श्रीरामपूर (गौरव डेंगळे) १८/०२: येथील न्यू इंग्लिश स्कूल क्रिकेट मैदानावर अध्यक्ष श्री राम टेकावडे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळविण्यात आलेल्या सुपर सिक्स क्रिकेट स्पर्धेच्या आज झालेल्या अंतिम सामन्यात श्रीरामपूर इन्द्राज संघाने श्रीरामपूर फायटर्स संघाचा २० धावांनी पराभव करीत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
आज रंगलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन श्री दौलत पवार, सौ अस्मिता परदेशी, सौ सारिका भांड,श्री नितीन गायधने,श्री नितीन बलराज आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.८ संघाने सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत श्रीरामपूर रायडर्स,श्रीरामपूर फायटर्स,श्रीरामपूर इंद्राज, श्रीरामपूर चॅलेंजर्स संघांनी साखळीतील प्रत्येकी २-२ सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीत श्रीरामपूर रायडर्स संघाने श्रीरामपूर चॅलेंजर्स संघाचा ६ गडी राखून तर दुसरा उपांत्य फेरीच्या लढतीत श्रीरामपूर इंद्राज संघाने श्रीरामपूर फायटर्स संघाचा ८ गडी राखून पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेच्या अंतिम सामन्याची नाणेफेक इन्द्राज संघाने जिंकली व प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इन्द्राज संघाने निर्धारित ६ षटकात ६ गडी बाद ८१ धावा फटकावल्या.यामध्ये ज्वेल पटोले ५८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. रायडर्स संघाकडून मोहित २ गडी बाद केले. विजयासाठी ८२ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेला रायडर्स संघ ६ षटकात ६१ धावाच करू शकला. व हा सामना इन्द्राज संघाने २० धावांनी जिंकून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.स्पर्धेचे पारितोषिक वितरण श्री लकी सेठी, तमन भाटीयानी,मातापुरचे सरपंच श्री गणपत गायके,श्री विनोद जोशी,श्री बन्सीलाल फरवानी,श्री गौरव साहनी,श्री प्रशांत माळवे, क्रीडा प्रशिक्षक श्री गौरव डेंगळे आदी मान्यवरांच्या हस्ते पार पडले.स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अनुज पाटिल , इशन भोसले, साई सोनावणे,साई जवळे, मोहित माळवे आदी खेळाडूंचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या स्पर्धेत उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरी करणारा ज्वेल पटोलेला मालिकावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.स्पर्धा यशस्वी करण्याकरिता श्री नितीन गायधने,श्री नितीन बलराज,श्री निखिल फासाटे,श्री एस हलनोर, श्री अतुल जाधव,श्री दौलत पवार,दीपक रणपिसे आदींनी अथक परिश्रम घेतले.
Post a Comment