Latest Post

राहुरी प्रतिनिधी- राहुरी येथे नगर मनमाड राज्य महामार्गावर आज शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते. मात्र पोलिस प्रशासनाने दंडूकेशाहीचा वापर करून आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू करताच काही कार्यकर्त्यांनी धूम ठोकली. दिवसभर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू होती.

       प्रहारचे तालुकाध्यक्ष सुरेश लांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक २ डिसेंबर रोजी सकाळी नगर मनमाड राज्य महामार्गावर बाजार समिती समोर चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते. शेती पंपाची वीज बील वसूली ताबडतोब बंद करून शेतकऱ्यांचे विजबिल माफ करावे. अशा मागण्या आंदोलन कर्त्यांनी केल्या होत्या. आंदोलन सुरू होऊन पंधरा मिनिटे झाली होती. पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे हे घटनास्थळी दाखल होताच पोलिस फौजफाट्याने धाक दडपशाहीने कार्यकर्त्याची धरपकड सुरू केली. त्यामुळे काही कार्यकर्त्यांनी धूम ठोकली. तर काही कार्यकर्त्यांची उचल बांगडी करून ताब्यात घेतले. यावेळी पोलिस प्रशासन व कार्यकर्त्यांची चांगलीच झटापट झाली. यामध्ये पोलिस वाहनाची खिडकीची काच फोडण्यात आली. पोलिस प्रशासना विरोधात जबरदस्त घोषनाबाजी करण्यात आली. यावेळी पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक तुषार धाकराव, मधुकर शिंदे तसेच इतर मोठ्या प्रमाणावर पोलिस फौजफाटा उपस्थित होता. 


         त्यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलिस प्रशासनाने हे आंदोलन दडपशाहीने धुळीस मिळवले. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची दिवसभर धरपकड सुरू होती. तर प्रहार संघटना, आरपीआय व वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी झाली होती. 

        यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद परदेशी, तालुकाध्यक्ष सुरेश लांबे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अनिल जाधव, शहराध्यक्ष पिंटू नाना साळवे, आरपीआयचे जिल्हा नेते बाळासाहेब जाधव, तालुकाध्यक्ष विलासनाना साळवे, लहानु तमनार, एकलव्य संघटनेचे नामदेव पवार आदि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. याबाबत दुपारी उशिरापर्यंत पोलिस प्रशासनाची कारवाई सुरू होती.



श्रीरामपूर (प्रतिनिधी) - शहरातील नागरिकांच्या आरोग्यप्रश्नी तथा घनकचरा व्यावस्थापन ढिसाळ कारभाराबाबतीत समाजवादी पार्टी तर्फे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार आणि कार्यकर्त्यांच्या वतीने नगर पालिका मुख्याध्याकाऱ्यांना निवेदन देण्यात आले,या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, शहरात स्वच्छता रहावी याकरीता श्रीरामपूर नगर पालिकेमार्फत पुणे येथील मे.दिशा एजन्सी यांना शहरातील घनकचरा व्यवस्थापचा ठेका देण्यात आलेला आहे,सदरील एजन्सीने शहरातील घनकचरा हा दैनंदिन तथा नियमितपणे साफ करावयाचा असून कामात कुठलीही कुचराई करावयाची नसून जर असे आढळून आल्यास सदरील एजन्सीवर दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार हा संबंधित नगर पालिका प्रशासनास आहे,मात्र इतके नियम असताना सदरील एजन्सीने कामात कुचराई केलेली आहे, यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याने समाजवादी पार्टीतर्फे श्रीरामपूर नगर पालिका प्रशासन आणि घनकचरा व्यवस्थापनाविरुद्ध दिनांक ३० सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०२१ असे सलग ५ दिवस आमरण उपोषण करुन शहरातील अस्वच्छतेबाबत संबधितांचे लक्ष वेधले असता संबंधित एजंन्सीने कामात कुचराई केली म्हणून नगर पालिका प्रशासनाकडून संबंधित एजन्सीला माहे सप्टेंबर २०२१ या केवळ एक महिन्याच्या कालावधीत कामात केलेल्या कसूराबाबत रुपये ७५०००/- (अक्षरी रुपये पंचाहत्तर हजार मात्र) दंड ठोठावला आहे, ही बाब अभिनंदनीय आहे,मात्र शहरातील अस्वच्छतेच्या गंभीर प्रश्नांमुळे सदरील नगर पालिका प्रशासनास तोंडी सांगुन तथा वेळोवेळी शेकडो निवेदने देऊन काहीच उपयोग झालेला नसल्याने समाजवादी पार्टीस शेवटी उपोषणाचा मार्ग स्विकारावा लागला हे शहरवासियांचे दुर्दैवच म्हणावे लागेल,महत्वाचे म्हणजे सदरील एजन्सीला माहे सप्टेंबर २०२१ या केवळ एक महिना कामाच्या कुचराईबाबत दंड ठोठावण्यात आला आहे,हे जरी सत्य असले तरी संबंधित एजन्सीने शहरातील घनकचऱ्याचा ठेका घेतल्यापासूनच शहरातील स्वच्छतेकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केलेले आहे हे नाकारुन चालणार नाही,कारण शहरातील अस्वच्छतेबाबत शहरातील अनेक नागरीकांच्या तक्रारी होत्या व आहेत मग त्यांच्या तक्रारी नुसार संबंधित ठेकेदारास कोणत्याही प्रकारचा दंड आकारण्यात आल्याचे दिसून येत नाही,आणि जर यामागे दंड आकारण्यात आला असेलतर त्याचाही खुलासाही करण्यात आलेला नाही, दुसरे असे की, शहरातील अस्वच्छतेबाबत जेव्हा समाजवादी पार्टीतर्फे सलग ५ दिवस आमरण उपोषण करण्यात आले तेव्हा कुठे श्रीरामपूर नगर पालिका प्रशासनाने मनावर घेत संबंधित एजंन्सीस ७५०००/- रुपयांचा दंड ठोठावला,मात्र संबंधित एजंन्सीस ठोठावण्यात आलेला दंड हा कोणत्या तक्रारीच्या आधारे ठोठावला गेला ?, सदरील कामाबाबत श्रीरामपूर नगर पालिका कर्मचारी, अधिकारी प्रत्येक्ष शहरात जागो जागी फिरुन प्रत्येक्षात कोणी शहानिशा केली आहे काय ? कोणता रिपोर्ट दिला आहे ?, काय निष्कर्ष काढले आहे ?, की कार्यालयात बसुनच केवळ तक्रारीच्या आधारावर सदरील दंड ठोठावण्यात आला आहे ? याचाही खुलासा करण्यात आलेला नाही,सोबतच जर शहरातील घनकचऱ्याचा ठेका घेतल्यापासूनच संबंधित एजंन्सीने आपल्या कामांबाबत उदासिनता दाखवून आपले कामे आणि कर्तव्यात कसुर केलेला आहे,कारण त्याबाबत पुरावा म्हणून श्रीरामपूर नगर पालिका कार्यालयात नागरीकांच्या याबाबत शेकडो तक्रारी पडून आहेतच तर मग संबंधित एजंन्सीस केवळ माहे सप्टेंबर २०२१ या केवळ एकाच महिन्याचा दंड का आकारण्यात आला,दरमहिन्याचा दंड आकारणे का नगर पालिका प्रशासनास सुचले नाही ?, यामुळे सदरील नगर पालिका प्रशासन हे ठेकेदारास पाठीशी तर घालत नाही ना ? असा संशय बळावत आहे,वास्तविक पहाता संबंधित एजंन्सीने जर ठेका घेतल्या पासूनच कामात कसूर केलेला आहे तर दंड केवळ एकाच महिन्याचा का ?, हे अयोग्य आणी संबंधित एजंन्सीला पाठीशी घातले जात असल्याचे जाणवत आहे, श्रीरामपूर नगर पालिका प्रशासनाचा जर खरोखरच पारदर्शी कारभार आहे तर मग संबंधित एजंन्सीने ठेका घेतल्यापासून ते आजवर दर महिन्याला त्यांनी केलेल्या कामातील अनियमितता आणि कुचराईपोटी दंड आकारण्यात यायला हवा होता,मात्र असे निदर्शनास येत नाही असेही या निवेदनात म्हटले आहे,तसेच संबंधित एजंन्सीने सदरील ठेका घेतल्यापासून ते आजवर केलेल्या कामातील अनियमितपणा आणी कुचराई पोटी प्रत्येक महिना दंड आकारणी करण्यात यावी, शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा ज्वलंत प्रश्न असल्याने यापुढे शहरातील अस्वच्छतेप्रश्नी संबंधित एजंन्सीस दक्षता बाळगण्याची सुचना देण्यात यावी आणि येत्या आठ दिवसांत याबाबत काय निर्णय घेण्यात आला,याची आम्हास माहिती देण्यात यावी.अन्यथा याविरोधात श्रीरामपूर नगर पालिका कार्यालयासमोर आत्मकलेश आंदोलन आणि आमरण उपोषणाचा मार्ग स्विकारला जाईल असेही निवेदनात शेवटी नमुद करण्यात आले आहे.या निवेदनावर जोएफ जमादार,आसिफ तांबोळी, अय्यूब पठान, अब्दुल सैय्यद, मतीन शेख,बादल सिंग जूनी, ईमरान शेख, अरबाज़ कुरैशी, मुबसशीर पठान, ज़करिया सैय्यद, अल्तमश शेख,अमन ईनामदार, फैजान सैय्यद,परवेज़ शेख,आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-बेलापुर येथील अल्पवयीन मुलीस फूस लावुन पळवुन  नेवुन लैंगिक शोषण केल्याप्रकरणी एका जणा विरुध्द श्रीरामपुर पोलीसांनी गुन्हा दाखल केला असुन आरोपीस अटक करण्यात आली आहे       बेलापुर ऐनतपुर येथील एका अल्पवयीन मुलीस असलम मंजुर शेख याने आठ दिवसापूर्वी फूस लावून पळवुन नेले होते त्या बाबत बेलापुर पोलीसांनी भादवि कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता सदर मुलगी ही देहरे येथे असल्याचे समजताच पोलीस त्या ठिकाणी पोहोचले नातेवाईकांनी त्या मुलीस पोलीसांच्या स्वाधीन केले त्यानंतर पोलीसांनी पळवुन नेणारा असलम शेख यास ताब्यात घेतले त्यानंतर पहील्या दाखल गुन्ह्यात भादवि कलम 376 बाल लैंगिक अत्याचार पोस्को आदि वाढीव कलम लावण्यात आले असुन पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक गणेश भिंगारदे रामेश्वर ढोकणे निखील तमनर पोपट  भोईटे हरीष पानसंबळ यांनी त्या मुलीचा शोध घेवुन तीला ताब्यात घेतले त्या नंतर काही वेळाने  पळवुन नेणारा असलम शेख यास ताब्यात घेण्यात आले असुन त्यास अटक करण्यात आली आहे पुढील तपास  पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सापोनि विठ्ठल पाटील हवालदार लोटके करत आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- संक्रापुर तालुका राहुरी येथील तमाशा कलावंत शाहीर संभाजीराव जाधव यांच्या मुलांनी  तयार केलेल्या" वायली" या लघुपटास गोवा शाँर्ट फिल्म फेस्टिवल 2021 चा सर्वोत्कृष्ट मराठी लघुपट पुरस्कार मिळाला असुन ग्रामीण भागातील कलाकारांचे सर्वत्र कौतुक होत आहे  


प्रणव वाणी यांनी दिग्दर्शित केलेल्या वायली लघुपटास गोवा शॉर्ट फिल्म फेस्टिव्हमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी लघुपट पुरस्कार नुकताच मिळाला आहे या लघुपटात

ग्रामीण भागातील कौटुंबिक समस्या मांडल्या आहेत. कौटुंबिक वाद आणि आपापल्या पालकांमधील मतभेद झालेले मनभेद तसेच या वादाचा दोन चुलत भावांच्या सुंदर नात्यावर कसा परिणाम होतो हे हृदयस्पर्शी चित्र लघुपटमध्ये दाखवले आहे.

   वायली लघुपटाचे कथा लेखन स्वतः प्रणव वाणी यांनी आणि पटकथा लेखन शुभम वाणी यांनी केले होते लघुपटाची निर्मिती प्रा. मोहन वाणी यांनी केली. कॅमेरामन म्हणून  सुखदेव आढाव यांनी काम केले या लघुपटास सत्यजित सराफ यांनी संगीत दिले आहे.

या लघुपटाची निवड लंडन, मध्यप्रदेश, पुणे व इतर ठिकाणी झाली आहे. या लघुपटात संजय जाधव, रवींद्र जाधव शशिकला जाधव, सिंड्रेला परेरा, यांची प्रमुख भूमिका आहे. तसेच सत्यजित थेटे, पार्थ शेळके या बाल कलाकरांनी भूमिका साकारली आहे. सुप्रसिद्ध तमाशा कलावंत शाहीर संभाजी जाधव याच्या मार्गदर्शनाखाली या कलाकारांनी ही शाँर्टफिल्म तयार केली होती या कामी संभाजी गायकर यांचीही मोलाची मदत मिळाली  ग्रामिण भागातील कलाकारांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल

माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, खा. डॉ. सुजयदादा विखे पाटील अखिल भारतीय तमाशा परिषदेचे अध्यक्ष प्रसिद्ध तमाशा फडमालक रघुवीर खेडकर तसेच सांक्रापुरचे सरपंच रामा पांढरे यांनी अभिनंदन केले.

ग्रामिण भागातील कलाकारांनी तयार केलेल्या वायली लघुपटास मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्व कलाकारांचे कौतुक होत आहे.



बेलापूर ( प्रतिनिधी ) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डाँक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान हे जगातील सर्वोत्कृष्ट राष्ट्रग्रंथ असल्याचे उद़्गार बेलापुर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख डाँक्टर बी एन पवार यांनी काढले.बेलापुर एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने "भारतीय संविधान दिन" संपन्न करण्यात आला त्या वेळी  ते बोलत होते.भारतीय राज्यघटनेचा इतिहास त्यांनी  विशद करुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तुत्वावर प्रकाश टाकला.या लोकशाही समाज व्यवस्थेत न्याय,समता,स्वातंत्र,बंधुता ही मुल्य प्रवर्धित करुन ही राज्यघटना डॉ.आंबेडकर यांनी जनतेप्रती अर्पण केली आहे. सर्व जाती, धर्म, भाषा ,पंथ यांना मार्गदर्शक ठरावा असा एकमेव ग्रंथआहे . हे भारतीय संविधान देशातील सर्वात लहान संस्था गाव पातळीवरील ग्रामपंचायत ते देशाची सर्वोच्च संस्था संसद ,न्यायपालिका ,प्रसारमाध्यमे यांच्यासह प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाला मार्गदर्शन करते .26 नोव्हेंबर 1949 ला संविधान स्वीकार करून 26 जानेवारी 1950 पासून भारतीय संविधानाचा अंमलबजावणी करण्यात आली. सार्वभौम समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य ,न्याय ,स्वातंत्र्य ,बंधुता याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले आहे. कलम 14 ते 18 समानतेचा हक्क ,कलम 19 ते 22 स्वातंत्र्याचा हक्क ,कलम 23 ते 24 शोषणाविरुद्ध हक्क, कलम 25 ते 28 धर्मस्वातंत्र्याचा हक्क ,कलम 29 ते 31 सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, कलम 32 ते 35 उपायोजनांचा हक्क या बाबी आहेत आपण सर्वांनी संविधान वाचावे तसेच,भारतीय संविधानाचे प्रचारक व प्रसारक व्हावे असेही त्यांनी सांगितले.यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ गुंफा कोकाटे यांच्या हस्ते  भारतीय संविधान व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले  .महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनींनी स्वच्छता मोहिम यशस्वीपणे पार पाडली.कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी  प्रा.चंद्रकांत कोतकर ,सहकार्यक्रम अधिकारी प्रा.रुपाली उंडे यांनी केले.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापक इतर सेवक वृंद यांनी परिश्रम घेतले.


बेलापुर  (प्रतिनिधी  )- बेलापुरच्या सुजाण नागरीकांनी बहुमताने गांवकरी मंडळाच्या ताब्यात सत्ता दिली आता गावाचा विकास करण्याची जबाबदारी आमची आहे त्यामुळे आता गावाच्या विकासालाच प्राधान्य देणार असल्याचे मत जि प सदस्य शरद नवले यांनी व्यक्त केले.  दरवर्षी प्रमाणे गणपती गल्ली बेलापुर येथे अंगारकी चतुर्थी निमित्त ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सत्कार व महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या वेळी सत्काराला उत्तर देताना नवले बोलत होते या वेळी सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे  दिलीप काळे पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब तोरणे माजी सरपंच भरत साळूंके सुनील मुथा  रणजीत श्रीगोड डाँक्टर सुधीर काळे आदिंनी मनोगत व्यक्त केले या वेळी मंडळाचे संस्थापक कै .मनोज श्रीगोड  यांना अदरांजली  अर्पण करण्यात आली  त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रम यशस्वीतेसाठी लोकमान्य मंडळाचे उपेंद्र कुलकर्णी सतीश काळे डाँक्टर सुधीर काळे योगेश शिंदे राजु काळे रघुनाथ वाघ शशिकांत औटी भगीरथ मुंडलीक राजु सुर्यवंशी आदिंसह लोकमान्य महीला मंचच्या महीलांनी विशेष परिश्रम घेतले या वेळी जनता अघाडीचे नेते आबासाहेब नवले रविंद्र खटोड प्रफुल्ल डावरे राजाभाऊ काळे योगेश दायमाप्रभात कुऱ्हे समर्थ शिंदे विनीत दायमा आभिषेक बैरागी सुभाष अमोलीक  हरिप्रसाद मंत्री बाबुलाल मंत्री सुनिल डाकले प्रसाद कुलकर्णी रवि कडू मुस्ताक शेख प्रंशात मुंडलीक योगेश दायमा किशोर खरोटे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपेंद्र कुलकर्णी यांनी केले तर किरण बैरागी यांनी आभार मानले.


शिर्डी (प्रतिनिधी)-7 ऑक्टोबर 2021 पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनाकरिता खुले करण्यात आलेले असून करोनाच्या पार्श्वभुमीवर संस्थानचे श्री साईप्रसादालय बंद ठेवण्यात आलेले होते. संस्थानच्यावतीने श्री साईप्रसादालय व लाडू प्रसाद वाटप सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करण्यात आला होता. या प्रस्तावास जिल्हाधिकारी यांची परवानगी मिळाली असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानायत यांनी दिली. 26 नोव्हेंबर 2021 पासून श्री साईप्रसादालय भाविकांना प्रसाद भोजनाकरिता सुरु करण्यात येणार असल्याची माहिती श्रीमती बानायत यांनी दिली.श्रीमती बानायत म्हणाल्या, जगभरात, देश व राज्यात आलेल्या करोना व्हायरसच्या संकटामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाच्यावतीने दिनांक 05 एप्रिल 2021 पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलेले होते. पुन्हा राज्य शासनाने दिनांक 07 ऑक्टोंबर 2021 पासून काही अटी शर्तीवर धार्मिकस्थळे खुले करण्याचे आदेश दिलेले होते. त्यानुसार श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आलेले आहे. परंतु अहमदनगर जिल्ह्यातील कोविड रुग्णांची संख्या लक्षात घेऊन संस्थानचे श्री साईप्रसादालय व भाविकांना लाडू वाटप बंद ठेवण्याबाबात जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन शाखा, अहमदनगर यांनी आदेश पारित केलेले होते.मात्र साईभक्त व शिर्डी ग्रामस्थ यांच्याकडून श्री साईप्रसादालय सुरु करण्याबाबत वारंवार मागणी होत होती. त्यानुसार संस्थानच्यावतीने दिनांक 08 नोव्हेंबर 2021 व दिनांक 23 नोव्हेंबर 2021 रोजी जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता. त्या प्रस्तावास अनुसरुन दिनांक 23 नोव्हेंबर 2021 रोजी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येवुन भाविकांसाठी श्री साईप्रसादालय व लाडु प्रसाद वाटपास काही अटी शर्तीवर परवानगी देण्यात आलेली आहे.उद्या शुक्रवार 26 नोव्हेंबर 2021 पासून श्री साईप्रसादालय भाविकांना प्रसाद भोजनाकरीता सुरु करण्यात येणार असून सर्व साईभक्तांनी कोवीड-19 च्या नियमांचे पालन करुन प्रसाद भोजनाचा लाभ घ्यावा. तसेच सर्व साईभक्तांनी व ग्रामस्थांनी संस्थानला सहकार्य करावे, असे आवाहन श्रीमती बानायत यांनी केले.



MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget