बेलापुर (देविदास देसाई )-बेलापुर येथे घरात झालेला स्फोट हा गँस गळतीनेच झाला असल्याचा निष्कर्ष बाँम्ब शोधक व नाशक पथकाने काढला असुन गावात चाललेल्या वेगवेगळ्या वावड्यांना त्यामुळे पूर्णविराम मिळाला आहे अन ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला बेलापुर येथील शशिकांत शेलार यांच्या घरी सकाळी साडेसहा वाजता मोठा स्फोट झाला त्या स्फोटाने आजुबाजुचा परिसर दणाणून गेला शेलार यांच्या घरातील पत्र्याची छत पुर्णतः उडून गेली घरात लागलेल्या आगीत घरातील शंशिकात शेलार ज्योती शेलार त्यांचा मुलगा यश व मुलगी नमश्री गंभीर
जखमी झाले होते त्यांना प्रथम साखर कामगार व नतंर प्रवरा नगर येथील हाँस्पीटलला हलविण्यात आले होते .त्यानंतर घटनास्थळी अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सानप यांनी भेट दिली होती त्या नंतर ऐटीएस पथकानेही भेट देवुन पहणी केली त्या नंतर ऐ टी सी पथकानेही घटनास्थळाला भेट दिली व आसपासच्या नागरीकाकडे चर्चा केली त्यांनतर बाँम्ब शोधक व नाशक पथक सायंकाळी चार वाजता आले सात जणांच्या पथकात जंजीरा नामक कुत्राही होता अधुनिक यंत्राच्या मदतीने सर्वत्र स्फोटक पदार्थाचा शोध घेण्यात आला तसेच जंजीरा कुत्र्यानेही सर्वत्र शोध घेतला परंतु आक्षेपार्ह किंवा संशयास्पद असे काहीच आढळले नाही. त्यामुळे हा स्फोट गँस गळतीमुळेच झाल्याच्या निष्कर्षापर्यंत सर्व जण पोहोचले आहे. दवाखान्यात उपचार घेत असलेल्या ज्योती शेलार यांनीही सांगीतले सकाळी गँस पेटविण्यासाठी लाईटरचे बटन दाबताच स्फोट झाला होता
,त्यामुळे झालेला स्फोट हा गँस गळतीमुळेच झालेला असावा असा अंदाज आहे रात्री गँस शेगडीचे बटन चालू राहील्यामुळे गँस गळती होत राहीली व सकाळी लाईटरचे बटन दाबताच स्फोट झाला असल्याचे सर्वांचे मत झालेले आहे. बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे गणेश भिंगारदे निखील तमनर पोपट भोईटे हरिष पानसंबळ हे सकाळपासून सायंकाळ पर्यत घटनेच्या ठिकाणी तळ ठोकुन होते अखेर दिवसभर सुरु असलेल्या वेगवेगळ्या चर्चेला पुर्णविराम मिळाला असुन हा स्फोट गँस गळतीमुळेच झाला असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
Post a Comment