Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी  )-लहान मुलांच्या भांडणाच्या कारणातुन दोन कुटुंबात जबर हाणामारी झाली असुन दोन जण गंभीर जखमी झाले आहेत त्यांचेवर साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरु आहेत पोलीसांनी तीन जणाविरुध्द जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या कारणावरुन गुन्हा दाखल केला आहे .पोलीस घटनास्थळी तातडीने पोहोचल्यामुळे मोठा अनर्थ टळला.                           

बेलापुरातील बोरुडगल्लीत राहणारे ,आतार व सोनवणे या दोन कुटुंबात दोन दिवसापूर्वी लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरुन वाद झाले होते परंतु  ते वाद आपापसात समझोता करुन मिटविण्यात आले तेच वाद कालही उफाळून आले सोनवणे कुटुंब व आतार कुटुंब यांच्यात तुफान हाणामारी झाली  मारामारीत लाकडी दांडके लोखंडी साखळीचा वापर करण्यात आला             दोन दिवसापुर्वी सोनवणे व आतार कुटुंबातील लहान मुलात वाद झाले होते ते वाद दोन्ही कुटुंबांनी मिटविले त्या वेळी आतार यांच्या मुलाला कचरु सोनवणे याने मारले असा आतार कुटुंबीयांचा आरोप होता त्या रोषातुनच काल दोन्ही कुटुंबात पुन्हा वाद झाले वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले त्या वेळी कचरु धोडीराम सोनवणे विकासा सोनवणे आकाश सोनवणे या तिघांनाही बेदम मारहाण करण्यात आली यात कचरु सोनवणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे त्यांना रक्तभंबाळ अवस्थेत आगोदर पोलीस स्टेशन नंतर साखर कामगार दवाखान्यात पाठविण्यात आले असुन त्यांचेवर तसेच विकास सोनवणे व आकाश सोनवणे यां तिघेवर  साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरु आहेत .मारामारीची घटना गावात पसरताच मोठा जमाव जमा झाला बेलापुर पोलीस स्टेशनला मोठी गर्दी जमा झाली घटनेची माहीती मिळताच पोलीस निरीक्षक संजय सानप मोठ्या फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले त्यांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली पोलीसांनी संपुर्ण गावातुन गस्त सुरु केली रात्री बारा वाजेपर्यंत गावात तणावाची परिस्थिती होती पतितपावनचे सुनिल मुथा यांनी तातडीने वरिष्ठांशी संपर्क साधुन घटनेचे गांभीर्य सांगितले त्यामुळे पोलीसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनीही घटनास्थळी भेट दिली कचरु धोंडीराम सोनवणे यांच्या तक्रारीवरुन बेलापुर पोलीसांनी अनिस दादासाहेब शेख अकील दादासाहेब आतार बबडी दादासाहेब आतार यांचेविरुध्द भादवि कलम ३०७ ,३२४ ,३२३ ,५०४ ,५०६ ,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन पोलीस निरीक्षक संजय सानंप यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अतुल लोटके पुढील तपास करत आहेत

अहमदनगर प्रतिनिधी - एका गोडाऊनमध्ये साठा करून ठेवलेला तीन ट्रक गुटखा पोलिसांनी पकडला. बोल्हेगाव परिसरात बुधवारी पोलिसांनी ही कारवाई केली. कोतवाली पोलिसांनी नगर शहरातील कायनेटीक चौकात दुचाकीवरून गुटखा वाहतूक करणार्‍या दोघांना पकडल्यानंतर गुटखा गोडाऊनविषयी माहिती मिळाली होती. यानंतर ही कारवाई करण्यारत आली. रात्री उशिरापर्यंत गुटख्याची मोजदाद सुरू होती.दरम्यान गोवा, माणिकचंद, हिरा, सितार अशा विविध कंपनीचा हा गुटखा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटखा पकडल्याने गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. दोन तरुण दुचाकीवर गुटखा विक्री करण्यासाठी नगर-पुणे रोडवरून जात असल्याची खबर कोतवाली पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी कायनेटीक चौकात सापळा लावला. तेथे पाठलाग करून दोन तरूणांना पोलिसांनी पकडले.त्यांच्याकडे पिशवीमध्ये गोवा गुटखा मिळून आला. पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता बोल्हेगावातील गुटखा गोडाऊनची माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिसांनी या गोडाऊनवर छापा टाकला. तेथे विविध कंपन्यांचा गुटखा साठा पोलिसांना मिळून आला. सर्व मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करून ट्रकमध्ये भरण्यात आला. तीन ट्रक भरून हा गुटखा होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

अहमदनगर प्रतिनिधी-लोणी (ता. राहाता) येथील माजी सैनिकाची 18 लाख 39 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणार्‍याला येथील सायबर पोलिसांनी मुंबई येथून ताब्यात घेत अटक केली. सलाहुद्दीन शहाबुद्दीन खान (वय 52 रा. गणेशनगर, वेल्फेअर सोसायटी, कांदिवली, मुंबई) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.त्याला नगर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. लोणी येथील फिर्यादी हे सैन्यातून निवृत्त झाले आहे. ते ‘वर्क फॉर्म होम’ करता येईल अशा नोकरी, उद्योगाच्या शोधात होते. ऑनलाईन साईटवर माहिती घेत असताना त्यांची फेसबुकवर एका महिलेशी ओळख झाली. तीने फिर्यादी यांना ‘शॉपिंग डॉट कॉम’ कंपनीत अधिकारी असल्याचे सांगितले व त्यांचा विश्वास संपादन केला. कंपनीचे उत्पादने खरेदी केल्यास व विकल्यास तुम्हाला भरपूर कमिशन मिळेल, असे संबंधित महिलेने सांगितले.पैसे जमा करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवरून एक क्यूआर कोड पाठविला. त्याद्वारे फिर्यादी यांनी संबंधित कंपनीच्या साईटवरून वस्तू खरेदी करून बँक खात्यावर वेळोवेळी 13 लाख 10 हजार रुपये पाठविले. मात्र फिर्यादी यांना वस्तू मिळाल्या नाही. 10 ते 20 लाख रुपयांचा टप्पा पूर्ण होत नसल्याने त्यांनी कंपनीकडे पैसे परत मागितले. परंतु, 10 ते 20 लाखांचा टप्पा पूर्ण केल्यानंतर रक्कम काढता येईल, असे फिर्यादीला सांगितले गेले. त्यांनी नंतर सात लाख रुपये भरताच कंपनीने बँक खाते बंद केले. ही घटना 8 ते 23 नोव्हेंबर 2021 दरम्यान घडली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी यांची एकूण 18 लाख 39 हजार 702 रुपयांची फसणूक झाली आहे.दरम्यान फिर्यादी यांनी 10 जानेवारी 2022 रोजी सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द भादंवि कलम 419, 420, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (सी) (डी) नुसार गुन्हा दाखल केला होता. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, पोलीस उपनिरीक्षक प्रतिक कोळी, पोलीस अंमलदार योगेश गोसावी, उमेश खेडकर, दिंगबर कारखिले, मलिक्कार्जुन बनकर, राहुल हुसळे, अरूण सांगळे, वासुदेव शेलार यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण करून आरोपी खान याला मुंबई येथून अटक केली.सहा राज्यांत गेली रक्कम सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण करत असताना फसवणुकीची रक्कम सहा राज्यांतील विविध बँक खात्यात वर्ग झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार मुंबई येथील भारत मेटेज कार्पोरेशन, कांदिवली या खात्यावर एक लाख रूपये रक्कम वर्ग झाली होती. या बँक खातेदाराचा सायबर पोलिसांनी शोध घेण्यास सुरूवात केली. त्यानंतर सलाहुद्दीन शहाबुद्दीन खान याचे नाव समोर आले. पोलिसांनी त्याचा शोध घेत गजाआड केले.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-मनसेच्या जन रेट्यानंतर सी,डी जैन महाविद्यालयातील श्री  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या भोवती असलेली जाळीचा दरवाजा काढण्यात आला असुन अनेकांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले आहेत ,श्रीरामपूर येथील सीडी जैन कॉलेज मध्ये गेल्या अनेक वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा चारी बाजूने लोखंडी जाळी च्या सहाय्याने बंदिस्त पणाने करून ठेवण्यात आला होती अनेक विद्यार्थ्यांनी ही बाब मनसे विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली व ती जाळी काढुन टाकण्याची विनंती केली त्यानुसार मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे यांचे नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्त्यांनी  कॉलेज मध्ये जाऊन आंदोलन केले .

मनसेच्या वतीने  सी,डी जैन कॉलेजचे प्राचार्य श्री निंबाळकर यांना निवेदन देण्यात आले

त्याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे म्हणाले की हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री  छत्रपती शिवाजी महाराज हे तमाम हिंदूंची श्रद्धा स्थान आहेत त्यांचा पुतळा अशाप्रकारे कैद करून ठेवल्याने तमाम शिवप्रेमींची मने दुखावली  गेली आहेत व हा प्रकार शिवप्रेमी कदापीही सहन करणार नाही ही कॉलेज प्रशासनाने लक्षात ठेवावे महाराजांना साडेतीनशे वर्षापूर्वी मोगल साम्राज्य यांनी असेच कैद करून ठेवण्याचे प्रयत्न केले परंतु छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या तावडीतून सहीसलामत सुटले होते परंतु आज  रयत शिक्षण संस्थेच्या श्रीरामपूर येथील सीडी जैन कॉलेजमध्ये  यांनी आज या ठिकाणी महाराजांचा पुतळ्या भोवती  लोखंडी जाळी लावण्यात आल्याचे मनसे कार्यकर्त्यांच्या लक्षात आले त्यानंतर मनसे स्टाईलने महाविद्यालयात आंदोलन करण्यात आले मनसेच्या आंदोलनानंतर काँलेज प्रशासनाने ताताडीने ती लोखंडी जाळी हटवीली  यापुढे जर पुन्हा अशा पद्धतीने गेट लावून बंद अवस्थेत ठेवण्यात आले तर कॉलेज व्यवस्थापकाच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे यांनी सांगितले 

आंदोलकांच्या वतीने महाविद्यालयाच्या प्राचार्यांना निवेदन देण्यात आले 

आंदोलनात मनसे जिल्हा सचिव डॉक्टर संजय नवथर, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप, विधानसभा अध्यक्ष संतोष डहाळे,तालुकाध्यक्ष गणेश दिवसे, शहराध्यक्ष निलेश लांबोळे, विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष विशाल शिरसाठ, तालुकाध्यक्ष अक्षय सूर्यवंशी,  दीपक सोनवणे, समर्थ सोनार,  अमोल साबणे, मनोज जाधव, लक्ष्मण लोखंडे, महेश रोकडे, किरण रणवरे, अतुल खरात, विकी शिंदे, रुपेश शिंदे, आर्यन शिंदे, कुंदन शेलार, रोहित वेताळ, विकी निकाळजे, जगन सुपेकर, किशोर बनसोडे, विकास शिंदे, विनेश शिंदे,आदीनी सहभाग घेतला होता .

कोपरगाव प्रतिनिधी-मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत जेऊर पाटोदा ते धारणगाव जिल्हा मार्ग क्रं 8 वरती शासनाने 703 लक्ष रुपये खर्च करून वर्षभरापुर्वी हा रस्ता तयार केला. मात्र या कामास वर्ष होत नाही तेच रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली असून धारणगाव पुलावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत जेऊर पाटोदा, चांदगव्हाण, मुर्शतपूर,धारणगाव,सोनारी, रवंदे या प्रा.जी.मा 8 वरच्या 10 किलोमीटर च्या रस्त्यास सातशे तिन लक्ष रुपये 2020 मध्ये खर्च करण्यात आले. एकाच वर्षात धारणगाव येथिल पुलाच्या नळ्या वरील स्लॅब फुटून रस्ता खचल्याने काम गुणवत्तेप्रमाणे झाले की नाही अशी शंका उपस्थित होत आहे.पंतप्रधान ग्राम सडक योजनेस मुख्यमंत्री ग्रामसडक योजना असे नाव बहाल करण्यात आले. जिल्ह्यातील मोठ्या रस्त्यांचा विकास या योजने अंतर्गत करण्यात येतो. यावर कार्यकारी अभियंता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अहमदनगर यांचे नियंत्रण असतांना एकाच वर्षांत पुलाचा स्लॅब खराब कसा होतो. हा संशोधनाचा विषय आहे. देखभाल दुरुस्ती कालावधी हा पाच वर्षे असून 21 ठिकाणी मोरीच्या कामाचा समावेश आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवून वेड्या बाभळीची तात्काळ सफाई करण्याची ग्रामस्थांची मागणी.

बेलापुर  (प्रतिनिधी )-तालुका व शहरातील असणाऱ्या स्वस्त धान्य दुकानावर देखरेख करण्याकरीता शासन नियुक्त दक्षता समीती जाहीर करण्यात आली असुन या समीतीत चर्मकार समाजाचे माजी जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब वाघमारे व पत्रकार चंद्रकांत झुरंगे यांचा समावेश करण्यात आला आहे                           पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी शहर व तालुका दक्षता समीतीत अशासकीय सदस्यांना मंजुरी दिली आहे श्रीरामपुर शहर दक्षता समीतीत चर्मकार समाजाचे मा .जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब वाघमारे, भाऊसाहेब एडके, रणजीत जामकर, श्रीमती आशा परदेशी ,श्रीमती अर्चना पानसरे ,जिवन सुरडे,नानासाहेब बडाख ,श्रीमती तरन्नुम जहागीरदार मनोज परदेशी महेबुब शेख आदिंचा समावेश आहे तर श्रीरामपुर तालुका दक्षता समीतीत पत्रकार व समता परिषदेचे चंद्रकांत झुरगे ,संतोष मोकळ ,राहुल रणधीर , सौ शिल्पा चितेवार ,श्रीमती शारदा बनकर ,श्रीमती जयश्री जगताप ,हरदिपसींग शेठी ,श्रीमती रेखा फाजने ,विष्णूपंत खंडागळे  ,सतीश बोर्डे आदिचा समावेश आहे .या सदस्यांच्या निवडीबद्दल आमदार लहु कानडे साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे ,माजी आमदार भानुदास मुरकुटे धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई  आदिंनी अभिनंदन केले आहे.

श्रीरामपूर  प्रतिनिधी -7 व्या वर्ल्ड फुनाकोशी राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत मार्गदर्शक सेन्सई संजय पवार सर, मुख्य प्रशिक्षक सेन्सई अशोक शिंदे सर आणि संघर्ष स्पोर्ट्स फाउंडेशन महाराष्ट्र टीम ने मिळवला प्रथम क्रमांक, सर्व विद्यार्थी व प्रशिक्षकावर  सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या स्पर्धा काता आणि कुमीते या दोन प्रकारात घेण्यात आल्या होत्या. बाळासाहेब भागवत सर यांनी ब्राम्हणवाडा, अकोला तालुका, जि अहमदनगर या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या, पुणतांबा आणि परिसरातून एकूण 35 खेळाडू सहभागी होऊन, उत्कृष्ट

खेळाचे प्रदर्शन करीत प्रथम क्रमांकाच्या चषकावर गावाचे नाव कोरले, सेन्सई अशोक शिंदे सर गेल्या सात वर्षापासून पुणतांबा आणि आजूबाजूच्या परिसरात कराटे प्रशिक्षण वर्ग उत्कृष्ट पणे घेत असून अनेक राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी खेळाडू घडविले आहेत. यश मिळविले आहे, त्यांच्या प्रशिक्षनातून अनेक विद्यार्थी यशस्वीहोत आहेत, अशोक शिंदे सर यांच्याकडे आजही एक हजार. विद्यार्थी कराटे प्रशिक्षण घेत आहेत, शिंदे सर स्वतः च  अंतर राष्ट्रीय खेळाडू असून (गोल्ड मेडलिस्ट )मार्शल आर्ट खेळाच्या सात प्रकारात ते नॅशनल गोल्ड मेडलिस्ट आहेत, राष्ट्रीय पंच, उत्कृष्ट जिल्हा, संघटक,महाराष्ट्र कोच, अशा अनेक जबाबदाऱ्या ते मोठ्या सीताफिने पार पाडत आहेत,काता व कुमिते(फाईट)अशा दोन खेळांच्या प्रकारा मध्ये  अहमदनगर जिल्ह्याला 50 सुवर्ण पदक 17 रौप्य 13 कांस्य आसे एकूण 80 पदकाची कमाई अहमदनगर  जिल्ह्याने केली असून.चॅम्पियन ऑफ चॅम्पियन ची ट्रॉफी वर  अहमदनगर जिल्ह्याचे नाव कोरले आहे व महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळून यश

संपादन केले आहे. विद्यार्थी व विद्यार्थिनी  वय वर्ष 5,6 आणि 7 मधील मुले व मुली सुरज निपटे - सुवर्ण  ,रौप्य . अस्मी शिंदे सुवर्ण, कांस्य वय वर्ष 8 आणि 9 मधील मुले व मुली कल्याणी बेंडकुळे रौप्य,कांस्य ,धनश्री वैराळ सुवर्ण ,रौप्य.रद्रा काळे  रौप्य,कांस्य . मैथिली गोडसे रौप्य,कांस्य.अबुजर शेख रौप्य,कांस्य .श्रद्धा फोपसे कांस्य,कांस्य.वय वर्ष 12आणि 13 मधील मुले व मुली रुद्रा उकांडे सुवर्ण ,सुवर्ण.तृप्ती वाघ कांस्य ,कांस्य . अंजली पवार सुवर्ण, सुवर्ण. साई गाडेकर रौप्य,सुवर्ण .शिवम घोगरे सुवर्ण ,रौप्य .कृष्णा तांबे सुवर्ण, रौप्य.निखिल दिवटे कांस्य , कांस्य. श्रेया दिवटे रौप्य ,रौप्य. साईशा दिवटे सुवर्ण ,कांस्य .साक्षी शेटे कांस्य , कांस्य.साक्षी आमले सुवर्ण , सुवर्ण वेदांत शेजूळ रौप्य ,सुवर्ण .अदिती धुळगंड सुवर्ण , रौप्य.ऋतुजा भागडे सुवर्ण,कांस्य. सायली वैराळ रौप्य , कांस्य. श्रुतिका काळे सुवर्ण ,कांस्य.अलिषा ओहोळ रौप्य ,रौप्य.आयान शेख कांस्य ,सुवर्ण.वय वर्ष 14आणि 15मधील मुले व मुली आदित्य बनकर कांस्य ,रौप्य. अदिराज फोपसे रौप्य , कांस्य.कृष्णा फोपसे रौप्य, कांस्य.प्रसन्न फोपसे रौप्य ,रौप्य.नम्रता जेजुरकर रौप्य ,कांस्य.समृध्दी जेजुरकर सुवर्ण, रौप्य.तनुजा प्रधान रौप्य,रौप्य.वय वर्ष 16आणि 17 मधील मुले व मुली साई शिंदे सुवर्ण , रौप्य. अचूत थोरात सुवर्ण, रौप्य .चेतना  गुडेकर सुवर्ण ,कांस्य .श्रावणी शेजुळ सुवर्ण ,रौप्य.अनुजा चौधरी रौप्य,रौप्य. तसेच आदित्य माळी या विद्यार्थ्याला बेस्ट फायटर प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह मिळाले. प्रशिक्षक म्हणून सार्थक शिंदे सन्मान चिन्ह मिळाले. तसेच प्रशिक्षक ओम लोकने ईशा निपटे वैष्णव सोनवणे श्रावणी शेजुळ रेश्मा शिंदे इत्यादींचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी  यश संपादन करून चॅम्पियन ऑफ चॅम्पियन ची ट्रॉफी वर  अहमदनगर जिल्ह्याचे नाव कोरले आहे व महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे . या विद्यार्थ्यांचे आजूबाजूच्या गावांमध्ये कौतुकचा वर्षाव होत आहे. तसेच  पालकांनी ही अभिनंदन व शुभेच्छा दिल्या. अशोक शिंदे सर यांचा गौरव करण्यात आला.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget