Latest Post

संगमनेर प्रतिनिधी-अज्ञात चोरट्याने डिटोनेटरच्या सहाय्याने एटीएम मशिन फोडून या मशिनमधील 3 लाख 17 हजार रुपयांची रोकड व 2 हजार रुपये किंमतीचा डिव्हीआर चोरुन नेल्याची घटना काल मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास तालुक्यातील समनापूर येथे घडली.समनापूर येथील राजेंद्र रोकडे यांच्या मालकीच्या गाळ्यामध्ये इंडीया वन लिमीटेड या कंपनीचे एटीएम मशिन आहे. अज्ञात चोरट्याने काल पहाटे डिटोनेटरचा स्फोट घडवून हे मशिन फोडले. या मशिनमधील रक्कम घेवून त्याने पोबारा केला. एटीएम मशिन फोडल्याबाबतची घटना सकाळी ग्रामस्थांच्या लक्षात आली. कामगार पोलीस पाटील गणेश शरमाळे यांनी या चोरीची माहिती शहर पोलीस ठाण्यात कळविली.या घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे हे घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून त्वरीत श्वान पथकाला व ठसे तज्ञाला पाचारण करण्यात आले. श्वान पथकाने चोरट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला अपयश आले. याबाबत धर्मेंद्र वर्मा यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा रजिस्टर नंबर 671/2021 भारतीय दंड संहिता 379, 427, भारी पदार्थ कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. जाने करत आहे.

श्रीरामपूर प्रतिनिधी-श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापती अखेर डॉ. वंदनाताई ज्ञानेश्वर मुरकुटे यांची निवड निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी अनिल पवार यांनी जाहीर करुन त्यांनी या पदाचा कार्यभार आ. लहू कानडे यांच्या उपस्थितीत स्वीकारला.श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापती निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी दि 18 नोव्हेंबर रोजी जाहीर केलेला होता. त्याप्रमाणे निवडणूकही घेतण्यात आली. मात्र न्यायालयाच्या आदेशान्वये हा निकाल राखीव ठेवण्यात आला होता. या विरोधात पंचायत समितीचे सदस्य दीपक पटारे यांनी उच्च न्यायालय औरंगाबाद येथे पिटीशन दाखल करून निवडणूक कार्यक्रमावर आक्षेप घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार ओबीसी आरक्षण हे क्षमतेपेक्षा अधिक असल्याने निकाल जाहीर करण्या संदर्भात स्थगिती मिळवली होती.तथापि औरंगाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधिश श्री. गंगापूरवाला व न्यायाधिश श्री. लढ्ढा यांच्यासमोर सदर अपीलात युक्तिवाद होऊन न्यायाधिशांनी सदर अपील फेटाळून लावत डॉ. वंदना मुरकुटे यांच्या सभापती पदाचा निकाल जाहीर करण्यासंदर्भात आदेश जिल्हाधिकार्‍यांना केले.जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिलेल्या आदेशान्वये निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अनिल पवार यांनी दु. 12 वाजता त्यांची निवड जाहीर केली. यावेळी प्रांताधिकारी अनिल पवार यांनी त्यांचा सत्कार केला. काल सायंकाळी डॉ. वंदना ज्ञानेश्वर मुरकुटे यांची श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापती निवड झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर आ. लहू कानडे यांच्या उपस्थितीत डॉ. वंदना मुरकुटे यांनी सभापतीपदाचा कार्यभार स्वीकारला.यावेळी ज्ञानेश्वर मुरकुटे, काँग्रेस तालुकाध्यक्ष अरुण नाईक, पंचायत समिती सदस्य विजय शिंदे, आदी उपस्थित होते. यावेळी पंचायत समितीच्या आवारात फटाक्यांची अतिषबाजी करत या निवडीचा जल्लोष करण्यात आला.


श्रीरामपूर-( प्रतिनिधी) आज दि.05/12/2021 रोजी सकाळी मोरगे वस्ती सदावर्ते हॉस्पिटल जवळ वार्ड नंबर 7 येथे बिबट्या आल्याची माहिती मिळताच Dy.s.p.संदीप मिटके यांनी पोलीस फौजफाट्यासह तसेच वनविभागiचे  सुवर्णा माने ( उपवनसंरक्षक) घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळविले.

आज सकाळी मोरगे वस्ती येथील सदावर्ते हॉस्पिटल जवळील असणाऱ्या लोकवस्तीत बिबट्या येऊन ऋषभ अंबादास निकाळजे नावाच्या बालकास जखमी केल्याची घटना घडली होती सदर घटनेचे प्रसंगावधान राखून Dy.s.p.संदीप मिटके यांनी नेहमीप्रमाणे आपल्या साहस व शौर्याची चुणूक दाखवत 


पोलीस,वनविभाग व तसेच स्थानिकांच्या मदतीने बिबट्यास जेरबंद केले.सदर बिबट्यास  जेरबंद करत असताना 8 व्यक्ती वर झडप घालून बिबट्या ने जखमी केले. पोलीस अधिकारी, अंमलदार, स्थानिक नागरिक व बिबट्या  यांच्यात झटापटी चा  सामना होऊन जवळ जवळ एक तासाच्या अथक परिश्रमानंतर बिबट्यास जेरबंद करण्यात यश मिळाले.   

                

  सदरच्या कारवाईने श्रीरामपूरiतील जनतेने सुटकेचा निश्वास टाकला असून Dy.s.p.संदीप मिटके, P.I. सानप, इतर पोलिस अधिकारी व अंमलदार, वनविभागiचे  सुवर्णा माने( उपवनसंरक्षक), प्रतिभा सोनवणे( वनक्षेत्रपाल) संगमनेर उपवन विभाग  रेस्क्यू टीम यांचे कौतुक करून आभार व्यक्त केले.



श्रीरामपूर (प्रतिनिधी) - राज्य निवडणूक आयोगामार्फत आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सालाबाद प्रमाणे एक जानेवारी दोन हजार बावीस रोजी अठरा वर्षे पूर्ण करणाऱ्या नविन मतदारांची नाव नोंदणी करण्याचे अभियान राज्यात सुरु आहे. श्रीरामपूर तालुक्यात प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील मधील मतदार नोंदणी जनजागृती कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाचे प्रमुख शकील बागवान तसेच संदीप पाळंदे यांनी आपल्या सहकार्‍यांसह तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती अभियान राबविल्याने अनेक मतदारांनी स्वयंप्रेरणेने मतदार नोंदणी करून घेतली आहे. या अभियानात गेल्या महिन्याभरामध्ये जवळपास दोन हजार नवीन मतदारांनी अर्ज भरून दिले असून या सर्वांची नोंदणी होणार आहे. मतदारांनी आपले अर्ज भरून दिले असून ते तपासून त्याला अंतिम स्वरूप देण्याचे काम तहसील कार्यालयामध्ये अगदी सुट्टीच्या दिवशी सुद्धा सुरू आहे.

मतदार नोंदणी जागृती अभियानाचा परिणाम म्हणून शहरातील तृतीयपंथी मतदारांनी आज स्वयंप्रेरणेने आपली नावे तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेकडे नोंदविली. तृतीयपंथीयांचे प्रमुख दिशा शेख यांच्या नेतृत्वाखाली अकरा मतदारांनी तहसील मध्ये येऊन आपले मतदान नोंदणीचे अर्ज भरून दिले. याकामी या कक्षाचे प्रमुख शकील बागवान तसेच निवडणूक शाखेचे संदीप पाळंदे यांनी सदर अर्ज भरून व स्वीकारून या नोंदणीसाठी अनमोल सहकार्य केले.

राज्य निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीची मुदत पाच डिसेंबर पर्यंत वाढविल्याने गेल्या आठवडाभरामध्ये तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेने मतदान नोंदणी अभियानासाठी जनजागृती मोहीम राबवली. त्याचे परिणाम स्वरूप शहर व तालुक्यात मोठ्या संख्येने नवीन मतदारांनी नोंदणी केली असून नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या भागातील स्थलांतरित झालेल्या मतदारांनी देखील आपले अर्ज भरून दिले आहेत. शनिवार रविवार या सुट्टीच्या दिवशी ही निवडणूक शाखेतील संदीप पाळंदे व त्यांचे सहकारी मतदार नोंदणीसाठी कार्यरत आहेत. प्रांताधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांनी अतिशय चांगल्या प्रकारे मतदार नोंदणी मोहीम मतदारांपर्यंत पोहोचून श्रीरामपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात हे अभियान यशस्वी केल्याबद्दल निवडणूक शाखेचे सर्वत्र कौतुक होत आहे.



 

श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती परिसरात सदावर्ते हॉस्पिटल रोड ला आता 10:15 ते 10:30 दरम्यान झाला बिबट्याचा हल्ला बिबट्याच्या हल्ल्यात एक महिला व पुरुष जखमी परिसरात लोक वस्तीत बिबट्या लापल्याची चर्चा नागरिकात भितिचे वातावरण.



दिव्यांग कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन.

अहमदनगर-  जागतिक अपंग दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेने गुणवंत दिव्यांग कर्मचारी पुरस्कार सोहळा गुरुवारी आयोजित केला होता. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. सौ. राजश्रीताई घुले ,उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, सार्वजनिक बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते सर ,अर्थ समितीचे सभापती सुनील गडाख ,कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अजय फटांगरे, महिला व बालकल्याण सभापती सौ.मीराताई शेटे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री राजेंद्र क्षीरसागर आदी मान्यवर  उपस्थित होते*

 *यावेळी दिव्यांग कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साहेबराव अनाप यांनी दिव्यांगांना आदर्श शिक्षक पुरस्कार व सभागृह मिळण्याची विनंती पदाधिकाऱ्यांना केली होती. यावेळी बोलताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. राजश्रीताई घुले यांनी संघटनेच्या मागणीवरून पद्मश्री पोपटराव पवार  यांचे उपस्थितीत दरवर्षी शिक्षक दिनाला एक आदर्श पुरस्कार दिव्यांग शिक्षकाला देण्याचा व जागतिक अपंग दिनी ३ डिसेंबरला छत्रपती शिवाजी महाराज सभागृह मोफत देण्याचा व राखून ठेवण्याचा शब्द दिला होता, तो काल जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पाळून दरवर्षी शिक्षक दिनाला एका दिव्यांग शिक्षकाला आदर्श पुरस्कार देणार व जिल्हा परिषदेचे सभागृह जागतिक अपंग दिनी मोफत व राखून ठेवण्याचा ठराव करून.. दोन मागण्या मंजूर केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद सर्व पदाधिकारी व अधिकारी यांचे  अभिनंदनाचा ठराव मंजूर केला ."बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले" या उक्ती प्रमाणे अध्यक्षा  राजश्रीताई  घुले यांनी जो शब्द सभागृहात दिला होता, तो तात्काळ दुसऱ्या दिवशी पाळून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव पारित केला,अशी माहिती कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साहेबराव अनाप यांनी दिली.*

 *या मागण्या मंजूर झाल्याबद्दल जिल्ह्यातील सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे .यापूर्वीही सर्व पदाधिकाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी दिव्यांग कर्मचारी संघटनेला सहानुभूतीपूर्वक सहकार्य केले आहे.राज्यात प्रथमच 39 दिव्यांग कर्मचाऱ्यांना मुख्याध्यापकाचे प्रमोशन दिले, त्याप्रमाणे 180 प्राथमिक शिक्षकांचे वाहन भत्त्यांचे प्रस्ताव फरकास मंजूर केले, याबद्दलही संघटनेच्या बैठकीत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली*

*यावेळी संघटनेचे मार्गदर्शक दत्तात्रय जपे, राज्य सहकोषाध्यक्ष संतोष सरवदे, राजू आव्हाड, पोपट धामणे, राजेंद्र औटी ,रमेश शिंदे, उद्धव थोरात,बन्सी गुंड, साहेबराव मले, श्रीकांत दळवी, संजय बोरसे,गजानन मुंडलिक,अमोल चन्ने,महिंद्रा कोळी, दादासाहेब गव्हाणे, अजय लगड,चरणसिंग काकरवाल, भिमराज चव्हाण,राजेंद्र ठूबे, खंडू बाचकर,किरण माने आदी पदाधिकारी उपस्थित होते.



बेलापुर  (प्रतिनिधी  )-जिल्हा परिषद. प्राथमिक शाळेचा इयत्ता पाचवी स्काँलरशिप परिक्षेचा निकाल ८०% लागला असुन रिध्दी काळे हीने प्रथम क्रमांक  मिळवीला आहे                बेलापुर जिल्हा परिषद मराठी शाळेचा इयत्ता पाचवी परिक्षेचा स्काँलरशिप परिक्षेचा निकाल चांगला लागला आहे असा उत्कृष्ट निकाल लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. रिद्धी रवींद्र काळे ह्या विद्यार्थीनीने ३००पैकी २१८ गुण संपादन करून शाळेत प्रथम क्रमांक मिळविला. त्याच प्रमाणे रोशनी दिलावर सय्यद, अक्षदा ज्ञानेश्वर गांगुर्डे आणि आरुषी अंबादास मोरे ह्या विद्यार्थीनी उत्तम गुणासह सदर परीक्षेत पात्र ठरल्या.पाचवी च्या वर्ग शिक्षिका श्रीमती सुरेखा दत्तात्रय सोनवणे यांनी लाँकडाऊनच्या  काळातही गृहभेट, वैयक्तिक मार्गदर्शन, गट अध्यापन, ऑनलाईन अध्यापन.. इ. सर्व प्रयत्न केले. विस्तार अधिकारी संजीवन दिवे , विस्तार अधिकारी मंदा दुर्गुडे  आणि मुख्याध्यापिका सुरेखा लोंढे  यांनी वेळोवेळी बहुमोल मार्गदर्शन केले. तसेच शाळेच्या दहीवळ विजया, बनसोडे लता, गायकवाड शीतल आणि परदेशी लता यांचेही मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

श्रीरामपूर तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी सामलेटी साईलता  केंद्रप्रमुख किशोर निळे  आणि केंद्रप्रमुख राजाबाई कांबळे जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी बेलापूर बुद्रुक मुली शाळेचे हार्दिक अभिनंदन केले.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget