बेलापुर (प्रतिनिधी )- बेलापुर ग्रामपंचायतीच्या स्थापनेस शंभर वर्ष पुर्ण होत असुन सर्वांच्या सहकार्याने शतक महोत्सवी वर्ष साजरे करताना गावाचा चेहरा मोहरा बदलण्याचा आपला मानस असल्याचे मत जि प सदस्य शरद नवले यांनी व्यक्त केले . बेलापुर कुऱ्हे वस्ती रोडवरील पाटील मळा कुऱ्हे वस्ती कापसे वस्ती या रस्त्याच्या १२ लाख रुपये खर्चाच्या कामाचा शुभारंभ करताना ते बोलत होते या वेळी सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे अशोक कारखान्याचे माजी व्हा चेअरमन जालींदर कुऱ्हे सुरेश कुऱ्हे मा.उपसभापती दत्ता कुऱ्हे प्रफुल्ल डावरे तंटामूक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे सदस्य चंद्रकांत नवले मुस्ताक शेख रमेश अमोलीक सौ प्रियंका कुऱ्हे आदि मान्यवर उपस्थित होते या वेळी बोलताना जि प सदस्य शरद नवले म्हणाले की एक कोटी रुपयांचा घनकचरा प्रकल्प मंजुर करण्यात आला असुन गाव व वाड्यावस्त्यावरील पिण्याच्या पाण्याकरीता १२ कोटी निधी मंजुर करण्यात आला असुन जागेअभावी ही योजना दुसऱ्या टप्प्यात गेली आहे .स्मशानभूमी सुशोभिकरणासाठी १५ लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. कुऱ्हे वस्तीवरील या रस्त्याच्या कामास १२ लाख रुपये गायकवाड वस्ती ते सुभाषवाडी या रस्त्याच्या कमास १५ लाख रुपये तर सुभाषवाडी ते ऐनतपुर या रस्त्याच्या कामासाठी २० लाख रुपये मंजुर करण्यात आले आहे जाँगींग ट्रँकसाठी ५० लाख रुपये निधी मंजुर करण्यात आला आहे मागासवर्गीयासाठी पिण्याच्या पाण्यासाठी आर ओ ची व्यवस्था करण्यात आली आहे. असेही ते म्हणाले. या वेळी सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनीही मनोगत व्यक्त केले . या वेळी विलास कुऱ्हे, संजय गोरे, पत्रकार देविदास देसाई ,दिलीप दायमा, भाऊसाहेब कुताळ ,भास्कर बंगाळ, शरद देशपांडे, गोरक्षनाथ कुऱ्हे, मधुकर अनाप, गोविंद शिरसाठ ,अजिज शेख, सुभाष कुऱ्हे, शशिकांत कापसे, सोमनाथ शिरसाठ ,महेश कुऱ्हे, विशाल आंबेकर, आमोल गाढे ,अमोल पाडांगळे, सौ कांता साळूंके, सौ मिरा नीर्मळ, सौस्वाती कुऱ्हे, वैशाली कुऱ्हे, कोमल कुऱ्हे, पुष्पा कुऱ्हे, अश्विनी कुऱ्हे आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.
Post a Comment