मनसेच्या वतीने सी,डी जैन कॉलेजचे प्राचार्य श्री निंबाळकर यांना निवेदन देण्यात आले
त्याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे म्हणाले की हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज हे तमाम हिंदूंची श्रद्धा स्थान आहेत त्यांचा पुतळा अशाप्रकारे कैद करून ठेवल्याने तमाम शिवप्रेमींची मने दुखावली गेली आहेत व हा प्रकार शिवप्रेमी कदापीही सहन करणार नाही ही कॉलेज प्रशासनाने लक्षात ठेवावे महाराजांना साडेतीनशे वर्षापूर्वी मोगल साम्राज्य यांनी असेच कैद करून ठेवण्याचे प्रयत्न केले परंतु छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या तावडीतून सहीसलामत सुटले होते परंतु आज रयत शिक्षण संस्थेच्या श्रीरामपूर येथील सीडी जैन कॉलेजमध्ये यांनी आज या ठिकाणी महाराजांचा पुतळ्या भोवती लोखंडी जाळी लावण्यात आल्याचे मनसे कार्यकर्त्यांच्या लक्षात आले त्यानंतर मनसे स्टाईलने महाविद्यालयात आंदोलन करण्यात आले मनसेच्या आंदोलनानंतर काँलेज प्रशासनाने ताताडीने ती लोखंडी जाळी हटवीली यापुढे जर पुन्हा अशा पद्धतीने गेट लावून बंद अवस्थेत ठेवण्यात आले तर कॉलेज व्यवस्थापकाच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे यांनी सांगितले
आंदोलकांच्या वतीने महाविद्यालयाच्या प्राचार्यांना निवेदन देण्यात आले
आंदोलनात मनसे जिल्हा सचिव डॉक्टर संजय नवथर, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप, विधानसभा अध्यक्ष संतोष डहाळे,तालुकाध्यक्ष गणेश दिवसे, शहराध्यक्ष निलेश लांबोळे, विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष विशाल शिरसाठ, तालुकाध्यक्ष अक्षय सूर्यवंशी, दीपक सोनवणे, समर्थ सोनार, अमोल साबणे, मनोज जाधव, लक्ष्मण लोखंडे, महेश रोकडे, किरण रणवरे, अतुल खरात, विकी शिंदे, रुपेश शिंदे, आर्यन शिंदे, कुंदन शेलार, रोहित वेताळ, विकी निकाळजे, जगन सुपेकर, किशोर बनसोडे, विकास शिंदे, विनेश शिंदे,आदीनी सहभाग घेतला होता .
Post a Comment