कोपरगाव प्रतिनिधी-मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत जेऊर पाटोदा ते धारणगाव जिल्हा मार्ग क्रं 8 वरती शासनाने 703 लक्ष रुपये खर्च करून वर्षभरापुर्वी हा रस्ता तयार केला. मात्र या कामास वर्ष होत नाही तेच रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली असून धारणगाव पुलावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत जेऊर पाटोदा, चांदगव्हाण, मुर्शतपूर,धारणगाव,सोनारी, रवंदे या प्रा.जी.मा 8 वरच्या 10 किलोमीटर च्या रस्त्यास सातशे तिन लक्ष रुपये 2020 मध्ये खर्च करण्यात आले. एकाच वर्षात धारणगाव येथिल पुलाच्या नळ्या वरील स्लॅब फुटून रस्ता खचल्याने काम गुणवत्तेप्रमाणे झाले की नाही अशी शंका उपस्थित होत आहे.पंतप्रधान ग्राम सडक योजनेस मुख्यमंत्री ग्रामसडक योजना असे नाव बहाल करण्यात आले. जिल्ह्यातील मोठ्या रस्त्यांचा विकास या योजने अंतर्गत करण्यात येतो. यावर कार्यकारी अभियंता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अहमदनगर यांचे नियंत्रण असतांना एकाच वर्षांत पुलाचा स्लॅब खराब कसा होतो. हा संशोधनाचा विषय आहे. देखभाल दुरुस्ती कालावधी हा पाच वर्षे असून 21 ठिकाणी मोरीच्या कामाचा समावेश आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवून वेड्या बाभळीची तात्काळ सफाई करण्याची ग्रामस्थांची मागणी.
Post a Comment