बेलापुर (प्रतिनिधी )-तालुका व शहरातील असणाऱ्या स्वस्त धान्य दुकानावर देखरेख करण्याकरीता शासन नियुक्त दक्षता समीती जाहीर करण्यात आली असुन या समीतीत चर्मकार समाजाचे माजी जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब वाघमारे व पत्रकार चंद्रकांत झुरंगे यांचा समावेश करण्यात आला आहे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी शहर व तालुका दक्षता समीतीत अशासकीय सदस्यांना मंजुरी दिली आहे श्रीरामपुर शहर दक्षता समीतीत चर्मकार समाजाचे मा .जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब वाघमारे, भाऊसाहेब एडके, रणजीत जामकर, श्रीमती आशा परदेशी ,श्रीमती अर्चना पानसरे ,जिवन सुरडे,नानासाहेब बडाख ,श्रीमती तरन्नुम जहागीरदार मनोज परदेशी महेबुब शेख आदिंचा समावेश आहे तर श्रीरामपुर तालुका दक्षता समीतीत पत्रकार व समता परिषदेचे चंद्रकांत झुरगे ,संतोष मोकळ ,राहुल रणधीर , सौ शिल्पा चितेवार ,श्रीमती शारदा बनकर ,श्रीमती जयश्री जगताप ,हरदिपसींग शेठी ,श्रीमती रेखा फाजने ,विष्णूपंत खंडागळे ,सतीश बोर्डे आदिचा समावेश आहे .या सदस्यांच्या निवडीबद्दल आमदार लहु कानडे साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे ,माजी आमदार भानुदास मुरकुटे धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई आदिंनी अभिनंदन केले आहे.
Post a Comment