असलेल्या अन्याय-अत्याचाराविरोधात राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद ही राष्ट्रव्यापी संघटना आक्रमक झाली असून याविरोधात संघटनेच्या वतीने श्रीरामपूर तहसीलदार यांजमार्फत महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा प्रभारी आर. एम. धनवडे, एस. के. बागुल, एम. आर. वैराळ, एस. के. मरभळ, प्रकाश पवार, एस. एल. सुर्यवंशी, संदिप पाळंदे, अनिल दुशिंग, राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चा प्रभारी पास्टर कर्डक, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा जिल्हाध्यक्ष मुश्ताकभाई तांबोळी, रवी बोर्डे, एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे शिवाजी गांगुर्डे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रकारे ३६ जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय अध्यक्ष एच. एन. रेकवाल, राष्ट्रीय संयोजक प्रेमकुमार गेडाम यांच्या सूचनेनुसार निवेदन दिले जात आहेत.

      निवेदनात म्हंटले आहे की, आदीवासींना त्यांचा मूळ अधिवास असलेल्या जल, जंगल आणि जमीन यांपासून विविध प्रकल्पांच्या नावाखाली विस्थापित केले जात आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील विस्थापित झालेले बारूखेडा, सोमठाणा बु, नागरतास, अमोना, केलपानी, गुल्लरघाट, सोमठाणा खु, धारगड आदी गावांचे अद्यापही योग्य प्रकारे पुनर्वसन झालेले नाही. ३७० पेक्षा मृत आदिवासींच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. मेळघाटातील विस्थापित, जंगलात राहत असलेल्या आदिवासींवर वन विभागाने दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत. मेळघाट व अन्य आदिवासींचे सामूहिक वन हक्काचे दावे मंजूर करावेत व प्रति व्यक्ती एक कोटी रुपये नुकसानभरपाई द्यावी. 

      शासनाने या बाबींचा गांभीर्याने विचार करावा अन्यथा दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात आंदोलनाची गती अधिक तीव्र केली जाईल.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-लहान मुलांच्या भांडणाच्या कारणातुन दोन कुटुंबात जबर हाणामारी झाली असुन दोन जण गंभीर जखमी झाले आहेत त्यांचेवर साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरु आहेत पोलीसांनी तीन जणाविरुध्द जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या कारणावरुन गुन्हा दाखल केला आहे .पोलीस घटनास्थळी तातडीने पोहोचल्यामुळे मोठा अनर्थ टळला.                           

बेलापुरातील बोरुडगल्लीत राहणारे ,आतार व सोनवणे या दोन कुटुंबात दोन दिवसापूर्वी लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरुन वाद झाले होते परंतु  ते वाद आपापसात समझोता करुन मिटविण्यात आले तेच वाद कालही उफाळून आले सोनवणे कुटुंब व आतार कुटुंब यांच्यात तुफान हाणामारी झाली  मारामारीत लाकडी दांडके लोखंडी साखळीचा वापर करण्यात आला             दोन दिवसापुर्वी सोनवणे व आतार कुटुंबातील लहान मुलात वाद झाले होते ते वाद दोन्ही कुटुंबांनी मिटविले त्या वेळी आतार यांच्या मुलाला कचरु सोनवणे याने मारले असा आतार कुटुंबीयांचा आरोप होता त्या रोषातुनच काल दोन्ही कुटुंबात पुन्हा वाद झाले वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले त्या वेळी कचरु धोडीराम सोनवणे विकासा सोनवणे आकाश सोनवणे या तिघांनाही बेदम मारहाण करण्यात आली यात कचरु सोनवणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे त्यांना रक्तभंबाळ अवस्थेत आगोदर पोलीस स्टेशन नंतर साखर कामगार दवाखान्यात पाठविण्यात आले असुन त्यांचेवर तसेच विकास सोनवणे व आकाश सोनवणे यां तिघेवर  साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरु आहेत .मारामारीची घटना गावात पसरताच मोठा जमाव जमा झाला बेलापुर पोलीस स्टेशनला मोठी गर्दी जमा झाली घटनेची माहीती मिळताच पोलीस निरीक्षक संजय सानप मोठ्या फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले त्यांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली पोलीसांनी संपुर्ण गावातुन गस्त सुरु केली रात्री बारा वाजेपर्यंत गावात तणावाची परिस्थिती होती पतितपावनचे सुनिल मुथा यांनी तातडीने वरिष्ठांशी संपर्क साधुन घटनेचे गांभीर्य सांगितले त्यामुळे पोलीसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनीही घटनास्थळी भेट दिली कचरु धोंडीराम सोनवणे यांच्या तक्रारीवरुन बेलापुर पोलीसांनी अनिस दादासाहेब शेख अकील दादासाहेब आतार बबडी दादासाहेब आतार यांचेविरुध्द भादवि कलम ३०७ ,३२४ ,३२३ ,५०४ ,५०६ ,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन पोलीस निरीक्षक संजय सानंप यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अतुल लोटके पुढील तपास करत आहेत

अहमदनगर प्रतिनिधी - एका गोडाऊनमध्ये साठा करून ठेवलेला तीन ट्रक गुटखा पोलिसांनी पकडला. बोल्हेगाव परिसरात बुधवारी पोलिसांनी ही कारवाई केली. कोतवाली पोलिसांनी नगर शहरातील कायनेटीक चौकात दुचाकीवरून गुटखा वाहतूक करणार्‍या दोघांना पकडल्यानंतर गुटखा गोडाऊनविषयी माहिती मिळाली होती. यानंतर ही कारवाई करण्यारत आली. रात्री उशिरापर्यंत गुटख्याची मोजदाद सुरू होती.दरम्यान गोवा, माणिकचंद, हिरा, सितार अशा विविध कंपनीचा हा गुटखा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटखा पकडल्याने गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. दोन तरुण दुचाकीवर गुटखा विक्री करण्यासाठी नगर-पुणे रोडवरून जात असल्याची खबर कोतवाली पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी कायनेटीक चौकात सापळा लावला. तेथे पाठलाग करून दोन तरूणांना पोलिसांनी पकडले.त्यांच्याकडे पिशवीमध्ये गोवा गुटखा मिळून आला. पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता बोल्हेगावातील गुटखा गोडाऊनची माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिसांनी या गोडाऊनवर छापा टाकला. तेथे विविध कंपन्यांचा गुटखा साठा पोलिसांना मिळून आला. सर्व मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करून ट्रकमध्ये भरण्यात आला. तीन ट्रक भरून हा गुटखा होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

अहमदनगर प्रतिनिधी-लोणी (ता. राहाता) येथील माजी सैनिकाची 18 लाख 39 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणार्‍याला येथील सायबर पोलिसांनी मुंबई येथून ताब्यात घेत अटक केली. सलाहुद्दीन शहाबुद्दीन खान (वय 52 रा. गणेशनगर, वेल्फेअर सोसायटी, कांदिवली, मुंबई) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.त्याला नगर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. लोणी येथील फिर्यादी हे सैन्यातून निवृत्त झाले आहे. ते ‘वर्क फॉर्म होम’ करता येईल अशा नोकरी, उद्योगाच्या शोधात होते. ऑनलाईन साईटवर माहिती घेत असताना त्यांची फेसबुकवर एका महिलेशी ओळख झाली. तीने फिर्यादी यांना ‘शॉपिंग डॉट कॉम’ कंपनीत अधिकारी असल्याचे सांगितले व त्यांचा विश्वास संपादन केला. कंपनीचे उत्पादने खरेदी केल्यास व विकल्यास तुम्हाला भरपूर कमिशन मिळेल, असे संबंधित महिलेने सांगितले.पैसे जमा करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवरून एक क्यूआर कोड पाठविला. त्याद्वारे फिर्यादी यांनी संबंधित कंपनीच्या साईटवरून वस्तू खरेदी करून बँक खात्यावर वेळोवेळी 13 लाख 10 हजार रुपये पाठविले. मात्र फिर्यादी यांना वस्तू मिळाल्या नाही. 10 ते 20 लाख रुपयांचा टप्पा पूर्ण होत नसल्याने त्यांनी कंपनीकडे पैसे परत मागितले. परंतु, 10 ते 20 लाखांचा टप्पा पूर्ण केल्यानंतर रक्कम काढता येईल, असे फिर्यादीला सांगितले गेले. त्यांनी नंतर सात लाख रुपये भरताच कंपनीने बँक खाते बंद केले. ही घटना 8 ते 23 नोव्हेंबर 2021 दरम्यान घडली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी यांची एकूण 18 लाख 39 हजार 702 रुपयांची फसणूक झाली आहे.दरम्यान फिर्यादी यांनी 10 जानेवारी 2022 रोजी सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द भादंवि कलम 419, 420, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (सी) (डी) नुसार गुन्हा दाखल केला होता. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, पोलीस उपनिरीक्षक प्रतिक कोळी, पोलीस अंमलदार योगेश गोसावी, उमेश खेडकर, दिंगबर कारखिले, मलिक्कार्जुन बनकर, राहुल हुसळे, अरूण सांगळे, वासुदेव शेलार यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण करून आरोपी खान याला मुंबई येथून अटक केली.सहा राज्यांत गेली रक्कम सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण करत असताना फसवणुकीची रक्कम सहा राज्यांतील विविध बँक खात्यात वर्ग झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार मुंबई येथील भारत मेटेज कार्पोरेशन, कांदिवली या खात्यावर एक लाख रूपये रक्कम वर्ग झाली होती. या बँक खातेदाराचा सायबर पोलिसांनी शोध घेण्यास सुरूवात केली. त्यानंतर सलाहुद्दीन शहाबुद्दीन खान याचे नाव समोर आले. पोलिसांनी त्याचा शोध घेत गजाआड केले.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-मनसेच्या जन रेट्यानंतर सी,डी जैन महाविद्यालयातील श्री  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या भोवती असलेली जाळीचा दरवाजा काढण्यात आला असुन अनेकांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले आहेत ,श्रीरामपूर येथील सीडी जैन कॉलेज मध्ये गेल्या अनेक वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा चारी बाजूने लोखंडी जाळी च्या सहाय्याने बंदिस्त पणाने करून ठेवण्यात आला होती अनेक विद्यार्थ्यांनी ही बाब मनसे विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली व ती जाळी काढुन टाकण्याची विनंती केली त्यानुसार मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे यांचे नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्त्यांनी  कॉलेज मध्ये जाऊन आंदोलन केले .

मनसेच्या वतीने  सी,डी जैन कॉलेजचे प्राचार्य श्री निंबाळकर यांना निवेदन देण्यात आले

त्याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे म्हणाले की हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री  छत्रपती शिवाजी महाराज हे तमाम हिंदूंची श्रद्धा स्थान आहेत त्यांचा पुतळा अशाप्रकारे कैद करून ठेवल्याने तमाम शिवप्रेमींची मने दुखावली  गेली आहेत व हा प्रकार शिवप्रेमी कदापीही सहन करणार नाही ही कॉलेज प्रशासनाने लक्षात ठेवावे महाराजांना साडेतीनशे वर्षापूर्वी मोगल साम्राज्य यांनी असेच कैद करून ठेवण्याचे प्रयत्न केले परंतु छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या तावडीतून सहीसलामत सुटले होते परंतु आज  रयत शिक्षण संस्थेच्या श्रीरामपूर येथील सीडी जैन कॉलेजमध्ये  यांनी आज या ठिकाणी महाराजांचा पुतळ्या भोवती  लोखंडी जाळी लावण्यात आल्याचे मनसे कार्यकर्त्यांच्या लक्षात आले त्यानंतर मनसे स्टाईलने महाविद्यालयात आंदोलन करण्यात आले मनसेच्या आंदोलनानंतर काँलेज प्रशासनाने ताताडीने ती लोखंडी जाळी हटवीली  यापुढे जर पुन्हा अशा पद्धतीने गेट लावून बंद अवस्थेत ठेवण्यात आले तर कॉलेज व्यवस्थापकाच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे यांनी सांगितले 

आंदोलकांच्या वतीने महाविद्यालयाच्या प्राचार्यांना निवेदन देण्यात आले 

आंदोलनात मनसे जिल्हा सचिव डॉक्टर संजय नवथर, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप, विधानसभा अध्यक्ष संतोष डहाळे,तालुकाध्यक्ष गणेश दिवसे, शहराध्यक्ष निलेश लांबोळे, विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष विशाल शिरसाठ, तालुकाध्यक्ष अक्षय सूर्यवंशी,  दीपक सोनवणे, समर्थ सोनार,  अमोल साबणे, मनोज जाधव, लक्ष्मण लोखंडे, महेश रोकडे, किरण रणवरे, अतुल खरात, विकी शिंदे, रुपेश शिंदे, आर्यन शिंदे, कुंदन शेलार, रोहित वेताळ, विकी निकाळजे, जगन सुपेकर, किशोर बनसोडे, विकास शिंदे, विनेश शिंदे,आदीनी सहभाग घेतला होता .

कोपरगाव प्रतिनिधी-मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत जेऊर पाटोदा ते धारणगाव जिल्हा मार्ग क्रं 8 वरती शासनाने 703 लक्ष रुपये खर्च करून वर्षभरापुर्वी हा रस्ता तयार केला. मात्र या कामास वर्ष होत नाही तेच रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली असून धारणगाव पुलावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत जेऊर पाटोदा, चांदगव्हाण, मुर्शतपूर,धारणगाव,सोनारी, रवंदे या प्रा.जी.मा 8 वरच्या 10 किलोमीटर च्या रस्त्यास सातशे तिन लक्ष रुपये 2020 मध्ये खर्च करण्यात आले. एकाच वर्षात धारणगाव येथिल पुलाच्या नळ्या वरील स्लॅब फुटून रस्ता खचल्याने काम गुणवत्तेप्रमाणे झाले की नाही अशी शंका उपस्थित होत आहे.पंतप्रधान ग्राम सडक योजनेस मुख्यमंत्री ग्रामसडक योजना असे नाव बहाल करण्यात आले. जिल्ह्यातील मोठ्या रस्त्यांचा विकास या योजने अंतर्गत करण्यात येतो. यावर कार्यकारी अभियंता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अहमदनगर यांचे नियंत्रण असतांना एकाच वर्षांत पुलाचा स्लॅब खराब कसा होतो. हा संशोधनाचा विषय आहे. देखभाल दुरुस्ती कालावधी हा पाच वर्षे असून 21 ठिकाणी मोरीच्या कामाचा समावेश आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवून वेड्या बाभळीची तात्काळ सफाई करण्याची ग्रामस्थांची मागणी.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget