Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी  )-राजुरी जवळ विजेच्या तारा तुटल्यामुळे खंडीत झालेला विज पुरवठा सुरळीत करत असताना दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले असुन दैव बलवत्त म्हणून दोघेही कर्मचारी थोडक्यात वाचले. बेलापुरला विज पुरवठा करणाऱ्या विजेच्या तारा राजुरी ममदापुर येथे तुटल्यामुळे बेलापुरगाव व परिसराचा विज पुरवठा खंडीत झाला होता बेलापुर महावितरणचे उपअभियंता मिलींद दुधे महावितरणचे चेतन जाधवा मधुकर औचिते स्वप्निल पाटील रविंद्र रौंदळ संदीप वायदंडे गणेश थोरात भोकरे पवार मनवर हे सर्व जण राजुरी येथे शेतात तुटलेल्या तारा ओढण्याचे काम करत होते चेतन जाधवा व अनिल दौंड हे अकरा मिटर उंच असलेल्या पोलवर बसुन तारा जोडण्याचे काम करत असतानाच त्यातील एक क्रॉस आर्म तुटल्याने शेजारी चेतन जाधव व अनिल दौंड यांनी प्रसंगावधान राखल्याने किरकोळ जखमी झाले. चेतन जाधव यांच्या बोटाला जखम झालेली आहे तर अनिल दौंड यांच्या तोंडाला जखम झालेली आहे उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने खाली उतरविले व प्राथमिक उपचार केले .या ही परिस्थितीत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी काम करुन रात्री दोन वाजता विज पुरवठा सुरळीत केला .आपला जिव धोक्यात घालुन हे कर्मचारी आपल्याला विज देण्याचे काम करत असतात ते उंच पोलवर चढुन विज पुरवठा सुरळीत करण्याचे काम करत असताना आपण वेळोवेळी लाईट केव्हा येईल हे विचारण्यासाठी केलेल्या फोनमुळे त्यांच्या कामात किती व्यत्यय येत असेल याची कल्पनाच केलेली बरी असाच अनुभव काल महावितरणच्या कर्मचाऱ्यांना आला.

श्रीरामपुर प्रतिनिधी - नेवाशातील एका पोलीसाच्या आँडीओ क्लिपमुळे एक वरीष्ठ अधिकारी अडचणीत आला होता त्यामुळे जिल्ह्यात पोलीस वर्तूळात चांगलीच खळबळ उडाली होती. त्यानंतर पुण्यातील एका पोलीस अधिकाऱ्यांच्या आँडीओ क्लिपमुळे नागरीकात वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या होत्या त्या चर्चांना पुर्णविराम मिळत नाही तोच श्रीरामपुरातील शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी सहा सात महिन्यात चार पोलिसांनवर अँटीकरप्शनचा ट्रॅप झाला आहे कालच दोन कॉन्स्टेबल ट्रॅप झाले होते तर आज हि पोलीसांचीही अवैध धंद्यावाल्याकडून वसुली बाबत झालेली हमरा तुमरी शिवीगाळ तसेच त्या प्रकरणात संबधीत अधिकाऱ्यांने वसुली बाबत दिलेला सल्ला काय आहे हे बिनधास्त न्युजच्या हाती लागले असुन बिनधास्त न्यूजच्या चाहत्यासाठी ते आहे तसेच प्रसारीत करत आहोत आणखीही बरीच वसुली प्रकरणे बिनधास्त न्यूजच्या हाती लागली आहे त्या बाबत वेळोवेळी खूलासा केला जाईल.


बेलापुर (प्रतिनिधी  )- अशोक सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी कारखान्याचे सूञधार माजी आ.भानुदास मुरकुटे यांची तर श्री.भाऊसाहेब उंडे यांची व्हा.चेअरमन पदावर एकमताने निवड झाली. अशोक कारखान्याचे चेअरमन व व्हा.चेअरमन पदाच्या निवडीसाठी निवडणूक अधिकारी श्री.गणेश पुरी यांचे अध्यक्षतेखाली व सहाय्यक निवडणुक अधिकारी श्री.एस.पी.कांदळकर यांचे उपस्थितीत नव निर्वाचित संचालक मंडळाची बैठक झाली. त्यात  कारखान्याचे सूञधार माजी आ.भानुदास मुरकुटे यांची पाच वर्षासाठी चेअरमन पदावर तर श्री.भाऊसाहेब उंडे

यांची एक वर्षासाठी व्हा.चेअरमन पदासाठी एकमताने निवड झाली. श्री.मुरकुटे यांनी यापूर्वी दोन वेळा दहा वर्षे चेअरमनपदाची धुरा सांभाळलेली आहे. आता त्यांची तिस-यांदा चेअरमन पदासाठी निवड झाली आहे. बैठकीस संचालक मंडळाचे सदस्य रावसाहेब थोरात, कोंडीराम उंडे, सोपानराव राऊत, हिम्मतराव धुमाळ, बाबासाहेब आदिक, आदिनाथ झुराळे, पुंजाहरी शिंदे, ज्ञानदेव पटारे, विरेश गलांडे, शितल गवारे, हिराबाई साळुंके, ज्ञानेश्वर काळे, प्रफुल्ल दांगट, यशवंत बनकर, रामभाऊ कसार, यशवंत रणनवरे, अमोल कोकणे, योगेश विटनोर, ज्ञानेश्वर शिंदे उपस्थित होते.            सदर प्रसंगी माजी आ.भाऊसाहेब कांबळे, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, साई संस्थानचे विश्वस्त  सचिन गुजर, माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे, संजय फंड, श्रीनिवास बिहाणी, दिलिप नागरे, बाबासाहेब दिघे, सुरेश गलांडे, संजय छल्लारे, सुभाष पटारे, शिवसेनेचे सचिन बडधे, लाल पटेल, मुजफ्फर शेख, मुन्नाभाई पठाण, ज्ञानदेव साळुके, अच्युतराव बनकर, बाबासाहेब ढोकचौळे, एकनाथ लेलकर, अंबादास आदिक, भाऊसाहेब कहांडळ, दिगंबर शिंदे, दिगंबर तुवर, दत्ताञय नाईक, अ‍ॅड्.डी.आर.पटारे, माजी नगरसेविका सौ.मंजुश्री मुरकुटे, प्रा.सौ.सुनिताताई गायकवाड, सौ.शालिनी कोलते, शिवाजी पवार, गोकुळ औताडे, दिगंबर नांदे, दशरथ पिसे, रणजीत बनकर, भागवतराव पटारे, हनुमंतराव वाकचौरे, भागवतराव पवार, भास्करराव मुरकुटे, कचरु औताडे, सखाराम कांगुणे, दिगंबर बारस्कर, अण्णासाहेब चौधरी, कचरु वाकचौरे, मच्छिंद्र भवार, रामदास पटारे, रामदास विधाटे, आबासाहेब गवारे, सुमन नाईक, चंदा जाधव, स्वाती गवारे, संगीता गवारे, संगीता खंडीझोड, अर्चना रणनवरे, सुनंदा जाधव, अर्चना पवार, अश्विनी यादव, प्रियंका गवारे, नीरज मुरकुटे, चंद्रभान पवार आदींसह कार्यकारी संचालक संतोष देवकर, कार्यालयीन अधिक्षक आप्पासाहेब दुशिंग उपस्थित होते. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष केला.

अहमदनगर प्रतिनिधीअहमदनगर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी  मोटरसायकली चोरणार्या एका टोळीला अहमदनगर जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेच्या विशेष पथकाने शोधण्यास यश मिळवले असून या टोळीतील दोन आरोपींना ताब्यात घेऊन पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेललले आहे.

या दोन आरोपींकडून आतापर्यंत नगर आणि पुणे जिल्ह्यात चोरलेल्या दहा मोटरसायकली जप्त केलेले असून या जप्त केलेल्या मोटर सायकलची किंमत सात लाख 87 हजार इतकी आहे.याबाबत अधिक हकीकत अशी की पाथर्डी येथील रहिवासी अशोक जाधव यांची मोटरसायकल 23 जानेवारी रोजी घरासमोरून चोरीस गेली होती. याबाबत त्यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती.एकंदरीतच नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोटर सायकल चोरीचे प्रमाण वाढत असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी एक स्वतंत्र पथक नेमून पाथर्डीतील मोटरसायकल चोरी तसेच जिल्ह्यात होत असलेल्या मोटरसायकल चोरीबाबत तपास करण्याचे आदेश दिले होते. या पथकाने याबाबत तपास सुरू केलेला असतानाच पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पथकाने नगर तालुक्यातील बहिरवाडी, जेऊर येथील सागर सुदाम जाधव याला ताब्यात घेतले सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्याला विश्वासात घेतल्यानंतर त्याने पाथर्डी येथील मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली. या गुन्ह्यामध्ये अजून त्याच्या सोबत कोण आहे याची माहिती त्याकडून मिळाली असता या टोळीमध्ये महेश उर्फ सुनील बाबासाहेब दारकुंडे, राहणार बहिरवाडी जेऊर तालुका नगर आणि गौतम पाटील अशी नावे सांगितली. यातील महेश उर्फ सुनील बाबासाहेब दारकुंडे याला ताब्यात घेण्यात आले मात्र तिसरा आरोपी हा फरार आहे.

यातील ताब्यात असलेल्या दोन्ही आरोपींना गुन्हे अन्वेषण शाखेने पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले असून पुढील तपास पाथर्डी पोलिस करत आहे. या टोळीतील तीनही आरोपींवर नगर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर, शिरूर, रांजणगाव या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. ही टोळी सराईत असून मोटरसायकल चोरी प्रकरणात त्यांच्यावर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.या गुन्ह्याची उकल करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ आगरवाल, पोलिस उपाधीक्षक सुदर्शन मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेचे कर्मचारी सपोनि सोमनाथ दिवटे, पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप पवार, सुनील चव्हाण, दत्ता हिंगडे, मनोज गोसावी, संतोष लोंढे, शंकर चौधरी, रवीकिरण सोनटक्के, देवेंद्र शेलार, लक्ष्मण खोकले, योगेश सातपुते, सागर ससाणे, विनोद मासाळकर, मेघराज कोल्हे, उमाकांत गावडे यांनी यशस्वी कामगिरी केली.



नाशिक प्रतिनिधी - नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आज (दि २६) सुरगाणा तालुक्यातील बोरगाव ते सुरगाणा रस्त्यावर चीराई स्टॉप  त्रिफुलीजवळच्या नागशिवडी शिवारात छापा टाकला. यादरम्यान, अवैधरित्या घातक अग्निशस्त्र बाळगणाऱ्या संशयितांना ताब्यात घेतले.या कारवाईत अंकेश सुरेश एखंडे, वय-२९ वर्षे, रा-गोडंब, सुरगाणा, श्यामराव नामदेव पवार, वय-२४ वर्षे, रा-वांजुरपाडा, सुरगाणा, आकाश सुनिल भगरे, वय २२ वर्षे, रा. सुरगाणा यांच्या ताब्यातून ०३ देशी बनावटीचे पिस्टल (गावठी कट्टे) व ०३ जिवंत काडतुसे तसेच ०१ एअर गण, ०१ चॉपर, ०१ कोयता, ०६ मोबाईल व ०१ टोयाटो कोरोला वाहन असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सपोनि रामेश्वर मोताळे, सहापोउपनि नाना शिरोळे, पोहवा गोरक्षनाथ सवंत्सकर, पोहवा किशोर खराटे, पोहवा प्रविण सानप, पोना विश्वनाथ काकड यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

श्रीरामपूर प्रतिनिधी - श्रीरामपूर नगरपालिकेत वारसा हक्काने माझ्या मुलास नोकरी मिळावी, या मागणीसाठी तारा रमेश बागडे या महिलेने नगरपालिका कार्यालयासमोर सोमवार दि. 24 जानेवारी 2022 पासून अमरण उपोषण सुरु केले असून काल दुसर्‍या दिवशीही कडाक्याच्या थंडीत महिलेचे उपोषण सुरुच होते.नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना बागडे यांनी यापुर्वीच निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, वारसा हक्काने माझ्या मुलास सेवेत रुजू करुन घेणेकामी आपण नगरपालिका प्रशासनाला वेळोवेळी अर्ज सादर केलेले आहेत. सदरचे प्रकरण न्यायप्रविष्ट असून तुमचा विचार करता येत नाही, असे नगरपालिका प्रशासन नेहमी व वारंवार एकच उत्तर देत आहे. सदरचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आपण या अगोदर नगरपालिकेमध्ये अनेक लोक अवॉर्डमधील वारसाहक्काने घेतलेले आहेत. त्यांच्यासाठी वेगळा कायदा आहे का? त्यांच्यासाठी सदरचे प्रकरण न्यायप्रविष्ट नाही का? याचा खुलासा करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.उपोषणाचा कालचा दुसरा दिवस होता. काल सायंकाळपर्यंत प्रशासनातील कोणीच उपोषणस्थळी भेट न दिल्याने आपल्या न्याय्य हक्कासाठी सुरु केलेले उपोषण यापुढेही सुरुच ठेवणार असल्याचे तारा बागडे यांनी म्हटले आहे.

कोपरगाव प्रतिनिधी - प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रायलय दरवर्षी पोलिसांच्या शौर्यासाठी 'पोलीस पदक' जाहीर करते. यामध्ये यंदा जिल्ह्यातील तिघांना 'पोलीस पदक' जाहीर झाले आहेत.कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक भरत चितांमण नागरे यांना 'पोलीस शौर्य पदक' तर नागरी हक्क संरक्षण विभाग (पीसीआर), अहमदनगर येथे कार्यरत असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय एकनाथ तिजोरे व अल्ताफ मोहिउद्दीन शेख यांना 'पोलीस पदक' जाहीर झाले आहे.पोलीस पदकाची मंगळवारी घोषणा झाली. यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील ५१ पोलिसांना हे पदक जाहीर झाले आहे. जिल्ह्यातील तिघांचा यामध्ये समावेश आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षक तिजोरे यांनी ३३ वर्षे सेवा केली आहे. राज्यभर गाजलेल्या कोठेवाडी (ता. पाथर्डी) दरोडा प्रकरणाविषयी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित झाला होता. याचे उत्तरे तिजोरे यांनी व्यवस्थीत पाठविली. त्यांनी लाचलुचपत विभागात काम करताना अनेक केसेस हाताळल्या. खर्डा (ता. जामखेड) हत्याकांड प्रकरणात वरिष्ठांना वेळेवर अहवाल सादर करण्याबरोबरच अहमदनगर शहरातील मोहरम, गणपती बंदोबस्ताच्या नियोजनात तिजोरे यांनी महत्वाची भूमिका बजावली.सहायक पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ शेख यांनी प्रकाश कांडेकर खून प्रकरणी आरोपी पकडणे, तपासात मदत करणे, सराईत गुन्हेगार पाप्या शेख याच्यावरील मोक्का प्रस्ताव तयार करणे, पोलीस अधीक्षक कृष्णा प्रकाश यांच्या कार्यकाळात १२ टोळ्यातील ६२ गुन्हेगार हद्दपार करण्यास मदत करणे याशिवाय गावठी कट्टे, काडतुसे, आरोपी अटक, मुद्देमाल हस्तगत करणे आदी प्रकरणात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. पोलिस उपनिरीक्षक भरत नागरे हे पोलिस मदत केंद्र, कोटमे, ता. येतापल्ली, जि. गडचिरोली. येथे प्रभारी अधिकारी असताना वरीष्ठाची परवानगीने त्यांनी २५ मार्च २०१८ रोजी नक्षली अभियान राबविले. यावेळी नक्षलीसोबत चकमक झाली. नक्षल्यांनी जोरदार फारींग केली.ऑपरेशनदरम्यान नागरे यांच्या टिमने नक्षलवाद्यानी लावलेले पाच क्लेमर बॉम्ब डिसपॉज केले. एक महिला नक्षलवाद्याची डेडबॉडी हस्तगत केली. या अभियानादरम्यान ब्लास्टिंगचे साहित्य, जिवंत क्लेमर बॉम्ब, थ्री बाय थ्री वेपन आदीसह मोठा शस्त्र साठा जप्त करण्यात आला होता. विषेश म्हणजे या ऑपरेशनदरम्यान पोलिस पथकातील एकही कर्मचारी जखमी झाला नव्हता. या कामगिरीची दखल घेत पोलिस उपनिरीक्षक भारत नागरे यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झाले आहे. गडचिरोली येथे नक्षल्यासोबत झालेल्या चकमकीत नागरे यांनी केलेल्या विशेष कामगिरीबद्दल त्यांना हे पदक जाहीर झाले असून त्यांचे अहमदनगर जिल्हा पोलिस दलाकडून अभिनंदन होत आहे.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget