श्रीरामपूर प्रतिनिधी:- दि.02/02/2020 रोजी पीडित महिला ही तिच्या बहिणीच्या आजारी मुलाला भेटण्यासाठी पढेगाव येथे जाण्यासाठी बेलापूर रिक्षा स्टँडवर गेली असता तेथे आरोपी आसिफ कबिर पठाण रा . हरेगाव ता श्रीरामपूर हा तेथे जाऊन तिस खोटे बोलून त्याच्या मोटरसायकलवर बसण्यास भाग पाडून तिला नगर मनमाड रोड ने राहुरी कृषी विद्यापीठाजवळील मुळा उजवा कालव्या जवळील रोडणे धरणाच्या दिशेने विद्यापीठाच्या मोकळ्या जागेत झाडाझुडपात नेऊन माझे तुझ्यावर प्रेम आहे व मला तुझ्याशी लग्न करायचे आहे असे म्हणून पीडितेस बळजबरी करू लागला पीडितेने त्यास विरोध केला म्हणून आरोपीने त्याची जवळील सत्तुरने पीडितेच्या गळ्यावर छातीवर ,दंडावर, हाताचे पंजे व इतर भागावर वार करून पीडितेस जातीवाचक शिवीगाळ केली त्यानुसार राहुरी पो.स्टे. Cr.no 74/2020 अ. जा.ज. प्र. का.क. 3 (2), (5),प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्याचा तपास Dy.S.P. राहुल मदने यांनी करून चार्जशीट न्यायालयात दाखल केले. सदर गुन्ह्याच्या तपासात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय श्रीरामपूर येथील म. पो. ना. अश्विनी पवार यांनी मोलाची कामगिरी केली सदर प्रकरणात ॲड. अनिल ढगे यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली. मा.अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री ए. एम. शेटे साहेब यांनी आरोपींना भादवि कलम 307 अन्वये दोषी ठरवून सात वर्षे सक्तमजुरी व 25000/- रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली व अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायदा कलम 3(2),(5), अन्वये सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. या दोन्ही शिक्षा एकत्रित भोगावयाच्या आहेत असा हुकूम झाला
. सदर खटल्यात एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले त्यात Dy.s.p.राहुल मदने यांची साक्ष महत्त्वाची ठरली, आणि विशेष बाब म्हणजे खटल्याचे कामकाज सुरू झाल्यापासून 27 दिवसात निकाल लागला. पैरवी अधिकारी म्हणून H.c. तुपे यांनी काम पाहिले.
Post a Comment