Latest Post

श्रीरामपूर (वार्ताहर)-श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील मुठेवाडगाव रोडवरील पिंपळेवस्तीवर दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत घरातील व्यक्तींना वेठिस धरून मारहाण केली. यावेळी दरोडेखोरांना प्रतिकार करताना देवीदास पिंपळे यांच्या एक महिला जखमी झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पिंपळे वस्तीवर काल पहाटे साडे चार ते पाच वाजेच्या दरम्यान दरोडेखोरांनी घराच्या मागील बाजुने आत प्रवेश केला. हा प्रकार लक्षात येताच देविदास पिंपळे यांनी दरोडेखोरांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दरोडेखोरांनी देविदास पिंपळे यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. घरातील एक महिलामध्ये पडली असता तिलाही मारहाण करण्यात आली. यावेळी श्री.पिंपळे यांच्या डोक्याला तसेच हाथा पायाला जबर मार लागला. त्यांच्या ओरडण्याच्या आवाजाने परिसरातील नागरिक मदतीला धावून आले. मारहाण करणार्‍या दरोडेखोरांनी तात्काळ या ठिकाणावरून पोबारा केला. दरोडेखोरांनी ऐवज चोरून नेला किंवा नाही हे मात्र समजू शकले नाही.यावेळी नागरिकांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे याठिकाणी घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक संजय सानप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. पाटील, पोलीस सब इन्स्पेक्टर श्री. घायवट, पोलीस हेडकॉन्स्टेबल परदेशी, पोलीस नाईक किरण पवार, श्री. दरेकर, गौतम लगड, हरीश पानसंबळ, पोलीस कॉन्स्टेबल सुनील दिघे, पोलीस कॉन्स्टेबल पंकज गोसावी, पोलीस कॉन्स्टेबल, महेश पवार, पोलीस कॉन्स्टेबल तुषार गायकवाड यांच्या पथकाने तात्काळ पिंपळे वस्तीवर भेट दिली. त्यांनी जखमी देविदास पिंपळे व इतरांना औषधोपचारासाठी श्रीरामपूर येथील रुग्णालयात हलविले. मारहाण करणार्‍या दरोडेखोरांनी तात्काळ या ठिकाणावरून पोबारा केला.पोलिसांनी परिसरात पाहणी केली असता तेथे दरोडेखोरांची मोटारसायकल आढळून आली आहे. सकाळी घटनास्थळी अहमदनगर येथील डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले. जाता जाता वडाळा महादेव येथील वस्तीवरून मोटरसायकल घेऊन हल्लेखोर पसार झाले. पिंपळे वस्तीवर ग्रामस्थांनी मोठी गर्दी करून घटनेसंदर्भात तर्कवितर्क काढत आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सानप यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


बेलापुर  (प्रतिनिधी  )- कर्नाटक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यावर कडक कारवाई  करण्यात यावी अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे यांनी केली आहे                         मनसेच्या वतीने प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे दैवत नाही तर ते भारत वासीयांचे श्रध्दास्थान आहे  या घटनेमुळे सर्व देश वासीयांच्या भावना दुखावल्या आहेत देशवासीयांच्या भावना दुखावणाऱ्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही मनसेच्या वतीने करण्यात आली आहे तसेच  राहता तालुक्यातील श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील जळगाव येथील चार वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस  फाशीची शिक्षा करण्यात यावी यासाठी श्रीरामपूर तालुक्यातील पोलीस निरीक्षक यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्रीरामपुर च्या वतीने निवेदन देण्यात आले या वेळी  मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे डॉक्टर संजय नवथर, जिल्हा सचिव, सुरेश जगताप जिल्हा उपाध्यक्ष, गणेश दिवसे तालुकाध्यक्ष, निलेश लांबोळे  शहराध्यक्ष, विशाल शिरसाठ , सचिन सरोदे, तालुकाध्यक्ष अक्षय सूर्यवंशी शहराध्यक्ष  संतोष डहाळे तालुका सरचिटणीस, ईश्वर जगताप, शहर सचिव अमोल साबणे उपाध्यक्ष अरुण बुऱ्हाडे  आदि पदाधिकारी उपस्थित होते.


बेलापूर (प्रतिनिधी  )- अवैध व्यवसायासाठी अनाधिकृतपणे व अतिक्रमण करुन टाकलेली टपरी ग्रामपंचायत प्रशासनाने उचलल्याप्रकरणी सौ.शोभा फुलारे यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर सुरु केलेले उपोषण हे बेकायदेशीर असुन या बाबत प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी बेलापुरचे सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे व सदस्यांनी केली आहे.अन्यथा आम्ही देखील ग्रामस्थासह उपोषणास बसु असा इशारा देण्यात आला आहे  चुकीच्या जागेवर अतिक्रमण करुन टाकलेली बेकायदेशीर टपरी बेलापुर ग्रामपंचायतीने उचलली तसेच नागरीकांच्या तक्रारीवरुन रस्त्यावर असणारे अतिक्रमण हटविले या बाबत सौ शोभा फुलारे यांनी पंचायत समीतीसमोर उपोषण सुरु केले आहे हे उपोषण चुकीच्या मगणीकरीता असुन अशा प्रकारे चुकीच्या मागणीकरीता उपोषणास बसुन शासनास वेठीस धरणाऱ्या व्याक्तीविरुध्द कायदेशीर कारवाई करावी अन्यथा मंगळवार (ता.२१)पासून आपण स्वतः सह,उपसरपंच तसेच सदस्य व ग्रामस्थ उपोषण करतील असा इशारा सरपंच महेन्द्र साळवी यांनी दिला आहे. यासंदर्भात गट विकास अधिकारी यांना दिलेल्या पञात सरपंच महेंद्र  साळवी यांनी म्हटले आहे की,श्री.किशोर धोंडीराम फुलारे यांनी अतिक्रमण करुन टपरी टाकली होती ग्रामपंचायत प्रशासनाने सदरची अतिक्रमित केलेली टपरी हटविली तसेत इतरही अतिक्रमण केलेल्या टप-या उचलून घेतल्या.यासंबंधी श्री.किशोर फुलारे यांनी त्यांच्या पत्नी सौ.शोभा फुलारी यांना पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणास बसविले आहे.फुलारी यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे.त्यांचेवर अवैध धंदे व बेकायदा दारु विक्री संदर्भात गुन्हे दाखल झालेले आहेत.आंदोलन उपोषणाची धमकी देवुन शासनास वेठीस धरण्याचा त्याचा धंदा आहे अन काही लोक यातही राजकारण आणून त्यास पाठींबा देत आहेत  टपरी काढणेबरोबरच श्रीमती सुमन बाबुराव गायकवाड यांचे अनधिकृत व सार्वजनिक  शौचालयाच्या रस्त्यावरचे अतिक्रमण केलेले घर पाडले या बाबतही सौ.फुलारे उपोषण करीत आहे.सदर प्रकरणी सुमन गायकवाड यांनी दिवाणी न्यायालयात दावा क्र.२७२/२०२१दाखल केलेला आहे.सबब सदरचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.अशा त-हेने दोन्ही प्रकरणी सौ.फुलारे यांचे उपोषण पूर्णपणे बेकायदेशीर आहे.याबाबत संबधितास उपोषण मागे घेणेबाबत तसेच अतिक्रमण संदर्भात येत्या ग्रामसभेत निर्णय घेवू असे लेखी कळवून उपोषणापासून परावृत्त होणेबाबत कळविले आहे.सदरचे उपोषण पूर्णपणे बेकायदेशीर असल्याने पंचायत समिती कार्यालयाने संबांधिता बाबत योग्य तो निर्णय घेणे आवश्यक होते.तसे न करता उपोषण करणारास काही झाल्यास त्यास ग्रामपंचायत सरपंच व प्रशासन जबाबदार राहिल असा दबाव टाकला जात आहे.हे पुर्णतः चुकीचे असुन असे झाल्यास या पुढील काळात कुणीही चुकीच्या कामाकरीता उपोषण करेल त्यामुळे संबधीत महीलेची मागणीच बेकायदेशीर व चुकीची आहे त्यामुळे  आपण देत असलेल्या निवेदनाची दखल घेवून सदरचे बेकायदेशीर उपोषण प्रकरणी आपणच योग्य तो कायदेशीर निर्णय घ्यावा अन्यथा सरपंच,उपसरपंच  सदस्य व ग्रामस्थासह मंगळवार पासून पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरु करतील असा इशारा सरपंच महेंद्र साळवी यांनी दिला आहे.सदर निवेदनाच्या प्रती  जिल्हाधिकारी,जिल्हा पोलीस प्रमुख उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभागीय अधिकारी श्रीरामपुर तहसीलदार श्रीरामपुर  तसेच पोलिस प्रशासनास पाठविण्यात आलेल्या आहेत .


बेलापुर  (प्रतिनिधी  )--हात उसने घेतलेल्या रकमेची परतफेड न केल्यामुळे वसुली करीता न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यात आरोपीला तीन लाख रुपये दंड तसेच एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे  या बाबत मिळालेली माहीती अशी की शेख ईरफान रशिद रा अहमदनगर याने त्याचा मित्र विष्णू हीरा सारस यास दोन लाख रुपये सारस यांच्या व्हँन दुरुस्तीसाठी दिले होते या पैशापोटी सारस यांनी शेख ईरफान यांना धनादेश दिला होता   तो धनादेश वटला नाही म्हणुन दाखल केलेल्या खटल्याचा निकाल नुकताच अहमदनगर येथील अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी श्री . यु . पी . देववर्षी  यांनी दिला असुन आरोपी विष्णु हिरा सारस रा. भिंगार यांस १ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व नुकसान भरपाई म्हणुन फिर्यादीला ३ लाख रुपये देण्यांचा आदेश दिला आहे आरोपीने नुकसान भरपाईची रक्कम न दिल्यास ६ महिण्याचा सश्रम कारावाची शिक्षा सुनावण्यात आली आहे  . सदर खटल्यात फिर्यादीचे वतीने अँड . शेख हाफिज एन . जहागीरदार , नोटरी पब्लीक व अँड . दावर एफ शेख , अहमदनगर यांनी काम पाहिले . भिंगार येथील फिर्यादी शेख इरफान रशिद याने सन २०१२ मध्ये त्याचा मित्र आरोपी विष्णु हिरा सारस रा - भिंगार यांस २ लाख रुपये आरोपीची व्हॅन दुरुस्ती करीता हात उसनवार दिले होते फिर्यादीने आरोपी कडे सदर रक्कमेची मागणी केली असता सदर रक्कमेचे परत फेडी पोटी आरोपीने फिर्यादीला दिलेला धनादेश वटला नाही म्हणुन फिर्यादीने आरोपीला वकिला मार्फत नोटीस पाठवुन धनादेशाचे रक्कमेची मागणी केली होती परंतु आरोपीने मुदतीत धनादेशाची रक्कम दिली नाही म्हणुन फिर्यादी याने अहमदनगर येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात आरोपी विरुध्द निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अँक्टचे कलम १३८ प्रमाणे खटला दाखल केला होता आरोपीने दिलेला धनादेश हा भिशीचे व्यवहाराचे सिक्युरीटी पोटी दिलेला होता सदर धनादेशाचा फिर्यादी गैर वापर करीत आहे आरोपी फिर्यादीची कोणतीही रक्कम देणे लागत नाही असा बचाव आरोपीने घेतला होता परंतु न्यायालयाने आरोपी बचाव अमान्य करुन सदर खटल्याचा निकाल दिनांक १०/१२/२०२१ रोजी देवून व आरोपीला दोषी धरुन १ वर्षाचा सश्रम कारावासची शिक्षा व ३ लाख रुपये नुक्सान भरपाई आरोपीने फिर्यादीला दयावी आरोपीने नुकसान भरपाईची रक्कम फिर्यादीला न दिल्यास आरोपीला ६ महिण्याची सश्रम कारवासाची शिक्षा सुनावली आहे . सदर खटल्यात फिर्यादीचे वतीने अँड . शेख हाफिज एन . जहागीरदार , नोटरी पब्लीक व अँड . दावर एफ . शेख यांनी काम पाहिले .


अहमदनगर (प्रतिनिधी)-नेवासा तालुक्यातील कांगोणी येथील अलिकडेच पडलेल्या दरोड्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला मागील 15 दिवसांत नेवाशासह राहुरी व पाथर्डी तालुक्यातील वस्त्यांवर दरोडे टाकणारी तिघा सराईत दरोडेखोरांची टोळी जेरबंद केली आहे.याबाबत माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील शिंगणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कांगोणी येथे 5 डिसेंबर रोजी रात्री बबन जगन्नाथ बेल्हेकर यांच्या वस्तीवर अज्ञात चोरट्यांनी घराचा मागील दरवाजा तोडून आत प्रवेश करून त्यांना व त्यांच्या आईला चॉपर व चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 3 लाख 36 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. याबाबत शिंगणापूर पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला.सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी समांतर तपास करत असताना पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त खबर्‍याकडून हा गुन्हा आरोपी रवींद्र भोसले याने व त्याच्या साथीदारांनी केल्याची माहिती मिळाली. त्यामुळे स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने गंगापूर येथे जाऊन आरोपींचा शोध घेतला.आरोपी रवींद्र मुबारक भोसले रा. गंगापूर जि. औरंगाबाद यास ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेवून कसून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदार लखन चव्हाण, कुलथ्या भोसले व इतर साथीदारांनी मिळून केला असल्याची माहिती दिल्याने सदर माहितीच्या आधारे त्याच्या साथीदारांचा शोध घेऊन आरोपी नंबर उर्फ लखन प्रल्हाद चव्हाण रा. अंतापूर ता. गंगापूर जि. औरंगाबाद व कुलथ्या बंडू भोसले रा. बाबरगाव ता. गंगापूर यांना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे वरील गुन्ह्या व्यतिरिक्त आणखी कुठे गुन्हे केले याबाबत चौकशी केली असता त्यांनी मागील 15 दिवसांच्या कालावधीत नेवासा व राहुरी तालुक्यात प्रत्येकी दोन तर पाथर्डी तालुक्यात एक असे 5 ठिकाणी गुन्हे केल्याचे सांगितले.दुसरा आरोपी कुलथ्या बंडू भोसले याचेविरुद्ध अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे गेल्यावर्षी एक दरोडा तर औरंगाबाद जिल्ह्यातील वाळुंज येथे 2020 मध्ये तीन व 2019 मध्ये दरोड्याचे दोन गुन्हे दाखल आहेत.अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे व शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, गणेश इंगळे, उपनिरीक्षक सोपान गोरे, हवालदार सुनील चव्हाण, दत्ता हिनगडे, मनोहर गोसावी, संदीप पवार, दत्ता गव्हाणे, पोलीस नाईक शंकर चौधरी, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप दरंदले, कॉन्स्टेबल रवींद्र घुंगासे, आकाश काळे, सागर ससाणे, रोहित येमूल व चालक हवालदार बबन बेरड यांनी ही कारवाई केली.दरम्यान काल तीनही आरोपींना नेवासा न्यायालयात हजर केले असता त्यांना 17 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.


श्रीरामपूर प्रतिनिधी-शहरामध्ये गेल्या महिनाभरापासून वेगवेगळ्या भागांमध्ये दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वेगवेगळ्या भागातील कॉलन्यांमध्ये बाहेर उभ्या असलेल्या दुचाकींचे पेट्रोल चोरून नेण्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. पोलीस यंत्रणा मात्र या गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत असल्याने शहरवासियांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला सक्षम पोलीस अधिकारी नियुक्त करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.गेल्या महिनाभरात शहरातून मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहने चोरीला गेली आहेत. अगदी घरासमोरून गाड्या चोरून नेल्या जात आहेत. याबाबत पोलिसांत तक्रार दिल्यास तुम्ही सध्या तपास करा, शोधा, मग आमच्याकडे या, अशी उत्तरे दिली जातात. वॉर्ड नंबर 2 मध्ये तर एका महिलेने आपल्या घरासमोरून चोरीला गेलेली गाडी स्वतः शोधून काढली आणि श्रेय मात्र पोलिसांनी घेतले अशीही चर्चा आहे.माजी आ. स्व. जयंत ससाणे यांचे तत्कालिन स्वीय सहाय्यक सुभाष तोरणे यांची दुचाकी अशीच चोरीला गेली. तिचा अद्याप तपास लागलेला नाही. पत्रकार अनिल पांडे यांच्या दुचाकी चोरीचाही तपास लागला नाही. वॉर्ड नंबर 7 मध्ये एका घरासमोरून गेलेली दुचाकी सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसत असताना चोरटे अद्याप सापडलेले नाहीत.

दुसरीकडे मिल्लतनगरमध्ये असलम बिनसाद तसेच गुलाबभाई शेख यांच्या घरासमोरील गाड्यांमधून पेट्रोल चोरीला गेले आहे. फातेमा कॉलनी, मिल्लतनगर, संजयनगर परिसरातील अनेक घरांसमोरून गाड्यांतून पेट्रोल चोरून नेण्यात आले आहे. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. पेट्रोल चोरी करणारी मोठी टोळी श्रीरामपूरमध्ये कार्यरत असून त्याच्या जोडीला वॉर्ड नंबर दोन मधील धनगर वस्ती परिसरातील अनेक लोक पेट्रोल चोर्‍या करतात. पोलिसांनाही ते माहिती आहे. परंतु तडजोडीतून याकडे दुर्लक्ष केले जाते. यापूर्वी मोबाईल चोरीच्या घटना घडत होत्या. आता पेट्रोल चोरीच्या घटना वाढत आहेत.सर्वसामान्य माणसे आपली वाहने घराबाहेर लावतात. परंतु चोरटे त्यावर डल्ला मारतात. वरून पोलीस तपास होत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शहराच्या सर्वच भागात पोलिसांनी रात्रीची गस्त सुरू करावी. चोरट्यांशी संबंध असलेल्या पोलिसांच्या तातडीने बदल्या कराव्यात. जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी श्रीरामपुरात येऊन शांतता कमिटी तसेच प्रत्येक भागातील प्रमुख नागरिकांची बैठक घेऊन हे प्रश्न समजून घ्यावेत, अशी मागणी शहरातील त्रस्त नागरिकांनी केली आहे.


बेलापुर  (प्रतिनिधी  )-भारताचे पहिले सी डी एस जनरल बिपिन रावत, त्यांची धर्मपत्नी मधुलिका रावत व इतर अकरा लष्करी जवानांच्या अपघाती मृत्यूनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून, देशभर त्यांना आदरांजली अर्पण करण्यात येत आहे. बेलापुरातही ग्रामस्थ व पत्रकारांच्या वतीने हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.


येथील विजयस्तंभाजवळ सीडीएस जनरल बिपिन रावत यांचेसह सर्व हुतात्म्यांचे स्मरण करून आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी " अमर रहे! अमर रहे! बिपिन रावत अमर रहे! " अशा घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी जि प सदस्य शरद नवले, उपसरपंच अभिषेक खंडागळे, ज्येष्ठ पत्रकार देविदास देसाई आदिंनी श्रद्धांजलीपर शब्दसुमन वाहिले. 


यावेळी माजी पोलीस पाटील शिवाजी वाबळे, पोलिस नाईक गणेश भिंगारदे, पत्रकार सुहास शेलार, दिलीप दायमा, किशोर कदम, शकील शेख, गणेश आढाव, बेलापूर सोसायटीचे चेअरमन अनिल नाईक, श्रीरामपूर पंचायत समितीचे माजी उपसभापती संतोष कुऱ्हे, भास्कर बंगाळ, गणेश बंगाळ,शफीक आतार बाबा शेख बापू कुऱ्हे बाळासाहेब लगे नामदेव दुधाळ डाँक्टर रविंद्र गंगवाल अन्वर सय्यद, शफिक शेख, रावसाहेब अमोलिक, मच्छिंद्र खोसे, बाळासाहेब निकम, मोहन सोमाणी, संजय गोरे, महेश ओहोळ आदी उपस्थित होते.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget