Latest Post

बेलापुर (प्रतिनिधी)-समता स्पोर्टस् क्लब गेल्या तीस वर्षापासुन अखंडपणे  नाताळ व नव वर्षाच्या निमित्त विविध स्पर्धा आयोजीत करत असुन बौध्दीक स्पर्धेच्या काळात भरविलेल्या धावण्याच्या स्पर्धा निश्चितच कौतुकास्पद असल्याचे मत उपनगराध्यक्ष करण दादा ससाणे यांनी व्यक्त केले.


समता स्पोर्टस् क्लबच्या वतीने नाताळ व नव वर्षाचे औचित्य साधुन धावण्याच्या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत जिल्हा व जिल्ह्याबाहेरील ६० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला मागील वर्षी कोरोनामुळे या स्पर्धेत खंड पडला होता  या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक संविधान हिवराळे (बाळापूर अकोला), द्वितीय क्रमांक विक्रम  बोराडे (नगर), तृतीय क्रमांक देशमुख राहुल (श्रीरामपूर), चतुर्थ क्रमांक खंडागळे प्रदिप भारत (टाकळीभान), तर उत्तेजनार्थ पाचवा आणि सहावा क्रमांक अनुक्रमे अजय साबळे (खैरी), भानगुडे विजय (बोधेगाव) यांनी मिळवला. सदर स्पर्धेचे उद़्घाटन उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या हस्ते तसेच, साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक, बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले, जेष्ठ पत्रकार देविदास देसाई, माजी सरपंच भरत साळुंके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. त्या नंतर विजेत्या स्पर्धकांना बक्षिस वितरण करण्यात आले, त्या वेळी ससाणे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, समता स्पोर्ट क्लबच्या वतीने भरविण्यात येणाऱ्या मैदानी खेळांच्या स्पर्धेतून नक्कीच बेलापूरातून नक्कीच चांगले खेळाडू तयार होतील. यावेळी सचिन गुजर, अरुण पाटील नाईक, देविदास देसाई, प्रा.बाबासाहेब शेलार आदींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सेवा संस्थेचे चेअरमन अनिल नाईक, अनिल पवार, विलास मेहेत्रे, रमेश शेलार, शाहनवाज सय्यद, उपेंद्र कुलकर्णी, प्रकाश कुऱ्हे आदी मान्यवर उपस्थित होते.


या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी समता स्पोर्टस् क्लबचे विजय शेलार, संजय शेलार, सुहास शेलार, बंन्टी शेलार, बाबासाहेब शेलार, संतोष शेलार, अक्षय शेलार, रोहीत शेलार, प्रसाद शेलार, राहूल शेलार, रोहन शेलार, संकेत शेलार, सुयश शेलार, निनाद शेलार, ललित शेलार, निशिकांत शेलार, रामा उमाप आदिंनी विशेष परिश्रम घेतले.


बेलापुर (प्रतिनिधी  )-खेळाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने समता स्पोर्टस् क्लबने नाताळ व नव वर्षाचे निमित्त साधुन सायकल स्पर्धाचे केलेले आयोजन हे निश्चितच कौतुकास्पद आहे असे मत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक यांनी व्यक्त केले                                         नाताळ व नव वर्षाच्या निमित्ताने  दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्या वेळी बक्षिस वितरण करताना ते बोलत होते या वेळी प्रमुख अतिथी म्हणून जनता अघाडीचे अध्यक्ष व खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड भरत साळूंके जेष्ठ पत्रकार देविदास देसाई बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले सेवा संस्थेचे चेअरमन अनिल नाईक विलास मेहेत्रे भाऊसाहेब कुताळ सुधाकर खंडागळे उपस्थित होते या वेळी बेलापुर ते रामगड व परत बेलापुर अशी सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती  या स्पर्धेत अहमदनगर येथील शशिकांत आवारे यांनी प्रथम क्रमांकाचे सायकल व रोख पाचशे रुपयाचे पारितोषिक मिळविले शिरसगाल येथील राहुल देशमुख याने द्वितीय क्रमांकाचे रोख २२२२ रुपयाचे  पारितोषिक मिळविले पाथर्डी येथील तुकाराम मरकड यांनी तृतीय क्रमांकाचे रुपये ११११रुपयाचे बक्षिस मिळविले निमगाव खैरी येथील कैलास सोनवणे यांनी चतुर्थ क्रमांकाचे  ७७७रुपयांचे पारितोषिक मिळविले तर करजगावचे चैतन्य कोल्हे याने उत्तेजनार्थ रुपये ५५५रोख पारितोषिक मिळविले मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ पार पडला या वेळी ग्रामपंचायत सदस्या स्वाती अमोलीक बाबुलालाभाई शफीक आतार शहनवाज सय्यद आरपीआयचे सागर खरात समता स्पोर्टस् क्लबचे विजय शेलार संजय शेलार सुहास शेलार बंन्टी शेलार रमेश शेलार बाबासाहेब शेलार संतोष शेलार अक्षय शेलार रोहीत शेलार प्रसाद शेलार संकेत शेलार सुयश शेलार निनाद शेलार ललित शेलार निषौकांत शेलार रामा उमाप आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते शेवटी विजय शेलार यांनी आभार मानले या वेळी संजय शेलार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.



श्रीरामपूर प्रतिनिधी- ओमायक्रॉन( Omicron) या जलद गतीने पसरणाऱ्या कोविड विषाणू प्रकाराचा पहिला बाधित रुग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर तालुक्यातील सर्व नागरिकांना प्रशासनाकडून नम्र आवाहन करण्यात येत आहे.कोविड-19 च्या संभाव्य गंभीर परिणाम तसेच लक्षणांपासून बचाव करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. तथापि श्रीरामपूर तालुक्यात प्रशासनाकडून वारंवार आवाहनासह दररोज विविध ठिकाणी लसीकरण सत्र आयोजित करून देखील लसीचा पहिला डोस अद्याप (18 वर्षांहून जास्त वयाच्या) जवळजवळ 65-70 हजार नागरिकांनी घेतलेला नाही. तसेच साधारण 33 हजार नागरिकांनी पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेण्याची मुदत उलटून गेली असून देखील अद्याप दुसरा डोस घेतलेला नाही.म्हणजेच तालुक्यातील अंदाजे एक लाख (18 वर्षांवरील) सज्ञान व्यक्ती,लसीचा मुबलक पुरवठा उपलब्ध असूनदेखील कोविड पासून जाणीवपूर्वक सुरक्षित झालेले नाहीत. लस न घेणाऱ्या व्यक्तींच्या स्वतःच्या जीविताबाबतची ही उदासीनता भविष्यात गंभीर स्वरूपाची वैयक्तिक व सार्वजनिक आरोग्याची समस्या निर्माण करू शकते.तरी लसीकरण न झालेल्या सर्व नागरिकांना पुनःश्च तात्काळ नजीकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करून घेण्याचे विनम्र आवाहन करण्यात येत आहे. लसीकरणासोबतच सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळणे,मास्कचा वापर करणे या उपायांचा अवलंब करणे अनिवार्य आहे.पुढील काळात प्रशासनाचे भरारी पथके बाजारपेठेत,मंगल कार्यालय अशा गर्दीच्या ठिकाणी अचानक भेटी देतील व कोविडच्या प्रतिबंधात्मक नियमांचा भंग झाल्याचे, प्रत्येक दुकानातील सर्व कर्मचारी व त्यावेळी असलेल्या ग्राहकांचे दोन्ही डोस लसीकरण झालेले नसल्याचे ( हे तात्काळ तपासण्याची व्यवस्था अधिकाऱ्यांकडे उपलब्ध आहे ) व मास्क वापरत नसल्याचे निदर्शनास आल्यास अशा आस्थापना,दुकाने तात्काळ सिलबंद करण्यात येतील याची सर्वांनी नोंद घ्यावी.समाजातील जबाबदार व्यक्ती,संस्था,घटकांनी आपापल्या परीने जनमानसात लसीकरणाबद्दल जागरूकता निर्माण करावी व 100% लसीकरण पूर्ण करून श्रीरामपूर तालुक्यात कोविडच्या दुसऱ्या लाटेच्या वेळी आपण सर्वांनी तोंड दिलेल्या भयावह स्थितीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे ही विनंती तहसिलदार तथा इनसिडेंट कमांडर,श्रीरामपूर.



अहमदनगर प्रतिनिधी-अहमदनगर जिल्हयामध्ये दैनंदिनरित्या 40-70 दरम्यान कोरोना बाधीत रुग्णसंख्या आढळून येत असल्याने दक्षिण आफिक्रा आणि इतर काही देशांमध्ये कोविड-19 विषाणूचा B.1.1.529 हा नवीन व्हेरिएंट आढळून आलेला असून त्यास जागतिक संघटनेव्दारे (W.H.0.) ओमायक्रॉन हे नाव दिलेले आहे. सदर नवीन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव हा कोविड-19 विषाणूच्या पूर्वीच्या व्हेरिएंट पेक्षा अतिशय वेगाने पसरत असल्याचे आढळून आलेले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे, असे सर्व टास्क फोर्स तसेच आरोग्य विषयक तज्ञांकडून वारंवार सूचित करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सांगोपांग चर्चा करून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये या विषयासंदर्भात नागरिकांना अधिक प्रमाणात लसीकरणासाठी प्रवृत्त करणेसाठी काही ठोस उपाययोजना करणेचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेषत्वाने लसीकरण न झालेले नागरिक समूहात मिसळल्यास त्यांचे स्वतःचे आरोग्याचे दृष्टीने तसेच आजाराच्या प्रसाराच्या दृष्टीने अधिक धोकादायक ठरू शकतात ही बाब विचारात घेऊन सार्वजनिक ठिकाणी अशा नागरिकांना प्रवेश देताना त्यांचे लसीकरणाबाबत शहानिशा करणे अनिवार्य करून त्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त करणेबाबत धोरण स्विकारणेस दि.24/12/2021 रोजीच्या बैठकीत सर्व संमतीने मान्यता देण्यात आलेली आहे.त्याअर्थी, मी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अहमदनगर, साथरोग अधिनियम 1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन अहमदनगर जिल्ह्यात खालीलप्रमाणे निर्बध दि.25/12/2021 पासून लागू करीत आहे.

1) अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये, खाजगी आस्थापना/कार्यालये,व्यावसायिक व औदयोगिक आस्थापना, हॉटेल, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल, नाट्यगृहे, सिनेमागृह,लॉन्स, मंगल कार्यालये, कृषी उत्पन्न बाजार समिती व इतर समारंभ, मेळावे व तत्सम सर्वच सार्वजनिक ठिकाणी व कार्यक्रमात “No Vaccine No Entry” याप्रमाणे निबंध लागू करीत आहे.
2) वरीलप्रमाणे प्रत्येक आस्थापना यांनी त्यांचे कार्यस्थळी येणा-या नागरिकांना कोविड
प्रतिबंधात्मक लसीकरणाची किमान एक मात्रा घेतल्याची खात्री करणे बंधनकारक राहील. व
याशिवाय प्रवेश देणे प्रतिबंधित राहील.
3) कोविड-19 विषयक मार्गदर्शक सूचना, निर्देश आणि कोविड अनुरूप वर्तन (Covid Appropriate Behaviour) चे तसेच राज्य व केंद्र शासन निर्णयातील अटी व शर्तीचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक राहील.
4) वरील ठिकाणी प्रवेश करताना प्रत्येक व्यक्तीने योग्य पध्दतीने मास्क परिधान करणे, नाक व
तोंड नेहमी मास्कने झाकलेले असले पाहिजे.
वरीलप्रमाणे सर्व संबंधितांनी कोविड-19 विषयक मार्गदर्शक सूचना, निर्देश आणि कोविड
अनुरूप वर्तन (Covid Appropriate Bahaviour) चे तसेच वरीलप्रमाणे शासन निर्णयातील अटी व शर्तीचे तंतोतंत
पालन करणे बंधनकारक राहील. यासंदर्भात कोणतेही उल्लंघन दिसून आल्यास शासन आदेश दि.27/11/2021 मध्ये नमूद केलेप्रमाणे शास्ती करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.



बेलापुर  (देविदास देसाई  )-श्रीरामपुरात पहीला ओमीक्राँनचा रुग्ण आढळला असुन ज्यांनी अजुनही कोविड लसीचा पहीला किंवा दुसरा डोस घेतला नसेल त्यांनी ताबडतोब लस घ्यावी असे अवाहन उपविभागीय अधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केले आहे.नायजेरीयाहुन दोन नागरीकांचे श्रीरामपुर तालुक्यात आगमन झाले होते त्याच्या आरटीपीसीआर टेस्ट घेण्यात आल्या होत्या त्या पाँझीटीव्ह आल्या त्यामुळे दोघाच्याही ओमीक्राँन टेस्ट करण्यात आल्या असुन त्यात एकाचा अहवाल पाँझीटीव्ह आल्यामुळे श्रीरामपुराकरांचा जिव टांगणीला लागलेला आहे कोविड लसीकरणाचे काम अतिशय धिम्या गतीने चालू असून लसीकरण करुन घेण्यास नागरीकांचा उत्साह कमी आहे लस सर्वत्र उपलब्ध आहे तरी देखील काही नागरीक लस घेत नाही त्यामुळे प्रांताधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांनी तालुक्यातील जनतेला अवाहन केले आहे की कोविड लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध असुन नागरीकांनी तातडीने लसीकरण करुन घ्यावे नागरीकांनी गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे प्रत्येकाने मास्क वापरणे सक्तीचे आहे घरी गेल्यावर हात स्वच्छ धुवा आपली काळजी आपणच घ्या आपण सुरक्षित रहा व इतरांनाही सुरक्षित ठेवा असे अवाहन प्रांताधिकारी अनिल पवार यांनी केले आहे




बेलापूर (प्रतिनिधी )-दरवर्षीप्रमाणे नाताळ व नवीन वर्षानिमित्त समता स्पोर्ट क्लबच्या वतीने भव्य सायकल व रनिंग स्पर्धांचे आयोजन करण्यात असल्याची माहीती समता स्पोर्ट क्लबच्या वतीने देण्यात आली आहे.समता स्पोर्ट क्लबच्या वतीने प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की नाताळ व नव वर्षाच्या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेआहे शनिवार, दि. २५/१२/२०२१ रोजी सकाळी ९.००  वाजता सायकल स्पर्धा होणार असून यासाठी प्रथम बक्षिस: सायकल, निर्मला जोगदंड यांचे तर्फे ( स्व. अजीत शेलार यांचे स्मरणार्थ), द्वितीय बक्षिस: २२२२, प्रा. बाबासाहेब शेलार यांचे तर्फे (अध्यक्ष, जागृती प्रतिष्ठान सार्वजनिक वाचनालय, बेलापूर), तृतीय बक्षिस : ११११, शाहनवाज सय्यद, सहारा ग्रुप यांचे तर्फे, चौथे बक्षिस: ७७७ (स्व. छबुबाई पावलस शेलार यांचे स्मरणार्थ) सुयश शेलार व अतिश शेलार यांचे तर्फे तर, उत्तेजनार्थ : ५५५, मनोज खर्डे व कैलास गांगुर्डे यांचे तर्फे देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे रविवार, दि. २६/१२/२०२१ रोजी सकाळी ९.०० वाजता खुल्या रनिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी प्रथम बक्षिस: ३३३३ विशेष राहुल शेलार व जोएल राजेंद्र शेलार यांचे तर्फे, द्वितीय बक्षिस: २२२२ राजमहंमद शेख यांचे तर्फे, तृतीय बक्षिस: ११११ इब्राहिम शेख यांचे तर्फे (सिव्हील कॉन्ट्रॅक्टर) चौथे बक्षिस: ७७७ मा. भाऊसाहेब तेलोरे यांचे तर्फे तर उत्तेजनार्थ : ५५५ गोरख फुलमाळी यांचे तर्फे देण्यात आले आहे. सदर स्पर्धा सर्वांसाठी खुल्या आहेत. प्रवेश फी नाममात्र १०रु. आहे. स्पर्धेचे ठिकाण झेंडा चौक, बेलापूर बु.II असून इच्छूकांनी 9370207224, 9503902858, 9370207224 या मोबाईल नंबरशी संपर्क साधून स्पर्धेत जास्तीतजास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन समता स्पोर्ट्स क्लबचे विजय शेलार, संजय शेलार, सुहास शेलार, बंन्टी शेलार, संतोष शेलार, अक्षय शेलार, संकेत शेलार, सुयश शेलार, निनाद शेलार, ललित शेलार, निष्कांत शेलार, रामा उमाप आदिंनी केले आहे.



श्रीरामपूर - येथील गोंधवणी भागातील नवीन पिण्याच्या पाण्याच्या तलावांमध्ये डुकरांचा मुक्तसंचार असून हेच पाणी नागरिकांना पिण्यासाठी सोडण्यात येत असल्याने पालिकेच्या अक्षम्य दुर्लक्ष बद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे .

शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी पालिकेने नवीन साठवण तलाव  निर्माण केलेला आहे.मात्र या तलावाच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही उपाययोजना केलेली नाही येथे वाजपेय असणे गरजेचे असताना तिथे वाचमेन वगैरे नाही त्यामुळे सर्व प्रकारची जनावरे त्या पाण्यामध्ये मुक्त संचार करतात तलावाच्या मागच्या बाजूने मिल्लत नगर कडील भागातून भिंत उंच नसल्याने वेगवेगळ्या प्रकारची जनावरे तलावात उतरतात यामध्ये डुकरांचा देखील समावेश आहे पाण्यामध्ये मनसोक्त डुंबत असल्याने पाणी दूषित होत आहे आणि हेच दूषित पाणी नागरिकांना पिण्यासाठी

सोडले जात आहे हे विशेष याबाबत काही जागरूक नागरिकांनी या डुकरांच्या तलावाच्या पाण्यात संचार करणारे फोटोसोशल मीडियावर पाठवून नगरपालिकेचे लक्ष या प्रश्नाकडे वेधले आहे मात्र पालिकेचा आरोग्य विभाग व पाणीपुरवठा विभाग यांनी या बाबीकडे सपशेल कानाडोळा केल्याने डुकरांच्या या तलावातील संचारा बद्दल प्रतिबंधात्मक कोणतीही उपाययोजना होऊ शकलेली नाही .नगरपालिकेचे पदाधिकारी व अधिकारी जरगावातील पाणी आपल्या घरात पीत असतील तर किमान त्याचे भान ठेवून तरी अशा जनावरांपासून या तलावाच्या संरक्षण व्हावे यासाठी तातडीने उपाययोजना करावी अशा प्रकारची जनावरे तलावाच्या पाण्यात उतरणार नाही यासाठी वाचमेन किंवा इतर बंदोबस्त करावा अशी मागणी शहरातील नागरिकांनी नगरपालिकेकडे केली आहे.



MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget