18 लाखांचा गंडा; आरोपी गजाआड,सायबर पोलिसांनी ठोकल्या बेड्या: तीन दिवस पोलीस कोठडी.

अहमदनगर प्रतिनिधी-लोणी (ता. राहाता) येथील माजी सैनिकाची 18 लाख 39 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणार्‍याला येथील सायबर पोलिसांनी मुंबई येथून ताब्यात घेत अटक केली. सलाहुद्दीन शहाबुद्दीन खान (वय 52 रा. गणेशनगर, वेल्फेअर सोसायटी, कांदिवली, मुंबई) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.त्याला नगर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. लोणी येथील फिर्यादी हे सैन्यातून निवृत्त झाले आहे. ते ‘वर्क फॉर्म होम’ करता येईल अशा नोकरी, उद्योगाच्या शोधात होते. ऑनलाईन साईटवर माहिती घेत असताना त्यांची फेसबुकवर एका महिलेशी ओळख झाली. तीने फिर्यादी यांना ‘शॉपिंग डॉट कॉम’ कंपनीत अधिकारी असल्याचे सांगितले व त्यांचा विश्वास संपादन केला. कंपनीचे उत्पादने खरेदी केल्यास व विकल्यास तुम्हाला भरपूर कमिशन मिळेल, असे संबंधित महिलेने सांगितले.पैसे जमा करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवरून एक क्यूआर कोड पाठविला. त्याद्वारे फिर्यादी यांनी संबंधित कंपनीच्या साईटवरून वस्तू खरेदी करून बँक खात्यावर वेळोवेळी 13 लाख 10 हजार रुपये पाठविले. मात्र फिर्यादी यांना वस्तू मिळाल्या नाही. 10 ते 20 लाख रुपयांचा टप्पा पूर्ण होत नसल्याने त्यांनी कंपनीकडे पैसे परत मागितले. परंतु, 10 ते 20 लाखांचा टप्पा पूर्ण केल्यानंतर रक्कम काढता येईल, असे फिर्यादीला सांगितले गेले. त्यांनी नंतर सात लाख रुपये भरताच कंपनीने बँक खाते बंद केले. ही घटना 8 ते 23 नोव्हेंबर 2021 दरम्यान घडली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी यांची एकूण 18 लाख 39 हजार 702 रुपयांची फसणूक झाली आहे.दरम्यान फिर्यादी यांनी 10 जानेवारी 2022 रोजी सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द भादंवि कलम 419, 420, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (सी) (डी) नुसार गुन्हा दाखल केला होता. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, पोलीस उपनिरीक्षक प्रतिक कोळी, पोलीस अंमलदार योगेश गोसावी, उमेश खेडकर, दिंगबर कारखिले, मलिक्कार्जुन बनकर, राहुल हुसळे, अरूण सांगळे, वासुदेव शेलार यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण करून आरोपी खान याला मुंबई येथून अटक केली.सहा राज्यांत गेली रक्कम सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण करत असताना फसवणुकीची रक्कम सहा राज्यांतील विविध बँक खात्यात वर्ग झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार मुंबई येथील भारत मेटेज कार्पोरेशन, कांदिवली या खात्यावर एक लाख रूपये रक्कम वर्ग झाली होती. या बँक खातेदाराचा सायबर पोलिसांनी शोध घेण्यास सुरूवात केली. त्यानंतर सलाहुद्दीन शहाबुद्दीन खान याचे नाव समोर आले. पोलिसांनी त्याचा शोध घेत गजाआड केले.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget