समता स्पोर्टस् क्लबच्या वतीने नाताळ व नव वर्षाचे औचित्य साधुन धावण्याच्या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत जिल्हा व जिल्ह्याबाहेरील ६० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला मागील वर्षी कोरोनामुळे या स्पर्धेत खंड पडला होता या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक संविधान हिवराळे (बाळापूर अकोला), द्वितीय क्रमांक विक्रम बोराडे (नगर), तृतीय क्रमांक देशमुख राहुल (श्रीरामपूर), चतुर्थ क्रमांक खंडागळे प्रदिप भारत (टाकळीभान), तर उत्तेजनार्थ पाचवा आणि सहावा क्रमांक अनुक्रमे अजय साबळे (खैरी), भानगुडे विजय (बोधेगाव) यांनी मिळवला. सदर स्पर्धेचे उद़्घाटन उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या हस्ते तसेच, साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक, बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले, जेष्ठ पत्रकार देविदास देसाई, माजी सरपंच भरत साळुंके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. त्या नंतर विजेत्या स्पर्धकांना बक्षिस वितरण करण्यात आले, त्या वेळी ससाणे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, समता स्पोर्ट क्लबच्या वतीने भरविण्यात येणाऱ्या मैदानी खेळांच्या स्पर्धेतून नक्कीच बेलापूरातून नक्कीच चांगले खेळाडू तयार होतील. यावेळी सचिन गुजर, अरुण पाटील नाईक, देविदास देसाई, प्रा.बाबासाहेब शेलार आदींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सेवा संस्थेचे चेअरमन अनिल नाईक, अनिल पवार, विलास मेहेत्रे, रमेश शेलार, शाहनवाज सय्यद, उपेंद्र कुलकर्णी, प्रकाश कुऱ्हे आदी मान्यवर उपस्थित होते.
समता स्पोर्टस् क्लबच्या माध्यमातून भरविण्यात आलेल्या धावण्याच्या स्पर्धा कौतुकास्पद -ससाणे.
बेलापुर (प्रतिनिधी)-समता स्पोर्टस् क्लब गेल्या तीस वर्षापासुन अखंडपणे नाताळ व नव वर्षाच्या निमित्त विविध स्पर्धा आयोजीत करत असुन बौध्दीक स्पर्धेच्या काळात भरविलेल्या धावण्याच्या स्पर्धा निश्चितच कौतुकास्पद असल्याचे मत उपनगराध्यक्ष करण दादा ससाणे यांनी व्यक्त केले.
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी समता स्पोर्टस् क्लबचे विजय शेलार, संजय शेलार, सुहास शेलार, बंन्टी शेलार, बाबासाहेब शेलार, संतोष शेलार, अक्षय शेलार, रोहीत शेलार, प्रसाद शेलार, राहूल शेलार, रोहन शेलार, संकेत शेलार, सुयश शेलार, निनाद शेलार, ललित शेलार, निशिकांत शेलार, रामा उमाप आदिंनी विशेष परिश्रम घेतले.
Post a Comment