Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी  )-अनेकाच्या जिवन प्रवासात साथ देणारी लालपरी अर्थात एसटी बसचे अस्तित्व धोक्यात आले असुन एसटी महामंडळ डबघाईस येण्यास कोण जबाबदार ?असा सवाल प्रवासी संघटनेचे रणजीत श्रीगोड यांनी केला आहे          या बाबत बोलताना श्रीगोड म्हणाले की अनेकाचे प्रपच भवितव्य हे एसटी बसवर अवलंबुन आहे

एस टी महामंडळ राज्याची जीवन वाहिनी आहे त्यावर सर्वजण अवलंबून असतो असा कोणी नाही की  त्याने एस टी मधून प्रवास केला नाही एस टी मुळे ग्रामीण भागातील मुले व मुली सवलतीमुळे शिकले आज ते शासनात मोठे अधिकारी व पुढारी बनले 1948 नंतर  प्रथमच एसटी महामंडळाची इतकी वाईट अवस्था झाली आहे एस टीच्या आर्थिक परिस्थिती सुधारणा व्हावी असे कुणालाच वाटत नाही  युती काळातील  विरोधीपक्ष नेत्यांनी   विधान सभेतील 7 वा आयोग देण्याची   भाषणे ठोकली होती  त्यावेळी सत्तारूढ पक्षातील लोकप्रतिनिधी गप्प होतें त्यावेळी  एस  टी विषयी पुळका दाखविणारे आज मंत्री आहेत कर्मचारी आत्महत्या करीत असताना ते गप्प आहेत म्हणजे महाविकास आघाडी चे लोकप्रतिनिधी डोळ्यास पट्टी बांधून बसले आहे शेतकरी आत्महत्या आपण पहात आलो आता एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत या घटनेस जबाबदार कोण आहे याचे मंथन करण्याची वेळ आलेली आहे एसटी महामंडळावर त्यांच्या कर्मचाऱ्यांवर अशी वेळ का यावी हे एक कोडेच आहे    यात एकच दिसून येते की एस टी जिवंत राहावी असे कोणालाच वाटत नाही  एस टी बंद  पडली तर  गरीब प्रवासी  विद्यार्थी यांचे मोठे नुकसान होणार आहे  मी या निमित्ताने विंनती करतो की अजूनही वेळ आहे  प्रवासी व अधिकारी सेवक यांनी संघटित होऊन जनशक्तीचा दबाव गट तयार करण्याची गरज आहे  अनावश्यक होणारी उधळपट्टी ला प्रशासनाने विरोध करण्याचे धाडस दाखविले पाहिजे अपघात सहायत्ता  विश्वस्त योजना कारभार पारदर्शक करावा  500 कोटी रुपये गुंतवणूक करून दरवर्षी व्याज जमा करावे पण अधीकारी दिशाभूल करतात याचे वाईट  वाटते एस टी मजबूत करण्यासाठी प्रवासी व कर्मचारी हितासाठीच संघटित होवुन एसटी वाचविण्यासाठी सर्वांनी एकजुट दाखवावी असे अवाहनही श्रीगोड यांनी केले आहे.


बेलापूर(वार्ताहर)सहकारी संस्था सामाजिक  संस्था असल्याने कारभार पाहणाऱ्या प्रतिनिधींनी सभासदांभिमुख सचोटीने कार्यक्षम कारभार केल्यास संस्थेची हमखास प्रगती होते याचे उत्तम उदाहरण म्हणजे बेलापूर सेवा सहकारी सोसायटी होय,असे गौरवोद्गार जिल्हा बँकेचे संचालक व श्रीरामपूरचे उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी काढले.

बेलापूर बुद्रुक सेवा सोसायटीच्या वतीने संस्थेच्या ९३३ सभासदांना दीपावलीनिमित्त प्रत्येकी पंधरा किलो साखर, पंधरा टक्के लाभांश आणि मिठाई तसेच कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांचा पगार बोनसचे वितरण शुभारंभ प्रसंगी ससाणे बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष व साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर होते.

यावेळी बोलताना गुजर म्हणाले की,बऱ्याचदा चुकीच्या लोकांच्या हाती सत्ता गेल्याने गैरकारभारामुळे सहकार क्षेत्र बदनाम होताना दिसते.मात्र बेलापूर सोसायटीने सभासदांच्या विश्वासाशी प्रामाणिक राहुन कारभार केल्यामुळे आज संस्था विकासाच्या बाबतीत आघाडीवर आहे.या क्षेत्रात विश्वास जागवून तो वृद्धिंगत करण्याची गरज आहे.

बाजार समितीचे संचालक व संस्थेचे मार्गदर्शक सुधीर नवले यांनी  संस्थेचे कामकाज आणि वाटचालीची सविस्तर माहिती दिली. तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष अरूण पा. नाईक यांनी संस्थेच्या कारभाराबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी  संस्थेचे माजी अध्यक्ष सुधाकर पा. खंडागळे, विलास मेहेत्रे, जनता आघाडी प्रमुख रविंद्र खटोड,आदींनी आपल्या मनोगतातून सुचना केल्या.

यावेळी सर्वश्री त्र्यंबकराव कु-हे,शेषराव पवार, प्रकाश नाईक, द्वारकानाथ बडधे, अजय डाकले, दत्ता कु-हे,गोरक्षनाथ कु-हे,विश्वनाथ गवते,प्रकाश कु-हे,जालिंदर गाढे, ज्ञानदेव वाबळे, पंडितराव बोंबले,प्रकाश मेहेत्रे,सोपान कु-हे,एस. के. कु-हे ,दीपक निंबाळकर, चंद्रकांत नाईक, पत्रकार अशोक गाडेकर,मारुतराव राशीनकर,प्रा. ज्ञानेश गवले,देविदास देसाई,सुहास शेलार, दीपक क्षत्रिय, दिलीप दायमा बाळासाहेब भांड, भाऊसाहेब तेलोरे, विजय शेलार, बंटी शेलार, बाळासाहेब लगे, अय्याज शेख, वैभव कु-हे,संजय गोसावी,सचिव विजय खंडागळे आदींसह मोठया संख्येने सभासद उपस्थित होते.साखर, लाभांश, बोनस व मिठाई मिळुन संस्थेच्या वतीने सुमारे अकरा लाख रुपयांचे सभासदांना वाटप करण्यात आले.संस्थेचे चेअरमन अनिल नाईक यांनी प्रास्ताविक केले तर व्हा चेअरमन कलेश सातभाई यांनी आभार मानले.

बेलापूर(प्रतिनिधी ):-बेलापूर बु।।ग्रामपंचायत प्रशासनाने दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याच्या वेतनासह दोन महिन्यांचे वेतन बोनस मिळून सुमारे नऊ लाखाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या बँकखाती वर्ग केली तसेच नविन गणवेशाचे वाटप करुन कर्मचाऱ्यांचा दिवाळी सण गोड केल्यची माहिती सरपंच महेन्द्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी दिली.यासंदर्भात माहिती देताना त्यांनी सांगीतले की,गेली दोन वर्षे कोरोना महामारीचे संकटामुळे ग्रामपंचायत वसुलीला खिळ बसली होती.उत्पन्न  घटल्याने ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती बिकट बनली होती.अशाही स्थितीत काही व्यापारी बंधू ,व्यावसायिक व नागरिकांनी वसुलीसाठी सहकार्य केले.त्यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करणे ग्रामपंचायत प्रशासनाला शक्य झाले.      ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद सदस्य शरद नवले,ज्येष्ठ नेते सुनिल मुथा,रणजीत श्रीगोड,जालिंदर कु-हे,शरद देशापांडे,विष्णुपंत डावरे,प्रभाकर कु-हे,भाऊसाहेब कुताळ,भास्कर बंगाळ,प्रकाश नवले,सुरेश कु-हे,प्रफुल्ल डावरे आदिंच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात बोनस व गणवेश वाटप कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी शरद नवले, सुनिल मुथ्था,विष्णुपंत डावरे,रणजित श्रीगोड,जालिंदर कु-हे,प्रफुल्ल डावरे,सरपंच महेन्द्र साळवी,उपसरपंच अभिषेक खंडागळे आदींची भाषणे झाली. कार्यक्रमास सुरेश कु-हे,प्रकाश नवले,भाऊसाहेब कुताळ, भास्कर बंगाळ, प्रभाकर कु-हे,ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे,ग्रामपंचायत सदस्य तबसुम बागवान,स्वाती अमोलिक,चंद्रकांत नवले,मुश्ताक शेख,रमेश अमोलिक,बाबुलाल पठाण,प्रभात कु-हे,  गणेश बंगाळ,दादासाहेब कुताळ,सागर कु-हे,महेश कु-हे,सद्दाम आतार,तस्वर बागवान,विशाल आंबेकर, यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी आदि उपस्थित होते.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) शासनाने अधिस्वीकृती पत्र धारक व सामान्य पत्रकार यांच्यात दुजाभाव केला आहे केंद्र शासनाकडून समाचार पत्रास मान्यता मिळवून आर एन आय नोंदणी क्रमांक मिळविणाऱ्या संपादक व पत्रकार यात शासनाने दुजाभाव करून छोट्या पत्रकारांवर मोठा अन्याय केला आहे अशा सर्व पत्रकारांसाठी महाराष्ट्र लघु वृत्तपत्र पत्रकार संघाच्या वतीने लढा देऊन शासनाचे लक्ष केंद्रित करणार असल्याचे महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत आली यांनी सांगितले रविवार दिनांक 31/ 10 /2021 रोजी दुपारी दोन वाजता पत्रकार संघाच्या श्रीरामपूर येथील मुख्य कार्यालयात श्रीरामपूर तालुक्यातील पत्रकारांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत आली बोलत होते पत्रकारांच्या सामाजिक शैक्षणिक व आर्थिक अडीअडचणी संदर्भात चर्चा करणे का मी तसेच वार्षिक स्नेह मेळावा घेणे का मी व पत्रकार संघात नवीन पत्रकारांचा समावेश करण्याकरिता या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते बैठकीच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष व रुग्ण मित्र सुभाष राव गायकवाड हे होते अध्यक्षपदाची सुचना पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राज मोहम्मद शेख यांनी मांडली त्यास अनुमोदन पत्रकार संघाचे युवा कार्याध्यक्ष संदीप पवार यांनी दिले सूत्रसंचालन व प्रास्ताविक राज मोहम्मद शेख यांनी केले यावेळी रामगड येथील पत्रकार राज मोहम्मद शेख ,रसूल शेख यांना उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष पदावर पदोन्नती करण्यात आली याच बरोबर रामगड येथील महिला चळवळीतील कार्यकर्त्या सौ समीना रफिक शेख यां ची अहमदनगर जिल्हा महिला उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली श्रीरामपूर येथील युवा कार्यकर्ते व पत्रकार इम्रान सरदार पठाण यांची श्रीरामपूर शहर सचिव पदावर तर ममदापूर येथील पत्रकार व दलित मित्र शब्बीर फत्तु भाई कुरेशी

यांची राहता तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र व ओळख पत्र देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले या बैठकीत राज मोहम्मद ,शेख असलम बिन साद, कासम शेख ,एजाज शेख ,कुमारी अश्विनी अहिरे ,शब्बीर कुरेशी आदींनी मनोगत व्यक्त केले आपल्या प्रमुख भाषणात शेख बरकत आली पुढे म्हणाले की पत्रकारांनी बातमीची शहानिशा करूनच बातम्या वृत्तपत्र पोर्टल न्यूज अगर न्यूज चैनल मध्ये प्रसिद्ध केल्यास पत्रकार अडचणीत येणार नाही समाजातील चांगल्या किंवा वाईट बातम्या पत्रकारांना प्रसिद्ध कराव्या लागतात सांगली बातमी छापल्यावर पत्रकाराची बाह वाह होते मात्र एखाद्याच्या भ्रष्टाचाराबाबत बातमी प्रसिद्ध केल्यास ती व्यक्ती पत्रकारावर लांछन लावून त्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करते अशा वेळेस पत्रकाराने घाबरून जायचे काहीच कारण नाही पत्रकार संघ खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभा आहे त्याला अडचणीतून बाहेर आणण्याची दानद पत्रकार संघ मध्ये आहे काळजी करायचे कारण नाही असे त्यांनी सांगितले आपल्या अध्यक्षीय भाषणात सुभाष राव गायकवाड यांनी सांगितले की मी गेल्या चार पाच वर्षापासून या पत्रकार संघात काम करीत असून माझ्या काही जवळच्या मित्रांनी मला जातीचे आंतर दाखविले त्यांना मी सांगितले की मी रुग्णमित्र आहे रुग्णांना जात पाहून हॉस्पिटल मध्ये नेत नाही सगळे रुग्ण मला समान आहेत आणि डॉक्टरही मुस्लिमांना वेगळं आणि हिंदूंना वेगळा औषध उपचार करीत नाही त्यामुळे या पत्रकार संघात मला कधीही भेदभाव दिसला नसल्या ने मी या पत्रकार संघाचा घटक आहे असे त्यांनी सांगितले या बैठकीस पत्रकार संघाचे महासचिव शेख फकीर मोहम्मद प्रदेश युवा अध्यक्ष संदीप पवार श्रीरामपूर शहर अध्यक्ष रियाज खान पठाण बेलापूर शहर उपाध्यक्ष अस्लम भाई सय्यद श्रीरामपूर शहर संघट कुमारी अश्विनी अहिरे सामाजिक कार्यकर्ते अमीर बेग मिर्झा पत्रकार रमेश शिरसाट पत्रकार संघाचे सदस्य मोहम्मद गौरी व रसूल भाई शेख आदींसह इतर पत्रकार उपस्थित होते उपस्थितांचे आभार श्रीरामपूर तालुका कार्याध्यक्ष कासम भाई शेख यांनी मानले.


बेलापुर  (प्रतिनिधी )- पोलीस दलाच्या वतीने घेण्यात आलेल्या पी एस यु वन प्रशिक्षण शिबीरात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल बेलापुर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे यांचा सन्मान करण्यात आला      पोलीस दलाच्या वतीने हवालदार पदावर बढती मिळविणार्या पोलीस नाईक या पदावर कार्यरत असणार्या पोलीसाचे प्रोफेशनल स्किल अपडेग्रीशन कार्यक्रम धुळे येथे संपन्न झाला या शिबीरात धुळे जळगाव नांदुरबार वाशिम नाशिक ठाणे अहमदनगर आदि सात जिल्ह्यातील तीनशे पोलीस सहभागी झाले होते या शिबीरात ईन डोअर व आऊट डोअर अशा परीक्षा घेण्यात आल्या होत्या या वर्षी प्रथमच राज्याचे पोलीस महासंचालक संजयजी पांडे यांच्या संकल्पनेतुन पहीले तीन स्पर्धाकांना बक्षीस देण्यात आले या परीक्षेत अहमदनगर जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी  तीनही क्रमांक पटकावीले उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तीन पोलीसांचा सन्मान पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला  प्रथम क्रमांक  बेलापुर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे यांनी मिळवीला द्वितीय क्रमांक नेवासा पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणारे बबन तमनर यांनी मिळवीला तर तृतीय क्रमांक नगर कार्यालयातील नानासाहेब गीरे यांनी मिळवीला पोलीस प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य किशोर काळे उपप्राचार्य पवार यांच्या हस्ते पोलीस दलातील तीनही कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला

.

अहमदनगर प्रतिनिधी :- दीपावलीच्या पार्श्वभूमीवर कापड बाजारात होणारी गर्दी विचारात घेता अहमदनगर शहर पोलीस दलाच्या वतीने कापड बाजार व्यापारी असोसिएशन यांची बैठक घेतली त्या बैठकीला आमदार श्री संग्राम जगताप उपस्थित होते.

मागील दीड वर्षापासून धोरणामुळे ठप्प झालेला व्यवहार पूर्वपदावर येत आहे आगामी दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर कापड बाजारात खरेदी करता नागरिकांची झुंबड उडत असते. कोरोना चे नियम पालन करून व्यापार पूर्वपदावर आणण्याचा पोलीस प्रशासन प्रयत्न करीत आहे. त्या अनुषंगाने सदरची बैठक बोलविण्यात आली होती बैठकीमध्ये व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यात आल्या कोरोना च्या पार्श्वभूमीवर

बाजारामध्ये गर्दी होऊ नये आणि कोरोना चा संसर्ग पुन्हा वाढ नये याकरता पोलीस प्रशासन दक्षता घेत आहे त्या अनुषंगाने व्यापाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर कापड बाजार मध्ये महिला मोठ्या संख्येने खरेदी करता येत असतात हे ध्यानात घेता कापड बाजारांमध्ये अतिरिक्त महिला पोलिस बंदोबस्त नेमण्यात येणार आहे असे DySP संदीप मिटके यांनी कळविले.

व्यापारी व नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे असे आव्हान पोलीस विभागातर्फे करण्यात आलेले आहे. बैठकीनंतर आमदार संग्राम जगताप व Dysp संदीप मिटके यांनी कापड बाजारांमध्ये पायी फिरून परिस्थितीचा आढावा घेतला. सदरच्या बैठकीस आमदार संग्राम जगताप, Dysp संदीप मिटके, PI संपत शिंदे,PI ज्योती गडकरी,PI भोसले, API देशमुख, कापड बाजार व्यापारी असोसिएशनचे संभव काठेड,  कुणाल नारंग, ईश्वर  बोरा  , प्रतीक बोगवत , विजय गुगळे,  विक्रम मुथा,  आनंद मुथा,  रवी कितनी, धीरज पोखर्णा, केतन मुथा,  संजय  चोपडा, विशाख वैद्य,  प्रकाश  बायड, संजय बोगावत , रवी कराचीवाला ,  धीरज मुनोत , दीपक नावालानी उपस्थित होते.




श्रीरामपूर प्रतिनिधी:-  दि.02/02/2020 रोजी पीडित महिला ही तिच्या बहिणीच्या आजारी मुलाला भेटण्यासाठी पढेगाव येथे जाण्यासाठी बेलापूर रिक्षा स्टँडवर गेली असता तेथे आरोपी आसिफ कबिर पठाण रा . हरेगाव ता श्रीरामपूर हा तेथे जाऊन तिस खोटे बोलून त्याच्या मोटरसायकलवर  बसण्यास भाग पाडून तिला नगर मनमाड रोड ने राहुरी कृषी विद्यापीठाजवळील मुळा उजवा कालव्या जवळील रोडणे धरणाच्या दिशेने विद्यापीठाच्या मोकळ्या जागेत झाडाझुडपात नेऊन माझे तुझ्यावर प्रेम आहे व मला तुझ्याशी लग्न करायचे आहे असे म्हणून पीडितेस  बळजबरी करू लागला पीडितेने त्यास विरोध केला म्हणून आरोपीने त्याची जवळील सत्तुरने पीडितेच्या गळ्यावर छातीवर ,दंडावर, हाताचे पंजे व इतर भागावर वार करून  पीडितेस जातीवाचक शिवीगाळ   केली त्यानुसार  राहुरी पो.स्टे. Cr.no 74/2020  अ. जा.ज. प्र. का.क. 3 (2), (5),प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्याचा तपास Dy.S.P.  राहुल मदने यांनी करून चार्जशीट न्यायालयात दाखल केले. सदर गुन्ह्याच्या तपासात उपविभागीय  पोलीस अधिकारी कार्यालय श्रीरामपूर येथील म. पो. ना. अश्विनी पवार यांनी मोलाची कामगिरी केली सदर प्रकरणात ॲड. अनिल ढगे यांनी सरकारी पक्षाची  बाजू मांडली. मा.अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री ए. एम. शेटे साहेब यांनी आरोपींना भादवि कलम 307  अन्वये दोषी ठरवून सात वर्षे सक्तमजुरी व 25000/- रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली व अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायदा कलम 3(2),(5), अन्वये सात वर्षे  सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.  या दोन्ही शिक्षा एकत्रित  भोगावयाच्या आहेत असा हुकूम झाला

.        सदर खटल्यात एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले त्यात Dy.s.p.राहुल मदने यांची साक्ष महत्त्वाची ठरली, आणि विशेष बाब म्हणजे खटल्याचे कामकाज सुरू झाल्यापासून 27 दिवसात निकाल लागला. पैरवी अधिकारी म्हणून H.c. तुपे यांनी काम पाहिले.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget