प्रणव वाणी यांनी दिग्दर्शित केलेल्या वायली लघुपटास गोवा शॉर्ट फिल्म फेस्टिव्हमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी लघुपट पुरस्कार नुकताच मिळाला आहे या लघुपटात
ग्रामीण भागातील कौटुंबिक समस्या मांडल्या आहेत. कौटुंबिक वाद आणि आपापल्या पालकांमधील मतभेद झालेले मनभेद तसेच या वादाचा दोन चुलत भावांच्या सुंदर नात्यावर कसा परिणाम होतो हे हृदयस्पर्शी चित्र लघुपटमध्ये दाखवले आहे.
वायली लघुपटाचे कथा लेखन स्वतः प्रणव वाणी यांनी आणि पटकथा लेखन शुभम वाणी यांनी केले होते लघुपटाची निर्मिती प्रा. मोहन वाणी यांनी केली. कॅमेरामन म्हणून सुखदेव आढाव यांनी काम केले या लघुपटास सत्यजित सराफ यांनी संगीत दिले आहे.
या लघुपटाची निवड लंडन, मध्यप्रदेश, पुणे व इतर ठिकाणी झाली आहे. या लघुपटात संजय जाधव, रवींद्र जाधव शशिकला जाधव, सिंड्रेला परेरा, यांची प्रमुख भूमिका आहे. तसेच सत्यजित थेटे, पार्थ शेळके या बाल कलाकरांनी भूमिका साकारली आहे. सुप्रसिद्ध तमाशा कलावंत शाहीर संभाजी जाधव याच्या मार्गदर्शनाखाली या कलाकारांनी ही शाँर्टफिल्म तयार केली होती या कामी संभाजी गायकर यांचीही मोलाची मदत मिळाली ग्रामिण भागातील कलाकारांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल
माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, खा. डॉ. सुजयदादा विखे पाटील अखिल भारतीय तमाशा परिषदेचे अध्यक्ष प्रसिद्ध तमाशा फडमालक रघुवीर खेडकर तसेच सांक्रापुरचे सरपंच रामा पांढरे यांनी अभिनंदन केले.
ग्रामिण भागातील कलाकारांनी तयार केलेल्या वायली लघुपटास मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्व कलाकारांचे कौतुक होत आहे.
Post a Comment