संतानी दाखविलेल्या मार्गाप्रमाणे जिवन व्यतीत करा - ह.भ.प.रंधे महाराज.
बेलापुर (प्रतिनिधी )- महाराष्ट्र ही संताची भूमी असुन समाजाच्या भल्यासाठी त्यांनी जो मार्ग दाखविला त्या मार्गाने जिवन व्यतीत केल्यास कुठलीही अडचण येणार नाही असा विश्वास ह.भ .प. बाळाराम रंधे महाराज यांनी व्यक्त केला श्री संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त ह.भ.प.रंधे महाराज यांच्या किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या वेळी भाविकांना मार्गदर्शन करताना ह.भ.प.रंधे महाराज म्हणाले की तुम्ही उद्याची चिंता करु नका चिंता ही मनुष्याला चितेकडे घेवुन जाते आनंदी जिवन जगा भौतिक सुखाच्या मागे धावू नका संताची शिकवाण आचरणात आणा असेही ते म्हणाले किर्तनानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले प्रारंभी गावातुन संत जगनाडे महाराजाच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली बेलापूरच्या ध्वज स्तंभाजवळ मिरवणूक आल्यानंतर अनेक मान्यवरांनी संत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले मिरवणूकी नंतर ह भ प बाळाराम रंधे महाराज यांचे काल्याचे किर्तन संपन्न झाले या वेळी अशोक साळूंके आसाराम जाधव, गोरखनाथ मगर ,सोमनाथ कर्पे जिल्हा उपाध्यक्ष लहानु नागले ,प्रभाकर जाधव भरत साळूंके ,अँड .विजय साळूंके ,केशवराव जाधव ,रविंद्र कर्पे ,चंद्रकांत शेजुळ ,रविंद्र जगताप, गोकुळ नागले ,सागर ढवळे रामेश्वर नागले जनार्धन शिंदे , गणेश मगर, योगेश शिंदे ,संदीप सोनवणे ,बापु नागले , सुनिल शेजुळ गणेश साळूंके ,विजु नागले कचरु राऊत ,आदिसह ग्रामस्थ वा महीला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
Post a Comment