श्रीरामपूर ते वाकडी जाणारे रोडवर लटू करणार्‍या दोघा चोरट्यांना श्रीरामपूर शहर पोलिसांनी केले जेरबंद.

श्रीरामपूर प्रतिनिधी-श्रीरामपूर ते वाकडी जाणारे रोडवर यशवंतबाबा चौकी जवळ, खंडाळा शिवारातून घरी जात असलेल्या इसमास त्याची मोटारसायकल, रोख रक्कम असा ऐवज घेवून पोबारा करणार्‍या दोघा चोरट्यांना श्रीरामपूर शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून मोबाईल, मोटारसायकल व रोख रक्कम 37 हजार 500 रुपये हस्तगत केले आहेत.कोपरगाव तालुक्यातील दोदेवाडी येथील नानासाहेब लक्ष्मण नेहे व त्यांचे चुलत भाऊ ज्ञानदेव राघुजी नेहे हे दोघे त्यांचे मोटार सायकलवरुन श्रीरामपूर ते वाकडी जाणारे रोडवर यशवंत बाबा चौकी जवळ, खंडाळा शिवारातून घरी जात असतांना त्यांच्या पाठीमागून पल्सर मोटार सायकलवरुन तीन इसम आले व त्यांनी त्यांचे मोटार सायकलला गाडी आडवी लावून चाकूचा धाक दाखवून त्यांचे जवळील दोन मोबाईल, रोख रक्कम व मोटारसायकल जबरीने ओढुन चोरुन नेली. याप्रकरणी श्रीरामपुर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.याप्रकरणी तपासाची गती पोलिसांनी वाढविली असता सदरचा गुन्हा श्रीरामपूर मधील विशाल भारत बोरुडे रा. वॉर्ड नं. 3 नॉर्दन बॅच श्रीरामपूर व खंड्या उर्फ विजय राजेंद्र वाकोडे रा. वार्ड नं.3 बाजारतळ श्रीरामपूर यांनी केल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय सानप यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक संजय सानप स्वतः व डी. बी.पथकाचे पोलीस नाईक रघुवीर कारखेले, पंकज गोसावी, राहुल नरवडे, पोलीस कॉन्स्टेबल गौतम लगड, पोलीस कॉन्स्टेबल रमिज आत्तार 7 जानेवारी 2022 रोजी 17.30 वा. सुमारास बाजारतळ वार्ड नं.3 श्रीरामपूर येथून गुन्ह्यातील चोरीस गेलेला होन्डा शाईन कंपनीची मोटार सायकल, दोन मोबाईल व रोख रक्कम 37 हजार 500 रुपये अशा मुद्देमालासह ताब्यात घेवून त्यांना अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे हे करित आहेत.


Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget