श्रीरामपूर तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी सामलेटी साईलता केंद्रप्रमुख किशोर निळे आणि केंद्रप्रमुख राजाबाई कांबळे जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी बेलापूर बुद्रुक मुली शाळेचे हार्दिक अभिनंदन केले.
बेलापुर जि प शाळेचा इयत्ता पाचवीचा स्काँलरशिप परिक्षेचा निकाल ८०%.
बेलापुर (प्रतिनिधी )-जिल्हा परिषद. प्राथमिक शाळेचा इयत्ता पाचवी स्काँलरशिप परिक्षेचा निकाल ८०% लागला असुन रिध्दी काळे हीने प्रथम क्रमांक मिळवीला आहे बेलापुर जिल्हा परिषद मराठी शाळेचा इयत्ता पाचवी परिक्षेचा स्काँलरशिप परिक्षेचा निकाल चांगला लागला आहे असा उत्कृष्ट निकाल लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. रिद्धी रवींद्र काळे ह्या विद्यार्थीनीने ३००पैकी २१८ गुण संपादन करून शाळेत प्रथम क्रमांक मिळविला. त्याच प्रमाणे रोशनी दिलावर सय्यद, अक्षदा ज्ञानेश्वर गांगुर्डे आणि आरुषी अंबादास मोरे ह्या विद्यार्थीनी उत्तम गुणासह सदर परीक्षेत पात्र ठरल्या.पाचवी च्या वर्ग शिक्षिका श्रीमती सुरेखा दत्तात्रय सोनवणे यांनी लाँकडाऊनच्या काळातही गृहभेट, वैयक्तिक मार्गदर्शन, गट अध्यापन, ऑनलाईन अध्यापन.. इ. सर्व प्रयत्न केले. विस्तार अधिकारी संजीवन दिवे , विस्तार अधिकारी मंदा दुर्गुडे आणि मुख्याध्यापिका सुरेखा लोंढे यांनी वेळोवेळी बहुमोल मार्गदर्शन केले. तसेच शाळेच्या दहीवळ विजया, बनसोडे लता, गायकवाड शीतल आणि परदेशी लता यांचेही मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
Post a Comment