अहमदनगर जिल्ह्यातील उंबरी बाळापूर येथील सौ सुनीता संपत शिंदे यांनी बनविलेला "जिंदगानी "हा मराठी चित्रपट दिनांक ११ फेब्रुवारी पासुन सर्व सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे त्या निमित्ताने त्यांच्याशी केलेली बातचित उडत्या पाखरांना परतीची सिमा नसावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी, घरट्यांच काय केव्हाही बाांधता येईल,क्षितीजापलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी..असा आत्मविश्वास बाळगणाऱ्या सौ.सुनिता संपत शिंदे एम.ए,बी.एड,पीएच.डी रा.उांबरी बाळापूर,ता.संगमनेर,जिल्हा अहमदनगर यांनी कठोर परिश्रम घेवुन जिंदगानी या चित्रपटाची निर्मिती केली आहे त्यांचे पती पोलीस दलात पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत त्या म्हणतात की मानवाने एकदा ध्येय ठरवल की तो ते साध्य करतोच.कारण ध्येयाकडे गुरूत्वाकर्षणाची शक्ती आहे.ध्येय वेडी व्यक्ती त्या शक्तीकडे नकळत पणे ओढली जाते... असे स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे .मी त्यांच्या विचाराने प्रभावीत झाले एकदा आपण ध्येय ठरविले की त्याला प्रयत्नाची जोड दिल्यास यशापासून आपल्याला कुणीही दुर ठेवू शकत नाही जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही त्या करीता हवी फक्त जिद्द आणी चिकाटी .म्हणजे तुम्ही हव्या त्या सर्व गोष्टी मिळवू शकता. म्हणतात ना एका यशस्वी पुरूषा मागे एक स्री असते,पण माझ्या बाबतीत याच्या उलटेच घडले,जसे महात्मा ज्योतीबा फुलेंनी आपली पत्नी सावीत्रीला घडविले तसेच माझ्या बाबतीतही मला माझ्या पतीने जे पोलीस दलात सेवा करत आहेत त्यांनी भक्कम साथ दिली.माझ्या कामाचे सर्व श्रेय मी त्यांनाच देते.त्यांनी साथ दिली नसती तर मी आहे तीच राहीले असते.मला लहानपणापासून चित्रपट संगीत याची आवड होती . पी एच.डी पुर्ण केल्यानंतर नातेवाईक म्हणायचे तु नोकरी का करत नाही.परांतू माझ्यावरील असलेली कुटुंबाची जबाबदारी माझ्या पती असलेली नोकरी त्यामुळे असे वाटायचे की मी जर नोकरी केली तर कुटुंबाला न्याय देवु शकणार नाही म्हणून मी नोकरी ऐवजी काहीतरी व्यवसाय करावा यादृष्टीने विचार सुरु केला यामधे बरेच दिवस ब्युटीपार्लर केले.त्यानांतर एस.टी.महामंडळात पार्सल सुविधेचे काम केले .शेतीमधे अनेक नवनवीन प्रयोग करीत असतानी फळबागा लावल्या.त्यातुन चांगले उत्पनही मिळाले .पण तरीही मन सतत नवीन करण्याकडे असायचे काहीतरी मोठा व्यवसाय करण्याची इच्छा होती. त्यात कोणता व्यवसाय करावा. लहानपणा पासून सिनेमाची आवड होतीच आणी त्यातच आमचे कौटुंबिक मित्र विनायकजी साळवे हे कधी कधी आमच्या घरी येत असत .आल्यानांतर गप्पा करत असताने ते सतत त्यांनी लिहीलेल्या कथा सांगायचे
या कथांवर सिनेमा करायचा आहे पण कुणी प्रोड्यूसर मिळत नाही.असेही ते म्हणायचे ते कथा सांगायचे त्यावेळी त्यांची एक कथा फार आवडायची त्या कथेमधील निसर्ग आणी मानव यांच असलेल नात मनाला स्पर्शून जात असे. मग मी माझ्या पतीला सांगीतले मला की मला सिनेमा काढावयाचा आहे त्यावर ते म्हणाले की हे आपले काम नाही ही चित्रपट नगरी फार वेगळी आहे तुला जमेल का पण तो पर्यंत माझ्या मनाने पक्का निश्चय केलेला होता ,मी हे करू शकते आपण हा प्रोजेक्ट करू या. त्यांनी हो सांगीतल्यावर खर्या कामाला सुरूवात झाली.सुरूवातीला कथेसाठी लागणारी कलाकार मांडळी शोधण्यासाठी जाहीरात दिली नंतर सर्व कलाकारांची निवड केली कथेच्या मागणी नुसार आम्हाला प्रमुख भुमिकेसाठी लागणारा चेहरा मिळत नव्हता शेवटी माझ्या मुलीची स्क्रिन टेस्ट घेण्यात आली.त्यात ती योग्य वाटली.तीला लहानपणा पासून अँस्क्टांग व डान्सची आवड आहे. एम.एस्सीचा अभ्यास तसेच यू.पी.एस.सी ची चालू असलेली तयारी यामुळे काय कराव काय नाही अशा दिधा मनस्धथतीत शेवटी मुलीने होकार दिला मग शुटींगसाठी योग्य ठिकाणांचा शोध सुरु झाला नाशिक मधील त्रिंबकेश्वर येथील निसर्गरम्य वातावरणात शुटींगला सुरुवात झाली ,शुटींग दरम्यान अनेक अडचणी आल्या त्या सोडवत गेलो काही कठीण प्रसंगाचाही सामना केला .अन जिंदगांनी हा चित्रपट तयार झाला आज तो आपल्या भेटीला येत आहे पर्यावरण व मानव यातील नाते काय असते ते या चित्रपटात दाखविण्याचा प्रयत्न केला आपल्या परिवारासमवेत पहावा असा हा चित्रपट असुन आपल्या लाडक्या नगरच्या कन्येचा हा पहीलाच चित्रपट आहे. आपल्या भेटीला हा सिनेमा 11 फेब्रुवारी 2022 ला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.आपणा सवाांना नम्र दवनांती आहे की आपण कुटुंबासह हा सिनेमा थिएटर मध्ये जाऊनचां बघावा.असे आवाहनही सौ सुनिता शिंदे यांनी केले आहे.
Post a Comment