बेलापुर (प्रतिनिधी )-तालुक्यात सर्वात मोठी सेवा संस्था असणाऱ्या बेलापुर विविध कार्यकारी सेवा संस्थेची निवडणूक दिनांक ६ मार्च रोजी होत असुन काल झालेल्या छानणीत दहा जणाचे अर्ज फेटाळण्यात आले असुन १३ जागेकरीता ८८ उमेदवार निवडणूक रिंगणात असुन दिनांक २४फेब्रुवारी रोजी अर्ज माघार घेण्याची मुदत आहे. त्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे बेलापुर सेवा संस्थेची निवडणूक दिनांक ६ मार्च रोजी होत असुन तेरा जागेकरीता एकुण ९९ जणांनी अर्ज दाखल केले होते त्यातील दहा उमेद़्वारांचे उमेद़्वारी अर्ज अवैध ठरविण्यात आले असुन त्या सर्वांना निवडणूक निर्णय अधिकारी एस पी रुद्राक्ष यांनी लेखी आदेश दिलेले आहेत त्यात बोंबले संजय दादा ,मेहेत्रे शाम रामभाऊ , लबडे अशोक सहादु , कुऱ्हे रावसाहेब नामदेव , नवले नितिन मोहन , लबडे विलास रामभाऊ , शेलार संजय छबु , अमोलीक बाबासाहेब सखाराम , बंगाळ भास्कर तुकाराम , खंडागळे देविदास नामदेव या दहा जणांचे उमेद़्वारी अर्ज फेटाळण्यात आले आहेत.तशा नोटीसाही संबधीतांना बजावण्यात आलेल्या आहेत .जिल्हा परिषद सदस्य शरद नवले व उपसरपंच आभिषेक खंडागळे यांचा एक पँनल तर बाजार समितीचे संचालक सुधीर नवले काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड यांचा दुसरा पँनल तर प्रकाश मेहेत्रे यांचा तिसरा पँनल राहण्याची दाट शक्यता आहे
Post a Comment