माझे पती शेती व्यवसाय करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.दररोज रात्री ११/०० वाजता वल्ड पिस मेडीटेशन हेशिबीर हे रात्री ०१/२० वा पावेतो चालते.या वर्ल्ड पिस मेडीटेशन ऑनलाईन शिबीरामध्ये मी भाग घेते सदरचे काल रात्री चे सुमारास आम्ही घरातील सर्वांनी जेवण केले त्यानंतर माझे पती पंकज हे हॉलमध्ये झोपी गेले तसेच घरामध्ये मुलगा नितीश व मुलगी सर्वज्ञा असे झोपी गेले माझी सासु हे घराचे बाहेरील किचन रुममध्ये झोपी गेल्या नेहमीप्रमाणे वल्ड पिस मेडीटेशन शिबीर असल्याने रात्री घराचा दरवाजा उघडा ठेवून, घराबाहेरील किचनरुममध्ये शिबीरात जावुन बसले. शिबीर चालू असताना मला आमचे घराबाहेर काहीतरी आवाज आल्याने घाबरुन मी किचनरूमचा दरवाजा बंद केला त्यानंतर राजी ०२/५५ पा चे सुमारास मी किचनचा दरवाजा उघडून माझे घरामध्ये गेलो असता मला आमचे घरातील आतील खोलीमधील कपाट उघडे दिसले व त्यामधील सामानाची उचकापाचक झालेली दिसली त्यामुळे मी माझे. पती यांना उठवुन पाहणी केली असता आम्हाला घरातील सामानाची उचकापाचक झालेली दिसली त्यानंतर आम्ही आमचे घरातील सामानाची खात्री केली असता आमचे खालील वर्णनाचे सोन्याचांदीचे दागिने व रोख रकमेची चोरी झाल्याचे आढळले त्याचे वर्णन खालीलप्रमाणे चार तोळे वजनाचे सोन्याचे गंठण एक सोन्याची बांगडी सोन्याचे एक तोळे वजनाचे कामातील कर्णफुले व २५,०००/- रुपये रोख रक्कम असा जवळपास सात तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम हे कोणीतरी अज्ञात चोरट्याने आमचे घराचा दरवाजा उघडा पहिल्याने त्याद्वारे आत प्रवेश करुन चोरुन नेले असल्याची तक्रार देण्यात आली त्यांच्या तक्रारीवरुन पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे पाटील यांनी तातडीने पोलीस पाटलाला घटनेची माहीती दिली त्यांनी पोलीसांना फोन करताच पोलीस काही वेळातच घटनास्थळी पोहोचले पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी रात्रीच घटनास्थळी भेट दिली सकाळी श्वान पथक व ठसे तज्ज्ञाना बोलविण्यात आले होते श्वानाने रस्त्यापर्यत माग दाखविला बेलापुरातील नेहे यांच्या घरी झालेल्या चोरीचा अजुन काहीच धागादोरा लागलेला नसताना आता चोरट्यांनी पुन्हा दुसरी चोरी केली आहे.
नरसाळी येथे धाडसी चोरी सात तोळे दागीने व २५ हजार रोख लांबविले.
बेलापुर (प्रतिनिधी )-नरसाळी येथील पाटील यांच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारला असुन त्यांच्या घरातुन सात तोळे दागीने व रोख रक्कम २५ हजार असा ऐवज चोरुन नेला आहे. नेहे यांच्या घरी झालेल्या चोरीचा तपास लागत नाही तोच चोरट्यांनी पुन्हा चोरी करुन पोलीसांनाच आव्हान दिले आहे या बाबतची फिर्याद सौ नमिता पंकज पाटील धंदा - घरकाम, राहणार नरसाळी बेलापुर खूर्द यांनी दिली असुन बेलापुर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत त्यांनी पुढे म्हटले आहे की
Post a Comment