Latest Post

मुंबई - कोरोना रुग्णसंख्येच्या वाढत्या आलेखाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आज मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने अनेक निर्बंधासह नवी नियमावली जारी केली आहे. हे सर्व निर्बंध उद्या मध्यरात्रीपासून (10 जानेवारी) लागू असणार आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अखेर नाईट कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला आहे. रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात नाईट कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे.यामध्ये राज्यातील स्विमिंग पूल, स्पा आणि जीम पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. आहे. चित्रपटगृह रात्री 10 पर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत. तसेच, नाईट कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. काय आहेत निर्बंध? मध्य रात्रीपासून राज्यात कडक निर्बंध रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत कर्फ्यू मैदाने, उद्याने पर्यटन स्थळ राहणार बंद शाळा कॉलेज 15 फेब्रुवारीपर्यंत बंद थिएटर 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार सलून आणि खासगी कार्यलय 50 टक्के क्षमतेने सुरु पूर्ण लसीकरण झालेल्यांना सार्वजनिक बसने वाहतूक करण्यास मुभा हॉटेल रेस्टॉरंट फक्त रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्यास मुभा स्विमिंग पूल, स्पा, व्यायामशाळा पूर्णपणे बंद.


श्रीरामपूर प्रतिनिधी-श्रीरामपूर ते वाकडी जाणारे रोडवर यशवंतबाबा चौकी जवळ, खंडाळा शिवारातून घरी जात असलेल्या इसमास त्याची मोटारसायकल, रोख रक्कम असा ऐवज घेवून पोबारा करणार्‍या दोघा चोरट्यांना श्रीरामपूर शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून मोबाईल, मोटारसायकल व रोख रक्कम 37 हजार 500 रुपये हस्तगत केले आहेत.कोपरगाव तालुक्यातील दोदेवाडी येथील नानासाहेब लक्ष्मण नेहे व त्यांचे चुलत भाऊ ज्ञानदेव राघुजी नेहे हे दोघे त्यांचे मोटार सायकलवरुन श्रीरामपूर ते वाकडी जाणारे रोडवर यशवंत बाबा चौकी जवळ, खंडाळा शिवारातून घरी जात असतांना त्यांच्या पाठीमागून पल्सर मोटार सायकलवरुन तीन इसम आले व त्यांनी त्यांचे मोटार सायकलला गाडी आडवी लावून चाकूचा धाक दाखवून त्यांचे जवळील दोन मोबाईल, रोख रक्कम व मोटारसायकल जबरीने ओढुन चोरुन नेली. याप्रकरणी श्रीरामपुर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.याप्रकरणी तपासाची गती पोलिसांनी वाढविली असता सदरचा गुन्हा श्रीरामपूर मधील विशाल भारत बोरुडे रा. वॉर्ड नं. 3 नॉर्दन बॅच श्रीरामपूर व खंड्या उर्फ विजय राजेंद्र वाकोडे रा. वार्ड नं.3 बाजारतळ श्रीरामपूर यांनी केल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय सानप यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक संजय सानप स्वतः व डी. बी.पथकाचे पोलीस नाईक रघुवीर कारखेले, पंकज गोसावी, राहुल नरवडे, पोलीस कॉन्स्टेबल गौतम लगड, पोलीस कॉन्स्टेबल रमिज आत्तार 7 जानेवारी 2022 रोजी 17.30 वा. सुमारास बाजारतळ वार्ड नं.3 श्रीरामपूर येथून गुन्ह्यातील चोरीस गेलेला होन्डा शाईन कंपनीची मोटार सायकल, दोन मोबाईल व रोख रक्कम 37 हजार 500 रुपये अशा मुद्देमालासह ताब्यात घेवून त्यांना अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे हे करित आहेत.


बेलापुर  (प्रतिनिधी  )-श्रीरामपुर तालुक्यात ७०% लसीकरण पुर्ण झाले असुन उर्वरीत नागरीकांनी लसीकरण करुन घ्यावे लसीकरण न करणाऱ्या नागरीकावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहीती प्रांताधिकारी अनिल पवार यांनी दिली आहे                                                बेलापुर ऐनतपुर येथे केवळ ६०% लसीकरण झाले असुन माझे गाव शंभर टक्के लसीकरण ही योजना बेलापुर गावात राबविण्याचा निर्णय जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी घेतला असुन या मोहीमेंतर्गत जामा मस्जिद बेलापुर येथे लसीकरण मोहीम राबविण्यात आली त्या वेळी बोलताना प्रांताधिकारी अनिल पवार म्हणाले की ज्या नागरीकांनी अजुनही लस घेतली नाही त्यांनी तातडीने लस घ्यावी सर्व व्यापारी बांधवांनी लस घ्यावी तसेच लस घेतल्याचे प्रमाणपत्र दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे तसेच व्यापारी बांधवानी आपल्या दुकानात आलेल्या ग्राहकाने लस घेतली की नाही याची खातरजमा करावी विना लस घेणाऱ्या ग्राहाकावर देखील दंडात्मक कारवाई केली जाणार असुन सर्व नागरीकांनी लसीकरण करुन घ्यावे कोरोनाचे सर्व नियम पाळा मास्कचा वापर करा शासकीय नियमाचे, निर्बंधाचे पालन करा कोरोनाचा फैलाव होवु नये यासाठी सर्वांनी खबरदारी घ्यावी असे अवाहनही प्रांताधिकारी पवार यांनी केले आहे .जि प सदस्य शरद नवले म्हणाले की माझे गाव शंभर टक्के लसीकरण ही मोहीम गावभर वाड्यावस्त्यावर राबविली जाणार असुन गाव शंभर टक्के लसीकरण करुन घेण्यासाठी गावपातळीवर विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे त्याचाच भाग म्हणून आज जामा मस्जिद येथे लसीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .या लसीकरणात १२० नागरीकांना लस देण्यात आली या वेळी तहसीलदार प्रशांत पाटील, सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे  , जेष्ठ पत्रकार देविदास देसाई, दिलीप दायमा, किशोर कदम,  मोहसीन सय्यद ,शफीक बागवान, मुश्ताक शेख, मुनीर बागवान, जीना शेख, रफीक शेख, सुलतान सय्यद ,बाबा सय्यद, सुरज बडे ,चेतन गांधी ,राजु श्रीगोड, अयाज सय्यद  , जब्बार अत्तार, मुश्ताक शेख ,शफ़ीक़ बागवान, अजिज शेख ,प्रभाकर ताके, आदिसह नागरीक उपस्थित होते लसीकरण मोहीम यशस्वीतेसाठी डाँक्टर देविदास चोखर डाँक्टर शंशाक जैन सिस्टर सुनिता गायकवाड  संगीता कसबे यांनी विशेष परिश्रम घेतले.



बेलापुर (देविदास देसाई   )-बेलापुर येथे घरात झालेला स्फोट हा गँस गळतीनेच झाला असल्याचा निष्कर्ष बाँम्ब शोधक व नाशक पथकाने काढला असुन गावात चाललेल्या वेगवेगळ्या वावड्यांना त्यामुळे पूर्णविराम मिळाला आहे अन ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला                      बेलापुर येथील शशिकांत शेलार यांच्या घरी सकाळी साडेसहा वाजता मोठा स्फोट झाला त्या स्फोटाने आजुबाजुचा परिसर दणाणून गेला शेलार यांच्या घरातील पत्र्याची छत पुर्णतः उडून गेली घरात लागलेल्या आगीत घरातील शंशिकात शेलार ज्योती शेलार त्यांचा मुलगा यश व मुलगी नमश्री गंभीर

जखमी झाले होते  त्यांना प्रथम साखर कामगार व नतंर प्रवरा नगर येथील हाँस्पीटलला हलविण्यात आले होते .त्यानंतर घटनास्थळी अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सानप यांनी भेट दिली होती  त्या नंतर ऐटीएस पथकानेही भेट देवुन पहणी केली त्या नंतर ऐ टी सी पथकानेही घटनास्थळाला भेट दिली व आसपासच्या नागरीकाकडे चर्चा केली  त्यांनतर बाँम्ब शोधक व नाशक पथक सायंकाळी चार वाजता आले सात जणांच्या पथकात जंजीरा नामक कुत्राही होता अधुनिक यंत्राच्या मदतीने सर्वत्र स्फोटक पदार्थाचा शोध घेण्यात आला तसेच जंजीरा कुत्र्यानेही सर्वत्र शोध घेतला परंतु आक्षेपार्ह किंवा संशयास्पद असे काहीच आढळले नाही. त्यामुळे हा स्फोट गँस गळतीमुळेच झाल्याच्या निष्कर्षापर्यंत सर्व जण पोहोचले आहे. दवाखान्यात उपचार घेत असलेल्या ज्योती शेलार यांनीही सांगीतले सकाळी गँस पेटविण्यासाठी लाईटरचे बटन दाबताच स्फोट झाला होता 

,त्यामुळे झालेला स्फोट हा गँस गळतीमुळेच झालेला असावा असा अंदाज आहे रात्री गँस शेगडीचे बटन चालू राहील्यामुळे गँस गळती होत राहीली व सकाळी लाईटरचे बटन दाबताच स्फोट झाला असल्याचे सर्वांचे मत झालेले आहे. बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे गणेश भिंगारदे निखील तमनर पोपट भोईटे हरिष पानसंबळ हे सकाळपासून सायंकाळ पर्यत घटनेच्या ठिकाणी तळ ठोकुन होते  अखेर दिवसभर सुरु असलेल्या वेगवेगळ्या चर्चेला पुर्णविराम मिळाला असुन हा स्फोट गँस गळतीमुळेच झाला असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.


बेलापुर  (प्रतिनिधी  )- घरात गँसचा अचानक स्फोट झाल्यामुळे चार जण भाजुन गंभीर जखमी झाले असुन त्यांचेवर प्रवरानगर येथील दवाखान्यात उपचार सुरु आहे. या स्फोटाबाबत परिसरात वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. या बाबत मिळालेली माहीती अशी की बेलापुर येथील जाम मस्जिदच्या पाठीमागे असणाऱ्या गाढे गल्लीतील शेलार यांच्या घरात सकाळी साडेसहा वाजता जोरदार स्फोट झाला या आवाजाने परिसर दणाणून गेला या ठिकाणी शशीकांत अशोक शेलार वय वर्ष 43 सौ

ज्योती अशोक शेलार  वय वर्ष 38 यश अशोक शेलार वय वर्ष 16 नमश्री अशोक शेलार वय वर्ष 8 हे चौघे जण कर्डीले यांचे खोलीत भाडेकरु म्हणून रहात होते शशीकांत शेलार याचा औषधाचा व्यवसाय आहे आज सकाळी साडे सहा वाजता सौ ज्योती अशोक शेलार यांनी शेगडी पेटविली असता भयानक स्फोट झाला हा स्फोट ईतका भयानक होता की  त्यांच्या घरावर असलेले पत्र्याचे छत दुर उडाले एक एक पत्रा सुटा होवुन दुर उडाला पत्र्यावर असलेल्या वरांड्या खाली कोसळल्या त्यामुळे नमश्री जखमी झाली तसेच आगीमुळे चौघेही जण होरपळले स्फोटाचा आवाज येताच आजुबाजुचे लोक मदतीला धावले जखमींना तातडीने साखर कामगार रुग्णालयात भरती केले त्या नंतर सर्व जखमींना पुढील उपचारासाठी प्रवरा मेडीकल ट्रस्ट येथे दाखल केले आहे जखमींची प्रकृती स्थिर आहे . घटनेची माहीती मिळताच अप्पर पोलीस अधिकारी दिपाली काळे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके पोलीस निरीक्षक संजय सानप बेलापुर पोलीस स्टेशनचा स्टाफ यांनी घटनास्थळास भेट दिली घटनेचे गांभिर्य

ओळखुन ए टी एस व ए टी सी पथकानेही घटनास्थळी भेट दिली कामगार तलाठी व मंडलाधिकारी यांनीही घटनास्थळी भेट दिली .तसेच दवाखान्यात जावुन जखमींची विचारपुस केली या घटनेबाबत नागरीकात उलट सुलट चर्चा चालू असुन गँस लिक असल्यामुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज असला तरी पोलीस सर्व शक्यता पडताळून पहात आहेत.


बेलापुर  (प्रतिनिधी  )- महाराष्ट्र ही संताची भूमी असुन समाजाच्या भल्यासाठी त्यांनी जो मार्ग दाखविला त्या मार्गाने जिवन व्यतीत केल्यास कुठलीही अडचण येणार नाही असा विश्वास ह.भ .प. बाळाराम रंधे महाराज यांनी व्यक्त केला             श्री संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त ह.भ.प.रंधे महाराज यांच्या किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या वेळी भाविकांना मार्गदर्शन करताना ह.भ.प.रंधे महाराज म्हणाले की तुम्ही उद्याची चिंता करु नका चिंता ही मनुष्याला चितेकडे घेवुन जाते आनंदी जिवन जगा भौतिक सुखाच्या मागे धावू नका संताची शिकवाण आचरणात आणा असेही ते म्हणाले किर्तनानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले प्रारंभी गावातुन संत जगनाडे महाराजाच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली बेलापूरच्या ध्वज स्तंभाजवळ मिरवणूक आल्यानंतर अनेक मान्यवरांनी संत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले मिरवणूकी नंतर ह भ प बाळाराम रंधे महाराज यांचे काल्याचे किर्तन संपन्न झाले या वेळी अशोक साळूंके  आसाराम जाधव, गोरखनाथ मगर ,सोमनाथ कर्पे जिल्हा उपाध्यक्ष लहानु नागले ,प्रभाकर जाधव भरत साळूंके  ,अँड .विजय साळूंके ,केशवराव जाधव ,रविंद्र कर्पे ,चंद्रकांत शेजुळ ,रविंद्र जगताप, गोकुळ नागले ,सागर ढवळे रामेश्वर नागले जनार्धन शिंदे , गणेश मगर, योगेश शिंदे ,संदीप सोनवणे ,बापु नागले , सुनिल शेजुळ गणेश साळूंके  ,विजु नागले कचरु राऊत ,आदिसह ग्रामस्थ वा महीला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.


बेलापुर  (प्रतिनिधी  )-नरसाळी येथील पाटील यांच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारला असुन त्यांच्या घरातुन सात तोळे दागीने व रोख रक्कम २५ हजार असा ऐवज चोरुन नेला आहे. नेहे यांच्या घरी झालेल्या चोरीचा तपास लागत नाही तोच चोरट्यांनी पुन्हा चोरी करुन पोलीसांनाच आव्हान दिले आहे  या बाबतची फिर्याद सौ नमिता पंकज पाटील  धंदा - घरकाम, राहणार नरसाळी बेलापुर खूर्द  यांनी दिली असुन बेलापुर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत त्यांनी पुढे म्हटले आहे की

 माझे पती शेती व्यवसाय करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.दररोज रात्री ११/०० वाजता वल्ड पिस मेडीटेशन हेशिबीर हे रात्री ०१/२० वा पावेतो चालते.या  वर्ल्ड पिस मेडीटेशन ऑनलाईन शिबीरामध्ये मी भाग घेते सदरचे काल  रात्री  चे सुमारास आम्ही घरातील सर्वांनी जेवण केले त्यानंतर माझे पती पंकज हे हॉलमध्ये  झोपी गेले तसेच घरामध्ये मुलगा नितीश व मुलगी सर्वज्ञा असे झोपी गेले माझी सासु हे घराचे बाहेरील किचन रुममध्ये झोपी गेल्या नेहमीप्रमाणे वल्ड पिस मेडीटेशन शिबीर असल्याने रात्री घराचा दरवाजा उघडा ठेवून, घराबाहेरील किचनरुममध्ये शिबीरात जावुन बसले.  शिबीर चालू असताना  मला आमचे घराबाहेर काहीतरी आवाज आल्याने घाबरुन मी किचनरूमचा दरवाजा बंद केला त्यानंतर राजी ०२/५५ पा चे सुमारास मी किचनचा दरवाजा उघडून माझे घरामध्ये गेलो असता मला आमचे घरातील आतील खोलीमधील कपाट उघडे दिसले व त्यामधील सामानाची उचकापाचक झालेली दिसली त्यामुळे मी माझे. पती यांना उठवुन पाहणी केली असता आम्हाला घरातील सामानाची उचकापाचक झालेली दिसली  त्यानंतर आम्ही आमचे घरातील सामानाची खात्री केली असता आमचे खालील वर्णनाचे सोन्याचांदीचे दागिने व रोख रकमेची चोरी झाल्याचे आढळले त्याचे वर्णन खालीलप्रमाणे  चार तोळे वजनाचे सोन्याचे गंठण  एक सोन्याची बांगडी सोन्याचे एक तोळे  वजनाचे कामातील कर्णफुले व २५,०००/- रुपये रोख रक्कम असा जवळपास सात तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम हे कोणीतरी अज्ञात चोरट्याने आमचे घराचा दरवाजा उघडा पहिल्याने त्याद्वारे  आत प्रवेश करुन चोरुन नेले असल्याची तक्रार देण्यात आली  त्यांच्या तक्रारीवरुन पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे पाटील यांनी तातडीने पोलीस पाटलाला घटनेची माहीती दिली त्यांनी पोलीसांना फोन करताच पोलीस काही वेळातच घटनास्थळी पोहोचले पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी रात्रीच घटनास्थळी भेट दिली सकाळी श्वान पथक व ठसे तज्ज्ञाना बोलविण्यात आले होते श्वानाने रस्त्यापर्यत माग दाखविला  बेलापुरातील नेहे यांच्या घरी झालेल्या चोरीचा अजुन काहीच धागादोरा लागलेला नसताना आता चोरट्यांनी पुन्हा दुसरी चोरी केली आहे.



MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget