Latest Post

संगमनेर प्रतिनिधी- हिजाबच्या धार्मिक हक्कासाठी व अल्पसंख्याक समुदायावर होणारे सांप्रदायिक अतिक्रमण रोखण्यासाठी मुस्लिम स्वयंसेवक संघाच्या वतीने राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, मा. प्रधानमंत्री, भारत सरकार, कर्नाटक राज्य अल्पसंख्याक आयोग, मा. मुख्यमंत्री, कर्नाटक राज्य यांना मा. तहसिलदार, संगमनेर यांचे मार्फत निवेदन देऊन संविधानिक मार्गाने सदर प्रश्न मार्गी लावण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी संत ईग्नाथी चर्चचे प्रमुख धर्मगुरु फा. सतीशजी कदम, मुस्लिम धर्माचे संगमनेर शहर काझी रकीबजी सैय्यद, दार-उल-उलूम बरकात-ए- शेर-ए-नेपालचे मौलाना हाफिज रेहान रजा बरकाती, महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेचे संस्थापक अनिलजी भोसले, वरिष्ठ आर. टी. आय. कार्यकर्ते मुझफ्फरजी शेख, न्यूज एन. एम. पी. चे मुख्य कार्यकारी संपादक शौकतजी पठाण, पत्रकार इम्रान शेख, न्यूज एन. एम. पी. चे सह संपादक जमीर शेख, मुनीर शेख, इम्रान पटेल, शहेबाज शेख, मोहसिन मनियार आणि बुरखा - हिजाब परिधान केलेल्या शबनमजी जावेद शेख, निलोफरजी सैय्यद, तैबाजी जावेद शेख, सादियाजी पठाण, सकिनाजी पठाण या महिला सामाजिक कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-तालुक्यात सर्वात मोठी सेवा संस्था असणाऱ्या बेलापुर विविध कार्यकारी सेवा संस्थेची निवडणूक दिनांक ६ मार्च रोजी होत असुन काल झालेल्या छानणीत दहा जणाचे अर्ज फेटाळण्यात आले असुन १३ जागेकरीता ८८ उमेदवार निवडणूक रिंगणात असुन दिनांक  २४फेब्रुवारी रोजी अर्ज माघार घेण्याची मुदत आहे. त्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे  बेलापुर सेवा संस्थेची निवडणूक दिनांक ६ मार्च रोजी होत असुन तेरा जागेकरीता एकुण ९९ जणांनी अर्ज दाखल केले होते त्यातील दहा उमेद़्वारांचे उमेद़्वारी अर्ज अवैध ठरविण्यात आले असुन त्या सर्वांना निवडणूक निर्णय अधिकारी एस पी रुद्राक्ष यांनी लेखी आदेश दिलेले आहेत  त्यात बोंबले संजय दादा ,मेहेत्रे शाम रामभाऊ , लबडे अशोक सहादु , कुऱ्हे रावसाहेब नामदेव , नवले नितिन मोहन , लबडे विलास रामभाऊ , शेलार संजय छबु , अमोलीक बाबासाहेब सखाराम , बंगाळ भास्कर तुकाराम , खंडागळे देविदास नामदेव या दहा जणांचे उमेद़्वारी अर्ज फेटाळण्यात आले आहेत.तशा नोटीसाही संबधीतांना बजावण्यात आलेल्या आहेत .जिल्हा परिषद सदस्य शरद नवले व उपसरपंच आभिषेक खंडागळे यांचा एक पँनल तर बाजार समितीचे संचालक सुधीर नवले काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड यांचा दुसरा पँनल तर प्रकाश मेहेत्रे यांचा तिसरा पँनल राहण्याची दाट शक्यता आहे

श्रीरामपूर प्रतिनिधी-कर्नाटक या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या महिलांचा पेहराव हिजाब (बुरखा) याला काही समाजकंटक विरोध करून मोठ्या प्रमाणे जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी समाजवादी पार्टीच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालय येथे माननीय तहसीलदार प्रशांत पाटील यांना निवेदन देण्यात आले.यावेळी समाजवादीचे अहमदनगर उत्तर

जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार, आसिफ तांबोळी,आय्युब पठाण, दानीश शहा,दिशान शेख,आयाज मिर्झा, मुबशिर पठाण, जकरिया सय्यद, अफरोज शहा ,मोसीन कुरेशी,महीला शहराध्यक्ष सुलताना शहा,तमन्ना शेख, अफसाना शेख, शाईन शेख ,स्वालिया शेख, यास्मिन शेख,हसीना मंसूरी,हजरा शहा, सोनी शाह, शाईन शाह,सकीना शेख, साईबा शेख, महेक शेख, नसरीन शाह, खुशबू शेख,यावेळी गौसे आजम सेवाभावी संस्था तसेच अलबदर ग्रुप,जे.जे. फाउंडेशन.आदी उपस्थित होते.मुस्लिम समाजाच्या महिलांचा पेहरावा हिजाब (बुरखा) यास कर्नाटक राज्य मधील समाजकंटक याला विरोध करीत आहे. हिजाब (बुरखा) मुस्लिम धर्मशास्त्राप्रमाणे इस्लाम धर्मात मुली व महिलांना अत्यावश्यक असून अनेक पिढ्यांपासून मुस्लिम मुलगी व महिला हिजाब (बुरखा) परिधान करून शाळेत व महाविद्यालयात देखील जात आहे. आजपर्यंत कोणतेही शाळा व विद्यालयांमध्ये हिजाब घालून आलेल्या मुलींना कधीही शाळेमध्ये येण्यास नाकरण्यात आलेले नाही.तसेच भारतीय राज्यघटनेच्या कलम २५ ते २८ मध्ये देशातील सर्व नागरिकांना त्यांच्या धर्माचे स्वातंत्र्य दिले आहे. तसेच भारतीय राज्यघटनेच्या कलम १९ (१) (अ) अन्वे सर्वांना बोलण्याचे व राहण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. तसेच स्वातंत्र्य भारतात आपल्या स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत कुणीही कोणाला कोणते गणवेश घालावे हे कुणीही सांगितलेले नाही किंवा कोणतेही धर्माचे लोकांनी जे काही गणवेश घातलेले आहे त्याच कधीही विरोध केलेला नाही.परंतु कर्नाटकात मागील काही दिवसापासून संविधानाने दिलेल्या मौलिक अधिकारापासून सामान्य जनतेला विशेष मुलींना वंचित ठेवण्याचे काम केले जात आहे. महाराष्ट्र राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांना पहिल्यापासून संरक्षण दिलेले आहे. तसेच एकेठिकाणी सरकार हे बेटी पढाव बेटी बचाव हा नारा देत आहे. परंतु दुसरे ठिकाणी हिजाबविरोधात घोषणाबाजी देत आहे. ही आपली भारतीय संस्कृती नाही. अशा समाजकंटकांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच हिजाब घालणाऱ्या मुलींना शिक्षण नाकारणाऱ्या संविधान विरोधी कर्नाटक सरकारचा श्रीरामपूर समाजवादी पार्टीच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला असून कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.




बेलापुर  (प्रतिनिधी  )- बेलापुर ग्रामपंचायतीच्या स्थापनेस शंभर वर्ष पुर्ण होत असुन सर्वांच्या सहकार्याने शतक महोत्सवी वर्ष साजरे करताना गावाचा चेहरा मोहरा बदलण्याचा आपला मानस असल्याचे मत जि प सदस्य शरद नवले यांनी व्यक्त केले .  बेलापुर कुऱ्हे वस्ती रोडवरील पाटील मळा कुऱ्हे वस्ती कापसे वस्ती या रस्त्याच्या १२ लाख रुपये खर्चाच्या कामाचा शुभारंभ करताना ते बोलत होते या वेळी सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे अशोक कारखान्याचे माजी व्हा चेअरमन जालींदर कुऱ्हे सुरेश कुऱ्हे मा.उपसभापती दत्ता कुऱ्हे प्रफुल्ल डावरे तंटामूक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे सदस्य चंद्रकांत नवले मुस्ताक शेख रमेश अमोलीक सौ  प्रियंका कुऱ्हे आदि मान्यवर उपस्थित होते या वेळी बोलताना जि प सदस्य शरद नवले म्हणाले की एक कोटी रुपयांचा घनकचरा प्रकल्प मंजुर करण्यात आला असुन गाव व वाड्यावस्त्यावरील पिण्याच्या पाण्याकरीता १२ कोटी निधी मंजुर करण्यात आला असुन जागेअभावी ही योजना दुसऱ्या टप्प्यात गेली आहे .स्मशानभूमी सुशोभिकरणासाठी १५ लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. कुऱ्हे वस्तीवरील या रस्त्याच्या कामास १२ लाख रुपये गायकवाड वस्ती ते सुभाषवाडी या रस्त्याच्या कमास १५ लाख रुपये तर सुभाषवाडी ते ऐनतपुर या रस्त्याच्या कामासाठी २० लाख रुपये मंजुर करण्यात आले आहे जाँगींग ट्रँकसाठी ५० लाख रुपये निधी मंजुर करण्यात आला आहे मागासवर्गीयासाठी  पिण्याच्या पाण्यासाठी आर ओ ची व्यवस्था करण्यात आली आहे. असेही ते म्हणाले. या वेळी सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनीही मनोगत व्यक्त केले . या वेळी विलास कुऱ्हे, संजय गोरे, पत्रकार देविदास देसाई ,दिलीप दायमा, भाऊसाहेब कुताळ ,भास्कर बंगाळ, शरद देशपांडे, गोरक्षनाथ कुऱ्हे,  मधुकर अनाप, गोविंद शिरसाठ ,अजिज शेख, सुभाष कुऱ्हे, शशिकांत कापसे, सोमनाथ शिरसाठ ,महेश कुऱ्हे, विशाल आंबेकर, आमोल गाढे ,अमोल पाडांगळे, सौ कांता साळूंके, सौ मिरा नीर्मळ, सौस्वाती कुऱ्हे, वैशाली कुऱ्हे, कोमल कुऱ्हे, पुष्पा कुऱ्हे, अश्विनी कुऱ्हे आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.

अहमदनगर जिल्ह्यातील उंबरी बाळापूर येथील सौ सुनीता संपत शिंदे यांनी बनविलेला "जिंदगानी "हा मराठी चित्रपट दिनांक ११ फेब्रुवारी पासुन सर्व सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे त्या निमित्ताने त्यांच्याशी केलेली बातचित                                  उडत्या पाखरांना परतीची सिमा नसावी,  नजरेत नेहमी नवी दिशा असावी, घरट्यांच काय केव्हाही बाांधता येईल,क्षितीजापलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी..असा आत्मविश्वास बाळगणाऱ्या सौ.सुनिता संपत शिंदे एम.ए,बी.एड,पीएच.डी रा.उांबरी बाळापूर,ता.संगमनेर,जिल्हा अहमदनगर यांनी कठोर परिश्रम घेवुन जिंदगानी या चित्रपटाची निर्मिती केली आहे त्यांचे पती पोलीस दलात पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत त्या म्हणतात की   मानवाने एकदा  ध्येय ठरवल की तो ते साध्य करतोच.कारण ध्येयाकडे गुरूत्वाकर्षणाची शक्ती आहे.ध्येय वेडी व्यक्ती त्या शक्तीकडे नकळत पणे ओढली जाते... असे स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे .मी त्यांच्या विचाराने प्रभावीत झाले एकदा आपण ध्येय ठरविले की त्याला प्रयत्नाची जोड दिल्यास यशापासून आपल्याला कुणीही दुर ठेवू शकत नाही जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही त्या करीता हवी फक्त जिद्द आणी चिकाटी .म्हणजे तुम्ही हव्या त्या सर्व गोष्टी मिळवू शकता. म्हणतात ना एका यशस्वी पुरूषा मागे एक स्री असते,पण माझ्या बाबतीत  याच्या उलटेच घडले,जसे महात्मा ज्योतीबा फुलेंनी आपली पत्नी सावीत्रीला घडविले तसेच माझ्या बाबतीतही मला माझ्या पतीने जे पोलीस दलात सेवा करत आहेत त्यांनी  भक्कम साथ दिली.माझ्या कामाचे सर्व श्रेय मी त्यांनाच देते.त्यांनी साथ दिली नसती तर मी आहे तीच राहीले असते.मला लहानपणापासून चित्रपट  संगीत याची आवड होती . पी एच.डी पुर्ण केल्यानंतर नातेवाईक  म्हणायचे तु नोकरी का करत नाही.परांतू माझ्यावरील असलेली कुटुंबाची जबाबदारी माझ्या पती असलेली नोकरी त्यामुळे असे वाटायचे की मी जर नोकरी केली तर कुटुंबाला न्याय देवु शकणार नाही म्हणून मी नोकरी ऐवजी काहीतरी व्यवसाय करावा यादृष्टीने विचार सुरु केला यामधे बरेच दिवस ब्युटीपार्लर केले.त्यानांतर एस.टी.महामंडळात पार्सल सुविधेचे काम केले  .शेतीमधे अनेक नवनवीन प्रयोग करीत असतानी फळबागा लावल्या.त्यातुन चांगले उत्पनही मिळाले .पण तरीही मन सतत नवीन करण्याकडे असायचे काहीतरी मोठा व्यवसाय करण्याची इच्छा होती. त्यात कोणता व्यवसाय करावा. लहानपणा पासून सिनेमाची आवड होतीच आणी त्यातच  आमचे कौटुंबिक मित्र  विनायकजी साळवे हे कधी कधी आमच्या घरी येत असत .आल्यानांतर गप्पा करत असताने  ते सतत त्यांनी लिहीलेल्या कथा सांगायचे  

या कथांवर सिनेमा करायचा आहे पण कुणी प्रोड्यूसर मिळत नाही.असेही ते म्हणायचे ते कथा सांगायचे त्यावेळी त्यांची एक कथा फार आवडायची त्या कथेमधील निसर्ग  आणी मानव यांच असलेल नात मनाला स्पर्शून जात असे.   मग मी माझ्या  पतीला सांगीतले मला की मला सिनेमा काढावयाचा आहे त्यावर ते म्हणाले की  हे आपले काम नाही ही चित्रपट नगरी फार वेगळी आहे  तुला जमेल का पण तो पर्यंत माझ्या मनाने पक्का निश्चय  केलेला होता ,मी हे करू शकते आपण हा प्रोजेक्ट करू या. त्यांनी हो सांगीतल्यावर खर्‍या कामाला सुरूवात झाली.सुरूवातीला कथेसाठी लागणारी कलाकार मांडळी   शोधण्यासाठी जाहीरात दिली  नंतर सर्व कलाकारांची निवड केली  कथेच्या मागणी नुसार आम्हाला प्रमुख भुमिकेसाठी लागणारा चेहरा मिळत नव्हता शेवटी माझ्या मुलीची स्क्रिन टेस्ट घेण्यात आली.त्यात ती योग्य वाटली.तीला लहानपणा पासून  अँस्क्टांग व डान्सची आवड आहे. एम.एस्सीचा अभ्यास तसेच यू.पी.एस.सी ची चालू असलेली  तयारी यामुळे काय कराव काय नाही अशा दिधा मनस्धथतीत शेवटी मुलीने होकार दिला मग शुटींगसाठी योग्य ठिकाणांचा शोध सुरु झाला  नाशिक मधील त्रिंबकेश्वर येथील निसर्गरम्य वातावरणात शुटींगला सुरुवात झाली ,शुटींग दरम्यान अनेक अडचणी आल्या त्या सोडवत गेलो काही कठीण प्रसंगाचाही सामना केला .अन जिंदगांनी हा चित्रपट तयार झाला आज तो आपल्या भेटीला येत आहे पर्यावरण व मानव यातील  नाते काय असते ते या चित्रपटात दाखविण्याचा प्रयत्न केला आपल्या परिवारासमवेत पहावा असा हा चित्रपट असुन आपल्या लाडक्या नगरच्या कन्येचा हा पहीलाच चित्रपट आहे.   आपल्या भेटीला हा सिनेमा 11 फेब्रुवारी 2022 ला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.आपणा सवाांना नम्र दवनांती आहे की आपण कुटुंबासह हा सिनेमा थिएटर मध्ये जाऊनचां बघावा.असे आवाहनही सौ सुनिता शिंदे यांनी केले आहे.

श्रीरामपूर : शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सानप, यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे,शेळके हॉस्पिटल, साईबाबा मंदिर वार्ड नंबर ६ परिसरात, एक युवक विनापरवाना बेकायदेशिर गावठी कट्टा व जिवंत काडतुस बाळगून असल्याची माहिती मिळाल्याने. यासंदर्भातील माहितीची खतीरजमा करून, कारवाईचे आदेश दिल्याने ,शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जीवन बोरसे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे, गोतम लगड,रमिजराजा आत्तार,गौरव दुर्गुळे आदींच्या पथकाने,८ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी साडे १२ वाजेच्या सुमारास, मिळालेल्या माहितीतील वर्णनाशी मिळत असलेला, एक इसम संशयास्पद रित्या फिरत असतांना. कारवाईस गेलेल्या पोलिसांनी सदर युवकास ताब्यात घेतले असता. त्याने आपले नाव दिपक बबन जाधव राहणार, शेळके हॉस्पिटल मागे असे सांगितले असून. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता. सदरच्या २१ वर्षीय युवकाच्या कमरेला लावलेला ,एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस असा एकूण २० हजार ५०० रुपये किमतीचे मुद्देमाल पोलिसांनी आरोपीसह  ताब्यात घेतला असून. यासंदर्भात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय सानप, सपोनि जिवन बोरसे, पोना पंकज गोसावी,पोना बिरप्पा करमल, पोको राहुल नरवडे, पोकॉ गीतम लगड, पोकॉ रमिज़ आत्तार, पोकॉ/ल गौरव दुर्गुळे, पोकों महेश पवार आदींनी केली.


श्रीरामपूर प्रतिनिधी - नुकत्याच झालेल्या कर्नाटक या ठिकाणी हिजाब बंदी व त्या ठिकाणी झालेली काही समाजकंटकांकडून निंदनीय घटना याचा श्रीरामपूर मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलीस निरीक्षक संजय सानप यांना निवेदन देण्यात आले यावेळी अहमद भाई जागीरदार, हाजी मुजफ्फर शेख, हाजी अंजुम मुसा शेख, मुनीर इमाम पठाण, मुक्तार शाह, शकूर भाई, असलम बिनसाद , साजिद मिर्झा, रियाज खान पठाण, गफार शाह, जफर शाह हे उपस्थित होते निवेदनात म्हणण्यात आले होते हिजाब हा कायद्याने दिलेला प्रत्येक नागरिकास मूलभूत अधिकार आहे या मूलभूत अधिकाराचा वापर करून त्या पद्धतीने राहणे कपडे परिधान करणे म्हणजे काही गुन्हा होत नाही म्हणून सर्व मुस्लिम समाज सदर घटनेचा निषेध करून मुस्लिम समाजाच्या वतीने शांततेच्या मार्गाने या ठिकाणी निवेदन देण्यात आले. 


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget