बेलापुर (प्रतिनिधी )-बेलापुर येथील अल्पवयीन मुलीस फूस लावुन पळवुन नेवुन लैंगिक शोषण केल्याप्रकरणी एका जणा विरुध्द श्रीरामपुर पोलीसांनी गुन्हा दाखल केला असुन आरोपीस अटक करण्यात आली आहे बेलापुर ऐनतपुर येथील एका अल्पवयीन मुलीस असलम मंजुर शेख याने आठ दिवसापूर्वी फूस लावून पळवुन नेले होते त्या बाबत बेलापुर पोलीसांनी भादवि कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता सदर मुलगी ही देहरे येथे असल्याचे समजताच पोलीस त्या ठिकाणी पोहोचले नातेवाईकांनी त्या मुलीस पोलीसांच्या स्वाधीन केले त्यानंतर पोलीसांनी पळवुन नेणारा असलम शेख यास ताब्यात घेतले त्यानंतर पहील्या दाखल गुन्ह्यात भादवि कलम 376 बाल लैंगिक अत्याचार पोस्को आदि वाढीव कलम लावण्यात आले असुन पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक गणेश भिंगारदे रामेश्वर ढोकणे निखील तमनर पोपट भोईटे हरीष पानसंबळ यांनी त्या मुलीचा शोध घेवुन तीला ताब्यात घेतले त्या नंतर काही वेळाने पळवुन नेणारा असलम शेख यास ताब्यात घेण्यात आले असुन त्यास अटक करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सापोनि विठ्ठल पाटील हवालदार लोटके करत आहे.
Post a Comment