बेलापूर ( प्रतिनिधी ) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डाँक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान हे जगातील सर्वोत्कृष्ट राष्ट्रग्रंथ असल्याचे उद़्गार बेलापुर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख डाँक्टर बी एन पवार यांनी काढले.बेलापुर एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने "भारतीय संविधान दिन" संपन्न करण्यात आला त्या वेळी ते बोलत होते.भारतीय राज्यघटनेचा इतिहास त्यांनी विशद करुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तुत्वावर प्रकाश टाकला.या लोकशाही समाज व्यवस्थेत न्याय,समता,स्वातंत्र,बंधुता ही मुल्य प्रवर्धित करुन ही राज्यघटना डॉ.आंबेडकर यांनी जनतेप्रती अर्पण केली आहे. सर्व जाती, धर्म, भाषा ,पंथ यांना मार्गदर्शक ठरावा असा एकमेव ग्रंथआहे . हे भारतीय संविधान देशातील सर्वात लहान संस्था गाव पातळीवरील ग्रामपंचायत ते देशाची सर्वोच्च संस्था संसद ,न्यायपालिका ,प्रसारमाध्यमे यांच्यासह प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाला मार्गदर्शन करते .26 नोव्हेंबर 1949 ला संविधान स्वीकार करून 26 जानेवारी 1950 पासून भारतीय संविधानाचा अंमलबजावणी करण्यात आली. सार्वभौम समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य ,न्याय ,स्वातंत्र्य ,बंधुता याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले आहे. कलम 14 ते 18 समानतेचा हक्क ,कलम 19 ते 22 स्वातंत्र्याचा हक्क ,कलम 23 ते 24 शोषणाविरुद्ध हक्क, कलम 25 ते 28 धर्मस्वातंत्र्याचा हक्क ,कलम 29 ते 31 सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, कलम 32 ते 35 उपायोजनांचा हक्क या बाबी आहेत आपण सर्वांनी संविधान वाचावे तसेच,भारतीय संविधानाचे प्रचारक व प्रसारक व्हावे असेही त्यांनी सांगितले.यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ गुंफा कोकाटे यांच्या हस्ते भारतीय संविधान व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले .महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनींनी स्वच्छता मोहिम यशस्वीपणे पार पाडली.कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा.चंद्रकांत कोतकर ,सहकार्यक्रम अधिकारी प्रा.रुपाली उंडे यांनी केले.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापक इतर सेवक वृंद यांनी परिश्रम घेतले.
Post a Comment