दरोडे घालणारी गंगापूरची टोळी जेरबंद,तीन दिवसांची पोलीस कोठडी; नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणची कामगिरी.

अहमदनगर (प्रतिनिधी)-नेवासा तालुक्यातील कांगोणी येथील अलिकडेच पडलेल्या दरोड्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला मागील 15 दिवसांत नेवाशासह राहुरी व पाथर्डी तालुक्यातील वस्त्यांवर दरोडे टाकणारी तिघा सराईत दरोडेखोरांची टोळी जेरबंद केली आहे.याबाबत माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील शिंगणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कांगोणी येथे 5 डिसेंबर रोजी रात्री बबन जगन्नाथ बेल्हेकर यांच्या वस्तीवर अज्ञात चोरट्यांनी घराचा मागील दरवाजा तोडून आत प्रवेश करून त्यांना व त्यांच्या आईला चॉपर व चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 3 लाख 36 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. याबाबत शिंगणापूर पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला.सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी समांतर तपास करत असताना पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त खबर्‍याकडून हा गुन्हा आरोपी रवींद्र भोसले याने व त्याच्या साथीदारांनी केल्याची माहिती मिळाली. त्यामुळे स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने गंगापूर येथे जाऊन आरोपींचा शोध घेतला.आरोपी रवींद्र मुबारक भोसले रा. गंगापूर जि. औरंगाबाद यास ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेवून कसून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदार लखन चव्हाण, कुलथ्या भोसले व इतर साथीदारांनी मिळून केला असल्याची माहिती दिल्याने सदर माहितीच्या आधारे त्याच्या साथीदारांचा शोध घेऊन आरोपी नंबर उर्फ लखन प्रल्हाद चव्हाण रा. अंतापूर ता. गंगापूर जि. औरंगाबाद व कुलथ्या बंडू भोसले रा. बाबरगाव ता. गंगापूर यांना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे वरील गुन्ह्या व्यतिरिक्त आणखी कुठे गुन्हे केले याबाबत चौकशी केली असता त्यांनी मागील 15 दिवसांच्या कालावधीत नेवासा व राहुरी तालुक्यात प्रत्येकी दोन तर पाथर्डी तालुक्यात एक असे 5 ठिकाणी गुन्हे केल्याचे सांगितले.दुसरा आरोपी कुलथ्या बंडू भोसले याचेविरुद्ध अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे गेल्यावर्षी एक दरोडा तर औरंगाबाद जिल्ह्यातील वाळुंज येथे 2020 मध्ये तीन व 2019 मध्ये दरोड्याचे दोन गुन्हे दाखल आहेत.अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे व शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, गणेश इंगळे, उपनिरीक्षक सोपान गोरे, हवालदार सुनील चव्हाण, दत्ता हिनगडे, मनोहर गोसावी, संदीप पवार, दत्ता गव्हाणे, पोलीस नाईक शंकर चौधरी, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप दरंदले, कॉन्स्टेबल रवींद्र घुंगासे, आकाश काळे, सागर ससाणे, रोहित येमूल व चालक हवालदार बबन बेरड यांनी ही कारवाई केली.दरम्यान काल तीनही आरोपींना नेवासा न्यायालयात हजर केले असता त्यांना 17 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.


Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget