बेलापुर (प्रतिनिधी )-श्रीरामपुर तालुक्यात ७०% लसीकरण पुर्ण झाले असुन उर्वरीत नागरीकांनी लसीकरण करुन घ्यावे लसीकरण न करणाऱ्या नागरीकावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहीती प्रांताधिकारी अनिल पवार यांनी दिली आहे बेलापुर ऐनतपुर येथे केवळ ६०% लसीकरण झाले असुन माझे गाव शंभर टक्के लसीकरण ही योजना बेलापुर गावात राबविण्याचा निर्णय जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी घेतला असुन या मोहीमेंतर्गत जामा मस्जिद बेलापुर येथे लसीकरण मोहीम राबविण्यात आली त्या वेळी बोलताना प्रांताधिकारी अनिल पवार म्हणाले की ज्या नागरीकांनी अजुनही लस घेतली नाही त्यांनी तातडीने लस घ्यावी सर्व व्यापारी बांधवांनी लस घ्यावी तसेच लस घेतल्याचे प्रमाणपत्र दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे तसेच व्यापारी बांधवानी आपल्या दुकानात आलेल्या ग्राहकाने लस घेतली की नाही याची खातरजमा करावी विना लस घेणाऱ्या ग्राहाकावर देखील दंडात्मक कारवाई केली जाणार असुन सर्व नागरीकांनी लसीकरण करुन घ्यावे कोरोनाचे सर्व नियम पाळा मास्कचा वापर करा शासकीय नियमाचे, निर्बंधाचे पालन करा कोरोनाचा फैलाव होवु नये यासाठी सर्वांनी खबरदारी घ्यावी असे अवाहनही प्रांताधिकारी पवार यांनी केले आहे .जि प सदस्य शरद नवले म्हणाले की माझे गाव शंभर टक्के लसीकरण ही मोहीम गावभर वाड्यावस्त्यावर राबविली जाणार असुन गाव शंभर टक्के लसीकरण करुन घेण्यासाठी गावपातळीवर विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे त्याचाच भाग म्हणून आज जामा मस्जिद येथे लसीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .या लसीकरणात १२० नागरीकांना लस देण्यात आली या वेळी तहसीलदार प्रशांत पाटील, सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे , जेष्ठ पत्रकार देविदास देसाई, दिलीप दायमा, किशोर कदम, मोहसीन सय्यद ,शफीक बागवान, मुश्ताक शेख, मुनीर बागवान, जीना शेख, रफीक शेख, सुलतान सय्यद ,बाबा सय्यद, सुरज बडे ,चेतन गांधी ,राजु श्रीगोड, अयाज सय्यद , जब्बार अत्तार, मुश्ताक शेख ,शफ़ीक़ बागवान, अजिज शेख ,प्रभाकर ताके, आदिसह नागरीक उपस्थित होते लसीकरण मोहीम यशस्वीतेसाठी डाँक्टर देविदास चोखर डाँक्टर शंशाक जैन सिस्टर सुनिता गायकवाड संगीता कसबे यांनी विशेष परिश्रम घेतले.
Post a Comment