यावेळी संत ईग्नाथी चर्चचे प्रमुख धर्मगुरु फा. सतीशजी कदम, मुस्लिम धर्माचे संगमनेर शहर काझी रकीबजी सैय्यद, दार-उल-उलूम बरकात-ए- शेर-ए-नेपालचे मौलाना हाफिज रेहान रजा बरकाती, महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेचे संस्थापक अनिलजी भोसले, वरिष्ठ आर. टी. आय. कार्यकर्ते मुझफ्फरजी शेख, न्यूज एन. एम. पी. चे मुख्य कार्यकारी संपादक शौकतजी पठाण, पत्रकार इम्रान शेख, न्यूज एन. एम. पी. चे सह संपादक जमीर शेख, मुनीर शेख, इम्रान पटेल, शहेबाज शेख, मोहसिन मनियार आणि बुरखा - हिजाब परिधान केलेल्या शबनमजी जावेद शेख, निलोफरजी सैय्यद, तैबाजी जावेद शेख, सादियाजी पठाण, सकिनाजी पठाण या महिला सामाजिक कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
हिजाबच्या धार्मिक हक्कासाठी व अल्पसंख्याक समुदायावर होणारे सांप्रदायिक अतिक्रमण रोखण्यासाठी मुस्लिम स्वयंसेवक संघाच्या वतीने निवेदन.
संगमनेर प्रतिनिधी- हिजाबच्या धार्मिक हक्कासाठी व अल्पसंख्याक समुदायावर होणारे सांप्रदायिक अतिक्रमण रोखण्यासाठी मुस्लिम स्वयंसेवक संघाच्या वतीने राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, मा. प्रधानमंत्री, भारत सरकार, कर्नाटक राज्य अल्पसंख्याक आयोग, मा. मुख्यमंत्री, कर्नाटक राज्य यांना मा. तहसिलदार, संगमनेर यांचे मार्फत निवेदन देऊन संविधानिक मार्गाने सदर प्रश्न मार्गी लावण्याचे आवाहन करण्यात आले.
Post a Comment