कर्नाटकातील प्रकरण उचलून धरुन मोर्चे आंदोलन करणाऱ्या संघटनावर कडक कारवाई करावी- हिंदुत्ववादी संघटनांचे निवेदन

बेलापुर  प्रतिनिधी  - कर्नाटकातील एका महाविद्यालयाने हिजाब काढण्यास नकार देणार्‍या सहा विद्यार्थिनींना प्रवेशबंदी केली होती. मात्र  हिजाब घालूनच आम्ही महाविद्यालयात येऊ, अशी भूमिका या विद्यार्थिनींनी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून घेतली आहे. त्या प्रकरणावरुन सध्या कर्नाटक सह देशभरात वादंग निर्माण झाला आहे.या बाबीचे समर्थनकरुन आंदोलन मोर्चे काढणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांच्याकडे करण्यात आली आहे , या बाबत हिंदुत्ववादी संघनांच्या वतीने उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की विद्यार्थ्यांनी समानता, अखंडता आणि कायदा आणि सुव्यवस्थेवर परिणाम होणार नाही असे कपडे परिधान करावेत. शाळा, कॉलेज, विद्यापीठ येथे शिक्षण घेणारे सर्व समान पातळी वर असावीत म्हणून  ठरावीक गणवेश नेमून देतात, सर्व विद्यार्थ्यांनी त्याचे पालन करावे असे निर्देश असतात. परंतु कर्नाटक मधील एका कॉलेजात काही विद्यार्थिनींनी आम्हाला हिजाब घालून वर्गात बसण्याची मागणी केली, त्यांची मागणी नामंजूर करताच याला काहींनी धार्मिक वळण देत दोन समाजात तेढ निर्माण होईल अशाप्रकारे हे प्रकरण उचलून धरले. तसेच त्यावरून प्रचंड गदारोळ माजवण्यात आला, त्याला प्रत्युत्तर म्हणून हिंदुत्ववादी विद्यार्थ्यांनी भगवे उपरणे घालून कॉलेजमध्ये विरोध दर्शवला, परंतु सामाजिक एकोप्यास बाधा आणण्याच्या दुष्ट हेतूने, सदर प्रकरण चुकीच्या पद्धतीने सोशल मीडिया व इतर माध्यमातून प्रसारित केले. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातही अनेक शहरांमध्ये या प्रकाराला धार्मिकतेचा रंग देण्याचा प्रयत्न झाला .काही शहरामध्ये पहिले हिजाब फिर किताब अशा प्रकारचे बॅनर बाजी केली गेली .तर काही ठिकाणी ,  मोर्चे काढले गेले  वास्तविक पाहता हे प्रकरण कर्नाटक राज्यातल्या एका कॉलेज पुरते मर्यादित होते, परंतु त्यास देशव्यापी प्रश्न बनवले गेले. अशा देशद्रोही प्रवृत्तींना वेळीच रोखण्याची गरज आहे. नाही तर उद्या शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये धार्मिक वाद वाढीस लागतील. सर्वसाधारणपणे शैक्षणिक संस्थांमध्ये सर्व विद्यार्थी शिक्षणासाठी येतात तिथे कुठल्याही जातीत व धर्मात भेदभाव केला जात नाही,अशा घटनामुळे भविष्यात शैक्षणिक सह इतर क्षेत्रात सुद्धा याचे विपरित परिणाम दिसून येतील, त्यामुळे आमची प्रशासनास या निवेदनाद्वारे विनंती करण्यात येत आहे की कर्नाटक प्रमाणे महाराष्ट्रात व देशात हा वाद विकोपास जाऊ नये यासाठी शासनाने व प्रशासनाने योग्य असा निर्णय घेऊन, त्याची त्वरित सक्तीची अंमलबजावणी करावी. 

  शासनाने ठरवून दिलेल्या गणवेशाचा देखील  वापर होतो की नाही याचीही  सखोल चौकशी करावी. शासनाचे अनुदान घेऊन देखील विद्यार्थ्यांना गणवेश  देत नसेल तर अशा मदरसा, शाळा महाविद्यालयांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच यापुढे शाळा व कॉलेजमध्ये मुस्लीम युवती हिजाब घालून आले तर हिंदू युवती देखील हिंदू धर्मातील पोशाख परिधान करुन येतील व बौद्ध, ख्रिश्‍नच देखील आपल्या धर्माच्या पारंपारिक पोशाखात महाविद्यालयामध्ये येतील. अशा पद्धतीने जर सुरु झाले तर पुढील काळामध्ये शाळा व कॉलेजमध्ये नमाज अदा करणे, हिंदू धर्मा प्रमाणे प्रार्थना करणे अशा प्रथा सुरु होतील. परंतु अशा या घटना होऊ नये यासाठी शासनाने कठोर पावले उचलावीत म्हणून त्वरीत गुन्हे दाखल करुन कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे. जेणे करुन महाविद्यालयामध्ये धार्मिक तेढ निर्माण होणार नाही व यांच्या समर्थनार्थ आंदोलन, मोर्चे काढणार्‍या पक्ष, संघटनांच्या लोकांवर देखील कारवाई करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी ओबीसी सेल राज्य उपाध्यक्ष प्रकाश चित्ते, विश्‍व हिंदु परिषदचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप शिरसाठ, हिंदू एकता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुदर्शन अण्णा शितोळे, मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष, रुपेश हरकल, बीजेपी जिल्हा उपाध्यक्ष गणेश राठी, शहराध्यक्ष मारुती बिंगले, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, आरएसएसचे देविदास चव्हाण, विजय ढोले, शिवसेना युवा सेनेचे शहर प्रमुख निखिल पवार, शिवप्रतिष्ठानचे  प्रविण पैठणकर, सौ. पुष्पलता हरदास बीजेपी महिला आघाडी ओबीसीसेल (जिल्हाध्यक्ष) यांनी सदर घटनेचा निषेध करुन मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी  शिवप्रहारचे चंंद्रकांत आगे, श्रीराम सेवा संघाचे कुणाल करंडे, बंडूकुमार शिंदे, मनसे विधान सभा अध्यक्ष संतोष डहाळे, तालुकाध्यक्ष गणेश दिवसे, शहराध्यक्ष निलेश लांबोळे, विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष विशाल शिरसाठ विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष समर्थ सोनार, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष अक्षय सुर्यवंशी, तालुका उपाध्यक्ष संतोष भालेराव, बाळासाहेब हरदास ,रोहित भोसले, विकास डेंगळे, योगेश ओझा, लखन उपाध्ये (तालुका उपाध्यक्ष) आध्यात्मिक आघाडीचे शहर प्रमुख रुद्रप्रताप कुलकर्णी,  निलेश गिते, रविराज बेलदार, पंकज करमासे, प्रविण फरगडे, लखन माखिजा, सुरज यादव, मंगेश छतवाणी, आदेश मोरे, नितीन ललवाणी, प्रसाद कांबळे, किशोर वडितके, रमेश घुले, प्रविण शिंदे, विशाल अंभोरे, विजय आखाडे आदी हिंदुत्वादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget